No judgements please!!!!!!

Submitted by किल्ली on 6 January, 2022 - 12:25

बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...
असं कुठेतरी व्यक्त व्हायचंय की जिथे मला कुणी judge करणार नाही, आगाऊ फुकटचा सल्ला देणार नाही किंवा हे सगळं ऐकून स्वतःच चिंतेत पडणार नाही. मला उपाय नकोय कारण माझी मुळात काही समस्याच नाहीये. भावनांचा निचरा करणं फक्त गरजेचं आहे.ह्यासाठी कुणाशीतरी बोलून बरं वाटतं.
म्हणून तर आपलं हे कोतबो आहे.
...
मनात खूप विस्कळीत विचार आहेत. जसे जमले तसे इथे लिहित जाईन
...
हा धागा म्हणजे शीर्षकात लिहिलं आहे त्याप्रमाणे non judgemental zone असेल इथे तुम्हीही मन मोकळे करू शकता. अर्थात specific सल्ला हवाय असे असेल तर हा तो धागा नाही.
..
मी काय लिहितेय हे समजून घेतलं नाही तरी चालेल.
मला फक्त व्यक्त व्हायचंय. कसं ते समजलं, सुचलं की येथे लिहीन.
तुम्हीही लिहा असं तुमच्यासोबत घडत असेल तर.
.
एखादा क्षण असा येतो, असं वाटतं की, आता नाही सहन होत. मी नाही handle करू शकणार ही परिस्थिती. डोकं out होतं एकदम.
पण मग आपली असहायता लक्षात येते आणि पुन्हा समजूतदार, विनम्र, गुणी मुखवटा चढवून आतल्या आत कुढत शांत बसते,
आपलेच दात आणि आपलेच ओठ! कुणाला काय बोलावं आणि कुणाजवळ कुणाची तक्रार करावी?
आलेला क्षण एक आव्हान समजून हाताळणं एवढंच हातात आहे माझ्या!
खरं तर कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा. ही फक्त सुरुवात आहे हे ठाऊक आहे. अजून मोठी आव्हानं येणार आहेत हेही माहितीये.
पण आता मला फक्त माझ्यापाशी थांबायचं आहे.

तो कठीण क्षण, किंबहुना असे कित्येक क्षण लीलया यशस्वीपणे हाताळून झालेत. आता गरज आहे ती विश्रांतीची, तीही मानसिक!
.
डू आयडी काढून हे लिहू शकले असते पण तेवढा संयम नाही. त्यामुळे risk घेतेय.
..
Thanks a lot माझी हक्काची जागा आणि लोक्स
..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पिहू तुमची post वाचून प्रेरणा मिळाली म्हणून धागा काढला.
मीही कित्येक दिवसापासून अशा non judgemental circle च्या शोधात आहे.
मायबोली is perfect त्यासाठी!
जरी कुणी काही म्हटले तरी i dont care ह्या attitude पर्यंत पोचायचं आहे.

मी मन लावून वाचलं , समजू शकते.
मी कुणासाठीही नो सल्ला/नो जजमेन्ट्स असा शांतपणे ऐकणारा कान व्हायला तयार आहे.

<< बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. >>

------
आपण उगाचच घाबरत घाबरत जगत असतो. " असे झाले तर, तसे झाले तर.... "
"prepare for the worst but hope for the best".

मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!>> मी तर बऱ्याचदा गोष्टींची सुरुवातच नकारात्मकतेने करते.. जणू काही सगळं वाईटच घडणार आहे..मग पुढे जाऊन थोडंसं काहीतरी चांगलं घडलं की फार सुखावते..अती चांगलं घडलं की पुन्हा अवघडल्यासारखी वागते .. May be I am happy being little unhappy and thats my comfort zone Happy

नंतर आठवते अरे आपण असं चांगलं का वागलो.
त्या व्यक्तीचं intention वेगळं होतं आणि आपण सरळसाधेपणाने खरं काय ते सांगून बसलो. असे आपले सगळे पत्ते उघड करायचे नसतात.
लोक त्यांच्या perspective ने वेगळा अर्थ घेतात आणि आपल्याला त्यांच्यासारखं च समजतात.
माझं काय होतं, हे सगळं घडून गेल्यावर कितीतरी दिवसांनी, महिन्यांनी साक्षात्कार होतो. आणि मग राग येतो, चिडचिड होते. धुसफूस होते. मग जप करून रामरक्षा म्हणून मनाला था ऱ्या वर आणावं लागतं.
ह्या सगळ्यात एखादी रात्र नक्कीच बरबाद होते.
Thanks to my babies त्यांच्यामुळे एरवी मन प्रसन्न राहतं.
नाहीतर काही खरं नव्हतं

अशा प्रकारचं 'व्हेन्टिंग' इतक्या सार्वजनिक पद्धतीने करणं, त्यावर मतमतांतरं मागणं वा येऊ देणं तुम्हाला खरंच आवडणार / झेपणार आहे का हा विचार करा असं आवर्जून सुचवेन. सहसा मनात असा कल्लोळ उठतो तेव्हा त्यात नातेसंबंधांतील अन्य व्यक्ती गुंतलेल्या असतात. खाजगीपणा ही तुमची नसेल तरी त्यांची गरज असू शकते, हेही लिहिताना ध्यानात घ्या.

>>>>>त्या व्यक्तीचं intention वेगळं होतं आणि आपण सरळसाधेपणाने खरं काय ते सांगून बसलो. असे आपले सगळे पत्ते उघड करायचे नसतात.

नो!!! त्यात काही गैर नाही.

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जापिनाम् ॥

हे लक्षात ठेवायचे. निर्मळ मन व्यवहारात पडताळून दु:खी व्हायचं नाही. तो स्पिरिच्युअल ठेवा आहे, स्प्रिच्युअल वेल्थ.

स्वाती
Gdpr सांभाळूनच लिहीन हो
Dont worry Happy
सामो, noted, श्लोक आवडला

आजकाल असं आहे ना कि....... साधे शब्द योग्य त्या 'टोन' मध्ये ऐकायलाच मिळत नाहीत आजकाल. मनाला तो उपचार मिळायचा बंद झालाय. हीच समस्या आहे खरी. कधीकधी असं वाटतं कि स्क्रिप्ट लिहून द्यावं समोरच्या व्यक्तीला आणि सांगवं "हे असं असं, अशा प्रकारे ह्या टोन मध्ये म्हण म्हणजे मला जरा बरं वाटेल". कारण जाईल तिकडे हेच आहे कि लोक आपण काय बोलतो यापेक्षा ते कसं बोलतो हे महत्वाचे असूनही त्याकडे दुर्लक्ष करतात. एटीट्युड मध्ये बोलणारे आवाज, बॉसिंग करणारे आवाज, आपली अचिव्हमेंट सांगणारे संवाद, अमुक कसं सुपेरीअर आहे, तमुकच कसं योग्य आहे हे ठसवणारे संवाद, साधेपणाचे नाटक करणारे संवाद इत्यादी इत्यादी सर्वांची रेलचेल आहे अगदी आसपास. कमी आहे ती अगदी साध्या सध्या वाक्यांची, सहज नैसर्गिक संवादाची, काय सांगतोय त्यापेक्षा ते कसे सांगतोय हे पाहणाऱ्या संवेदनशील वृत्तीची फार फार वानवा आहे आजकाल...

ऑन ए सिरीअस नोट,
मायबोलीवर वा कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर काही लिहिणे आणि ते लोकांनी जज करू नये अशी अपेक्षा करणे हे अवास्तवत आहे.

लोकांनी ईथे खुशाल लिहावे. ज्यांना जज करायचे त्यांना खुशाल करू द्यावे. त्यांची पर्वा करू नये. हा ॲटीट्यूड ईथे लिहिणाऱ्यांना सापडावा अशी प्रार्थना. सॅनिटायझरच्या वापराने ९९.९९ टक्के किटाणू मरतात तश्या तुमच्या समस्या तिथेच सुटतील अश्या शुभेच्छा.

नो!!! त्यात काही गैर नाही. >>> +१००० आपण सरळ वागावं. आरोप करणारे, दोषी ठरवणारे इ इ हजारो इतर असतातचं. आपण आपल्याशी प्रामाणिक होतो याचं समाधान फार मोठं असतं.

हा attitude is a goal>> एकदा दोनदा त्या ॲटीट्यूडने लिहीलं की सवय होते .. फार कठीण नसतं

किल्ली तुझी चंद्र रास नक्की मीन आहे. - असा माझा कयास.
---------------
अजुन एक आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर अपलं नातं महा महा महा प्रचंड कॉम्प्लेक्स असतं. तुझं-माझं जमेना, पण तुझ्या वाचून करमेना.
म्हणजे आपण त्यांना वाक्ताडन केलं तर इट्स ओके पण इतरांनी त्यांना जज केलं की आपल्याच जिव्हारी लागतं. खूप गिल्टी वाटतं. त्यामुळे डोन्ट व्हेन्ट ऑफ.
नंतर प्रतिसाद संपादित करता येत नाही Wink आणि आपण बोलून तर गेलेलो असतो Happy

एकदा दोनदा त्या ॲटीट्यूडने लिहीलं की सवय होते .. फार कठीण नसतं
>>>>
हो ना.. एकदा फायदे कळू लागले की तसे जगणे आवडू लागते. फक्त ते सहजतेने यायला हवे. ॲटीट्यूडचा आव आणता येत नाही.
मी तर म्हणतो मायबोलीसारखे प्लॅटफॉर्म हा ॲटीट्यूड अंगी बाणवायच्या प्रॅक्टीससाठी वापरावा. तिथून मग ते प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणता येईल का बघावे.

लोक त्यांच्या perspective ने वेगळा अर्थ घेतात >> अर्थातच... माझ्या आवडता author - Paulo Coelho चे एक वाक्य कायम लक्षात ठेव, Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear.

ह्या सगळ्यात एखादी रात्र नक्कीच बरबाद होते. >> का बरं ... इतका नाही विचार करायचा ग, किल्ली !
You’re only here for a short visit. Don’t hurry, don’t worry. And be sure to smell the flowers along the way. (Walter Hagen)... so, spend your time wisely ! Happy

नको नको म्हणताना
येऊ लागलेले सल्ले
आपापल्या परीने
ज्याने त्याने तोलले

इथलं जिणं कधीचं मी

शाप मानलं नाही,

मातीवरचं प्रेम कधीच

पाप मानलं नाही !

मातीतच परमेश्वर

हिरवागार रूजून येतो ;

मातीच्या मार्दवातच

फुलांनी सजून येतो !

मातीवरुन वहाणारा

स्वर्गातसुध्दा वारा नसतो ;

आभाळाच्या करुणेला

मातीशिवाय थारा नसतो !

पाखरांनो, या मातीवर

सुखाने मी रांगत असतो,

तरीसुध्दा तुमच्याशी

माझं नातं सांगत असतो

पाडगावकरांच्या कवितेतून साभार

अतुल, प्रतिसाद अतिशय आवडला....
किल्ले, तुझ्याबाबतीत काय घडलं ते काही माहिती नाही.. समस्येवर मार्ग मिळो

<< कधीकधी असं वाटतं कि स्क्रिप्ट लिहून द्यावं समोरच्या व्यक्तीला आणि सांगवं "हे असं असं, अशा प्रकारे ह्या टोन मध्ये म्हण म्हणजे मला जरा बरं वाटेल". >>

------ " आता तुम्ही मला सांगणार मी काय आणि कुठल्या टोन मधे बोलावं ? " असा समोरचा गैरसमज करुन बसेल. Happy

नक्की काय झाले आहे? त्यांना पोलीस मदत, वकील सल्ला, डॉक्टर व्हिजिट काउन्सेलर इमर्जन्सी रिस्पॉनस ची गरज आहे का?
इंटर व्हेन्शन ची गरज असल्यास
हेल्प लाइन ला संपर्क करा.
सेंडिन्ग पॉझिटिव्ह व्हाइब्ज. उत्तर तुमच्यापाशीच आहे.
सल्ले बिल्ले देणे सोडले.

आज रजा घेउन शेंबुड पुसत आराम करणार् आहे घरी. खिमा बनवू का चिकन हाच तिढा आहे. या घरी जेवा अन आराम करा दुनिया गयी तेल लेने.

"Why Zebras don't get ulcers - stress and health" by Robert Sapolsky हे युट्यूबवरचं भाषण कालच ऐकलं. Robert Sapolsky is a leading neuroscientist and a professor at Stanford.
भाषण बरंच मोठं आहे आणि ज्यांना रस आहे त्यांनी जरूर ऐकावं असं सुचवेन. पण एकूण भाषणाचं सार सांगायचे तर माणूस असा एकमेव प्राणी आहे ज्याच्या शरीरात मानसिक ताणामुळे तेच शारीरिक बदल होतात जे एखाद्या शारीरिक ताणामुळे किंवा संकटामुळे होतात. उदाहरणार्थ, तुम्ही जंगलातून जात असताना वाघ समोर आला तर तुमचे शरीर fight or flight mode मध्ये जाते. अशावेळी जी stress hormones तयार होतात ती तुम्हाला या अशा तात्कालिक संकटातून वाचायला मदत करतात. मात्र गंमत अशी की जो रिस्पॉन्स आपले शरीर वाघाला पाहून देते तोच रिस्पॉन्स आपण आपल्याला ज्या गोष्टीने मानसिक भय/ताण वाटतो अशा गोष्टींना देतो!
सध्याच्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यात वाघ समोर येण्याची शक्यता नगण्य आहे पण आपला मानसिक ताण इतका प्रचंड वाढलाय की जणू आपण वाघांनी भरलेल्या पिंजऱ्यात वावरतो आहोत असेच शरीराला वाटत असते!
आता या ताणामुळे शरीरात होणारे बदल हे तात्पुरते चांगलेच असतात पण कायमस्वरूपी जर शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स वाढलेले राहीले तर ते शरीराला फार घातक असते! आजचे आपले जे अनेक chronic lifestyle diseases आहेत ते बऱ्यापैकी स्ट्रेस शी संबंधित आहेत.
हे सर्व लिहीण्याचे कारण म्हणजे या भाषणात "मी आधीच worst case scenario ची कल्पना केल्यास काय होते" वगैरे गोष्टींचा उल्लेख केला आहे जो मला मूळ पोस्टमधे आणि इतर प्रतिसादात दिसला. या भाषणात उपायांवर भर नसल्याने त्याविषयी मी काही लिहू शकत नाही. पण एक गोष्ट जिचा रॉबर्टने उपाय म्हणून उल्लेख केला आणि जी किल्लीने हा धागा सुरु करून केली आहे ती म्हणजे आपल्या आजूबाजूला चांगली सपोर्ट सिस्टीम उभी करणे, चांगली माणसे गोळा करणे.
बाकी Robert Sapolsky is a great find! त्यांची इतर भाषणं आता शोधून ऐकेन.

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तुंचि शोधुनि पाहे॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे।
मना सर्वथा शोक चिंता नको रे॥
विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी॥ ॥

जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला।
परी शेवटीं काळमूखीं निमाला॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले।
कितीएक ते जन्मले आणि मेले॥१४॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती॥ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥
पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥ ॥

मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥ ॥

मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।
मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥
मना सत्य ते सत्य वाचे वदावे।
मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें॥ ॥

मना वासना चूकवीं येरझारा।
मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥
मना यातना थोर हे गर्भवासीं।
मना सज्जना भेटवीं राघवासीं॥ ॥

न बोलें मना राघवेवीण कांहीं।
जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥
घडिने घडी काळ आयुष्य नेतो।
देहांतीं तुला कोण सोडूं पहातो?॥२३॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा।
पुढें मागुता राम जोडेल कैंचा॥
सुखाची घडी लोटतां सूख आहे।
पुढें सर्व जाईल कांही न राहे॥ ॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला।
परी शेवटीं काळ घेउन गेला॥
करीं रे मना भक्ति या राघवाची।
पुढें अंतरीं सोडिं चिंता भवाची॥ ॥

असे हो जया अंतरी भाव जैसा।
वसे हो तया अंतरी देव तैसा॥
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥ ॥

मना प्रार्थना तूजला एक आहे।
रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥
अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥

मना पाविजे सर्वही सूख जेथे।
अति आदरें ठेविजे लक्ष तेथें॥
विविकें कुडी कल्पना पालटिजे।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥ ॥

बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
शिणावे परी नातुडे हीत कांहीं॥
विचारें बरें अंतरा बोधवीजे।
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥ ॥

मना सज्जना एक जीवीं धरावें।
जनी आपुलें हीत तूवां करावें॥
रघूनायकावीण बोलो नको हो।
सदा मानसीं तो निजध्यास राहो॥४३॥

जयाचेनि संगे समाधान भंगे।
अहंता अकस्मात येऊनि लागे॥
तये संगतीची जनीं कोण गोडी।
जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥

नसे अंतरी काम नानाविकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५०॥
_
मदें मत्सरें सांडिली स्वार्थबुद्धी।
प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी॥
सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे।
न लिंपे कदा दंभ वादे विवादे॥
करी सुखसंवाद जो उगमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५२॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळीं।
मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी॥
चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ॥

नसे मानसीं नष्ट आशा दुराशा।
वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा॥
ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू।
स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू॥
तया अंतरी क्रोध संताप कैंचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥ ॥

जगीं होइजे धन्य या रामनामे।
क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमे॥
उदासीनता तत्त्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ॥

नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
सदा राम निष्काम चिंतीत जावा।
मना कल्पनालेश तोहि नसावा॥ ॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी।
नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी॥
मनीं कामना राम नाही जयाला।
अती आदरे प्रीती नाही तयाला॥ ॥

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे।
तया अंतरीं सर्वदा तेचि आहे॥
जनी सज्जनी वाद हा वाढवावा।
पुढें मागता शोक जीवीं धरावा॥ ॥

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला।
बळें अंतरीं शोक संताप ठेला॥
सुखानंद आनंद भेदें बुडाला।
मना निश्चयो सर्व खेदे उडाला॥ ॥

घरी कामधेनू पुढें ताक मागें।
हरीबोध सांडोनि वेवाद लागे॥
करी सार चिंतामणी काचखंडे।
तया मागतां देत आहे उदंडे॥ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।
अती काम त्या राम चित्ती वसेना॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥ ॥

नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥
धरीं रे मना आदरें प्रीति रामी।
नको वासना हेमधामीं विरामीं॥ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधुनि पाहे॥
जनीं वीष खातां पुढे सूख कैचे।
करीं रे मना ध्यान या राघवाचें॥ ॥

घनश्याम हा राम लावण्यरुपी।
महाधीर गंभीर पूर्णप्रतापी॥
करी संकटीं सेवकांचा कुडावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ ॥

बळें आगळा राम कोदंडधारी।
महाकाळ विक्राळ तोही थरारी॥
पुढे मानवा किंकरा कोण केवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ ॥

सुखानंदकारी निवारी भयातें।
जनीं भक्तिभावे भजावे तयातें॥
विवेके त्यजावा अनाचार हेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ ॥
------------------------------------------------
खालील श्लोक अ तुल यांच्या प्रतिसादाला अप्र्पण

न वेचे कदा ग्रंथचि अर्थ काही।
मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं॥
महाघोर संसारशत्रु जिणावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा॥ ॥

Pages