एक प्रयोग

Submitted by सामो on 16 December, 2021 - 08:10

काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XWw...) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन. अर्थात बाह्य सॄष्टीमधून ज्ञान अर्जन करण्याचे मार्ग या इंद्रियांपाशी असतात. त्वचेला स्पर्शाचे, डोळ्यांना दॄष्टीचे, शृतींना ध्वनीचे ज्ञान होते आदि. मग मनाला कोणत्या रुपात ज्ञान मिळते तर इन्ट्युशन.
मनाची एकाग्रता, शक्ती तपासण्याकरता, मी एक प्रयोग काल केला. तो इथे देते आहे. हा मनाचा खेळ असेलही पण माझ्यापुरता तो कन्व्हिन्सिंग आहे. पुरेसा रोचक व उपयोगी आहे.
व्यवहारात संबंध येणारी एक एक व्यक्ती आठवत गेले आणि रेकीमध्ये करता तशीच पण मानसिक उर्जा, प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे संक्रमित करत गेले. त्या त्या व्यक्तीला मनाने 'फील' करत गेले. मग मला जाणवले मी ही जी उर्जा देऊ पहाते आहे तिचा स्वीकार करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची भिन्न आहेच परंतु मलाही सब घोडे बारह टक्के करता येत नाहीये. मला हां 'गॉड ब्लेस येरी', 'गॉड ब्लेस मारिया', 'गॉड ब्लेस अ‍ॅलेक्स' असे सरसकट करता येत नाहीये. उदा - अ‍ॅलेक्स्बद्दल विचार करताना मला त्याला आरोग्यविषयक शुभेच्छा द्याव्याश्या वाटतात. कदाचित मला हे माहीत आहे की तो वरचेवर डॉक्टरांकडे जाण्याकरता टाईम ऑफ घेतो. त्यामुळे असेल. काही का असेना पण प्रत्येकाकरता दिल्या गेलेल्या शुभेच्छांचा, वेल विशेस, प्रार्थनेचा आत्मा भिन्न भिन्न आहे. मिकेलाला आणि माईक नंबर १ ला मी सहज ओघवत्या रीतीने माझी प्रार्थना देउ शकते आहे. ते एखाद्या कोर्‍या कॅनव्हाससारखी आहेत याउलट 'मारिया' मी काही शुभेच्छा दिल्या तरी घेत नाही. शी इज स्टिफ. शी हॅज अ माईल्ड व्हेरी माइल्ड रिसेन्ट्मेन्ट. कदाचित परवा मी तिला सर्वांसमोर तिच्या कोडबद्दल टोकायला नको होते. प्रश्न विचारायला नको होता. प्रत्येकच जण आपल्या कामाबद्दल खूप हळवा असतो. असो. येरीला नुकतेच मूल झालेले आहे पण येरीला शुभेच्छा देताना मला मुलाला इन्क्लुड करता येत नाहीये. ते मूल डिस्टन्ट आहे. याउलट त्याच्या पत्नीस सहज शुभेच्छा देता येताहेत.
आणि हा प्रयोग मी झोपेपर्यंत चालू ठेवला व थोड्याच वेळात झोपी गेलेसुद्धा. अजुन एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अशी प्रार्थना करणे हे ऑफिसच्या किंवा त्रयस्थ/परिचित लोकांबद्दल सहज शक्य झाले. बट पास्ट वॉज लोडेड! भूतकाळातील व्यक्तींकरता सहज माझ्या मनातून उद्गार निघाले नाहीत. तेव्हा मन आरस्पानी न रहाता ढवळले जात होते. हा असा वागला, ती तशी वागली, मला ही व्यक्ती आवडता नाही आदि विचार मनात लाटांसारखे येउ लागले. त्यामुळे मी भूतकाळातील माझ्या प्रियजनांवरती हा प्रयोगच केला नाही. मुलीकरता व नवर्‍याकरता अशा प्रार्थना दिवसातून २० वेळा तरी होतात. नकळत, किंचित कंपल्सिव्हली. त्यामुळे मुलीस व नवर्‍यासही वगळले.

हा प्रयोग माझ्या मनाचे खेळ असतीलही पण एक नक्की या प्रयोगा अंती मला स्वतःबद्दल, माझ्या नातेसंबंधांबद्दल अधिक माहीती मिळाली. हे म्हणजे बाह्य किंवा आंतरजगाचे ज्ञान होणेच नाही का? कदाचित मी सध्या जास्त मिस्टिक व्हिडिओज युट्युबवरती पहात आहे त्याचा हा परिपाक असावा. उदाहरणार्थ एंजल्स, गार्डिअन एंजल्स, इन्टुशन, एंजल नंबर्स वगैरे विषयक व्हिडीओज (https://www.youtube.com/channel/UCVoOM-cCEPbJ1vzlQAFQu1A) सध्या जास्त बघतही असेन. ते काही का असेना, मला हा प्रयोग व्यवस्थित डॉक्युमेन्ट करायचा आहे. ओव्हर अ पिरीअड ऑफ टाइम तो कसा इव्हॉल्व होतो हेसुद्धा जाणुन घ्यायचे आहे.

आपल्या मतांचा सकारात्मक/नकारात्मक आदर आहे. जरुर इनपुट द्यावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे प्रयोग. असे निवांत क्षणी मनातला एकेक कप्पा उघडून आपल्याला नक्की काय वाटते, काय वाटायला हवे, काय नको आणि का याचे परिक्षण केले तर आपल्यातल्या नकारात्मक भावना, विचार नक्कीच दूर होतात.

>>>>निवांत क्षणी मनातला एकेक कप्पा उघडून
वाह! खूप सुंदर अलंकारीक भाषा वापरलीत. मस्त वाटलं.
अगदी हेच्च!! असेच काल झालेले.

K

काही जण आपल्याशी बोलतात पण आतून टाळतात किंवा राग करतात असं जाणवत राहातं. मग ठरवतो आपणही यांना दूरच ठेवायचं. हा मनाचा खेळ नाही तर खेळामध्ये पंच शिट्टी मारतो ना तसं आपोआप होतं.

छान प्रयोग. छान विचार. छान लेख.

मागे व्हॉटसपवर एक वाचलेले. जेव्हा तुम्ही दोघांपैकी काय निवडावे या गोंधळात असाल तेव्हा टॉस उडवावा. जेव्हा ते हवेत उडालेले कॉईन खाली येत असेल तेव्हा तुमचे मन तुम्हाला सांगते तुम्हाला काय हवे आहे ते..

आपले मन आपल्याशी कधी खोटे बोलत नाही. वा ते कधी गोंधळलेलेही नसते. गोंधळात मेंदू असतो जो मनाचे ऐकावे की नाही हे त्याला ठरवता येत नसते.

मध्यंतरी माझ्या बायकोने मला विचारलेले की तुला दोन मुलांपैकी कोण जास्त आवडते. मी चटकन उत्तर दिले. कारण मागे मी स्वत:ही हा प्रश्न स्वत:ला विचारला होता. दोन मुलांवरही आपण एक समान प्रेम करत नाही हे फॅक्ट आहे. तर जगातल्या ईतक्या लोकांबद्दल विविध प्रकारच्या भावना असणे स्वाभाविक आहेच. आपल्याच भावना आपणच प्रामाणिकपणे स्विकारू शकलो नाही तर कसे चालेल. पुढे जर माझे एका मूलावर जास्त प्रेम असल्याने दुसऱ्यावर कुठला अन्याय होऊ नये याची काळजी मला घ्यायची असेल तर आधी मला मी एकावर जास्त प्रेम करतो हे स्विकारणे गरजेचे नाही का Happy

>>>>>>>पुढे जर माझे एका मूलावर जास्त प्रेम असल्याने दुसऱ्यावर कुठला अन्याय होऊ नये याची काळजी मला घ्यायची असेल तर आधी मला मी एकावर जास्त प्रेम करतो हे स्विकारणे गरजेचे नाही का Happy

असे का ऋन्मेष? एकच हा आकडा तुम्ही ठरवला. असं काही नसतं. आपल्याला २ व्यक्ती समसमान आवडु शकतात. नवरा आणि मुलगी यात मला भेदभाव करणं अशक्य आहे. हां प्रेमाची छटा किंचित वेगळी असेलही पण असोशी तर सारखीच आहे.
-----------
शरदजी आपल्या कमेंटबद्दल आभार.

आपण कुणाकुणाची आठवण काढतो तेही नोंद करावे. आपण ज्याचे भले इच्छितो ती व्यक्ती आपल्या मनाच्या कपाटात वरती असते. म्हणूनच आठवण येते.
समजा एकाने सांगितलं की मी पुढच्या आठवड्यात इथे जाणार आहे. मग तेव्हा विचार येतो की आज जाणार होती, निघाली असेल का, आता कुठे असेल. म्हणजे मन आतून त्या व्यक्तीबरोबर प्रवास करत असते.
आवडत नसलेल्या व्यक्तीशी असे होत नसते.

लेख छान आहे. प्रयोग करीत राहावे
मेंदूचा समोरील एक भाग मेंदूत आधी नोंदल्या गेलेल्या नकारात्मक भावना, आठवणींविषयी संवेदना बाय डिफॉल्ट मनात सोडत असतो. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्या भागाला शिस्त लावावी लागते. ज्या ज्या गोष्टींविषयी दुस्वास, चीड, मत्सर,राग वाटतो त्याविषयी सतत मुद्दाम भले चिंतावे हा इतर अनेकांपैकी एक मार्ग आहे.
सोनालिस्ट आणि इतरांनी लिहिले आहे ते अगदी योग्य आहे. " पाहावे आपणासी आपण".-- समर्थ रामदास. स्वतः:ला पारखून घेत स्वतः: च शुद्ध होत राहाणे. हीच तपस्या. चंदन आणि सोने हे उदाहरण. "तूच हो तुझा उद्धारकर्ता किंवा उद्धरेत् आत्मानं आत्मा " ही वचने फोल नाहीत.

काही आवडला, काही नाही.
शुभेच्छा देणे खरच अवघड असते. भूतकाळामुळे असं नाही. ते थ्री इडियट्स मध्ये 'दोस्त फेल हो जाए तो दुख होता है पर वो फर्स्ट आए तो ज्यादा दुख होता है' ही गत अनेकांची असते. तोंडदेखलं हॅपी मंडे म्हणणे वेगळे आणि मनापासून शुभ चिंतणे वेगळे. त्यामुळे प्रयोग आवडलाच. इतकं प्रांजळ लिहीलेलं ही आवडलं. "गॉड ब्लेस", "एंजल्स" इ प्रकारावर माझा विश्वास नाही, उलट त्यात लुबाडणूक झाली असेच जास्त ऐकीवात आहे त्यामुळे तो भाग आवडला नाही.

'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे.>> हंस ध्वनि हा कर्नाटक संगीतातुन हिंदुस्तानी संगीतात आलेला फार मह त्वाचा व जुना राग आहे. ह्याच्या गायकी चीजा व वाद्यवादन उपलब्ध आहे. संतूर ( पं डित शिवकुमार शर्मा) , बासरी( पं. हरिप्रसाद चौरासिया) सोबतीने झाकीर हुसे न तबल्या ला अशी रेकॉ र्डिं ग उपलब्ध आहेत. प्रवीण गोडखिंडी म्हणून एक बासरीवादक कलाकार आहेत त्यांची स्पॉटी फाय वर प्ले लिस्ट आहे त्यात म्युझिक थेरपी मध्ये हंसध्वनीचे उत्तम रेकॉर्डिन्ग उपलब्ध आहे.

चांगले स्पीकर/ हेडफोन् वर हे जरूर ऐका . कारण युर्‍युब वर व्हिजुअल डिस्टर्बन्स असतो तो स्पॉटिफाय वर नसतो. व मन एकाग्र करून ऐकता येते. प्रवीण चे इतरही राग सुरेख आहेत.

आवडत असेल तर रविशंकर सतार पंचम से गारा पन ऐका.

दुसृयाबद्दल सुयश चिंतताना आपले सर्व बायसेस बाजूला ठेवून एका झिरो बेस वरः त्यांच्या आयु ष्यात ह्या घटिकेस त्यांना हवे ते मिळो. मग ते सुख शांती पैसे अन्न काहीही असु शकते अशी प्रार्थ ना केली तर काय वाट्ते ते बघा.

युट्युब व्हिडीओ वर जे काही ही असते ते नक्की व्हेरिफाइड ज्ञान असते असे नाही. काही ही व कोनीही बनव ते त्यामुळे एखाद्या वि शयात रुची असल्यास त्याचे पुस्तक वाचणे व व्हेरिफाइड रिसर्च फॉलो करणे हे जास्त फायद्याचे ठरेल. यु ट्युब वर जास्त करून मनोरंजनच असते.
किंवा चॅनेल व्हेरीफाइड आहे कि काय ती खात्री करून घ्या.

एंजल्स गार्डिअन एंज ल्स वगैरे बरोबर कम्युनिकेट करायला पण हाय लेव्हल एंपथी व एकदम क्लीअर इगो लेस माइन्ड लागेल. ते पहिले बनवावे लागेल. मग निसर्गातून संकेत मिळत जातील. तुम्हाला शुभेच्छा.

हंसध्वनी बद्दल अमाला +१

त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर >> इथे तुम्हाला दूध+साखर-पाणी असं डोळ्यासमोर आलं तर तो खरा हंस. रिमेम्बर, नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक:
Wink

@हीरा - प्रतिसाद नेहमीप्रमाणेच मस्त.
@सी व अमा - मला एंजल्स, ऑटोरायटिंग, मिडिअम्स वगैरेत शून्य प्रॅक्टिकल रस आहे. या प्रकारांमध्ये दिल्लीत व अन्य ठिकाणि सामूहीक आत्महत्या झालेल्या आहेत हेही माहीत आहे. जेव्हा तुम्ही स्वतच्या सारासार विचारशक्तीचा ताबा अन्य कोणा एन्टिटीस देता तेव्हा तो मोठ्ठा रेड फ्लॅग असतो. मग ते संत असोत की एंजल्स.
@अमा - हंसध्वनी या रागाबद्दल खूप छान माहीती दिलीत आपण त्याबद्दल धन्यवाद. हा राग नक्कीच एक्स्प्लोर करणार.
@हपा - नीरक्षिर विवेक तसा नीर-क्षीर-शर्करा विवेक अशी म्हण सुरु करावी काय? Happy

>>>>दुसृयाबद्दल सुयश चिंतताना आपले सर्व बायसेस बाजूला ठेवून एका झिरो बेस वरः त्यांच्या आयु ष्यात ह्या घटिकेस त्यांना हवे ते मिळो. मग ते सुख शांती पैसे अन्न काहीही असु शकते अशी प्रार्थ ना केली तर काय वाट्ते ते बघा.
होय ही आदर्श कला म्हणता यावी.
-----------------------------
या रागातील एक भजन सापडले - https://www.youtube.com/watch?v=Xo98uD3xEx0&t=6s
किती सुंदर आहे.

बड़े बड़े नयन दिए मिरगन को,
बन बन फिरत उधारी॥
.
उज्वल वरन दीन्ही बगलन को,
कोयल लार दीन्ही कारी॥
.
औरन दीपन जल निर्मल किन्ही,
समुंदर कर दीन्ही खारी॥
.
मूर्ख को तुम राज दीयत हो,
पंडित फिरत भिखारी॥
.
मीरा के प्रभु गिरिधर नागुण
राजा जी को कौन बिचारी॥

------------------------------------------------
https://pilu.in/raga-therapy.html
या साईट नुसार, हंसध्वनी हा राग उर्जा प्रदायक असून चैतन्यमय व मंगल विचारांस चालना मिळते.
बाप रे!!! म्युझिक थेरपीत रागांवरही 'वेलनेस' च्या दृष्टिने अभ्यास केलेला असेल हे डोक्यात आलेले नव्हते. शास्त्रिय संगीत म्हणजे फार निर्गुण, निराकार आणि म्हणुनच क्लिष्ट वाटे/ वाटते.

https://www.youtube.com/watch?v=ud-QqxtbixY - वातापि गणपतिं भजेहम - मुथुस्वामी दीक्षितार
---------------------
https://ommeodinodi.wordpress.com/2015/01/15/raga-hamsadhwani/
The rāga Hamsadhwani is known to activate the energy center Mooladhaara chakra, associated with the innocence and wisdom of the mind. This rāga is used as a therapy for all nerve related diseases.

हंसध्वनी रागातले कंठ्य संगीत ऐकायचे असेल तर किशोरीताईंचे ' आज सजन संग मिलन बनिलवा ' मस्ट आहे. पूर्ण 'आ ' कारातली आलापी, अत्यंत मधुर भावस्पर्शी स्वर....शब्द संपतात. ' झाले युवतीमना दारुण रण रूचिर प्रेमसे ' ची आठवण येईलच. पण ते वायलं आणि हे वायलं.

एक मानसिक लेव्हल अचीव्ह झाली की तुमची निसर्गाशी एक प्रकारची नाळ जुळते व निसर्गातील करो डो वर्श बांधत आलेला कार्य कारण भाव. गोड्वा प्रत्येक घटकाची आवश्यकता कळून चुकते. त्यातुन तुम्ही झाडे पाने व प्राण्यांशी किंवा त्यातील जीव तत्वाशी नाते जोडु शकता. असे झाले की हे गार्डिअन एंजलस अनुभवास येतात.

माझ्या कुत्र्याची सर्जरी होती तेव्हा सकाळी मी तिला फिरायला नेले होते तेव्हा एक फुलपाखरू ब्लॅक व टॅन कलरस्कीमचे होते ते आमच्या बरोबर होते व लिफ्ट पाशी वर दारात बसून राहिले. ही कदा चित वीनी चे स्पिरिट असेल जिची मुलगी म्हणजे आमचे सध्याचे कुक्कु स्वीटी.
लेकीचे गार्डिअन एंजल. !!

मी टॅरो कार्ड पण वाचते व सुपरनॅचरल अनुभवांना पूर्ण पणे ओपन माइंडेड आहे. ते एक वेगळे विश्व आहे.

हंसध्वनी रागातले कंठ्य संगीत ऐकायचे असेल>> जा तोसे नहीं बोलुं सजन वा ही लाडिक चीज पण आहे. खरंच मस्त राग आहे. त्या बरोबर शंकरा पण छान आहे. स्पॉटिफाय वर कर्नाटकी संगीताची लयलूट आहे. वीणा वादन व्हायोलिन उत्तम वादन क्लिप्स आहेत.

>>>>मी टॅरो कार्ड पण वाचते व सुपरनॅचरल अनुभवांना पूर्ण पणे ओपन माइंडेड आहे. ते एक वेगळे विश्व आहे.
होय अमा. नक्कीच. १००%.

मला जेव्हा जेव्हा ११ नंबर दिसतो, जो की खूपदा दिसतो. मी तो एंजल नंबर समजते. इटस अ विंक फ्रॉम माय गार्डिअन एंजल Happy
टॅरो कार्ड मीही वाचते Happy
--------------
https://www.youtube.com/watch?v=xX2dai-9tfs - जा तोसे नही बोलू कन्हैय्या......
वाह!!! खरच लाडीकच!
-----------------------
>>>>>>>>>>हंसध्वनी रागातले कंठ्य संगीत ऐकायचे असेल तर किशोरीताईंचे ' आज सजन संग मिलन बनिनलवा ' मस्ट आहे. पूर्ण 'आ ' कारातली आलापी, अत्यंत मधुर भावस्पर्शी स्वर....शब्द संपतात.
हे ऐकले पाहीजे हीरा.

सध्या पद्मश्री केशवजी गिंडे हे सुप्रसिद्ध बासरीवादक अशा तऱ्हेचे काही प्रयोग करीत आहेत. प्रयोग करीत आहेत म्हणण्यापेक्षा विकल मनस्कांसाठी ते बासरीवादनाचे कार्यक्रम करतात, हे ठीक होईल.

ते एक मॅजिक पेनी असे पण असते. अमेरिकेत किंवा वेस्टर्न किरिस्ताव लोकांच्यात. अगदी शंका पण नाही तिथे शायनिन्ग पेनी सापडते. ती तुमच्या लव्हड वन किंवा वेल विशर आत्म्याने ठेव्लेली असते.

अमा इथे पेनी जवळ जवळ रोज ३-४ सापडतात. हां शायनिंग पेनी मात्र क्वचितच सापडते Happy
>>>>>>विकल मनस्कांसाठी ते बासरीवादनाचे कार्यक्रम करतात, हे ठीक होईल.
वाह!!! कलेचा किती अभिनव आणि खरच उपयुक्त अविष्कार.

फार पूर्वी म्हणजे भारतात केबल आलेले नवीन तेव्हा स्टार मुव्हीज वर एक सिनेमा पाहिलेला.
एक बाई आहे तिची दोन मुले मुलगी अगदीच लहान पाच सहा वर्शाची. व तिचे वडील वारलेले आहेत. ती मुलगी ऑटिस्टिक स्पेक्टरम मध्ये आहे.
तर टॅरो कार्ड मधील मून कार्ड बघून तिला आपले बाबा त्या चंद्रावर आहेत असे वाट्ते. व ती मून कडे जाउ बघते. मुलीच्या प्रेमाखातर ती आई जी आर्किटेक्ट असते ती घरामागे एक मोठा उंच चक्राकार रँप बांधते व मुल्गीला घेउन पौर्णिमेला रात्री त्यावर चढतात.

ह्यात मुलगी एकदा थेरपी ला जाते व डॉक्ट र बसलेला असतो पेंट करत असतात. तो काही काळासाठी बाहेर जातो व परत येतो तर मुलगी गायब. एक मोठे झाडाचे चित्र काढलेले असते भिंतीत व ती मुलगी त्या चित्रातच आपले अंग रंगवून लप लेली असते. हा सी न फार भन्नाट आहे. ह्यात टॉमी ली जोन्स हा डॉक्ट् र आहे खूप छान काम करतो हा.

तेव्हा पासून मी टॅरो कार्ड्स जमवते माज्याक डे रायडर व्हाइट सेट आहे. व माझे कार्ड टेंपरन्स. पुण्यात एक बाई टॅरो चे ऑन लाइन क्लासेस घेतात.

अमा टॅरो कार्डस मलाही विकत घ्यायचे आहेत बट आय अ‍ॅम वेटिंग. कधीतरी चालत येतील माझ्याकडे.
मी क्वचित जालावरती रीडिंग वाचते.
>>>>>>पुण्यात एक बाई टॅरो चे ऑन लाइन क्लासेस घेतात.
वाह!!
>>>>> एक मोठे झाडाचे चित्र काढलेले असते भिंतीत व ती मुलगी त्या चित्रातच आपले अंग रंगवून लप लेली असते. हा सी न फार भन्नाट आहे.
अरे मस्त!!

नीर-क्षीर-शर्करा विवेक >> डायबेटीस झालेला हंस वाटतोय ! त्यात अजून पुढे '५५ मिनिटे' किंवा 'इन्शुलिन' लिहिलं असतंत तर दीक्षित हंस झाला असता तो.

Pages