आपापल्या कोण्या एका मित्राच्या फोटोंवर, रापचिक, कड्डक, छावा अशा शब्दांपासून सुरु झालेला प्रवास 'जाळ आणि धूर संगटच' , 'टांगा पलटी घोडे फरार', 'विषय खोल' सारख्या एकोळ्यां मार्गे पुढे जाऊन उखाणे म्हणून चांगलाच रुजला आणि फोफावला.
माझ्या बघण्यात आलेले प्रकार म्हणजे
प्रकार १ - भावाला कोणत्यातरी प्रसिद्ध नटाचे वगैरे नाव देणे
१. फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी
२. पोह्याला दिली फोडणी, फोडणीत टाकले जिरे-मोहरी, कडीपत्ता अन् हींग,
भाऊच्या फोटोला बघुन पोरी म्हणतात हाच माझा 'कवळा कबीर सिंग'!
३. भाऊंनी केला पोरींना पिन....भाऊंनी केला पोरींना पिन,
पोरी म्हणतात हाच तर आमचा जॉनी सिन..
४. काल भाऊ ने खाल्ली मेथीची दशमी
भाऊ गॉगल लावून दिसतो इम्रान हाशमी
प्रकार २ - भावाचे वर्णन
१. च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा, च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात, " आला गं माझा कवळा!
२. भावा तुझा फोटो म्हणजे नादखुळा, पब्लिक गोळा
भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा
३. आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा, आमचा भाऊ आहे मुलींचा लाडका ससा
पण हा सख्तभाऊ नेहमी मुलींना म्हणतो लांबच बसा, लांबच बसा
४. जिरा राईस मध्ये असतो जिरा...
भाऊ ने फोटो टाकला की पोरी म्हणतात हाच आमचा कोहिनूर हिरा.
५. मिर्चीत मिर्ची लाल मिर्ची, मिर्चीचा उडला खक्णा
सगळ्या गावातल्या मुली म्हणतायत कसा बघतोय बघ चिक्णा
६. आटली डाटली बाटली, मुली म्हणतात हाच आमचा जेटली
पण हा भाऊ म्हणतो मला काही नको द्या फक्त मटनाची ताटली
प्रकार ३ - भावावर फिदा असलेल्या किंवा भावाच्या आवडीच्या नट्या
१. भाऊंच्या घरात मारबल ची फरशी
क्रिती सॅनन म्हणते होणार सून मी ह्या घरची
२. कापलेल्या कोंबद्यातून वाहतय रक्त..
भाऊ आमचे "टिंबटिंब"चे भक्त टिंबटिंब च्या जागी सनी लियोनी, कटरिना कैक, दीपिका वगैरे कोणीही असू शकते.
३. राजासारख मन, मनासारखा राजा!
कियारा आडवाणी म्हणते मेरे घर आजा
सध्याच्या लॉक डाऊन काळात असेही काही वाचायला मिळाले....
१. Terrece वर उभा माझा भाऊ..
मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय #quarantine मध्ये कशी राहु
२. सध्या गल्लीत माणूस नाही फिरतंय काळं कुत्रं
पोरी म्हणत्यात भाऊच घालणार आम्हाला मंगळसुत्र
जशा ओव्या नक्की कोणी लिहिल्या सांगता येत नाहीत तसेच ह्या ओळी देखील नक्की कोणी रचल्या ते सांगता येत नाही.
एक प्रकारे ह्या ओळी म्हणजे आधुनिक लोककाव्यंच जणू.
तर असे उखाणे किंवा ह्या प्रकाराला जे काही म्हणतात ते प्रतिसादात लिहावे ही विनंती.
मुलींकरता असे उखाणे माझ्या बघण्यात तरी आलेले नाहीयेत. पण म्हणून मुद्दाम असे उखाणे तयार करू नये असे मात्र नाही.
किंवा आपल्या वाचनात असे उखाणे आले असतील तर ते पण लिहा.
धमाल चाललीय
धमाल चाललीय
धमाल चाललीय
धमाल चाललीय
आजकाल माबोवर कुठच्याबी
आजकाल माबोवर कुठच्याबी येत्यात ॲड
ताईच्या नावावर कायपण खपवायचं, हे कुठचं नवं फॅड?
मी पण दोन दोन वेळा धागा नक्की
मी पण दोन दोन वेळा धागा नक्की कोणाचा आहे हे बघितले. हर्पेन भाऊंचं हे रूप माहितच नव्हतं ना.
भाऊ आणि दीदी जोरात आहेत, चालूद्या
सरांच्या पोटावर पाय देऊ नका ओ
सरांच्या पोटावर पाय देऊ नका ओ नवीन सर
हा प्रकार मुद्दामून फेसबुकच्या कोप-यात पाहिलाय. मज्जा असते सगळी.
उद्या अकरा वाजता भाई फोटो सोडणार. सर्वांनी डीपी वॉरला तयार रहा. अशी पोस्ट येते.
कल दिखा देंगे किसमे कितना है दम.
दुसर्या दिवशी अकराला भाई फोटो सोडतो (फोटो पोस्ट करतो). त्याच्या मागे बाँबस्फोट झाल्याचं चिन्ह म्हणून आगकल्लोळ असतो. भाई तिथून चालत येत असलेला. दोन्ही बाजूला दोन सिंह डाव्या कोपर्यात स्टार आकाराचे रक्त. एक बंदूक.
अशा डीपीवर मग असल्या कमेण्ट्स येतात.
ओहहह!!!
ओहहह!!!
एक सेकंद मला वाटलेलं हर्पेनजींचा आयडी हॅक झाला की काय!!!!!
आणि ही कमेंट पहिल्यांदा केली तेव्हा पेज हँग झालं होतं!
शब्दखुणा आवडल्या
शब्दखुणा आवडल्या
मी पण दोन दोन वेळा धागा नक्की
मी पण दोन दोन वेळा धागा नक्की कोणाचा आहे हे बघितले. हर्पेन भाऊंचं हे रूप माहितच नव्हतं ना. >>> अगदी अगदी.
धन्यवाद मंडळी. कधीतरी
धन्यवाद मंडळी. कधीतरी विरंगुळा पण बरा असतो जीवाला.
शां मा - सरांचे पोट खूप मोठे आहे.
त्यांच्या पोटावर मी पाय दिल्याने काही फरक पडणार नाही.
पण त्यांना घाबरून मी
"अरे नको तो शाहरुख अन नको तो सल्लू
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात, आलं माझं पिल्लू ...."
हा उखाणा लिहिलाच नाही.
मस्त मज्जा येतेय वाचायला..
मस्त मज्जा येतेय वाचायला.. सुचत नाहीये काही लिहायला
>>>>>>>>आजकाल माबोवर
>>>>>>>>आजकाल माबोवर कुठच्याबी येत्यात ॲड
ताईच्या नावावर कायपण खपवायचं, हे कुठचं नवं फॅड?
माहीत नाही का तुला गुगलचं अॅड मॅनेजमेन्ट फीचर
तोंडात मारते कत्रिना-करीनाच्या ताईची झीरो फिगर
अगदी ताजा
अगदी ताजा
दुनिया में हर तरफ छाया है qurantine..
भाई की स्माइल देखकर हर लड़की बोलती है Will you be my Valentine..
हर्पेन .... यु टु
हर्पेन .... यु टु

<<< १. च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा, च्यवनप्राष मध्ये टाकतात आवळा,
भाऊंना बघून पोरी म्हणतात, " आला गं माझा कवळा! >>>> अरारा पार इज्जत काढली
गेला quarantine, आला
गेला quarantine, आला Valentine
ताईला काय त्याचं, ती तर रोजच Rose क्वीन...
हर्पेनभाऊंनी सध्द्या सुरू
हर्पेनभाऊंनी सध्द्या सुरू केला दंगा
सी ताईंशी मात्र घेऊ नका पंगा
अग्ग काय हे! चाललं आहे जरा
अग्ग काय हे! चाललं आहे जरा बरं तर ...
काश्मिरी पुलावात घातल्या लवंगा चार,
सीताईची माबोकारांवर माया फार....
चाललयं बरं चाललयं बरं
चाललयं बरं चाललयं बरं
….ताई म्हणतात आमचचं खरं
एकच वादा…….दादा
नाहीतर होईल सगळा राडा
वा वा, सी ताई…नवीन उखाणा मस्त
वा वा, सी ताई…नवीन उखाणा मस्त.
भारी आहे
भारी आहे
सी,भारी.
सी,भारी.
भावाकरता कायपण आजपण उद्यापण
भावाकरता कायपण आजपण उद्यापण
हर्पेनभाऊंनी केले आयर्नमॅनचे उद्यापन.
स्पर्धेत स्पर्धा स्पर्धेत स्पर्धा, आहे मोठी आयर्नमॅन
भाऊ आले इटलीला धावून, फुल्ल स्पीड करा फॅन.
आटली बाटली कचकन फुटली
आयर्नमॅन्साठी भाऊने इटली गाठली.
आटली बाटली कचकन फुटली
देऊन भाऊला शुभेच्छा मायबोली दमली.
अरे नको तो शाहरुख अन नको तो
अरे नको तो शाहरुख अन नको तो सल्लू
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात, आलं माझं पिल्लू ..>>>
मस्तच बारसी ताई
मस्तच
बारसी ताई
हर्पेनभाऊंसाठी केलेली कविता
आयर्नमॅन हर्पेनभाऊंसाठी केलेली कविता लय भारी.
"बोअर करतेस बोअर करतेस",
"बोअर करतेस बोअर करतेस", ताईला पीडले फारच

मात्र आयर्नमॅन मेडलवरही, भाऊला लाभले सारस..
सीताई.. ते मेडलवरचे सारस
सीताई.. ते मेडलवरचे सारस पाहून तुमचीच आठवण आलेली.
तसं नको म्हणू, It's his
तसं नको म्हणू, It's his moment. गेंड्याचे मेडल देणार्या मॅरॅथॉन शोधल्या पण त्या पार आफ्रिकेत आहेत
गेंड्याचे उखाणे तिकडे मेडल येईल तेव्हा.
भावाकरता काय पण आजपण उद्यापन!
भावाकरता काय पण
आजपण उद्यापन!
बा, (सी तसं बा)
बा, (सी तसं बा)
मनापासून धन्यवाद
थेंबांचे करते मोती, तिला
थेंबांचे करते मोती, तिला हिंदीत म्हणतात सिपी,
भाऊ मात्र सांगेना आयर्नमॅन लाडू रेसिपी...
धावपळीच्या वेळी नेहमी चालवतो उबंटूची रिक्षा
लाडूची रेसिपी घेते मात्र भाऊची सत्वपरीक्षा
आत्या आमची नेहमी मागते जादा साडी बस्त्यात
भाऊ ठेवतो आयर्नमॅन लाडू रेसिपी गुलदस्त्यात
(संदर्भः हा धागा!!)
Pages