मी लहान होतो. मी आणि माझे कुटुंब ईतकेच माझे जग होते. माझ्या तोंडात साल्या किंवा च्याईला शब्द जरी आला तरी घरी माझ्या थोबाडीत पडायची. त्यामुळे शिव्या देणे दूरची गोष्ट, मी त्या ऐकणेही टाळायचो. त्यामुळे स्लँग लँगवेज म्हणजे अश्लील असभ्य आणि अश्लाघ्य वगैरे भाषेपासून मी कोसो दूर होतो. त्यात जे शब्द डबल मिनींगने बनले होते ते तर मला कधी कळायचेच नाहीत. या कारणामुळे माझे फार हसेही व्हायचे.
उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो,
थोडे मोठे होताच मी बिल्डींगच्या गेटवर वासूगिरी करत उभे राहणार्या वा दादरावर रात्री जागून चकाट्या पिटणार्या पोरांसोबत उभे राहायला सुरुवात केली. एकदा एकाने मला केळे ऑफर केले. मी नम्रपणे नकार दिला. म्हटले मला  केळे आवडत नाही. त्यावर  दुसरा म्हणाला, "त्याला असली केळी आवडत नाहीत रे..." आणि सारे दात खीदीखीदी फाडून हसू लागले.
मी विचारले, हसायला काय झाले?? आणि  तसली केळी म्हणजे कुठली केळी?
तर एकजण म्हणाला, अरे ती छोटुसी असतात ना... ती केळी
मला वाटले तो वेलची केळ्याबद्दल बोलतोय.
मी म्हटले, अच्छा हो, ती काय.. ती खातो ना.. पण कधीतरीच !
झाले! आता तर फुटले सारे ..
पुढे काही महिने,  काही वर्षे मला वेलची केळे हे नाव पडले होते. आणि त्यावर वेलची केळे की खालची केळे अश्या कोट्या रचल्या जायच्या.
तो काळ माझा संक्रमणाचा होता. मी काहीतरी बोलायचो, त्यातील प्रत्येक वाक्यातील एखाद्या शब्दात तो ग्रूप काहीतरी डबल मिनींग अर्थ शोधायचा. आणि रोजच फिदीफिदी.
मी त्यांचे गिर्हाईक होतो. तरीही मी त्यांच्यात जायचो. कारण  एक तर माझ्याकडे ईतर मित्रांचा पर्याय नव्हता. चाळीत जवळपास सारे तसल्याच भाषेत बोलणारे होते. (अर्थात, पुढे दुनिया बघितली तसे मला समजले की जगात सगळीकडेच असली भाषा बोलली जाते, आमच्या चाळीला मी उगाच बदनाम समजत होतो)
दुसरे म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांची  भाषा  समजायला पाहिजे  अशी माझी ईच्छा होती. कारण आज ही भाषा शिकली नाही तर बाहेर जगात माझे हसे होईल अशी मला भिती होती. त्यामुळे आज जी काही टिंगल व्हायचीय ती होऊ दे. पण मला ही डबल मिनींग भाषा समजलीच पाहिजे हे माझे ध्येय झाले होते. ज्या गोष्टीचा मला खरे तर अभिमान असायला हवा त्या गोष्टीची मला शरम वाटत होती.
हळूहळू माझे डबल मिनींग शब्द भंडार वाढू लागले. "माझी वाट लागली" असे न म्हणता फक्त "माझी लागली" असे म्हटले की तिथे वाटच्या जागी कंबरेखालचा दुसरा एक शब्द ईमॅजिन करून आपण त्या वाक्यप्रचाराला कंबरेखालचे रूप देऊ शकतो. किंवा मग "माझी फाटली" असे म्हणून त्या वाक्यप्रचाराची भीषणता वाढवू शकतो. थोडक्यात जो की-वर्ड आहे तो फिल ईन द ब्लॅन्क ठेवून आपण स्लँग लँगवेज वापरल्याचा तोरा मिरवू शकतो ईत्यादी ट्रिक्स मला समजू लागल्या.
बहुतांश वेळा ज्यातून वाह्यात अर्थ निघतो ते शब्द कधीच ओरिजिनल नसतात. जसे मारणे, चढणे, लावणे, टाकणे, घालणे, घुसवणे, दाबणे, घेणे, करणे या सर्वच क्रियापदांना हल्ली डबल मिनींग अर्थ दिला गेलाय. एखाद्या व्यक्तीला साध्यासुध्या शब्दांचे हे वल्गर अर्थ माहीत नसतात. मग त्या व्यक्तीने ते वापरले की बाकीचे खुसफुस करतात. यात त्या मूळ व्यक्तीला शरम वाटायची काही गरज नसते. पण मला ती वाटू लागली. जणू ते शब्द त्यांचा दुसरा अर्थ माहीत नसताना वापरणे पापच होते.
जे मराठीबाबत तेच ईंग्लिशबाबत,
You screwed me  म्हणजेच You have done something that has made my life very difficult  म्हणजेच  मराठीतच बोलायचे झाल्यास तू मला पिळून काढले आहेस असा साधा सरळ अर्थ झाला.
आपण नेहमी त्याच अर्थाने हा वाक्यप्रचार वापरतो आणि एके दिवशी आपल्याला कळते की स्लँग लँगवेज मध्ये याचा काहीतरी घाणेरडा अर्थ होतो. अचानक आपल्याला आपलीच चूक वाटते की काय हे, एखाद्या वाक्यप्रचाराचा दुसरा घाणेरडा अर्थ आपल्याला माहीत नसताना आपण तो वापरलाच कसा. खरे तर ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला हवा  त्याचीच आपल्याला शरम वाटते.
 पण का?
हे जग सभ्य माणसांचे नाहीये का? एखाद्या शब्दाला कोणी घाणेरडा अर्थ देऊन तो प्रचलित केला असेल तर सभ्य माणसांनी मग तो मूळ शब्द वापरायचाच नाही का?
मी आजवर याचे उत्तर शोधतोय....
शोधता  शोधता बरेच डबल मिनींग  शब्द आणि  वाक्यप्रचारही शिकतोय.
कारण जर शेवटी असे समजले की खरेच हे जग सभ्य माणसांचे नाहीयेच मुळी तर आपण कुठे मागे पडायला नको
काय बोलता?
 
त्यात आदर असतो. आदमखान
त्यात आदर असतो. आदमखान यांच्या विपूत हा आदर विनयपूर्वक प्रकट करा.
ज्यांना जे अर्थ काढायचेत,
ज्यांना जे अर्थ काढायचेत, ज्यांना जी आडनावं बघायचीत, बघून द्यावीत, काढून द्यावेत अर्थ.
ठराविक समुदाया विरुद्ध धगधगता द्वेष, चुकीचे काढलेले अर्थ - ज्याच्या आत जे असतं तेच बाहेर येतं.
आपल्या आत पहात रहावं.. आपल्याला वाटलं चूक आहे तर बदलावं.. न वाटल्यास, जे चालू आहे ते आहेच.
कोण ठरवतं की मधल्या बोटाचा अर्थ वाईट आहे. ठरवलं तर ठरवलं - ते आपल्या वर बंधनकारक का असावं?
दाबणे, मार णे, च ढणे हे मराठी भाषेतले साधे शब्द आहे. ज्यांना त्यात कायम तसलंच दिसतं, ते विकृत आहेत. इट्स ओके. मला फरक पडू नये.
हे जग सभ्य माणसांचे नाहीये का
हे जग सभ्य माणसांचे नाहीये का? >>
आज जेव्हां या चाळीस मजली इमारतीच्या वरच्या खिडकीतून समोरच्या रस्त्यावर बघतो तेव्हां तिथे एक लाचार आई आणि दोन लहान मुलं दिसतात. ती आई इतकी लाचार आणि असहाय्य आहे की ती निरुपा रायचा चेहरा जन्माला घेऊन आली आहे. त्यातल्या मोठ्या मुलाच्या हातावर मेरा बाप सभ्य है अशी अक्षरे गोंदवलेली दिसतात. त्या वाक्यामुळे त्या मुलाचे इतके खच्चीकरण झाले की मी जगात कधीच सभ्यपणा दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली. मग त्याने बागेत वडे तळले.
त्याचा छोटा भाऊ आज गूगलचा सीईओ आहे. आणि त्याला मायबोलीवर धुमाकूळ घालणार्या आयडींची लिस्ट मिळाली आहे. त्यात मोठ्या भावाचेही नाव आहे. पण आता सीईओची खुर्ची मिळाल्याने त्याचा नाईलाज आहे.
कुछ फर्ज रिश्तों से भी बडे होते है.
त्याचा भाऊ त्याला म्हणाला
"दुनिया मे और भी कंपनीया है, मायक्रोसॉफ्ट है, फेसबुक है, इन्फोसिस है , स्पेस एक्स है, टेस्ला है, पॉण्ड्स है, दौंड साबण है. यही कंपनी क्युं ? पता है इस कंपनी मे तुम्हारी जान को खतरा है "
पण त्या भावाने माघार घेतली नाही. तो आजही या दुनियेला सभ्यांची दुनिया समजतो. कारण त्याच्या हातावर मेरा बाप सभ्य है गोंदवलेले नाही. कपाळावर शिक्का बसावा तसं हातावर सभ्य गोंदवले की काय होते हे ज्याचे (वडे) ज(त)ळते त्यालाच कळते.
दिवार.. कर्रेक्ट?
दिवार.. कर्रेक्ट?
बॅड लक..! दीवार मधे शारुख खान
बॅड लक..! दीवार मधे शारुख खान नाही...!!
गुगलच्या सीईओने वडे तळणार्या
गुगलच्या सीईओने वडे तळणार्या भावाला ऋ सरांच्या मंदीराच्या पायर्यांवर गोळी घातली.
Pages