भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज एकांनी चौकशी केली की ओडया आहेका मेटिंग ला
म्हणलं आहे, पुढे काहिबोलनी झाली नाहीत
घरी पोराला सांगत होतो हे तर म्हणाला ओडीन अजून मॅच्युअर झाला नाही असे मला वाटतं
म्हणलं तुझं सोड अजून ओडीनला तरी आपण मॅच्युअर झालोय हे कळलंय का
अजूनही पपी असल्यागत बागडत असतो सगळीकडे

ते फिमेल्स असतील तर
आम्ही वर पक्षाकडून त्यामुळे आम्ही हुंडा घेतो Happy
जोक्स अपार्ट आता पैसे वगैरे काही नको
एक पिल्लू द्या म्हणून सांगणारे आणि ते कोणीतरी चांगल्या फॅमिलीत देईन

एक पिल्लू द्या म्हणून सांगणारे आणि ते कोणीतरी चांगल्या फॅमिलीत देईन
मी मी....म्हणजे मला पाहिजे एक टिल्लु. :))

अजून ओडीनला तरी आपण मॅच्युअर झालोय हे कळलंय का
अजूनही पपी असल्यागत बागडत असतो सगळीकडे >>> Lol ही तर माझ्या बिगलचीच स्टोरी.
तो 3 वर्षांचा आहे, त्याने फार कधी हम्पिंग केलं नाही, त्यामुळे मेटिंगचा विचार केला नव्हता. पण एक बिगल सुंदरी (खरोखरच खूप सुंदर आहे) मिळाल्यावर व्हेटला विचारून सगळी पूर्वतयारी ( फिमेल डॉगला विशिष्ट औषधं आणि मेल डॉगला तिच्याशी 2-3 वेळा भेट) केली. जेव्हा ती हिटवर होती, तेव्हा व्हेट, 'तिचा' बाबा आणि 'याचा' बाबा जय्यत तयारी करून 'तिच्या' घरी भेटले. पहिली वेळ आहे, व्हेट मदतीला लागेल तर असावा म्हणुन 'तिच्या' बाबाने भरमसाठ फी देऊन 2 तासांसाठी हायर केला होता. व्हेटने सांगितलं की दोघांना distraction नको म्हणुन एका रूममध्ये ठेवा आणि सगळे बाहेर बसा. 20 मिनिटाने व्हेट आत डोकावला तर बालिका वधु आणि छोटा नवरदेव एक खेळणं तोंडात धरून ओढाओढी करत खेळत होते. 45 मिनिटांनी दोघे खेळण्यांमध्ये झोपलेले दिसले. एक सव्वा तासाने दोघे घरभर पकडापकडी खेळुन वस्तु उध्वस्त करायला लागल्यावर आम्ही त्याला घरी परत आणलं. आता दोघांची फक्त एंगेजमेंट करून ठेवली आहे. पुढे 3-4 महिन्याने पुन्हा विचार करू. Happy

वाह मस्त

फुंतरु ला पण ओडीन कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

केक मस्त दिसतोय एकदम

अय्यो सो स्वीट!!! मीरा मस्त किस्सा आहे. असू देत की दोघांना गार्डन ऑफ ईडनमध्ये. सफरचंद खायला लावण्याची घाईच नको Sad

किस्से भारी! बिगल बालविवाह !! हा हा
सध्या आमच्याकडे डॉगी प्रेम उफाळुन आलेले आहे, लेकाच्या नविन शाळेत त्याच्या ५-६ फ्रेन्डस कडे डॉग्स आहेत, रोज पिकपच्या वेळेस कुठल्यातरी डॉगशी हाय-हॅलो करायचेच असते.

5,3 ,2 खेलत आहेत..... Lol

म्हणून तुम्ही 3 वेळा फोटो टाकला का? Wink

मोबाइलवार उपलोड करताना अड़चन होत होती

एकदमच गुण्या गोविंदाने नांदत आहेत की Happy

लेटेस्ट किस्सा
ओडीन चा नाही माझाच
हॉटेल मधून पार्सल घेतले आणि गाडी पाशी आलो तर तिथे एक भुभ्या लोळत पडलेला, त्याला म्हणलं बाजूला हो रे, गाडी काढायची आहे
मग गाडी काढल्यावर म्हणालो हा आता लोळ पाहिजे तेवढा
तिथे बाजूलाच एक माणूस होता, तो म्हणाला तुमच्या घरी कुत्रा आहे ना पाळलेला
मि कन्फ्युज, म्हणलं हो
म्हणे लगेच कळलं ते, बाकीचे ए हाड, ए उठ म्हणाले असते
इतकं कोणी बोलत बसत नाही
मलाही आमच्या rambo मुळे सवय लागली होती सगळ्यांशी असंच बोलायची Happy

हा हा ...
उन्दिर मारला म्हणुन भुभु दोघींचा क्लास घेतोय अस वाटत आहे lol

हो सगळे पटते, फक्त खाताना नाही पटत, सकाळी पळापळी, भंडाभांडी होतात, एकमेकावर गुरगुरतात, पुन्हा एकमेकावर लोळतात

आशुचाम्प मस्त आहे तुमचा किस्सा.
मुक्तेश्वर, तुमचा भुभु माउंची ट्युशन घेतोय.:)
फुंतरुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मीरा, भारी हसले बालिकावधूचा किस्सा वाचून.

आजचा किस्सा एकदम लेटेस्ट
रात्री जेवण झाल्यावर गाडीवर बसवून आम्ही पान खायला जातो कधी कधी, आम्ही म्हणजे मी आणि ओड्या
तो पानवल्या चा पण लाडका आहे, गेल्यावर तो याला कागदावर थोडं गुलकंद घालून देतो, ते ओडीन महाशय मटकवतात
तर आज मी त्याला घेऊन गेलो होतो आणि बोलत होतो
तर एकदम लिश ला झटका बसला आणि ओडीन भुंकत सुटला जोरात
म्हणलं काय झालं तर बघतो तर आमच्या गाडीपाशी एक माणूस हॅण्डसअप पोझिशन घेऊन उभा
मी इतका कन्फ्युज, म्हणलं काय झालं
तर म्हणे मी माझी गाडी लावायला जागा करत होतो आणि ही गाडी हलवली तर तुमचं कुत्रा आला अंगावर
मला हसूच आलं एकदम,म्हणलं अहो ती आमची गाडी आहे, त्याला वाटलं तुम्ही घेऊन चाललंय
बोलता बोलता आम्ही गाडीपाशी आलो
मी त्याच्याशी बोलतोय म्हणल्यावर ओडीन भुंकयाचा थांबला पण लगबगीने गाडीवर चढून बसला आणि शेवटपर्यंत त्या माणसाकडे संशयाने बघत होता
मी त्याला म्हणलं नाही घेऊन चालले ते आपली गाडी, हे बघ चावी आहे माझ्याकडे
तरीही तो उतरला नाहीच अजिबात

पहिले दोन तीन दिवस त्याला काही कळलंच नाही
असेही मी घरी नसल्याची सवय आहे त्याला
पण एकदा आई जेवणाचे वरती घेऊन येताना तिच्या पाठोपाठ आला आणि त्याला कळलं मी इथंच वरच्या खोलीत आहे मग जो काही गोंधळ घातला त्याने
रात्री ऐकेच ना, दरवाजापाशी जाऊन कुई कुई रडत बसला
शेवटी मग त्याला रात्री झोपण्यापूरता आत सोडलं
सकाळी आई नाष्टा घेऊन आली की तिच्या सोबत खाली गेला
त्यानंतर हेच रुटीन सुरू ठेवला, पोरगा त्याला सकाळी पुसून घाययचा रिस्क नको म्हणून

सात दिवसांनी जेव्हा मीच खाली आलो तेव्हा जो काही आनंद झाला त्याला विचारू नका
अक्षरशः गडबडा लोळला
कारण मी नसताना कोणीच त्याला संध्याकाळी फिरायला नेत नव्हते
पण जेव्हा मी म्हणलं मला अजून विकनेस आहे आपण नको जाऊया ते ऐकेना
मग त्याच्याखातर एक राउंड मारून आलो

तसा त्रास म्हणलं तर काहीच नाही

Pages