रोलिंगचं चुकलं का? काय चुकलं?
Submitted by भास्कराचार्य on 10 January, 2022 - 15:30
हॅरी पॉटर चित्रपटसृष्टीला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'हॉगवार्ट्स रियुनियन' नावाची विशेष डॉक्युमेंटरी नुकतीच स्ट्रीम व्हायला लागली, आणि अनेकांना त्यातून पुन्हा बालपणीचा नाहीतर तरूणपणीचा काळ सुखाचा अनुभवायला मिळाला. अनेक आठवणींनी भरलेल्या ह्या जगात जे के रोलिंग या हॅरीच्या लेखिकेला मात्र महत्त्वाचं स्थान मुद्दाम दिलं नाही की काय, असं अनेकांना वाटलं. तिच्या रीळाला मुद्दाम २०१९ची तारीख दाखवली गेली. का बरं असेल असं?
विषय:
शब्दखुणा: