भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद. भारतातून येताना ज्योईसाठी खाऊ म्हणून डॉग सेफ फराळ आणायचा होता. आता आलो परत. Happy
पुढच्यावेळी ट्राय करू.

काल दोन्ही लेकरांचा वाढदिवस साजरा झाला. ज्यांना ओडीन ची भिती वाटते त्यांनी मला फोनवरूनच शुभेच्छा द्या, आम्ही आज अजिबात ओडीन ला बांधणार नाही, असा फतवा दादूने त्याच्या मित्रासाठी काढला होता. त्यामुळे काय मग ओडीन ला फुल वावर होता सगळीकडे. एकतर सगळ्यांकडून अटेन्शन मिळत होतं यामुळेच खुष झालेला गडी. काय चाललं आहे हे त्याला कळत नव्हतं पण फेम एन्जॉय करत होता जाम. त्यात त्याच्याच श्वान फुडचा मी केकचा आकार केला, त्यात दोन चिकन स्टीक आणि डॉग बिस्किट ठेऊन सजवला. नुसता लाळेचा धबधबा.

हॅपी बर्थडे सॉंग होईपर्यंत कसातरी दम काढला. आटपा लवकर असे भाव होते चेहऱ्यावर

नंतरही सगळ्यांच्या मध्ये जाऊन लोळत स्टीक खात बसलेला

त्याला एक च्युईंग रोप आणि च्युईंग टॉय आणून ठेवलेले मी आधीच ते त्याला गिफ्ट म्हणून दिलं, मग काय आनंद त्याचा गगनात मावेना.

इतकं लाडात येऊन झालं की बस

WhatsApp Image 2021-12-06 at 8.49.58 PM.jpeg

बिलेटेड बड्डे विशेस फॉर ओडिन!! ऑऑ कसला हॅप्पी भाव आहे चेहर्‍यावर!! Happy दादू पण एकदम मोठा झालेला दिसतोय गेल्या वर्षाच्या तुलनेत Happy
व्हिडिओ आत्ता पाहिला. फारच मस्त! इतर डॉगीज बरोबर मस्ती बघून मज्जा वाटली. तो दुसरा छोटुला पिल्लू कसला व्रात्य आहे Happy स्विमिंग च्या क्लिप्स पण भारी.

धन्यवाद सर्वांना

मैत्रेयी - तोच हा मेयो, महाव्रात्य होता
ओडीन आणि बुलेट त्याच्या दुप्पट तिप्पट आकाराचे पण बिनधास्त त्याच्या बाऊलमध्ये तोंड घालून खात असे
त्यांना चावणे, गुरगरणे तर अगदीच
भयानक दंबिस आणि गोंडस असल्याने फुल लाडवला होता

ओडीन ला माहिती नसलं तरी मागे हटायचं नाही हे बरोबर कळतं
त्याला म्हणलं माझा मोबाईल सापडत नाहिये, जरा शोध
की तो लगेच जाऊन त्याचे एक खेळणे पुढयात टाकतो

"हे नाही रे, काळ्या रंगाचा, ज्यातून आवाज येतो असा मोबाईल"

की कळल्यासारखा जातो आणि पाण्याची बाटली, पायपुसणे, डबा जे काही समोर दिसेल ते आणून देतो Happy

आणि कॉन्फिडन्स तर एवढा की जणू हाच मोबाईल आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल Happy

कसलं क्युट आहे.
मोबाईल बॉल सारखा फेकला तर देईल बघा आणून.आणि मग रक हाडुक बक्षीस पण द्यायचे आठवण राहायला.

त्याला इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे एकदमच वावडे आहे
काही जणांकडून ऐकले आहे त्यांचे भुभु मोबाईल, रिमोटची वाट लावतात म्हणून
आमचे तर मोबाईल, रिमोट कुठेही लोळत असतात, पार जमिनीवरही
पण एकदाही त्याने कुतूहलापोटी पण रिमोट घेतला नाही
पायात मध्ये आला तर त्यावरून उडी मारून जातो पण अजिबात तोंड लावत नाही
रादर पपी फेजमध्ये दात येत असताना जी काही चावाचवी केली तितकीच
घरात आम्हाला आठवत नाही कुठली वस्तू त्याने खराबकेलीय अथवा फाडलीय
पायपुसणे वगळता, त्याच्या मात्र मन लावून चिंध्या करतो
म्हणून ते मेश वाले आणले तर त्यालाही सोडले नाही
आता आमच्याकडे पाय पुसणे म्हणजे कापडाचे बारीक तुकडे असतात Happy
ओड्याच्या तावडीतून वाचलेली फडकी दुर्मिळच

आणि कॉन्फिडन्स तर एवढा की जणू हाच मोबाईल आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल Happy
Happy Happy

मी नक्कीच पुण्यात आल्यावर भेटणार आहे ओडीनला

मस्तच ! मोबाईलच व्यसन लागलेल्या मुलांना ओडिनचा आदर्श घ्या म्हणून सांगायला हवंय Lol

मी नक्कीच पुण्यात आल्यावर भेटणार आहे ओडीनला>>>>
नक्की या, त्यालाही आवडतात नवे मित्र मैत्रिणी जोडायला

मोबाईलच व्यसन लागलेल्या मुलांना ओडिनचा आदर्श घ्या म्हणून सांगायला हवंय>>>
घरीच आहे त्याचा दादू, मी म्हणतो त्याला की बघ जरा तो, अजिबात टीव्ही बघत नाही ना मोबाईल
पण तो कुठला ऐकुन घेतोय, म्हणे तंगड्या वर करून लोळत राहणे ही ओडीनची एंटरटेनमेंट आहे, माझी नाही Happy

त्याची अजून एक मज्जा म्हणजे काल त्याने आयुष्यात पहिल्यांदा उंट पहिला
रस्त्यावरून चालला होता निवांत आणि ओडीन ने आधी भुंकत भुंकत (गेट च्या आतूनच) राग व्यक्त केला
आणि मग आत येऊन मला काहितरी सांगायचं प्रयत्न केला
इतके चमत्कारिक आवाज करून तो सांगत होता की मी शेवटी काय आहे म्हणून बघायला बाहेर आलो तर उंट दिसला

म्हणलं जा की आणि गेट उघडलं तर ओड्याला वाटलं आता उंट आत येतो का काय आणि धूम आत पळून गेला
Happy म्हणलं नुसतं भुंकण्यात जोर
प्रत्यक्ष भित्रा ससा आहेस लेका

उंट बघितल्यावरची रिऍक्श धमाल. काय विचार येत असतील त्याच्या मनात?
मोबाईल संदर्भातदादूचे बरोबर आहे.
दादू आणि ओडिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!काय आनंद दिसतोय ओडिनच्या चेहऱ्यावर!

दोन्ही किस्से धमाल आहेत!
कळल्यासारखा जातो आणि पाण्याची बाटली, पायपुसणे, डबा जे काही समोर दिसेल ते >>> Lol

त्याचे शोध प्रकारचे तर अनेक किस्से आहेत
दर्शन घरात कुठंतरी लपतो आणि आम्ही सांगतो ओडीन ला जा दर्शन कुठं आहे शोधून आण
मग लगेच नाकाड वर करत त्याची मोहीम सुरू होते
दाराच्या मागे, टेबलच्या खाली अशा ठरलेल्या जागी आधी बघतो आणि तिकडे दादू सापडला नाही तर मग सैरभैर होतो आणि कुठंही शोधायला लागतो
चप्पल स्टॅण्ड, वरती पंख्याकडे, टीव्ही च्या मागे आणि कहर म्हणजे ड्रॉवर एखादा उघडा असेल तर त्यातही डोकावून बघतो
म्हणजे एकतर त्याला मनुष्यप्राणी आणि त्याचा रबरी बॉल यांच्या वस्तुमानात फरक आहे हे मान्य नाहीये किवा मग तो शेरलोकच्या Once you eliminate the impossible... या वाक्यावर अपार श्रद्धा ठेवून आहे
Happy

दादूला आणि ओडीनला वाढदिवसाच्या उशीराने शुभेच्छा!
मोबाईल , रिमोट पळवत नाही म्हणजे अगदीच गुणी बाळ आहे ओडीन! उंटाचा आणि लपालपीचा किस्सा फार मजेशीर आहे.

Once you eliminate the impossible... >>> Lol
दादू आणि ओडिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! #StayBlessed
फोटु फार आवडला... एकदम गोडुलं आहे पिल्लू !

Pages