मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ते दाखवल पण सगळेच तीला सान्गत होते पटवुन देत होते तरी ही बया काही हटायला तयार नाहि, बिबॉस पण अ‍ॅम्बिग्युअस सुचना देतात, बहुमताने तिला तिथुन सहज हटवता आल असत पन टास्क काय ते निट सान्ग्तच नाहित.
सगळे घराबाहेर जायला लागल म्हणुन वैतागले होते एकटे दादुस सोडून ते कधिही तक्रार करत नाहित, बाकी मी असते तर मजेत जाउन राहिले अस्ते, घरातले काही काम करायची नाहित, आयत जेवायला आणून दिल जाईल, तिथे गाद्या वैगरे घालुन दिल्या होत्या की मस्त बसायच गप्पा मारत.

काल विकास - मीनल सोनाली बद्दल बोलताना दाखवले.
मग लगेच मीनल - सोनाली विकासाबद्दल बोलताना दाखवले.
विषय - टीम ए मधल्या लोकांशी जाऊन बोलणं.
विकास- सोनाली मीनल बद्दल बोलताना दाखवले का आठवत नाही.

सोनालीला हौदात राहायला सांगितल्यावर तिने मांजरेकर तिच्याबद्दल जे बोलले त्याचा डेमो दिला.

विकास सोनाली मिनलबद्दल बोलतानाचा एक विडिओ फेबुवर आलाय. त्यात विकास टीम ए ला बिच्छू गॅंग म्हणाला आहे.

नीता उडेल. जर तीला ते मिनिमम पिरियड प्रकरण नसेल तर. ती अगदीच माठ आहे. दादूस जाणार शेवटच्या टप्प्यात.
सोनाली ला रीजनल लोक वाचवत असतील.
तृप्ती देसाई ए टीम कडे झुकलेल्या आणि त्यांची लोक प्रियता घसरणीला लागली.

आता पाहिला एपिसोड. स्नेहा हिस्टेरिया झाल्यागत किंचाळत होती. असं वाटत होतं हिने काही घेतलंय की काय? की काही झाले हिला?
बिबॉ ला माहित हवे एव्हाना की कोणीही जागा सोडल्या नसत्या. काहीही निगोसिएशन्स झाली नसतीच. म्हणजे आधी कोण कुठल्या पाटीजवळ पोहोचतंय हाच टास्क. ते प्रोमो मधे दाखवलं तेही फुसका बार निघाला. मला पण ती बाहेर रहाण्याची शिक्षा (?)फारच आवडली असती Happy शिक्षा तर आतल्यांनाच झाली ना?! डबल ड्युट्या कराव्या लागल्या त्यांना.

ट्विटर वर पाहिला तो बिच्छू विडीओ. पण तो मिनलला टोमणे मारतोय. सोनालीने मस्त पलटवला तू पण जातोच की त्यांच्याकडे गप्पा मारत.
मिनलला गायत्री मिराबरोबर जायचे आहे की जय उत्क्या बरोबर?
मिरा गायत्रीचे ते आता आम्ही आमचे आमचे खेळणार ऐकून कंटाळा आला आहे. बोलबच्चन आहेत नुसत्या.

होना, मस्तं होती बाहेर रहायची शिक्षा, नो ड्युटीज , आयते फुड आणि भरपूर फुटेज Proud
ती सोनाली कित्ती कटकट करते, काही अक्कल् नाहीये तिला , विशाल-दादुस अगदी जयने सुद्धा आनंदानी स्वीकारली शिक्षा, हिचे अर्ग्युमेन्ट्स संपतच नव्हते !
रँकिंग टास्कला काही अर्थच नव्हता, उलटा क्रम बरोबर वाटला असता फार तर Biggrin
स्नेहाला बघून एकच गाणं आठवल ‘पता नही ये कौनसा नशा करती है“
एपिसोड मधेही दाखवलं कि जय स्नेहाला ७ डिझर्व करते म्हंटलेल्, त्यावरून काही वाजलं नाही त्यांचं !
अ‍ॅक्चुअली बिबॉने गुगली टाकून पहिल्या ५ लोकांना नॉमिनेट करायला हव होतं !
आता नीथा जाते कि दादुस बघायला हवं !
पण ७ लोकांना नॉमिनेट केल्याने मला सोनालीही जाऊ शकते असं वाटतय, जर दादुसला घालवायच असत तर बिबॉचं काम झालं होतं फक्तं शेवटच्या ५ लोकांना नॉमिनेट करून !
एनीवेज, व्होटिंग लाइन्स अजुन सुरु झाल्या नाहीयेत असं ऐकलं म्हणजे एलिमिनेशन नसेलही कदाचित !

बिग बॉस वाल्यांनी टास्क कसे असावे हे एम टिव्ही रोडीज कडुन शिकावं. आजिबात तक्रार करायला / चिटींग करायला जागा नसते.

सोना extra शॉट मध्ये बरेच वेळा असते, न छान एंटरटेन पण करते की त्या दादूस आणि निथा पेक्षा

>>सोना extra शॉट मध्ये बरेच वेळा असते, न छान एंटरटेन पण करते की त्या दादूस आणि निथा पेक्षा

हो! extra shots मध्ये बऱ्याचदा असते ती..... पण tasks मध्ये आणि planning/plotting मध्ये कमी पडते ती!!

उत्क्या काल स्वताला पहील्या तीनात धरत होता पण त्याचा नेमका नंबर सांगत नव्हता Wink

स्नेहा नंबर वन डिझर्व्ह करत नसली तरी ती तिकडे अडुन राहिली हे महत्त्वाचे.... उगा जय म्हणाला म्हणून हटली असती तिथून तर अजुनच वाईट दिसली असती!!

विशाल आणि जयला बाहेरचा अंदाज चांगला आलाय त्यामुळे ते नॉमीनेशनला घाबरत नाहीत
दादूस असल्यामुळे उत्कर्ष वाचेल!!

विशाल जय आणि मीनल हे शेवटचे तीन असतील असे सध्यातरी वाटतेय..... आणि विशाल आणि जय घराचे दिवे बंद करुन बाहेर येतील आणि विशाल मोठ्ठ्या मार्जिनने जिंकेल असा अंदाज आहे!

ओपनिंग वोटिंग ट्रेंड नुसार रँकिंग काहीस अस(अँक्ट रयडरवाल्याच आहे)
1.विशाल
2विकास
3जय
4सोनाली
5नीथा
6उकर्ष
7दादूस

आता पाहिला एपिसोड. स्नेहा हिस्टेरिया झाल्यागत किंचाळत होती. असं वाटत होतं हिने काही घेतलंय की काय? की काही झाले हिला?>>>
हो ना.. मला तर नंतर हसूच यायला लागलं.

बिबॉचं काम झालं होतं फक्तं शेवटच्या ५ लोकांना नॉमिनेट करून ! >>> हो ते मलाही कळले नाही.
बाकी बिबॉ ला हवे ते लोक पहिल्या ३ वर उभे राहिले असते तर त्यांनी पहिल्या ३ ना नॉमिनेट केलंही असतं. सब खेल उसीका है Happy

5नीथा
6उकर्ष
7दादूस हजम नाही होत. उत्क्या नीताच्या मागे? तो गेला तर मजा नाही गेमला.
अविष्कार सुटला बिचारा असं वाटलं कालचा स्नेहाचा कडकडाट पाहून. Lol Lol Lol
स्नेहा नंबर वन डिझर्व्ह करत नसली तरी ती तिकडे अडुन राहिली हे महत्त्वाचे.... उगा जय म्हणाला म्हणून हटली असती तिथून तर अजुनच वाईट दिसली असती!!... हम्म ,ती वाटते तितकी बावळट नाही. चालू आहे. गुड फॉर हर. बाकीच्या मुलींना शिका तिचे काही.

फार इरिटेटिंग आहे स्नेहा. वाद घालायचा म्हणाजे कोणते तरी एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत रहाते.
उत्क्या आत्ता शेवटी असला तरी फरक पडणार नाही. नीता, सोनाली अन दादुस त्याच्या आधी जाणार.

बिग बॉस दरवर्षी तेच तेच टास्कस घेऊन, उलट करण्याचं डोकं वापरत नाही किंवा स्नेहा नॉमिनेशनमध्ये येऊ नये ही इच्छा.

मी दोन वि ना पहाटेच वोटिंग केलं, वोटिंग लाईन्स सुरू होत्या तेव्हा.

फार इरिटेटिंग आहे स्नेहा. वाद घालायचा म्हणाजे कोणते तरी एकच वाक्य पुन्हा पुन्हा बोलत रहाते.>>>>
हिन्दी ओटीटी मधलं प्रतीकच वागणं बघून आली आहे बहुतेक , तो करतो असे भांडणात ..
पण तो दिसायला अगदीच पोर्‍या दिसतो, त्याच्या एज ला /पर्सनॅलिटीला शोभतं असलं वागणं , या स्नेहाकाकू वेडसर दिसत होत्या प्रोमो मधे !

लोकांच्या वोटिंग वर पण काही आर्थिक फायदा असेल का चॅनल चा? विशाल वगैरे नॉमिनेट झाले की खूप लोक वोटिंग करतात, तुलनेत स्नेहा वगैरे साठी जास्त वोटिंग होणार नाही.
असे काही आर्थिक आडाखे असतील का?

मलाही तेच वाटलं अगदी, टिम बी ला , त्यात विशाल विकास ला भरपूर वोट्स मिळतात म्हणून विकासलाही खेचलं यात तो ४ न असून सुद्धा !

नीताने दोन्ही डगलीवर पाय ठेवून चूक केली. तुम्ही बाहेर खेळ बघून येता तेव्हा पॉप्युलर ग्रुप तुम्हाला माहीत असतो. त्यांना बिनबोभाट जॉइन करायचे. त्यांचे फॅन्स तुम्हाला वाचवतात. तीने आगाऊ पणा केला आणि आता तो तिच्या अंगाशी येतोय.

Pages