एक प्रयोग

Submitted by सामो on 16 December, 2021 - 08:10

काल रात्री बराच वेळ पडून, इन्स्ट्रुनेम्टल म्युझिक (https://www.youtube.com/watch?v=WxDJsMQCSzQ&list=PLo4u5b2-l-fBE7Yg_v5XWw...) ऐकलं. रागांमधलं काहीच कळत नाही पण नोट केलेले की 'हंसध्वनी' हा राग आपल्याला फार आवडतो आहे. कदाचित संस्कॄतप्रचुर नावाच्या मोहातच पडले असेन, त्यातही शुभ्र हंस इमॅजिन केल्याने दूधात साखर. ते काहीही असो पण मन खूप शांत झाले. बराच वेळ गेल्यानंतर आपोआप मनात एक विचार आला. जशी पाच इंद्रिये असतात तसे आपले सहावे इंद्रिय असते आपले मन. अर्थात बाह्य सॄष्टीमधून ज्ञान अर्जन करण्याचे मार्ग या इंद्रियांपाशी असतात. त्वचेला स्पर्शाचे, डोळ्यांना दॄष्टीचे, शृतींना ध्वनीचे ज्ञान होते आदि. मग मनाला कोणत्या रुपात ज्ञान मिळते तर इन्ट्युशन.
मनाची एकाग्रता, शक्ती तपासण्याकरता, मी एक प्रयोग काल केला. तो इथे देते आहे. हा मनाचा खेळ असेलही पण माझ्यापुरता तो कन्व्हिन्सिंग आहे. पुरेसा रोचक व उपयोगी आहे.
व्यवहारात संबंध येणारी एक एक व्यक्ती आठवत गेले आणि रेकीमध्ये करता तशीच पण मानसिक उर्जा, प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे संक्रमित करत गेले. त्या त्या व्यक्तीला मनाने 'फील' करत गेले. मग मला जाणवले मी ही जी उर्जा देऊ पहाते आहे तिचा स्वीकार करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची भिन्न आहेच परंतु मलाही सब घोडे बारह टक्के करता येत नाहीये. मला हां 'गॉड ब्लेस येरी', 'गॉड ब्लेस मारिया', 'गॉड ब्लेस अ‍ॅलेक्स' असे सरसकट करता येत नाहीये. उदा - अ‍ॅलेक्स्बद्दल विचार करताना मला त्याला आरोग्यविषयक शुभेच्छा द्याव्याश्या वाटतात. कदाचित मला हे माहीत आहे की तो वरचेवर डॉक्टरांकडे जाण्याकरता टाईम ऑफ घेतो. त्यामुळे असेल. काही का असेना पण प्रत्येकाकरता दिल्या गेलेल्या शुभेच्छांचा, वेल विशेस, प्रार्थनेचा आत्मा भिन्न भिन्न आहे. मिकेलाला आणि माईक नंबर १ ला मी सहज ओघवत्या रीतीने माझी प्रार्थना देउ शकते आहे. ते एखाद्या कोर्‍या कॅनव्हाससारखी आहेत याउलट 'मारिया' मी काही शुभेच्छा दिल्या तरी घेत नाही. शी इज स्टिफ. शी हॅज अ माईल्ड व्हेरी माइल्ड रिसेन्ट्मेन्ट. कदाचित परवा मी तिला सर्वांसमोर तिच्या कोडबद्दल टोकायला नको होते. प्रश्न विचारायला नको होता. प्रत्येकच जण आपल्या कामाबद्दल खूप हळवा असतो. असो. येरीला नुकतेच मूल झालेले आहे पण येरीला शुभेच्छा देताना मला मुलाला इन्क्लुड करता येत नाहीये. ते मूल डिस्टन्ट आहे. याउलट त्याच्या पत्नीस सहज शुभेच्छा देता येताहेत.
आणि हा प्रयोग मी झोपेपर्यंत चालू ठेवला व थोड्याच वेळात झोपी गेलेसुद्धा. अजुन एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे अशी प्रार्थना करणे हे ऑफिसच्या किंवा त्रयस्थ/परिचित लोकांबद्दल सहज शक्य झाले. बट पास्ट वॉज लोडेड! भूतकाळातील व्यक्तींकरता सहज माझ्या मनातून उद्गार निघाले नाहीत. तेव्हा मन आरस्पानी न रहाता ढवळले जात होते. हा असा वागला, ती तशी वागली, मला ही व्यक्ती आवडता नाही आदि विचार मनात लाटांसारखे येउ लागले. त्यामुळे मी भूतकाळातील माझ्या प्रियजनांवरती हा प्रयोगच केला नाही. मुलीकरता व नवर्‍याकरता अशा प्रार्थना दिवसातून २० वेळा तरी होतात. नकळत, किंचित कंपल्सिव्हली. त्यामुळे मुलीस व नवर्‍यासही वगळले.

हा प्रयोग माझ्या मनाचे खेळ असतीलही पण एक नक्की या प्रयोगा अंती मला स्वतःबद्दल, माझ्या नातेसंबंधांबद्दल अधिक माहीती मिळाली. हे म्हणजे बाह्य किंवा आंतरजगाचे ज्ञान होणेच नाही का? कदाचित मी सध्या जास्त मिस्टिक व्हिडिओज युट्युबवरती पहात आहे त्याचा हा परिपाक असावा. उदाहरणार्थ एंजल्स, गार्डिअन एंजल्स, इन्टुशन, एंजल नंबर्स वगैरे विषयक व्हिडीओज (https://www.youtube.com/channel/UCVoOM-cCEPbJ1vzlQAFQu1A) सध्या जास्त बघतही असेन. ते काही का असेना, मला हा प्रयोग व्यवस्थित डॉक्युमेन्ट करायचा आहे. ओव्हर अ पिरीअड ऑफ टाइम तो कसा इव्हॉल्व होतो हेसुद्धा जाणुन घ्यायचे आहे.

आपल्या मतांचा सकारात्मक/नकारात्मक आदर आहे. जरुर इनपुट द्यावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जे प्रयोग म्हणताय त्याला टेलिपॅथी म्हणतात. मिस्टिक व्हिडिओज महिनाभर बंद करून तेवढा वेळ श्वासोच्छवासावर ध्यान केंद्रीत करण्यास दिला तर प्रयोगात यश मिळण्याची जास्त शक्यता आहे. मिस्टिक नंबर्स, एंजल-किंजल असल्या गोष्टींनी अंतर्मनाला निरर्थक इनपुट्स मिळत असतील. अलीकडच्या काळातल्या नाथसम्प्रदायातील आर्वीकर महाराजांच्या साधकांसाठीच्या नित्यक्रमात स्वात्मदीक्षा म्हणून एक ध्यान-प्रार्थनेचा सोपस्कार आहे, त्यात हेच व्यवस्थित सांगितले आहे. ज्ञानोबांचे पसायदान एकप्रकारे तेच आहे की.

धन्यवाद जिद्दु.

>>>>>ज्ञानोबांचे पसायदान एकप्रकारे तेच आहे की.
होय बरोबर!!! ज्ञानेश्वरां चे पसायदान आणि शांती मंत्र/ विश्व प्रार्थना ही तीचे रुपे इन मोस्ट प्रिस्टीन फॉर्म.

>>>>>>>मिस्टिक व्हिडिओज महिनाभर बंद करून तेवढा वेळ श्वासोच्छवासावर ध्यान केंद्रीत करण्यास दिला तर प्रयोगात यश मिळण्याची जास्त शक्यता आहे.
ओके.

>>>>>तुम्ही जे प्रयोग म्हणताय त्याला टेलिपॅथी म्हणतात.
होय तसाच प्रकार.

जिद्दूंचा प्रतिसाद वाचून थोडे लिहावेसे वाटले.
खरे तर हे सर्व महाजनांनी आधीच अनुभवून पथ तयार करून ठेवला आहे. महाजनो येन गत: स पंथा: . पण प्रत्येकाचा realisation चा क्षण आला की revealation होतं. स्थिरबुद्धीसाठी आणि नित्यानंदासाठी अनेक सोपे मार्ग सांगितले गेले आहेत. पण ज्याला जी वाट सोपी किंवा नवी वाटेल त्या वाटेने तो जाईल. सोपी वाट कोणती यावरही अनेकांनी दिग् दर्शन केले आहे. पण आयुष्यात तो realisation चा क्षण येईल तेव्हाच ते कळेल. तोपर्यंत, 'राही, चलता चल'..
आपापले प्रवास आणि प्रयोग करीत राहावे हेच उत्तम.

हीरा, सुंदर प्रतिसाद!!!
>>>'राही, चलता चल'..
आपापले प्रयोग करीत राहावे हेच उत्तम.

होय खरे आहे.

बाबामहाराज आर्वीकर यांच्या 'स्वात्मदीक्षेसंदर्भात' सर्च दिली असता, काही माहीती सापडली नाही परंतु मला जैन धर्माचे एक मासिक सापडले ज्यात सुंदर कविता व विचार सापडले.
त्या अंकांची लिस्ट - चर्पिंग स्पॅरो.
http://new.maitreesamooh.com/index.php?option=com_jdownloads

>>>>>>>>खरे तर हे सर्व महाजनांनी आधीच अनुभवून पथ तयार करून ठेवला आहे.

उसने
एक पेड लिखा
खिडकी से बाहर
झांका देखा
कोइ और
उससे भी पेहेले
कई कई पेड
लिख गया
.
उसने सोचा
अब वह पहाड लिखेगा
देखा सहसा
कोइ और सामने
एक पहाड लिख गया
.
उसने डरते डरते
चुपके से
एक नदी लिखा
और देखा
एक नदी
कोइ और लिख गया
.
अब वह नही लिखता
कहता है
कोइ और है
और सिर्फ वही है
जो लिखता है

- मुनि क्षमासागर.
साभार - http://new.maitreesamooh.com/index.php?option=com_jdownloads&task=downlo...

टॅरो कार्डस प्रचंड रेझोनेट होतायत. प्र-ह-चं-ड!!!
ते खरच खरच आपली उर्जा बरोब्बर पकडतात. फक्त वर्तमानातली नाही तर शॉर्ट टर्म भविष्यातलीही. हे अगाध आहे, गूढरम्य आहे. यामागे शास्त्रिय आधार काय असावा माहीत नाही.

आज मैत्रिणीने, व्हाईट रायडर टॅरो कार्ड डेक भेट दिला. पहीले कार्ड आले - एस ऑफ कप्स - एका सुंदर नात्याची सुरुवात. खूप इन्ट्युइटिव्ह. कप्स म्हणजे भावना, हृदयातील ओलावा, इन्ट्युइशन, प्रवाही ...... सबकॉन्शस (अमूर्त मन) आणि एस (एक्का) म्हणजे सुरुवात. नक्कीच चांगली सुरुवात आहे.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AL9nZEUSiEylwXMVgQug9URVlv28F-s0UUKgZzlUCemSIOeMV_RqVpKFAQ0q-Wxdj542RsZN4aXV55xKgsWN5qegFczS8S1UCWcVDU92KLERVTpWc3INfPiEseDbDorj7CZ6tPYtDHlyk5lyvJcp7iv6Ycq9Ow=w353-h625-no?authuser=0

Pages