"तोच तोच तोच तोच तोचपणा!!!!! दुसरं काही सुचत नाही का तुला?"
"लोकांना हे असलंच आवडतं.'
'तुला लोकांच्या आवडी निवडीशी काय घेणं देणं? स्वतःच्या मनाचं कर कधीतरी. लोकप्रिय व्हायची तुला काहीही गरज नाही."
"लोकप्रिय? मला कुणी ओळखतही नाही..." ती निराशेने म्हणाली.
तोही जरा वरमला.
"पण तेच तेच काय? एकच कथा नेहमी, वर्षानुवर्ष तेच. आणि प्रत्येक कथेत तोच सरधोपटपणा. एक बाळ आलं, मोठं झालं, नोकरीला लागलं, लग्न झालं, त्याला मुले झालीत, त्यांची लग्ने, हा मेला. दॅट्स इट?"
"नाही ना, मी कधीकधी त्यात फारकत टाकते, दुर्धर आजार टाकते, नाहीतर मग विवाहबाह्य संबंध तरी...? किंवा मग मुलांचा अपघात वगैरे? ड्रामा क्रिएट होण्यासाठी? पराकोटीच अपयश, क्वचित आत्महत्या..."
"तू या साच्याच्या पलीकडे कधी गेली आहेस? कधीही या चौकटीच्या बाहेर? मला हिशेब ठेवताना किती दमछाक होते माहितीये?"
"सॉरी ना चीत्रू..."
"सॉरी म्हणे. जा, आता अशी काही कथा लिही ना, की एका झटक्यात कळलं पाहिजे, चांगलं की वाईट ते."
"ओके." ती नाराजीने निघून गेली.
'तो जन्माला आला, मुळातच लहानणापासूनच तो उनाड होता. अभ्यासात त्याची कधीही प्रगती झाली नाही. मग तो वाईट संगतीत राहायला लागला. अशाच संगतीमुळे तो ड्रग विकायला लागला. हळूहळू तो मोठा ड्रग माफिया झाला, आणि त्यानंतर एके दिवशी तो पोलिसांच्या चकमकीत मारला गेला...'
ती हसली...
'आता चीत्रूला हिशेब एका झटक्यात कळेल...'
...आणि इकडे आपल्या भाळी काय लिहिलं जातंय, हे न कळालेलं ते बाळ निवांत झोपलं होतं....
समाप्त
सटवाई आणि चित्रगुप्त???? ते
सटवाई आणि चित्रगुप्त???? ते असे लिव्ह-इन मध्ये का आहेत??
वेगळी गोष्ट. आवडली.
आवडली... छान कल्पना.
आवडली... छान कल्पना.
अशी काही कथा लिही ना, की एका
अशी काही कथा लिही ना, की एका झटक्यात कळलं पाहिजे, चांगलं की वाईट ते.>> +१
सी चा प्रतिसाद वाचल्यावर कळली
सी चा प्रतिसाद वाचल्यावर कळली.
छान लिहिली आहे.
हमममम, सी च्या प्रतिसादानंतर
हमममम, सी च्या प्रतिसादानंतर नीट कळली. आवडली गोष्ट. चीत्रू म्हणजे भारीच लडिवाळ हाक
छान लिहिली आहे.
छान लिहिली आहे.
चीत्रू
चीत्रू
आणि इकडे आपल्या भाळी काय लिहिलं जातंय, हे न कळालेलं ते बाळ निवांत झोपलं होतं.... इथे च्च् झालं
आणि इकडे आपल्या भाळी काय
आणि इकडे आपल्या भाळी काय लिहिलं जातंय, हे न कळालेलं ते बाळ निवांत झोपलं होतं
छान, आवडली
छान, आवडली
आणि रिलेटही झाली.
आपण उगाच बकेट लिस्ट काढत बसतो. पत्रिकेत जे लिहिलेय तेच मिळणार
शेवटचा ट्विस्ट भारीच
शेवटचा ट्विस्ट भारीच
भारी चित्रू
भारी
चित्रू
भन्नाट कल्पना आहे. खूप आवडली
भन्नाट कल्पना आहे. खूप आवडली कथा.
चित्रू नाही "चीत्रू" "चीत्रू"
चित्रू नाही "चीत्रू" "चीत्रू".... लै च लडिवाळ चाललं होतं... ते कुणी कुणी मुलं गोड बोलून मुलींना असाईंनमेंट करायला लावतात आणि परीक्षेनंतर तोंड बघत नाहीत त्या मुलीचं... तसं झालयं बिचार्या सटवाईचं... चित्रगुप्ताला शेवटी हिशेब नको करायला म्हणून हिच्याशी लघट चालू आहे
मस्तच!
मस्तच!
छान आहे...
छान आहे...
भारी जमली आहे कथा..!!
भारी जमली आहे ही कथा..!!
बरं... राहिलेल्या अपूर्ण कथा कधी पूर्ण करणार..??
जबरदस्त! बिचारं ते बाळ!
जबरदस्त!
बिचारं ते बाळ!
छान. पाब्लो एस्कोबार का?
छान. पाब्लो एस्कोबार का?
कल्पना भारी! आवडली गोष्ट.
कल्पना भारी! आवडली गोष्ट.
प्रतिसाद वाचल्यावर कथा कळली.
प्रतिसाद वाचल्यावर कथा कळली.
आधी मला वाटलं डेलीसोपं लेखिके ची आहे.
Mast
Mast
मला चीत्रू आणि बाळ वाचूनच
मला चीत्रू आणि बाळ वाचूनच समजलं लगेच
बिचारं बाळ.
भारिच कल्पना आहे! मस्तच!!!
भारिच कल्पना आहे! मस्तच!!!
मस्त
मस्त
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!!!
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!!!
याचाच एक पुढचाही भाग टाकला आहे
मस्तच वाटली कथा
मस्तच वाटली कथा
मस्त कथा. चित्रगुप्त ,सटवाई
मस्त कथा. चित्रगुप्त ,सटवाई लिव्ह इन इमॅजिन करून हसायला आलं.
बदललेलं शीर्षक नाही आवडलं.
बदललेलं शीर्षक नाही आवडलं.
चित्रगुप्त इ. मंडळी स्वर्ग नरक दोन्हींच्या कॉमन रिसेप्शन एरियात बसत असतील.
खूपच छान.. फारच वेगळी कल्पना,
खूपच छान.. फारच वेगळी कल्पना, cute सटवाई वाटते,
अभिनंदन अज्ञात, बरेच दिवसांनी आलात..
चित्रगुप्त इ. मंडळी स्वर्ग
चित्रगुप्त इ. मंडळी स्वर्ग नरक दोन्हींच्या कॉमन रिसेप्शन एरियात बसत असतील.+१
Pages