मी लहान होतो. मी आणि माझे कुटुंब ईतकेच माझे जग होते. माझ्या तोंडात साल्या किंवा च्याईला शब्द जरी आला तरी घरी माझ्या थोबाडीत पडायची. त्यामुळे शिव्या देणे दूरची गोष्ट, मी त्या ऐकणेही टाळायचो. त्यामुळे स्लँग लँगवेज म्हणजे अश्लील असभ्य आणि अश्लाघ्य वगैरे भाषेपासून मी कोसो दूर होतो. त्यात जे शब्द डबल मिनींगने बनले होते ते तर मला कधी कळायचेच नाहीत. या कारणामुळे माझे फार हसेही व्हायचे.
उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो,
थोडे मोठे होताच मी बिल्डींगच्या गेटवर वासूगिरी करत उभे राहणार्या वा दादरावर रात्री जागून चकाट्या पिटणार्या पोरांसोबत उभे राहायला सुरुवात केली. एकदा एकाने मला केळे ऑफर केले. मी नम्रपणे नकार दिला. म्हटले मला केळे आवडत नाही. त्यावर दुसरा म्हणाला, "त्याला असली केळी आवडत नाहीत रे..." आणि सारे दात खीदीखीदी फाडून हसू लागले.
मी विचारले, हसायला काय झाले?? आणि तसली केळी म्हणजे कुठली केळी?
तर एकजण म्हणाला, अरे ती छोटुसी असतात ना... ती केळी
मला वाटले तो वेलची केळ्याबद्दल बोलतोय.
मी म्हटले, अच्छा हो, ती काय.. ती खातो ना.. पण कधीतरीच !
झाले! आता तर फुटले सारे ..
पुढे काही महिने, काही वर्षे मला वेलची केळे हे नाव पडले होते. आणि त्यावर वेलची केळे की खालची केळे अश्या कोट्या रचल्या जायच्या.
तो काळ माझा संक्रमणाचा होता. मी काहीतरी बोलायचो, त्यातील प्रत्येक वाक्यातील एखाद्या शब्दात तो ग्रूप काहीतरी डबल मिनींग अर्थ शोधायचा. आणि रोजच फिदीफिदी.
मी त्यांचे गिर्हाईक होतो. तरीही मी त्यांच्यात जायचो. कारण एक तर माझ्याकडे ईतर मित्रांचा पर्याय नव्हता. चाळीत जवळपास सारे तसल्याच भाषेत बोलणारे होते. (अर्थात, पुढे दुनिया बघितली तसे मला समजले की जगात सगळीकडेच असली भाषा बोलली जाते, आमच्या चाळीला मी उगाच बदनाम समजत होतो)
दुसरे म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांची भाषा समजायला पाहिजे अशी माझी ईच्छा होती. कारण आज ही भाषा शिकली नाही तर बाहेर जगात माझे हसे होईल अशी मला भिती होती. त्यामुळे आज जी काही टिंगल व्हायचीय ती होऊ दे. पण मला ही डबल मिनींग भाषा समजलीच पाहिजे हे माझे ध्येय झाले होते. ज्या गोष्टीचा मला खरे तर अभिमान असायला हवा त्या गोष्टीची मला शरम वाटत होती.
हळूहळू माझे डबल मिनींग शब्द भंडार वाढू लागले. "माझी वाट लागली" असे न म्हणता फक्त "माझी लागली" असे म्हटले की तिथे वाटच्या जागी कंबरेखालचा दुसरा एक शब्द ईमॅजिन करून आपण त्या वाक्यप्रचाराला कंबरेखालचे रूप देऊ शकतो. किंवा मग "माझी फाटली" असे म्हणून त्या वाक्यप्रचाराची भीषणता वाढवू शकतो. थोडक्यात जो की-वर्ड आहे तो फिल ईन द ब्लॅन्क ठेवून आपण स्लँग लँगवेज वापरल्याचा तोरा मिरवू शकतो ईत्यादी ट्रिक्स मला समजू लागल्या.
बहुतांश वेळा ज्यातून वाह्यात अर्थ निघतो ते शब्द कधीच ओरिजिनल नसतात. जसे मारणे, चढणे, लावणे, टाकणे, घालणे, घुसवणे, दाबणे, घेणे, करणे या सर्वच क्रियापदांना हल्ली डबल मिनींग अर्थ दिला गेलाय. एखाद्या व्यक्तीला साध्यासुध्या शब्दांचे हे वल्गर अर्थ माहीत नसतात. मग त्या व्यक्तीने ते वापरले की बाकीचे खुसफुस करतात. यात त्या मूळ व्यक्तीला शरम वाटायची काही गरज नसते. पण मला ती वाटू लागली. जणू ते शब्द त्यांचा दुसरा अर्थ माहीत नसताना वापरणे पापच होते.
जे मराठीबाबत तेच ईंग्लिशबाबत,
You screwed me म्हणजेच You have done something that has made my life very difficult म्हणजेच मराठीतच बोलायचे झाल्यास तू मला पिळून काढले आहेस असा साधा सरळ अर्थ झाला.
आपण नेहमी त्याच अर्थाने हा वाक्यप्रचार वापरतो आणि एके दिवशी आपल्याला कळते की स्लँग लँगवेज मध्ये याचा काहीतरी घाणेरडा अर्थ होतो. अचानक आपल्याला आपलीच चूक वाटते की काय हे, एखाद्या वाक्यप्रचाराचा दुसरा घाणेरडा अर्थ आपल्याला माहीत नसताना आपण तो वापरलाच कसा. खरे तर ज्या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला हवा त्याचीच आपल्याला शरम वाटते.
पण का?
हे जग सभ्य माणसांचे नाहीये का? एखाद्या शब्दाला कोणी घाणेरडा अर्थ देऊन तो प्रचलित केला असेल तर सभ्य माणसांनी मग तो मूळ शब्द वापरायचाच नाही का?
मी आजवर याचे उत्तर शोधतोय....
शोधता शोधता बरेच डबल मिनींग शब्द आणि वाक्यप्रचारही शिकतोय.
कारण जर शेवटी असे समजले की खरेच हे जग सभ्य माणसांचे नाहीयेच मुळी तर आपण कुठे मागे पडायला नको
काय बोलता?
असा काही उद्देश ठेऊन लिहिलेलं
असा काही उद्देश ठेऊन लिहिलेलं नाही. ३ स्त्रीया अन २ पुरुषांमधे घडलेला तो खरा किस्सा आहे म्हणुन ती खरी पात्रं वाचताना सर्वप्रथम मनात ठसावीत या हेतूने बोल्ड केले आहेत. बोल्ड करावयास नको होते का?
Submitted by DJ....... on 20 October, 2021 - 16:57
तुमचे हे स्पष्टीकरण मायबोलीवर नवीनच आलेल्याला सुद्धा पटणे कठीण आहे! मागे त्या कुमारी मातृत्वच्या धाग्यावरही आपण जाणूनबुजून 'चांगल्या घरातील' हा शब्द बोल्ड करत होतात तसेच उच्च विचारसरणी हा शब्द जाणीवपूर्वक 'हुच्च विचारसरणी' असा लिहून एकप्रकारे टर उडवत होतात हे आपल्या स्मरणात असेलच!!!
बकवास, फालतू धागा!
बकवास, फालतू धागा!
एडमिन/वेमा यांना विनंती
एडमिन/वेमा यांना विनंती
प्रतिसादांनी खालची पातळी गाठण्याआधी हा भंगार धागा उडवावा.
माफ करा, पण सभ्य, असभ्य,
माफ करा, पण सभ्य, असभ्य, आंबटशौकीन लोक कसे ओळखायचे?
>>>>
सिरीअसली?? हे ओळखणे अवघड असते??
प्रतिसादांनी खालची पातळी
प्रतिसादांनी खालची पातळी गाठण्याआधी हा भंगार धागा उडवावा.
+१
खालच्या पातळीचे प्रतिसाद आले
खालच्या पातळीचे प्रतिसाद आले तर येऊ द्या. ईतरांनी ते मार्क करा. त्याने वीरू यांना असभ्य आणि आंबटशौकीन लोकं ओळखण्यास मदत होईल.
त्यानंतर आपण धागा न उडवता खालच्या पातळीचे प्रतिसाद आणि ते देणार्यांना उडवूया. जेणेकरून हे जग सभ्य माणसांसाठी अजूनही आहे हा विश्वास कायम राहील.
तुमचे हे स्पष्टीकरण मायबोलीवर
तुमचे हे स्पष्टीकरण मायबोलीवर नवीनच आलेल्याला सुद्धा पटणे कठीण आहे! मागे त्या कुमारी मातृत्वच्या धाग्यावरही आपण जाणूनबुजून 'चांगल्या घरातील' हा शब्द बोल्ड करत होतात तसेच उच्च विचारसरणी हा शब्द जाणीवपूर्वक 'हुच्च विचारसरणी' असा लिहून एकप्रकारे टर उडवत होतात हे आपल्या स्मरणात असेलच!!!>> चांगल्या घरातील मुलगी आहे ही प्रीकंडीशन प्रतिसाद वाचताना ध्यानात यावी म्हणुन ते बोल्ड केलं होतं. उच्च विचारसरणी लिहिताना मोबाईलवर टाईप करताना चुकुन हुच्च झालं असेल.. त्यात टर वगैरे उडवण्याचा विचारही कधी स्वप्नात आला नव्हता. बरेचदा त्यांच्या असं लिहितानाही मोबाईलवर त्यांछ्या असं टाईप होतं तसंच ते झालं असावं. बाकी तुम्ही माझ्या प्रतिक्रिया इतक्या बारकाईने वाचता याबद्दल खरेच धन्ह्यवाद. तुम्ही दिलेल्या सुचनांचा मी नक्कीच साकल्याने विचार करून लिखाणातील चुकीचे शब्द तपासून बघेन. (तसे मी ते बघतच असतो परंतू नजरचुकीने एखादा राहू शकतो.). बाकी काही शब्द बोल्ड टाईप करण्यामागे ती नामे, स्थल-काल दर्शक विशेषणे वाचकांच्या मनात ठसावी हाच उद्देश असतो एवढंच नम्रपणे सांगू इच्छितो.
तुम्ही स्वतः अनेक कमेंट्स मधे
सिरीअसली?? हे ओळखणे अवघड असते??
>>>>>> साहेब तुम्ही स्वतः अनेक कमेंट्स मधे "गुगाळून" अस लिहिले आहे. पहिले अक्षर आणि गाळून/गळून दोन्ही शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती नाहीत यावर विश्वास बसत नाही. गुगलून किंवा गुगल करून अस लिहिण्याचा ऑप्शन असताना मुद्दाम totally disgusting अर्थ तयार करणे असभ्य आहे.
सिरीअसली?? हे ओळखणे अवघड असते
सिरीअसली?? हे ओळखणे अवघड असते??>> नवीन धाग्याचे पोटेंशिअल आहे यामध्ये. इथे चर्चा केली तर तुमचा धागा भरकटवल्याचा आरोप व्हायचा.
धाग्याचा विषय निसरडा आहे.
धाग्याचा विषय निसरडा आहे. त्यामुळे घसरगुंडी झालीच आहे. आता धागा चालूच आहे तर काहीतरी कमेण्ट्स टाकायच्या म्हणून आपणही घसरावे या निरूद्देशानेच कमेण्ट्स येणार. मूळ विषय असा होता कि असेही म्हणायची इथे सोय नाही. भले भले विनाकारण वाहवत जाण्यापेक्षा धागा बंद व्हावा किंवा निसरड्या विषयाचे भान ठेवूनच प्रतिसाद द्यावेत असे न राहवून सुचवावेसे वाटते.
इंटरनेट येत असताना, फिअर फोन
इंटरनेट येत असताना, फिअर फोन मधे नेट मिळताना आणि आता स्मार्टफोन्स मधे ४ जी आणि वायफाय चा प्रवास बघण्याचे सौभाग्य मिळाले. सुरूवातीला अनेक विषय असे होते की ज्याचा उच्चार करताना भीती वाटायची. लाज म्हणता येत नाही. पण आपल्यापेक्षा सभ्य लोक, मुलं, महिलांनी आपल्या तोंडून अमूक विषय, शब्द ऐकले तर काय होईल , बदनामी तर होणार नाही ना ही भीती आणि तो काळ अनुभवला आहे. खरे म्हणजे आता या गोष्टीवर विश्वास बसत नाही. इंटरनेटने अनेक गोष्टी बदलवल्या. जिथे चुंबनदृश्यांची चर्चा अगदी वर्तमानपत्रात सुद्धा (सभ्यतेचे सर्व निकष पाळून ) व्हायची तिथे चुंबनदृश्य, बिकीनी दृश्ये ही सामान्य झाली आहेत. नजरेत बदल झाला आहे. अशी दृश्ये, शब्द, चर्चा यांनी कसलाही फरक न पडण्यामधे या युगाचे योगदान आहे. तंत्रज्ञानाने असा बदल होतो याचा साक्षीदार होण्याचे भाग्य या जन्मात लाभले.
पूर्वी आपण ब्ल्यू फिल्म पाहिली हे दडवणे सभ्य समजले जायचे. काहीही करा मात्र सभ्यतेचे आवरण टिकवून ठेवणे गरजेचे होते. आता पॉर्न या नावाने मुलंही पाहतात. काही पालकांना चिंता वाटते. काही बेफिकीर असतात. एकाने तर मला म्हटले , देख लेने दे यार. हमारे टाईम मे हमे कहा मिलता था ? देखेगा तो उसे कुछ नही लगेगा... मला हे ऐकताना धक्का नाही बसला. ही बधीरता सुद्धा नाही.
नेट वर स्त्री पुरूष संवाद इतका सामान्य झाला आहे की कधी काळी हे सुद्धा खळबळजनक प्रकरण होते याचा विसर पडावा.
मुद्दा हा की..
इतकी प्रचंड उलथापालथ झाली असताना धाग्याचा विषय हा बाबा आदमच्या जमान्यातला वाटतोय. आज फारतर राजकुमार राव कॉमन मॅनचे रोल करत असेल. पण तो अमोल पालेकरसारखा नाही दाखवत. राजा गोसावी सारखा भोळा तर अजिबातच नाही. राजकुमार रावचा कॉमन मॅन तुफान डबल मिनिंगचे संवाद हाणतो पण त्यात दादा कोंडकेपण नाही. सहजता आहे.
परवा शाळेत मुलांच्या वर्गातल्या अन्य मुलाच्या पालकांशी बोलताना (महिला ) विषय टॅब्यू विषयाकडे गेला. मुलांना त्यापासून दूर ठेवणे ही काळजी होती. पण घरी आल्यानंतर लक्षात आलं की आपण भिन्न लिंगी पालकाशी या विषयावर गप्पा मारल्या हे त्या वेळी जाणवलं सुद्धा नाही. कधी काळी हा गुन्हाच झाला असता. आजही मुख्य वर्तुळाबाहेर तसे वातावरण पहायला मिळते. पण तीव्रता कमीच.
मुली सुद्धा आता पूर्वीचे खंग्राट समजले जाणारे शब्द सहज वापरतात. बरेचदा त्यात मुलांची बरोबरीचे थ्रिल वाटते. सोशल मीडीयात तर काही जण केवळ विरोध व्हावा म्हणून (अटेन्शन सीकिंग ?) अश्लील शब्द गाजावाजा करून वापरतात. त्यात सहजता आढळत नाही. प्रचारकी थाट, ईर्ष्या आणि वादलोलुपता आढळते.
कधी कधी जुने भाबडे वातावरण आढवून नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. मुली लाजायच्या, पोरं थिल साठी तिखटजाळ शब्द वापरायची.
त्या जमान्यातला धागाविषय आहे हा.
हे सभ्य माणसांचे जग नाहीये का
हे सभ्य माणसांचे जग नाहीये का ?
>>>
शिव्या देणे म्हणजे असभ्य हे विचित्र आहे. मुळात काही अवयवांवर बोलणे taaboo का आहे ? हे टॅबू असल्यामुळेच त्यावर शिव्या रचल्या जातात. उदाहरणार्थ, नाकावरून शिव्या असतात का ? तर नसतात.
मोअरोव्हर, ग्राम्य शब्द वापरणे असभ्य समजले जाते, तर त्याच शब्दांचे "शास्त्रीय" रूप सभ्य ? काय लॉजिक आहे ?
मुळात शिव्या इन इटसेल्फ वाईट नाहीत. समोरचा व्यक्ती त्या भाषेत बोलण्यास कम्फर्टेबल आहे का, आपण अशी भाषा त्या व्यक्तीला इंटिमिडेट करण्यास किंवा घाबरण्यास किंवा त्याला लाज वाटावी या हेतूने वापरतोय का- हे महत्वाचे आहे, आणि ते चुकीचे आहे. Context महत्वाचा, शब्द नाहीत. सभ्य शब्दांनी सुद्धा कितीतरी जास्त दुखावता येते. त्याउलट आई बहिणींवरून दुखावण्यासाठी दिलेल्या शिव्यांनी लहान/टिनेज पोरांचा स्वाभिमान वैगेरे दुखावत असेल, पण त्यात शब्दांमागे फारसा अर्थ नसतो हे समजते. पण त्याउलट एखाद्याला जाड्या म्हणून हिणवणे हे कितीतरी पटींनी वाईट. त्यात अर्थ आहे आणि डायरेक्टेड आणि शार्प हेटाळणी आहे.
मी लहान असताना दोन वर्षे एका
मी लहान असताना दोन वर्षे एका खेडेगावात राहिलो होतो. तिथली पोरांची आपसातली भाषा ऐकून आजही इथल्या सभ्य सदस्यांना झीट यीएल. माझ्या वडिलांनी तर धसका घेउन माझे गावच बदलले होते. मी एकटा राहिलो होतो शिक्षणासाठी अगदी कमी वयात.
पण न भिता रहायची तयारी त्या गावातच झाली होती असे म्हणायला हरकत नाही.
द्वयर्थी संवादांचे बादशहा म्हणजे दादा कोंडके. अर्थ जरी कितीही अश्लील असला तरी त्यांच्या शब्दखेळातल्या बुद्धी ला दादच द्यायला हवी. काही विनोद तर अचानक साक्षात्कार झाल्या सारखे नंतर कळतात.
असो मुलांच्या आणि पुरूषांच्या बाबतीत तरी कुठल्याना कुठल्या वयात ही वेगळी पुरूषांची भाषा कानावरून गेलेली असते आणि बहुतेकांनी त्यांच्या छोट्या समुहात वापरलेली असते. पण ती भाषा मैत्रिणी, बहिणींसमोर कोणीही पुरुष वापरणार नाही/वापरत नाही. आणि म्हणूनच स्त्री वर्गाने वापरली तर विचित्र वाटेल. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
माझ उदाहरण देतो.
एका टाउन हॉल मधे एका मुलीनी प्रश्न विचारला. मी तिला नंतर म्हणल, छान, बर झाल छान प्रश्न विचारलास ते. तिनी मला उत्तर दिल, मग गेल्यावेळेस तुम्ही मला सांगितल होत , विजिबीलिटी वाढवायची असेल तर अशा सभात अॅक्टिव असल पाहिजे. मी विचारला नसता प्रश्न तर "u would have screwed me". आता ती हे पुर्ण इनोसंटली म्हणाली होती हे मला आणि सर्वांना माहिती होतच, पण मी कोलमडायच्याच बेतात होतो.. मला तोंड फिरवायला लागलच, पण बाकी टीम पण भराभरा पांगली. हे अस होत अजाणतेपणे.
शिव्या देणे म्हणजे असभ्य हे
शिव्या देणे म्हणजे असभ्य हे विचित्र आहे.
>>
शिव्या न देता येणे म्हणजे बावळट हे त्याहून जास्त विचित्र आहे. धाग्याचा मूळ विषय तो आहे खरे तर
बाकी शिव्यांवरून सभ्य असभ्य ठरत नाही तर त्या देताना देणार्याची भावना आणि टोन यावरून ते ठरते हे मान्य.
पण मग हेच आपण पुढे जे "जाड्या" म्हटलेले उदाहरण दिलेय त्यालाही लागू नाही का? कारण मित्रांमध्ये जसे शिव्या देऊन बोलतात तसेच जाड्या, सुकड्या, काळ्या, बुटक्या वगैरे नावांनीही त्याच सहजतेने चिडवले जाते असे म्हणू शकतोच.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/CVJ80zUD_hq/?utm_medium=copy_link
ऋन्मेषचा धागा आणि त्याकडे पाहणारे लोक
"u would have screwed me".
"u would have screwed me". आता ती हे पुर्ण इनोसंटली म्हणाली होती हे मला आणि सर्वांना माहिती होतच, पण मी कोलमडायच्याच बेतात होतो.. मला तोंड फिरवायला लागलच,
>>>>>>>
हाच तो धाग्याचा विषय आहे. जर या वाक्याचा घाणेरडा अर्थ देखील निघतो वा काहींनी बनवून प्रचलित केला आहे हे तिला माहीत नसेल तर यात तिची काय चूक.
हाच तो धाग्याचा विषय आहे. जर
हाच तो धाग्याचा विषय आहे. जर या वाक्याचा घाणेरडा अर्थ देखील निघतो वा काहींनी बनवून प्रचलित केला आहे हे तिला माहीत नसेल तर यात तिची काय चूक.>> हेच मी माझ्या प्रतिक्रियेत पण लिहिलं आहे. मला अन माझ्या कलिग साळुंकेंना "चौकात दाबलं जाणं" याबद्दल दुसरा अर्थ आजिबातच माहित नव्हता. उगीच कानकोंडं झाल्यासारखे आम्ही दोघे त्या कुलकर्णी, कळमकर अन सारडाचं तोंड दाबून हसण्याचा उद्योग बघत बसलो..
आमच्या हॉस्टेलला अशा दोन मुली
आमच्या हॉस्टेलला अशा दोन मुली होत्या, ज्यांना नव्यानेच हे द्वयर्थी शब्दांचं ज्ञान प्राप्त झालं होतं. त्यांनी ते एवढं गांभीर्याने घेतलं होतं की, त्यांच्यासमोर आम्ही काहीही बोललो, तरी त्यातले नेमके शब्द पकडून त्या हसायच्या. आणि वर आम्हाला चिडवायच्या, " शी.... डर्टी माईंड " म्हणून. खरंतर अश्लील अर्थ काढणार त्या, पण असभ्य आम्ही. नंतर नंतर खूप वैताग यायला लागला त्यांचा.
आमच्यातली अजून एक मुलगी याबाबतीत जरा अजाण बालकच होती. तिला तर त्या खूपच पिडायच्या. एकदा तिच्याच वाढदिवसाच्या वेळी केक खाताना, ती म्हणाली की, "मला क्रीम जास्त आवडते. " त्यावरून या दोघींनी इतकं सतावलं तिला की ती रडायलाच लागली. तेव्हा मात्र मी सुनावलं होतं त्या दोघींना की, " एकतर आमच्या साध्या बोलण्याचा तुम्ही हवा तो अर्थ लावता आणि आम्हालाच चिडवता. सतत तुमच्या डोक्यात तेच वाईट अर्थ असतात. त्यामुळे डर्टी माईंड तुम्ही आहात, आम्ही नाही. कधीतरी गंमत म्हणून असं बोलणं, चिडवणं वेगळं आणि सतत तेच वेगळं"
त्यानंतर हळूहळू त्या नॉर्मल होत गेल्या.
योग्य केलेत माऊमैय्या. दर
योग्य केलेत माऊमैय्या. दर वाक्यात दर शब्दात असे दुसरे अर्थ काढून दात काढणारे फार ईरीटेट करतात.
असले विनोद करायला सेन्स ऑफ ह्युमर अगदी शून्य लागतो. तरी आव असा असतो की आपण काय जोक केला, हे सुद्धा फार इरीटेट करते...
^^^^ ____/\____
^^^^ ____/\____
इतरांनाच इरीटेट होतं असं नाही यावर शिक्कामोर्तब झाले.
Submitted by माऊमैया on 21
Submitted by माऊमैया on 21 October, 2021 - 13:41 >>>> असं नाही. मुलींची आडनावं लिहून ती बोल्ड करा. त्याशिवाय मुद्दा ठसत नाही (म्हणे).
कुणाला कधी अन काय ठसेल हे
कुणाला कधी अन काय अन तेही कुठं ठसेल हे खरंच सांगता येत नाही बुवा..!
नामे, सर्वनामे, विषेषणे, क्रियापदे बोल्ड केली म्हणुन ती ठसावीत..? अगम्य आहे हे सगळं..!!
कोणत्याही विषयावरची चर्चा
कोणत्याही विषयावरची चर्चा जातीयवादावर आणून सोडण्याचे DJ.... यांचे कसब ग्रेट आहे !
>>>शिव्या न देता येणे म्हणजे
>>>शिव्या न देता येणे म्हणजे बावळट हे त्याहून जास्त विचित्र आहे.
हम्म. असे करु नये ह्या बाबत सहमत.
>> समोरचा व्यक्ती त्या भाषेत
>> समोरचा व्यक्ती त्या भाषेत बोलण्यास कम्फर्टेबल आहे का, आपण अशी भाषा त्या व्यक्तीला इंटिमिडेट करण्यास किंवा घाबरण्यास किंवा त्याला लाज वाटावी या हेतूने वापरतोय का- हे महत्वाचे आहे <<
कॉमी यांचा मुद्दा पटला. यावरुन एक विनोद आठवला...
मित्र १: ये भेंचो तो डरपोक है
मित्र २: डरपोक किस्को बोला बे
इथे भेंचो पेक्षा डरपोक हा जास्त ऑफेन्सीव शब्द आहे कारण तो समोरच्याला लाज वाटावी म्हणुन उल्लेखला गेला आहे.
कोणत्याही विषयावरची चर्चा
कोणत्याही विषयावरची चर्चा जातीयवादावर आणून सोडण्याचे DJ.... यांचे कसब ग्रेट आहे !>> विकु, तुम्ही सुद्धा..?? अहो मी काहीतरी असं लिहिलं का..? माझा तसा कणभर तरी हेतू होता का..? ते नगरवाले अन वैनी इतक्या दिवस मला एका ठराविक ज्ञातीला टार्गेट करतो असं म्हणायचे निदान तुम्ही ते तसं म्हणाला नाहीत म्हणुन तुमचे आभार मानावेत की जातीयवादावर चर्चा आणून सोडली या आरोपाचे खंडन करावे हेच कळेनासे झाले.
एक साधा आणि वास्तविक जीवनातला अनुभव काय सांगितला तर मला किती टोचून बोलले सगळे. सत्य कडू असतं म्हणतात पण इतकं..??
मित्र १: ये भेंचो तो डरपोक है
मित्र १: ये भेंचो तो डरपोक है
मित्र २: डरपोक किस्को बोला बे
>>>
हा मुद्दा योग्यच आहे.
पण धाग्यात असे बोलणारे आणि चालवून घेणाऱ्यांबद्दल भाष्य केले नाहीये. वा त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले नाहीत.
हे उदाहरण बघा.
मित्र १: ये भेंचो तो भारी है बे.. क्या डेअरींग है ईसमे
मित्र २: भाई ये बिना गाली के भी बोल सकता था..
दुसऱ्या मित्राला आवडत नसेल तर तसे बोलता आले पाहिजे आणि त्यावर ठाम राहता आले पाहिजे की मला ही भाषा चालत नाही तर मी खपवून घेणार नाही. आणि त्यानंतर आणखी तिसऱ्या मित्राने त्याला हे समजवायचा शहाणपणा करू नये की मित्रांमध्ये असे चालतेच रे..
Runmeshji yaha pe aap galt ho
Runmeshji yaha pe aap galt ho
ओके सर. आपल्या मताचा आदर आहे.
ओके सर. आपल्या मताचा आदर आहे.
पण नेमके काय गलत वाटले वा आपले मत नेमके काय आहे हे समजले तर आपला दृष्टीकोण समजेल.
असे रोमन मराठीत टाईप केले तरी चालेल. मी वाचेन
भेनचोद शिवि असते का ? हा
भेनचोद शिवि असते का ? हा शब्द खुप कॉमन आहे ... मूली देखील कैजुअली बोलतात...
Pages