दीपावली च्या शुभेच्छा (२०२१)

Submitted by धनुडी on 5 November, 2021 - 15:05

या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्ताला ऑफिस चालू झालं. मग दिवाळीत रांगोळी काढायची संधी सोडते कि काय.

एक एक फोटो अपलोड होईना, मग कोलाज करून अपलोड केले.
सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!

20211106_000627-COLLAGE.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आहेत रांगोळ्या. पण काढायला किती वेळ आणि मेहनत लागली असेल! विशेषत: उजवीकडच्या त्या खालच्या दोन.
फारच सुंदर.

धन्यवाद शर्मिलाR, मंजूताई, ममो,वीरू,हीरा, किशोर मुंढे, अमुपरी, सामो,च्रप्स, दत्तात्रय साळुंके, फारएण्ड Happy
ममो तु माझं कौतुक करत्येस! मुठभर मांस चढलं अंगावर.
हीरा, रांगोळ्या काढायला फार वेळ नाही लागला. त्या उजवीकडच्या खालच्या दोन्ही रांगोळ्या घरासमोर आहेत. त्या काढताना माझी शेजारीण अख्खा वेळ माझ्याशी गप्पाच मारत उभी होती. गाळण्या ने रंग भरून इयरबडने चित्र काढलय पटापट.
उजवीकडची सर्वात वरची रांगोळी ऑफिस मध्ये काढली, ती आणि डावीकडची खालची ऑफिस मध्ये आहे. 3 नोव्हेंबर ला. ती काढताना मात्र दमझाक झाली. एकतर बऱ्याच महिन्यांनी असं खाली बसून रांगोळी काढली. उठताना अक्षरश: आई आठवली. पायात गोळे दोन दिवस होते.

रांगोळ्यांमधली आकृत्यांची व्हेरिएशन्स छान आहेत. उजवीकडच्या मधल्या चित्रात तो अ‍ॅरो सारखा (->>) आकार सर्व बाजूंनी "ही इथे रांगोळी आहे" असे दाखवतोय असे वाटते Happy

फा खरं सांगू ( मला हि अशी हाक केव्हा पासून मारायची होती. Happy ) माझा खुप आवडता फॉर्म आहे हा " >>> " मी खुप वापरते. उभा आडवा. कधी कधी वाटत की माझ्या रांगोळ्या त्याच त्याच होत चालल्या आहेत.
सियोना तुला पण थॅंक्यु.

Happy Happy

पुन्हा बघितल्यावर इतरही रांगोळ्यांमधे तो फॉर्म दिसला. सिग्नेचरसारखा Happy एकसारख्या नाही वाटल्या. नीट पाहिल्यावर न्युआन्सेस दिसतात. मी जेथे राहायचो तेथे घरांसमोर खूप लोक रांगोळ्या काढत. काल हा बाफ बघताना एकदम ते आठवले.

मस्तच आहेत रांगोळ्या. फोन वरून बघितल्या होत्या पण मराठीतुन लिह्यायचे होते. अगदी कलाकाराचा हात आहे तुमचा. ह्या मानाने मी काढलेली रांगोळी एकदम प्राथमिक स्वरूपाची आहे. पण वेळ कमी होता व साधारण तितकीच लेव्हल आहे व्ह्याख्या विक्ख्ही वुख्हु म्हणून काढली. जमेल तसा इथे झब्बू देइन.

मूव्ह आयोडेक्स लावणे गरम पाण्यात पाय सोडून बसणे असे उपाय करा नक्की. गु डघे दुखी हा आमचा प्रांत. ओनरशिप घेतली आहे.

धन्यवाद फा, ऋन्मेSSष, अमा, वर्णिता.
वर्णिता रांगोळ्या फार मोठ्या नाहीत. फक्त उजवीकडची सगळ्यात वरची मोठी आहे ( ऑफिस मध्ये काढलेली) खालच्या रांगोळ्या फोटोच्या ॲंगलमुळे मोठ्या वाटताएत.
अमा झब्बू ची वाट बघतेय

Pages

नवीन प्रतिसाद लिहा