मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

नॉमिनेशन हे managed आहे असे वाटत आहे आणि उत्कर्षला असे कर (जय ला नॉमिनेट कर) हे सांगण्यात आले असावे. नाहीतर तो जयला का नॉमिनेट करेल? त्यालाच का शेवटी बोलावले?

यावेळी सोनाली किंवा Trupti ला हाकलण्याचा प्लॅन असावा.

मीनल, सोनालीला एव्हिक्ट करायला त्यांच्यासमोर स्ट्रॉ़ग प्लेयर असायला हवा. जय सगळ्यांना भारी पडेल म्हणून तो.
आणि बहुतेक तृप्तीसुद्धा.

उत्क्याचं लॉजिक वाईट नव्हतं. सोनाली , मीनल ला टार्गेट करायचे तर त्यांच्या समोर स्ट्राँग कोणीतरी हवे जे नॉमिनेट झाले तरी उडणार नाही. त्यांच्यासमोर दादुस ला टाकले तर दादुस उडेल आणि सोनाली राहील. गायत्रीला ठेवले असते तर तीच गेली असती बाहेर.
जय ला का इतका राग आला कळाले नाही.
पण हे अगदी बरोबर की जय आणि उत्क्याला वाटते या घरात सगळे आपणच कन्ट्रोल करतोय. कोणाला कधी उडवायचे, कोणाला कॅप्टन करायचे असल्या बाता कायम. त्यांच्यापेक्षा विकास चे डोके बरोबर डायरेक्श्न ने चालतेय असे वाट्ले आज. त्याला जजमेन्ट बरोबर येते आहे बाहेर काय चालले असावे प्रेक्षकांना काय आवडत असावे इ. अन जय उत्क्याचे प्लानिंग पण त्याच्या लक्षात येते आहे. अर्थात याचा उपयोग करता आला तर खरं.
गायत्री किती मिंधेपणाने वागत होती आज. कीव येण्याच्या पलिकडे. उत्क्याच्या तर पायाशी बसून असे बघत होती की वाटले आता पाय धरते का काय त्याचे. नंतर उत्क्याने लिटरली तिला हाकलले जा जय शी बोलून ये तोवर मी तृप्तीताईशी बोलतोय. मग ही लगेच अक्षरशः भीक मागण्याच्या आविर्भावात जय समोर उभी राहिली जाऊन. काल तर हिमतीच्या बाता करत होती ना ही ? मी सेपरेट खेळणार अन यंव त्यंव. ती मीराही तशीच. स्नेहा पण जय सांगेल ते करणे आणि त्याच्या प्रत्येक फालतू कमेन्ट वर खिदळणे याउप्पर काहीही करत नाहीये. एकंदर त्या साइड च्या सगळ्याच मुली त्या दोन पुरुषांच्या मिंध्या आहेत.आणि तशाच वागत आहेत. डिस्गसटिंग वाटते.

मीनल, सोनालीला एव्हिक्ट करायला त्यांच्यासमोर स्ट्रॉ़ग प्लेयर असायला हवा. जय सगळ्यांना भारी पडेल म्हणून तो.>>>
मी कालचा भाग पाहिला नाही अजून. पण असाच काहीसा विचार मनात आला जेव्हा विकास ने जयला सेफ केल्याचे वाचले.

माझे 80 टक्के मते मिनल, 20 टक्के तृप्ती
जय आणि विशाल वाचणार आहे तच.
सोनाली मला फार आवडत नाही. विकास ला फार जज करणार नाही कारण बी टीम ने त्या च्या पेक्षा सोनाली विशाल ला जास्त वाचवलय मागे. तो दरवेळी दुखावला गेलाय त्यांच्या कडून

मी आधी लिहिलंय का आठवत नाही. मीरा रडण्याचा सीन पाहून मला साहिब बीबी गुलाममधले मीनाकुमारी, रहमान आठवले. पायांवर, जमिनीवर लोळण, माझ्याकडे बघ कधीतरी, माझ्यात काय नाही?
इथे गुलामपण याच.

आपण मीरा ला स्ट्राँग समजत होतो कारण ती बारीक ऍथलेटिक दिसते. पण नाही. गोऱ्या रंगाची आहे त्यामुळे सुंदर असण्याचा भास होतो. थोडा अटिट्यूड दाखवला पण कोणाला?त्या गुबगुबीत आविष्कार ला
आपण वरच्या दिखाव्याला भाळतो हे च खरे.

गोऱ्या रंगाची आहे त्यामुळे सुंदर असण्याचा भास होतो.
>>> भास कसला? सुन्दर आहे ती नाकी डोळी, आणि छान क्यारी करते स्वताला...

काय की मला फार चपटा वाटला तिचा चेहरा. मे बी तीचं वजन उतरले असावे.
वीक एंड चा ड्रेस पण काही तरी होता.

सोनाली आणी त्रुप्ती यातच टफ कॉम्पीटिशन आहे , सोनालीला सुद्धा विकेन्डला सर बोललेच होते की साईडलाइन आहेस, टास्क करत नाहिस त्यापेक्षा त्रुप्ती ताई टास्क करतात पण मग परत जयच्या छत्रछायेत दिसतात.
उत्क्याला आता घाई झालिये कूणा स्ट्रॉन्ग प्लेयरला उडवायची, लॉजिक बरोबर आहे पण आपणच ह.भ.पा. महाराज सर्वद्य असल्यासारख वागतात दोघ.
मैच्या पोस्टला अनेक मोदक!! ए ग्रुप मुलिनी स्वाभिमानाशी तडजोड करु नये फार डेस्पो दिसतायत त्या आणी खुप वाईट दिसतय ते चित्र

आता जयला एव्हिक्ट करून सिक्रेट रुममध्ये पाठवला पाहिजे.
<<<
मी तेच लिहिलय मागच्या पानावर, जय वि उत्कर्ष ड्रामा मिळेल जय सिक्रेटरुम मधे गेल्यावर Proud
तृप्ती किंवा सोनालीही जाऊ शकतात, सोनाली अजुनही काही खेळत नाहीये आणि जयचा पुळका तर आहेच तिला !
मीरा गायत्री खरच अज्जिबात स्वाभिमान,दम नसलेल्या बाया आहेत , कधीही इंडिव्हिज्युअल खेळणार नाहीत.
स्नेहा तर जय उत्कर्षचे निरोप इकडे तिकडे पोचवणे. अधेमधे जयला मसाज देणे, वेड्या सारखे हसणे आणि फ्लर्टिंग एन्जॉय करणे इतकच करते , त्या अजित व्हिलन असणार्‍या सिनेमात त्याची मोना डार्लिंग होती तशी !
विकास, मीनल हुषार आहेत, त्यांना जयउत्क्याचे फालतु प्लॅन्स आणि ऑडियन्सच्या रिअ‍ॅक्शनची कल्पना आली आहे !

जय बाहेर गेला तरी त्यांच्या विरोधात बोलतील का हे?
ती सुरेखा पण मुलगा मुलगा करत त्याच्या मागे होती.
करोडपती असून सगळ्यांना काही आमिष दिलंय की काय?

गेलेल्यांतून कोणाला परत बोलावतात का?
आदिशला बोलवलं पाहिजे.

त्या आदिशला बिग बॉस मधून बाहेर गेल्याचा चांगलाच फटका बसलेला दिसतोय. कधी बघावं तेव्हा कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर मला परत बिग बॉसच्या घरात पाठवा म्हणून रडत असतो.

नीथा रडत होती अन मीनल, सोनाली तिला समजावत होत्या तेव्हा उ.शि. तिथेच होता अन बाहेर जाऊन त्याने स्नेहाला आत पाठवायची व्यवस्था केली. पण तोपर्यंत कार्यक्रम झालेला सगळा.

हे विकासने परफेक्टली ओळखले अन बाकीच्यांना पण सांगितले.

मला नाही वाटत विकास गद्दारी करेल.

यावेळी जयला काढून secret रूम मध्ये ठेवलं तर खूप मजा येईल. बराच content मिळेल bigg बॉस ला.BTW यावेळी secret रूम आहे ना? की त्या jail सारखा तोही एक दिखावा आहे.. Happy

परवा गायत्री परत एकदा त्या छोट्या खोलीतून बाहेर येताना दिसली.पण काल तर विकास पण दिसला जाताना.यावेळी फुकणारे कमी असावेत,म्हणून खोली पण लहान आहे.

वर मीराच्या दिसण्याबद्दल चर्चा असेल तर ती मला दिसायला स्मार्ट वाटते आणि कायम गा दा बरोबर असते मीन्स मी बघते तेव्हा, गा दा पेक्षा इम्प्रेसिव वाटते मला. मी हेट करत नाही तिला, माहिती नाही का. गा दा, स्नेहाला करते. जय काही मला सगळ्या पोरींनी भाव द्यावा इतका काही वाटत नाही. मिनल भाव देत नाही त्याला आणि मीनलच्या इतर गुणांमुळे ती मला सर्वात जास्त आवडते.

हं. नीताचे वडील गेले त्याबद्दल ती सा़ंगत होती.

मीरा रडत असताना पण स्नेहाने येऊन "मी काही करू शकते का?", असं विचारलं तिने.मग ते दोघे आले.

स्नेहाने येऊन "मी काही करू शकते का?", असं विचारलं>>> सगळं तर तूच केलंय, शूर्पणखा! असे मीरा बोलली असती तर मजा आली असती.

सिक्रेट रूममधे जयला वेगळे काय सम्जणार आहे ? गादा, मीरा,स्न्हेहा,दादुस त्याचेच ऐकुन खेळतात, त्रुप्ती सोनाली ७५ टक्के त्याच्याच ताब्यात.
विशाल मीनल विकास ची सिक्रेट म्हणावी अशी काही रणनीतीच नाही. मास्टमाइंड बाहेर गेलेल्या लोकांवर बोलण्यात फारसा वेळ नाही घालवणार, तसही दोघे भामटेपणा मिळुन करत होते त्यामुळे ह्याला नवीन असे काय दाखवणार?

जय एलिमिनेट झाल्याचे ढोंग केले तर तो सिक्रेट रूम मधे गेला हे सगळ्यांना लक्षात येईल सहज. तेवढे हुषार आहेत लोक.

शिन्देशाही पी.आर सध्या फार अ‍ॅक्टिव्ह झालेत, ते वाचवतील त्याला.. माझी फार इच्छा आहे त्याचा केळ्या झालेला पहायची !
परवा तर बिबॉ ने लिटरली खैरात कि इम्युनिटी दिली त्याला, कालच्या नॉमिनेशसन्स मधेही डिसिजन मेकर बनायला त्यालाच शेवटी पाठवले.. कुछ तो गडबड है दया !

हो काल त्याला मुद्दाम शेवटी पाठ्वले तो बिबॉ चाच गेम. पण त्याला इम्युनिटी मात्र विशाल च्या टीम ने बहाल केली खर तर.

Pages