No judgements please!!!!!!

Submitted by किल्ली on 6 January, 2022 - 12:25

बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...
असं कुठेतरी व्यक्त व्हायचंय की जिथे मला कुणी judge करणार नाही, आगाऊ फुकटचा सल्ला देणार नाही किंवा हे सगळं ऐकून स्वतःच चिंतेत पडणार नाही. मला उपाय नकोय कारण माझी मुळात काही समस्याच नाहीये. भावनांचा निचरा करणं फक्त गरजेचं आहे.ह्यासाठी कुणाशीतरी बोलून बरं वाटतं.
म्हणून तर आपलं हे कोतबो आहे.
...
मनात खूप विस्कळीत विचार आहेत. जसे जमले तसे इथे लिहित जाईन
...
हा धागा म्हणजे शीर्षकात लिहिलं आहे त्याप्रमाणे non judgemental zone असेल इथे तुम्हीही मन मोकळे करू शकता. अर्थात specific सल्ला हवाय असे असेल तर हा तो धागा नाही.
..
मी काय लिहितेय हे समजून घेतलं नाही तरी चालेल.
मला फक्त व्यक्त व्हायचंय. कसं ते समजलं, सुचलं की येथे लिहीन.
तुम्हीही लिहा असं तुमच्यासोबत घडत असेल तर.
.
एखादा क्षण असा येतो, असं वाटतं की, आता नाही सहन होत. मी नाही handle करू शकणार ही परिस्थिती. डोकं out होतं एकदम.
पण मग आपली असहायता लक्षात येते आणि पुन्हा समजूतदार, विनम्र, गुणी मुखवटा चढवून आतल्या आत कुढत शांत बसते,
आपलेच दात आणि आपलेच ओठ! कुणाला काय बोलावं आणि कुणाजवळ कुणाची तक्रार करावी?
आलेला क्षण एक आव्हान समजून हाताळणं एवढंच हातात आहे माझ्या!
खरं तर कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा. ही फक्त सुरुवात आहे हे ठाऊक आहे. अजून मोठी आव्हानं येणार आहेत हेही माहितीये.
पण आता मला फक्त माझ्यापाशी थांबायचं आहे.

तो कठीण क्षण, किंबहुना असे कित्येक क्षण लीलया यशस्वीपणे हाताळून झालेत. आता गरज आहे ती विश्रांतीची, तीही मानसिक!
.
डू आयडी काढून हे लिहू शकले असते पण तेवढा संयम नाही. त्यामुळे risk घेतेय.
..
Thanks a lot माझी हक्काची जागा आणि लोक्स
..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

आपल्या आजूबाजूला चांगली सपोर्ट सिस्टीम उभी करणे, चांगली माणसे गोळा करणे.>> पूर्णपणे सहमत
CFD20B8B-8B9E-45C7-8FB0-999CEF3EE852.jpeg

नक्की लिही किल्ली/पल्लवी.सल्ला देणार नाही.
बरेचदा मनातलं नुसतं लिहून्/बोलून पण आपण स्वतःच सर्वात चांगला मार्ग शोधायच्या शांत स्टेज ला येतो.

जसा ऐकणारा हवा असतो तसाच समजणाराही हवाच असतो. मिळाला तर ठीक नाहीतर उपरवाला है ना! सगळे शिव्याशाप चुपचाप ऐकून घेईल.
बादवे, मीपण तुमच्या मागच्याच डब्यात बसलेय. फक्त माझं फ्रस्ट्रेशन ऑलरेडी इथे काढून झालंय आणि खरंच बर्याच माबोकरांनी सांभाळून घेतलंय.
पण अशावेळी एखादं टाईममशीन किंवा रिसेट बटण असावं असं फार फार वाटतं.

माझी तर स्वत:ला विवेकी / संतुलित ठेवण्यातच बरीच उर्जा खर्च होते. मग काही विधायक करायला उर्जाच उरत नाही. मग आत्मचिडचिड होते. शेअर करायची देखील भिती वाटते. आपल्या चिकित्सक विश्लेषणाचे लोकांना काय पडलीये? एकदा असेच गतकाली वैयक्तिक सुखदु:खाच्या घटनांचे आजच्या काळात केलेले विश्लेषणाची Audio recording केले व त्या काळातील साक्षीदार असलेल्या मै्त्रिणीला शेअर केले. बघते म्हट्ल्यावर नंतर आठवण करुन ही तिने पाहिले/ ऐकले नाही. मग 21 दिवसांनी sorry for sharing म्हणून सुरवातीला deactivate व नंतर Delete and Destroy केले. तुम्ही पुष्कळ शेअर कराल पण शेअर करवून घेणार्‍याशी तुमची वेव्हलेंथ जुळ्ली नाही तर त्याचा तसा काही उपयोग नसतो. मग कारणे काही ही असोत. त्या व्यक्तिच्याही काही अडचणी असतील असे म्हणून विषय सोडून द्यायचा असतो. पण मनात राहतच. असो.

प्रकाश छान पोस्ट. मला पण कधी कधी वाट्ते आत्ताच्या स्वतः बद्दलच्या ज्ञानाचा( जे विचार करुन मिळवले आहे) त्याकाळाच्या सिचुएशनचा सम्यक विचार करावा व सगळे लिहून ठेवावे. पण मग वाट्टे तेव्हाचे सर्व लोक आता नाहीत. त्यांच्या काय बाजू असतील ते डिफेंड करू शकत नाहीत हे एक. आणि आपल्या बरोबर सर्व संपले तरी ठीक आहे. सुख आनंदी आठवणी मागे ठेवाव्यात. तेव्हाची आपली दु:खे आता कोणाला समजूनही काही उपयोग नाही. गुड यु गेव्ह धिस इन्साइट.

हा सगळा संप्रेरकांच्या संतुलनाचा प्रॉब्लेम असतो.
शारिरीक मेहनत आणि कार्यमग्नता हेच यातून बाहेर पडण्याचे दरवाजे आहेत.
आपल्याला समजून घेणारी माणसे शोधून त्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करणे . ती अचानक सापडू पण शकतात.

non judgemental circle...

किल्ली, सुंदर धागा अन आजच्या काळात जवळ जवळ प्रत्येकाला गरज आहे....non judgemental circle / वा कोणी असण्याची !!
कदाचीत ह्या तंत्र, यंत्र युगात जगणारे आपण स्वतः ईतके माहीती , Data analysis मध्ये गुरूफटलेले आहोत की " non judgemental" स्वतः होण्याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात, मला तरी ....

कोणी तरी फक्त ऐकीव पाहिजेच...

सर्वांचे आभार
काल इथे लिहिलं आणि मन एकदम हलकं फुलकं झालं
असं वाटलं कुणा bff सोबत गप्पा मारल्यात.
.
नाम स्मरण आणि जप really helps me
स्तोत्रे ही ऐकते, म्हणते.
.
फार काही गंभीर नाही घडलं, जे होतं ते handle झालं, एवढंच की मनात राहिल्यामुळे जड वाटत होतं.
कुणी काळजी करू नका Happy
.
प्रकाश छान post.
.
पुन्हा माझ्या मनात दाटून आलं की आभाळ इथे बरसेल हे मात्र नक्की
(उपमा lol )

मी आयुष्यभर यातूनच गेलो. मी अजूनहि या सर्वातून जातो आहे
<<<<नाम स्मरण आणि जप really helps me
स्तोत्रे ही ऐकते, म्हणते.>>>
या सर्वाचा मला खूप उपयोग झाला. अजूनहि होतो. पण आता वय खूप जास्त झाल्याने त्याबद्दल विचारच करत नाही.
सगळं जग म्हणजे केवळ विनोद वाटतो - राजकारण काय, मायबोली काय? सगळीकडे विनोदी काय ते बघून हसायचे.
जगात सुख, समाधान हवे असेल तर ते इतरांकडून मिळत नाही, स्वतःच स्वतःमधे शोधायचे!

अप्रिय आठवणींपासून सुटका हा मायबोलीवर असलेला शाम भागवतांचा लेख उत्तम आहे.जरी मी सर्व बाबतीत सहमत नसलो तरी मला लेख आवडला. प्रत्येकाकडे जशा सुखद स्मृती असतात तशा कटु स्मृतीही असतात. कटुस्मृतींमुळे होणार मनकल्लोळ हा आपल्याला त्रासदायक असतो मग त्याच समायोजन कसे करायचे हा भाग त्यांनी घेतला आहे.

>>>>>>अप्रिय आठवणींपासून सुटका हा मायबोलीवर असलेला शाम भागवतांचा लेख उत्तम आहे.
अरे वा! खजिना आहे की. प्रघा धन्स.

सारखी चिडचिड होते, प्रत्येक वेळी मीच चुकतेय असं वाटायला लागलंय.खुप प्रयत्न करते शांत राहून परिस्थिती हाताळावी पण मीच टार्गेट होते . नवरा आणि माहेर या दोन्हीत माझं मरण होतंय.नाही काही गोष्टी घडत आपल्या मनासारख्या पण समजून नाही घेत ,मान्य ताण पडतोय आर्थिक ओढाताण होते पण करतेय ना मीही अडजेस्ट जातील हेही दिवस सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे ना मी दिवसभर घरात राहुन मन शांत ठेवतेय आणि हे रात्री माझ्या मनःशांती चे बारा वाजवून घोरतात . विचारांनी झोप येत नाही

अप्रिय आठवणींपासून सुटका हा मायबोलीवर असलेला शाम भागवतांचा लेख उत्तम आहे === > + ++ १११
मला ह्या लेखाचा खूपच उपयोग होतो !!!!

जगात सुख, समाधान हवे असेल तर ते इतरांकडून मिळत नाही, स्वतःच स्वतःमधे शोधायचे ==> ++१११

Boss kadun honaara duja bhav, satat Tamil ani Telugu lokanna milat asnaare footage (for no good reason)
aju-baju che sagle aplyaach virodhaat aahe asa kahisa vatavaran.
He sara khup khup depressing aahe. Sad

आजच्या काळात जवळ जवळ प्रत्येकाला गरज आहे....non judgemental circle / वा कोणी असण्याची !!>>> अगदी खरे ..मनातले!

आजकाल नुसतं व्यक्त व्हायला लागलं की समोरचा पहिल्या शब्दा पासून प्रवचन किंवा माझंच कसं चुकतय ह्याची गाणी गायला लागतोय्/लागतेय असं वाटतं.. अनेक लोक टॉक्सिक पण चकचकीत प्रेमळ वेस्टनातली, गोड व्यवहार करणारी असतात, अशी लोक तोंडावर शिव्या देणार्यांपेक्षा महा खतरनाक असतात. त्यांना ओळखण्यात अर्धा जन्म जाऊ शकतो Wink पण एकदा ओळखले की डायरेक्ट संबंध कट करून मोकळे व्हावे.
बेटा मधिल अरुणा ईराणी आठवली वरच्या केस मधे फिट्ट! Lol

aju-baju che sagle aplyaach virodhaat aahe asa kahisa vatavaran.
He sara khup khup depressing aahe.
===>
बन्डु ,
अस मी देखील अनुभल आहे, कठीण आहे, त्रास होतो... ===>हँग इन देअर. !!!!
ये लमहा भी गुजर जायेगा !!!

टॉक्सिक वर्क कल्चर असेल तर दुसरा जॉब शोधावा. Sad
अनुभव आहे. >>> thank you! Job search is in progress, didn't get the right one though.

Satish Sir- exactly same words(Hang in There!) one of my best friend told me y'day over the phone.
Apna Time Aayega he added Happy

{Marathi type karta yet nahiye ajibaat Edge / Chrome var Sad }

Boss kadun honaara duja bhav, satat Tamil ani Telugu lokanna milat asnaare footage (for

पुण्यात ही अवस्था.पुणे महाराष्ट्रात आहे .राज ठाकरे सारखे नेते पुण्यात पण असले
पाहिजेत.

Pages