मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काय माहित , न्युज होती कि शमिता शेट्टी साठी जाणार हिन्दीत, त्याची गर्लफ्रेंड आहे आणि बहुतेक लग्नही ठरलय !
शमिता ऑलरेडी आहे शो मधे.

बापरे नेहा पण ? भयंकर अनॉयिंग बाई होती ती , शमिताची एकदम बी.एफ.एफ Uhoh
हिन्दी बिबॉ अशक्य लेव्हलला बायस्ड आहे , मागच्या आठवड्यात शमिताचा मानलेला भाऊ राजीव आला वाइल्डकार्ड म्हणून, आता बॉफ्रे राकेश आणि बेस्ट फ्रेंड नेहा ! स्वतः शमिताच मुळात तिसर्‍यांदा आली आहे बिबॉ मधे !
कै च्या कै चालु आहे, सोशल मिडियावर ऑलरेडी मिम्स आल्या आहेत.. बिबॉ= सासुराल शम्मो का, मायका शम्मो का इ.
देऊन टाका तिला ट्रॉफी नाहीतर येतच राहिल दर वर्षी !

आज मला गायत्रीची शूर्पणखा बकासुर कॉमेंट्री आवडली, जय खाताना दाखवला त्यावेळी >>>>>>>> अगदी अगदी. गायत्रीने वेगळाच आवाज काढलेला.

मीरा आणि गायत्रीने याआधी केलेली शुपर्णखाची स्टोरी सुद्दा भन्नाट होती. मेघा आणि सई राजेश-रेशम ला राजा- राणी नावे देऊन अश्याच स्टोर्या रचायच्या ते आठवल.

देऊन टाका तिला ट्रॉफी नाहीतर येतच राहिल दर वर्षी !
>> ती भारी खेळतेय बिग बॉस .. Ott ची व्हिलन इथे हिरो आहे... आवडतोय तिचा खेळ...

राकेश बापट आणि नेहा भसीन हिंदी bb मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून गेले आहेत.. >>> अच्छा, थँक यु. मिळाला तर परत बघेन तो व्हिडीओ. मराठीच म्हणत होती ती, नीथा शेट्टीचं पण नाव घेतलं. फेकतात कधी कधी अर्धवट माहीतीवर.

कै च्या कै चालु आहे, सोशल मिडियावर ऑलरेडी मिम्स आल्या आहेत.. बिबॉ= सासुराल शम्मो का, मायका शम्मो का इ. >>> हाहाहा.

मीनल काय ए टीममधे जाणार का आता, वेडी आहे की काय. स्वतंत्र खेळना, दोन वि ना सोडायचं आणि त्या दोन दु ना जॉईन कशाला व्हायचं.

देऊन टाका तिला ट्रॉफी नाहीतर येतच राहिल दर वर्षी !
>> ती भारी खेळतेय बिग बॉस .. Ott ची व्हिलन इथे हिरो आहे... आवडतोय तिचा खेळ...
<<
मला नाही आवडत तिचा गेम काही केल्या, अतिशय फेक आहे, तिच्याही पेक्षा फेक तेजस्वि आहे. सगळ्याच बायका फेक आहेत Proud
त्यातल्या त्यात प्रतीक , उमर बरे आहेत.

मीरा सगळा आठवडा चांगला करून असं काहीतरी करते कि चावडीवर बोलणी खावीच लागतात तिला.
इतके दिवस जय-उत्क्याला इतकी खुन्नस देऊन शेवटी कॅप्ट्न बनली जयच्या मदतीने, मग जय नंतर वेळ आल्यावर टोमणे मारणारच कि, तो जे म्हंटला कि १० आठवडे आमच्यामुळे आलीयेस ते प्रुव्ह केलं तिनी ..सेल्फ रिस्पेक्ट वगैरे गेला उडून मीराचा !
खरं तर मीनलला घ्यायला हवं होत मीराने, सोनाली, दादुसही चालले असते कि, त्या जय -उत्क्याला ठेवायच कि बाहेर !
त्या मानानी गायत्रीने डिग्निटी मेन्टेन केली स्वतःची !
ट्रिसमि टास्क नुसताच टिपी होता, नीथा अर्थातच बेस्ट होती रँपवर , उत्क्या फिदा आहे तिच्यावर !

हो खरच.मीराने विशाल विकासवर पण विश्वास ठेवायला हवा होता.
पण टीम ए या निमित्ताने आता एकत्र येऊ शकते.
गायत्रीने आता कितीही डिग्निटी दाखवली तर जर उद्या मीराच परततिच्या ग्रुपकडे गेली तर गायत्रीला पर्याय राहणारच नाही.टीम बी मध्ये जाईल अस वाटत नाही,आणि एकटी खेळू शकणार नाही.
बिबॉसला दरवेळी त्रुप्तीच का संचालक म्हणून लागते ते कळत नाही.
आज बहुतेक जय,मिनल,उत्कर्ष यांच्यावर होईल चावडी.खरतर मीराच कौतुक ममांनी करायला हव यावेळी.

विशाल , मीनल सेफ.
मला वाटतं सोनाली जाईल आणि तीच गेलेली बरी.
मी थोडी मतं दिलीत तिला. पण मांजरेकर म्हणाले तशी ती बांडगुळ आहे.

तृप्तीला खुप कमी वोट आहेत, लेटेस्ट वोटीन्ग मधे विशाल एक नबर आणी सगळ्यात शेवटी तृप्ती होत्या

बाकी एक मान्य करायला हवं शमिता- तेजस्वि दोघी जितक्या वागायला अनॉयिंग आहेत, दिसायला मात्र बिन मेकपच्या सुद्धा खूप सुंदर दिसतात ., बरेचदा शमिताचे रात्री मेकप काढता काढता बोलतानाचे शॉट्स दाखवतात, केवढी ग्लोइंग स्किन आहे विदाउट मेकप !

आजही म.मां नी अगदी एक अन एक विचार आपल्याच मनचा बोलला , याही वेळची चावडी एकदम झकास.. हा सिझन फार म्हणजे फार भारी करतायेत मांजरेकर !
इनडायरेक्ट्ली विशाल ज्या पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीची स्तुति झाली , त्याचं नाव न घेता !
एकच पॉइंट नाही पटला, मीराला स्नेहाशी पॅचप करायला लावायचा आग्रह कशाला ? आधी टिम ए तुटण्यासाठी इतक्या चुगल्या दाखवल्या गेल्या , गायत्रीची स्तुतिही झाली, मग आता फायनली तुटलाय ए गृप तर कशाला पॅचप , नडु दे त्यांना !
अर्थात मीरा गायत्रीने उडवून लावली पॅचप आयडिआ Proud

एकच पॉइंट नाही पटला, मीराला स्नेहाशी पॅचप करायला लावायचा आग्रह कशाला >> होना !
बा़की जयची मदत घेतल्याने मिराला बोलणे बसणार आणी थोड फार चान्गल खेळलेल वाया जाणार हे झालच !
विशालची फार स्तुती करत नाहित ममा नाहितर सगळे अजुनच तुटन पडतिल त्याच्यावर, बाकी त्रुप्ती ग्रजेस धरुन ठेवतात आणी कधिकधी स्वतःच खर करण्याच्या नादात त्याच आणी दुसर्‍याच अस दुहेरी नुकसान करतात.

स्नेहा मीरा वाद उगाच घातला काल.
ती स्नेहा किती तुसड्यासारखी बोलते तक्रार करताना पण!! मला वाटलं होतं की आविष्कार बद्दल राग आहे मनात म्हणून तसे बोलत असेल पण काल मीरा आणि तृप्तीबद्दल बोलतानाही तसेच बोलत होती. बाकी कोणाचा कधी तसा सूर लागत नाही तक्रार करताना.
मिनल काल पटकन् सॉरी म्हणाली ते आवडलं. विकास, मीनल, विशाल पटकन् चूक मान्य करून सॉरी म्हणतात.

आज ममां एक वाक्य बोलून गेले जे आपण सगळेच म्हणत इहोत की जय बाहेर गेला तर गेम कसा होईल?
ममां सरळसरळ अस पहिल्यांदाच बोलत असावेत.
मीराच खूप कौतुक होईल अस वाटल होत,पण बोलणीच खाल्ली तिने.
उलट म्हणाले गायत्री दिसली,मीरा कधीकधी दिसला.
मला तर या आठवड्यात जास्त मिनल.आणि मीराच दिसल्या.

मी त्या ऍक्ट रायडरची चांगलीच तासली मायबोली स्टाईलमध्ये. लोकांना मूर्ख बनवतो चुकीचे थंबनेल टाकून. मला बोलतोय मी जुनेच थंबनेल टाकतो. त्याला बोललो जुने थंबनेल असतात मग एव्हिक्ट झालेले कंटेस्टंट कसे अपडेट होतात? तू पण आब्रा का डाब्रा करतोस काय? वाटच लावली त्याची. मला ब्लॉक केलंय बहुतेक आणि कमेंट पण हाईड केल्या.

बोकलत मला समजलं नाही काय ते.

मी youtubers चं फार बघत नाही, act rider चं voting ट्रेंड्स साठी बघते, बाकी सगळेच पकवतात. पाच दहा मिनिटं रिव्ह्यू कोणी देत नाही, मोठे मोठे व्हिडीओ कोण बघणार त्यापेक्षा मायबोलीकर मस्त लिहितात, तेच वाचते.

स्नेहा सर्व अवगुणसंपन्न असावी.

Btw कोण गेलं.

थंबनेल असतील चुकीचे पण तो अ‍ॅक्ट रायडर मोस्टली रिलायबल आहे अपडेट्स च्या बाबतीत. नक्की नसेल तर सांगत नाही तो ( असे माझे निरीक्षण) बाकीचे यूट्यूबर्स काहीही अफवा देतात.

तो ऍक्ट रायडर खोटे थंबनेल ठेवतो. बहुतेक थंबनेल, खास करून जे व्होटिंग ट्रेंडचे व्हिडिओ असतात त्यांचे थंबनेल चुकीचे आणि प्रेक्षकांची दिशाभूल करणारे असतात. थंबनेल चुकीचा ठेऊन जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ बघावा हा त्यामागचा उद्देश असतो. जेणेकरून पाच पैशे जास्त मिळतील.

काहीही अफवा देणे आणि काहीही थंबनेल ठेवणे यांचा उद्देश एकच प्रेक्षकांना मूर्ख बनवणे, व्हिडिओ व्ह्यू वाढवणे आणि युट्यूबकडून पाच पैशे ज्यादा मिळवणे.

बरं झालं.

मैत्रेयी मलाही अ‍ॅक्ट रायडर बरा वाटतो पण मी बघत नाही, वोटींग बघते फक्त.

Pages