रोलिंगचं चुकलं का? काय चुकलं?

Submitted by भास्कराचार्य on 10 January, 2022 - 15:30
जे के रोलिंग

हॅरी पॉटर चित्रपटसृष्टीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'हॉगवार्ट्स रियुनियन' नावाची विशेष डॉक्युमेंटरी नुकतीच स्ट्रीम व्हायला लागली, आणि अनेकांना त्यातून पुन्हा बालपणीचा नाहीतर तरूणपणीचा काळ सुखाचा अनुभवायला मिळाला. अनेक आठवणींनी भरलेल्या‌ ह्या जगात जे के रोलिंग या हॅरीच्या लेखिकेला मात्र महत्त्वाचं स्थान मुद्दाम दिलं नाही की काय, असं अनेकांना वाटलं. तिच्या रीळाला मुद्दाम २०१९ची तारीख दाखवली गेली. का बरं असेल असं?

रोलिंगने २०२०मध्ये एक ट्वीट (https://mobile.twitter.com/jk_rowling/status/1269382518362509313?lang=en-GB) केलं होतं. 'Women' अर्थात स्त्री हा शब्द न वापरता 'people who menstruate' अर्थात 'ज्यांना पाळी येते किंवा रजस्राव होतो ते' असा शब्दप्रयोग काही लोक आजकाल करतात. 'ट्रान्स बायका' म्हणजे जन्मवेळेस शारिरीकदृष्ट्या पुरूष असल्याने (अर्थात 'बायॉलॉजिकल सेक्स' पुरूष,‌ ह्यात पुरूषलिंग असणे वगैरेचा‌ समावेश) समाजाकडून पुरूष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पण ज्यांची स्वतःला स्वतःच्या लिंगाबद्दलची असलेली ओळख अर्थात जेंडर आयडेंटिटी त्यांना आपण स्त्री आहोत असं सांगत असते, अश्या व्यक्ती. मग‌ ती ओळख व्यक्त होण्यासाठी असे लोक साधारणपणे बायकांचेच‌ कपडे घालतील, बायकांसारखे वागतील, असं करू शकतात. अश्या बायकांचाही समावेश 'विमेन' म्हणून व्हावा, अश्यासाठी त्या स्वतः व अनेक ॲक्टिव्हिस्ट आग्रही असतात. त्यामुळे 'शारिरीकरीत्या स्त्री आणि स्वतःबद्दलच्या‌ ओळखीनेही स्त्री' अश्या (प्रौढ) व्यक्तींनाच फक्त 'विमेन' म्हणून ओळखलं जाऊ नये, अश्या हेतूने 'people who menstruate' हे अश्या बायकांना म्हणावं, आणि 'women' हा शब्द ट्रान्स बायकांना इन्क्ल्युड करून वापरावा, असा एक मतप्रवाह आहे. एकंदरीतच people who menstruate = all women हे गृहीतक रद्दबातल ठरवावं, आणि बायकांना फक्त त्यांच्या शारिरीक वैशिष्ट्यांनी डिफाईन केलं जाऊ नये, हा हेतूही अश्या शब्दप्रयोगातून कंटेक्स्टनुसार साध्य होतो, असाही ह्या मताच्या लोकांचं म्हणणं आहे.

असे ट्रान्स पुरूषही असतात.‌ शारिरीक लिंग आणि मानसिक ओळख एकच असेल, तर ती व्यक्ती cis आणि वरच्याप्रमाणे वेगवेगळी असेल, तर ती‌ व्यक्ती trans असं साधारणपणे म्हटलं जातं. फक्त बायकांचंच असं आहे, असं काही नाही.

रोलिंगने मात्र तिच्या त्या ट्वीटमध्ये ह्या मतप्रवाहावर जोरदार आक्षेप घेतला. तिच्या मते cis बायका ह्याच बायका, त्यांना people who menstruate वगैरे म्हणू नये. तिचं हे‌ मत 'ट्रान्स' बायकांना एक्सक्ल्युड करणारं आहे, असं अनेकांना वाटलं. अनेक ट्रान्स वाचकांना 'हॅरी'मध्ये त्यांच्या ओळखीच्या संघर्षातला एक आधार सापडला होता. त्यांना ह्यामुळे रोलिंगने दगा दिल्याची भावना झाली. खुद्द हॅरीच्या चित्रपटांतल्या स्टार्सनी अश्या ट्वीटचा निषेध केला. मात्र रोलिंग आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली, व तिने नंतरही वेळोवेळी अश्या अर्थाचेच भूमिका समजवणारे वगैरे ट्वीट्स केले. मात्र अनेक‌ तरूण लोकांचा तिच्यावर रोष झाला तो झालाच. अश्या वातावरणात तिच्याशी जास्त‌ संबंध नको, म्हणून चित्रपट निर्मात्यांनी नंतर तिचे बोल फार घेतलेले नाहीत, आणि जे घेतले तेही २०२०च्या पूर्वीचे आहेत (तेव्हा माहिती नव्हतं) बुवा, अश्या प्रकारे घेतले, असं दिसतं. हे बरोबर आहे का?

ही सर्व चर्चा हॅरी पॉटरच्या धाग्यावर सुरू झाली. तिला योग्य स्थान मिळावं, म्हणून हा चर्चेचा धागा. इथे माहिती‌ मिळवा, लिहा, विचारा, तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं? तेही सांगा. मात्र चर्चा निकोप व्हावी ही अपेक्षा.

Group content visibility: 
Use group defaults

आमच्या ऐकीवात एक बाई होत्या ज्यांना गर्भाशय नव्हते. त्यांना पाळी येत नसे. एका विधुर व्यक्तीशी त्यांचे लग्न झाले होते.

मग त्यांना स्त्री म्हणायचे की पुरुष की ट्रान्स?

धन्यवाद, भाचा.
माझ्या माहितीनुसार २०१९ मध्ये माया फोर्स्टेटरला पाठिंबा देणारं ट्वीट तिने केलं तेव्हापासून तिचा अलेजेड ट्रान्सफोबिया उजेडात यायला सुरुवात झाली.
जेन्डर आयडेन्टिटी हा संवेदनशील विषय आहे आणि लैंगिक अल्पसंख्यांक मुळातच समानतेच्या आणि आत्मशोधाच्याही लढ्यात पोळत असतात, हे लक्षात घेऊन निदान लेखक असणार्‍या व्यक्तीने शब्द जपून वापरायला हवे होते.

ह्या ट्वीट ला आणि त्या भोवतीच्या चर्चेला बराच बॅकग्राउंड आहे. पहिल्या लिंक मध्ये ह्या ट्विट पासून सुरु झालेली चर्चा आणि ट्विट/घटनाक्रम आहे. दुसर्‍या लिंकमध्ये रोलिंगनी तिची मते सविस्तर मांडली आहेत. दोन्ही लिंक आवर्जून वाचाव्यात कारण एकंदरितच हा विषय गुंतागुंतीचा आहे.

https://www.glamour.com/story/a-complete-breakdown-of-the-jk-rowling-tra...

https://www.jkrowling.com/opinions/j-k-rowling-writes-about-her-reasons-...

धाग्याचा विषय ' रोलिंग बाई चुकली का' असा आहे आणि ती चुकली का नाही हे ठरवायला ते दिलेले लेख वाचायला हवेत.

पण 'trans' असा उल्लेख एका व्यक्तीने दुसऱ्याबद्दल करणे हे बरोबर आहे का? हा प्रश्न आणि तुमचं मत काय आहे हे विचारताय?

धन्यवाद भा वेगळा बाफ काढल्याबद्दल. चांगली माहिती. बुवा - वरची पहिली लिंक पाहिली. त्यातलाही घटनाक्रम वाचला.

वैद्यबुवांनी दिलेली दुसरी लिंक उत्तम आहे. रोलिंगने स्वतः सविस्तर लिहिलं आहे.

मी दुसऱ्या धाग्यावर लिहिलं तेच- सेफ प्लेसेसची बायकांना नितांत गरज आहे. तिथे ट्रान्स च्या नावाखाली शरीराने पुरुष असलेल्या पुरुषांना प्रवेश दिला जाऊ नये. अन्यथा स्त्रियांसाठी काही सेफ जागा उरणार नाहीत.

ट्रान्स लोकांसाठी वेगळ्या सेफ प्लेसेस तयार कराव्या. (पण त्याचं फ़ंडिंग बायकांसाठीच्या बजेटमधून घेऊ नये.) त्या वेगळ्या बाथरूम्सना सोन्याचे नळ लावा , नळातून गुलाबजल येऊ द्या- पण बायकांना त्यांच्या साध्या बाथरूम्स सुरक्षितपणे वापरायला ठेवा. तिथे फक्त बायकानाच access द्या.

शरीराने पुरुष पण मनाने स्त्री हा तिसरा जेंडर / तृतीयपंथ असावा. पण 'आम्ही नैसर्गिक बायकांइतक्याच बाई आहोत, काहीच फरक नाही, आम्हाला १००% समान हक्क असावेत' असा हट्ट धरणं , त्यासाठी रोलिंग व इतर स्त्रियांना harrass करणं, १२-१३ वर्षांच्या कोवळ्या मुली यातून predators ची शिकार होऊ शकतील याबद्दल शून्य पर्वा असणं- हे सगळं भयानक विकृत आहे.
हा male previlege, male entitlement चाच एक आविष्कार आहे. रोलींग शेवटी एक 'बाई' आहे. एक 'बाई' आम्हाला विरोध करते , तोंड वर करून बोलते म्हणजे काय- धडा शिकवलाच पाहिजे तिला.

आताच्या दोन प्रतिसादानंतर -
१) आम्हाला स्त्रीच म्हणा.

२) त्यांना काही वेगळे हक्क हवेत.

--------
एकूण गहन प्रश्न आहे.
कुणाला तृतीय पुरुषी ( trans ?) म्हणायचं?

१) आपण जेव्हा सभासद होण्याचे फॉर्मस भरतो तेव्हा पु/स्त्री/इतर इथे ते काय लिहितात? स्वत:लाच 'इतर'म्हणत असतील तर स्त्रियांच्यासाठी असलेल्या जागेत जाऊ शकतील का? ( रेल्वे डबे, टॉइलेट्स) त्यांनी कुठे जावं हा उपप्रश्न येतो आणि ते कोण ठरवणार? न्यायालय का सरकार?

स्वत:ला स्त्री म्हणवतील तर तृतीय पुरुषांचे हक्क जातील ना!
----------------------

Stonewall नावाची एक युकेमध्ये संस्था आहे जी ट्रान्स च्या हक्कांसाठी कार्य करते. या संस्थेची दादागिरी, आक्रस्ताळेपणा आता इतका वाढला आहे की अनेक सरकारी डिपार्टमेंट आणि युनिव्हर्सिटीजनी या संस्थेशी संबंध तोडला आहे.

https://www.theguardian.com/commentisfree/2021/jun/06/stonewall-risks-al...

समाजमन एका रात्रीत घडत नाही...तो वर्षानुवर्ष झालेल्या संस्कारांचा परिपाक असतो...
विषय किचकट त्यामुळे होतो. बदलाला सुरवातीला विरोधच असतो.
रोलिंगने काय करायला हवं आणि काय नको हे ठरवणारे तुम्ही, आम्ही, ट्रान्स वगैरे वगैरे कोण आहोत. तिला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का?

हो
त्यात डम्बलदोर आणि ग्रीनडेलवाल्ड गे असतात म्हणे