मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मला समहाऊ दादुस तृप्तीच्या आधी या मुलांच्या मागेमागे करून वेळ घालवणार्‍या स्नेहा, सोनाली गेलेल्या आवडतील>>>
मलाही.

सोनालीला खूप सपोर्ट आहे सोमि वर. स्नेहाला भरपूर बॅश करतात पण तरी ती लवकर जाईल असे वाटत नाही. Sad
गायत्री आणि मीराला बॅगेज म्हटलं जातं पण स्नेहा , सोनाली पेक्षा त्या नक्कीच जास्त कॉन्ट्रिब्यूट करतात टास्क मधे.

गायत्री - मीरा कशा झाल्या कॅप्टन्शिप कँडिडेटस? बहुमत घेतले की कसे?....
बहुमत घेउन .स्नेहा,मिनल,त्रुप्ती,गायत्री,मीरा,नीथा.
स्नेहा,नीथा,मिनल,त्रुप्ती अशा क्रमाने बाहेर गेल्या.

गायत्रीला वाचवणे चालु आहे, अशीच एक एक आठवडा इम्युनिटी मिळतेय तिला आणि जे टॉप २ डिझर्व करतात ते
विशाल - मीनल मात्र कायम नॉमिनेट होतात Uhoh

चौघी राहिल्या होत्या तेव्हा तृप्तीने मिनलला सपोर्ट करायला पाहिजे होता. तृप्तीने मीरा तुपारे ला जाणीवपूर्वक कॅप्टन पदासाठी दावेदार केलं असेल तर ठीक आहे. पण जर तिला वाटलं असेल की मीनल गेल्यावर शेवटच्या दोघीत ती राहील तर तिच्यासारखी बिनडोक तीच. उद्या जय उत्कर्ष कोणाला सपोर्ट करतील हे बघणे इंटरेस्टिंग असेल.

जे टॉप २ डिझर्व करतात ते
विशाल - मीनल मात्र कायम नॉमिनेट होतात >>> हो ना.

ए टीम लाडकीच बिग बॉसची, स्नेहा आणि गायत्री तर विशेष.

https://www.youtube.com/watch?v=QDN6mojQhGs

जय ला सोनालीपेक्षा पण कमी votes, हाहाहा. विशाल एक नंबर, जवळ जवळ पन्नास टक्के (थोडं कमी) voting त्यालाच. मीनल दोन नंबर वर, २५ टक्के (थोडं कमी) तिला. बाकी तिघे मागे. तृप्तीला फारच कमी.

हो पाहिले लेटेस्ट ट्रेंड्स !
मला नकोय सोनाली वाचायला पण केवळ जय उत्क्याने तिला टर्गेट केले म्हणून त्याला समजु देत सोनाली ऐवजी तो स्वतःच बॉटम मधे असल्याचे !

तसे नाही करत ते. जयला आधी सांगतील तू सेफ आहेस ते, मग तो सातवे आसपानपर वगैरे जाईल अजून.

त्या मीनलला विशालला कळू देणार नाहीत त्यांची पोझिशन काय आहे ती.

यावेळी काढणार असतील कोणाला तर खरंच danger zone मध्ये जयबाबा आहेत हे त्याला कळूद्या. त्याला काढून सीक्रेट रूम मध्ये ठेवतील बहुतेक, जर कोणीच जाणार नसेल तर.

यानी त्रुप्तिला का नाही उतरवल, त्याही झाल्यात की कॅप्टन एकदा मग उतरावायच की त्याना पण, त्या हट्टी आहेत खुप त्यामुळे आधि त्यानाच उतरावयच होत.
बाकी टास्कच स्वरुप बदलवुन जय-उत्कर्श सॉरी मास्टरमाइन्द्,गुरेदेव्,ह.,भ्,प ईई याची चान्गलिच जिरवली म्हणे आम्ही आणू तोच कॅप्टन होइल.

मीरा, गा दा विशालला मस्का लावायला गेल्यात आणि मीनल विशालचंही पटत नाहीये. ग्रुप बी तुटायला नको. त्या विशालने त्या दोघींना भाव द्यायला नको.

विकास सांगत होता विशालला, की त्या दोघी एकट्या पडल्या आहेत म्हणून मस्का लावतायेत पण विश्वास ठेवण्याजोग्या नाहीयेत त्या.

मीरा, गा दा पण काय जय उतक्या नाही तर विशाल हवा का ह्यांना. एकट्या खेळाना.

बोकलत+१
ज्या सहा जणी होत्या त्या पाहता तृप्तींचं मत जिथे जाईल ती टिकली असती.
तृप्तीचा कल अजूनही टीम ए कडेच आहे.

देतात कि, भारी असतात त्यांचे रिव्ह्युज Proud
विकास जास्तं धम्माल रिव्ह्यु देतो राजेश पेक्षा, खूप फनी !>>>
मला लिन्क द्याल का?

ते दादूस सोनालीला घेऊन पडले,पण मग सोनालीला का काढल?
आणि तो रड्या विकास मिनलला काय ब्लेम करत होता की तुझ्यामुळे झाल.एवढ होत तर दादूसने जायच नाही तिकडे.

मीनलला इतकं उत्तम खेळून चान्स नाहीच मिळाला बिचारीला , पण हिन्दी बिबॉ मधे म्हणतात ना ‘जिसको जिस चीज कि भूख होती है, उसे बिगबॉस तडपाते है ‘
मीनल खूप कॅप्टनशिप साठी डेस्परेट झाली होती म्हणून मुद्दाम अशीच राउंड ठेवली जिथे मीनलला कोणी नाही सपोर्ट करणार Uhoh
गायत्री मीरा पैकी एकीला आधीच काढल असतं तर मीनलला उतरावं लागलं नसतं !
आज मला गायत्रीची शूर्पणखा बकासुर कॉमेंट्री आवडली, जय खाताना दाखवला त्यावेळी Biggrin

मीनलला आधीच कळलं होतं की तिला काढायचा प्लॅन आहे. निता, स्नेहा या दोघींनी सपोर्ट केला असता तर ती वाचू शकली असती. पण, मीराने बरोबर फासे टाकले.
मला विकास मास्टरमाईंड वाटतोय हल्ली. परफेक्ट डोकं चालवतो. फूट वगैरे काही नाहीये त्यांच्या ग्रुपमध्ये.
बाकी, उत्क्याचं थोबाड फुटलं याचं भारी वाटलं
अवधूतने विकासला खुपच भाव दिला, उत्क्याचं नाव पण नाही! Proud

काल जय आणि उत्क्या ला हेल्पलेस झाल्यासारखे झाले होते. त्यांच्या हातात काहीही नव्हते आणि त्यांच्या मनाप्रमाणेही काही घडत नव्हते.
उत्क्या तर निर्लज्जपणे खोटे बोलतो. सोनाली आणि मीनल दोघींना तुलाच कॅप्टन करू वगैरे झुलवत होता. बरे झाले चांगली जिरली. आणि एक प्रकारे मीरा आणि गायत्रीची पोझिशन पुन्हा जरा बेटर झाली ( त्या दोघांच्या मदतीशिवाय) . तेही बघून त्यांचे चेहरे पडले होते.
मीनल स्वतःसाठी खेळली तर तिच्या ग्रुपमधल्या बाकीच्यांनी तिला बॅश केलेले आवडले नाही पण. येडे आहेत का हे, तसाही त्यांना काही चान्स नव्हताच, मग तिला सपोर्ट करायचे ना काही का करेना.
मीनल ला जर हा टास्क आहे हे आधी समजले असते तर तिला स्नेहा आणि नीतासोबत प्लान करून आधी गायत्री मीरा दोघींना किंवा एकीला उतरायला लावता आले असते. नीताने तिला सपोर्ट केला असता आणि स्नेहाने मीरा नको म्हणुन मीनल ला सपोर्ट केला असता आणि हे चित्र वेगळे असते. पण सरप्राइज टास्क असल्यामुळे काहीच प्लान करता आला नाही.

पण मिनल ने शेवटी तरी तृप्ती ताई ला सपोर्ट करून मीरा किंवा गायत्री ला उतरवायला पाहिजे होते

मीनल स्वतःसाठी खेळली तर तिच्या ग्रुपमधल्या बाकीच्यांनी तिला बॅश केलेले आवडले नाही पण. येडे आहेत का हे, तसाही त्यांना काही चान्स नव्हताच, मग तिला सपोर्ट करायचे ना काही का करेना.
<<<
होना, त्या सोनालीला नाही कधी बॅश करत सारखी जयच्या मागेमागे जाते म्हणून !
मीनल खरोखर मस्त खेळते , कोणत्या का टिम मधे असेना ! शिवाय फेअर खेळते, विशाल विकास ऑपोझिट टिम्स मधे असताना जो राडा ज्या लेव्हलला झाला तसे वियर्ड नाही करत!

मीनलला घाबरत असतील सगळेच. बाहेर गेली तर बरं. बाहेर ती कित्ती आवडती आहे याचा कमी अंदाज असेल.

बाय द वे, कोण कॅप्टन झालं.

दुर्योधन, दु:शासनला कोण व्हायला हवं होतं (ही नावं मी नाही दिली, सो मि वर वाचली जय उत्क्यासाठी ).

राकेश बापट येतोय म्हणे वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून.
<<
इथे कि हिन्दीत ?
कुठेही येवो, भयंकर बोरिंग होता तो बिगबॉसओटीटी मधे !

मी मराठीत येणार बघितलं युट्युबवर. अर्थात सगळ्याच युट्युबवरच्या बातम्या सत्य असतील असं नाही.

हिंदीत येतोय का.

आदीश असा काय वाईट होता, त्याला काढलं लवकर.

बाय द वे जयच्या स्ट्रॅटेजीमुळे मीरा कॅप्टन झाली हे खरं आहे का, असं असेल तर केवळ गायत्री हरली म्हणून आवडेल मला ते, हाहाहा. मीनल व्हावी असं वाटत होतं पण कॅप्टनपदाच्या उमेदवार मीरा गायत्री असतील तर मी मीराच्या बाजुने.

Pages