किशोरवयीन (प्रि-टीन्स, अर्ली टीन्स) मुलां/लीना आवडतील अशी इंग्रजी पुस्तके

Submitted by अमितव on 8 October, 2021 - 10:05

मॅजिक ट्री हाऊस झालं, सीरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स झालं, हॅरी पॉटरची अनेकोनेक पारायणं झाली, व्हिंपी किड बोर आहे... आता काय करू? आयेम बोर्ड! मग मायबोलीवर ग्रिशमच्या थिओडोर बून सिरीजचा धागा सापडला. ती सिरीज लायब्ररीतून आणून संपवली आता काय? हा प्रश्न ज्या पालकांना पडतो त्यांच्यासाठी हा धागा.

मायबोलीवर लहान मुलांना आणि मोठ्यांना वाचायला आवडतील अशा पुस्तकांचे अनेक धागे आहेत. पण किशोरवयीन म्हणजे साधरण ८ ते १५ वयोगटातील पोरांना वाचायला रेकमेंडेशन धागा सापडला नाही, आणि असला तरी पार खोलात बुडालेला असल्याने त्यावर अद्ययावत माहित उपलब्ध नसेल. या वयात मुलं अत्यंत भराभर वाचतात, त्यामुळे वाचनालयातून कितीही पुस्तकं आणली तरी त्यांचा कधी फडशा पडतो ते कळत नाही. परत आपण आपल्याला आवडतील अशी पुस्तकं आणावीत तर त्याकडे संपूर्ण काणाडोळा होतो. त्यांना घेउन लायब्ररीत गेलं की दोन-चार नॉन फिक्शन, जी काही मिनिटात वाचुन होतील अशी घरी येतात. पण तेच जर कुणाचा रेको असेल, तर ती पुस्तकं हमखास आवडली आहेत असा अनुभव आहे. ऑनलाईन ब्लॉग्स, लायब्ररीतुन शिफारशी मिळतातच, पण इथेही धागा असला आणि प्रत्यक्ष ओळखीत कुणी वाचुन रेको दिला तर लगेच शोध करायला आणखी बरं पडतं.

तुमच्या मुलांना कुठली पुस्तकं आवडली त्यांची नावं, थोडक्यात काही माहिती आणि मजकुरात काही धोक्याचे झेंडे (भाषा, कुणाला वावगे वाटतील असे विषय इ.) माहित असतील तर ते ही जरुर लिहा.
हा धागा इंग्रजी पुस्तकांसाठीच ठेवू. इतर भाषेसाठी हवे असतील तर वेगळे धागे काढता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या वर्षी वाढदिवसाला Artemis Fowl series मधले एक पुस्तक मिळाले होते. मुलाला ते आवडलं. मग आता ती पूर्णच सिरीज आणली.

आम्ही पण पुस्तकं शोधतोय.

1. 'To Kill a Mockingbird'
Aurhor-Harper Lee.
अप्रतिम कादंबरी आहे. (मराठीतही उपलब्ध आहे. बहुदा विद्यागौरी खरे यांनी अनुवाद केला आहे.)

2. To Sir, With Love
Author- E. R. Braithwaite
हे पण चांगले आहे..

3. Kafka on the Shore
Author - Haruki Murakami.
हे तर तसं सर्वांसाठीच आहे आणि थोर आहे.

4. Lord of the Flies
Author-William Golding
परिचय: https://www.maayboli.com/node/8567

व्हँपायर डायरीज
ट्वाय लाइट सीरीज
हंगर गेम्स सीरीज
पर्सी जॅकसन
टोल्किन तीन्ही बुके.
टु किल अ मॉकिन्ग बर्ड.
फॉल्ट इन अवर स्टारस ह्या लेखकाची इतर बुके,
पेपर टाऊ न एक आ ठवते आहे.

काल्विन अँड हॉब्स मास्टर कलेक्षन. तीन भली मोठी बुके आहेत. भारतात सात हजाराचा सेट आहे. फारच मजेशीर.

मुलांना काही टीव्ही सीरीज आवड त असतील जसे डॉ. हू तर त्याला धरून स्टिक र्स चे बुक मिळते. ते छान असते. घरी एक कोपरा बनवता येतो. किंवा त्यांच्या फोन / लँपटॉप ला लावतात.

1. 'To Kill a Mockingbird>> वयोगट काय असावा? 13 वर्षाच्या मुलाला वाचू द्यावं का? १० -११ साठी तर नक्कीच चालणार नाही.
पूर्वी मी १५ वर्षाच्या मुलाला वाचायला दिलं होते.

13 वर्षाच्या मुलाला वाचू द्यावं का? १० -११ साठी तर नक्कीच चालणार नाही.>>
मी माझ्या दहावीत असताना वाचलं होतं.. तेव्हा तर ते जबरदस्त आवडलं होतंच पण अजूनही त्या पुस्तकाबद्दलची माया पातळ झालेली नाही..! Happy
त्यामुळे वाटलं की जेवढ्या कमी वयात हे हातात पडेल तेवढं चांगलंच आहे.. शिवाय आत्ताच्या मुलांचं आकलन तेव्हाच्या मानाने जरा चांगलंच असेल, असा एक अंदाज Happy

लिटल हाउस ऑन द प्रेअरी ; अ रिंकल इन टाइम, लिटल वीमेन, एरॅगॉन सिरीज ( १५ +), रोआल्ड डाल ची पुस्तके,
वंडर , आणि त्याचं पुढचं पुस्तक; मार्क ट्वेन ची पुस्तके, जेरी ड्युरेलची पुस्तके ( इंग्रजीतून आणि इंग्रज चितमपल्ली म्हणता येईल )
तोत्तोचान , मिस्टीरियस बेनेडिक्ट सोसायटी

ही अशी आता पटकन आठवली. अजून विचारून सांगते

तुमच्या इथे फ्री लायब्ररी असते का स्थानिक ? तिथल्या यंग अड्ल्ट विभागाच्या लायब्रेरियन ला विचारा, नव्या पुस्तकांची माहिती तिथे मिळेल.

न्यूबरी अवार्ड मिळालेली पुस्तकं ; सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांना समर रीडिंगसाठी लावलेली पुस्तकं / त्या लेखकांची इतर पुस्तकं ;
टेक्सास लायब्ररीयन्सनी निवडलेली ब्लू बॉनेट अवार्ड मिळालेली पुस्तकं यातून पण चांगली पुस्तकं सापडतील

लिटल हाउस ऑन द प्रेअरी>> ही सिरीज आहे ना? यातलं एक आहे पुस्तकं घरी. मला सुद्धा आवडलं होते वाचायला.
वंडर cart मध्ये घालून ठेवलं आहे. इथेच वाचलं होते त्याबद्दल.
बाकी पण पुस्तकं लक्षात ठेवते.

अमितव, बरं झालं हा धागा काढला.

गेल्या वर्षी फेसबुकवर सत्यजीत नी ( लसावी आय डी) cartoon history of universe बद्दल पोस्ट केली होती. ती बघून त्या सिरीज ची पुस्तकं आणली आम्ही. ती खूप आवडली.

Covid च्या आधी लायब्ररीतून horrible history series खूप आवडीने आणली जायची.
मिस्टीरियस बेनेडिक्ट सोसायटी - सध्या hotstar वर सिरीज बघतोय मुलगा ही. बहूतेक पुस्तकं पण आणली जातील. मला सिरीज फारशी आवडली नाही. त्याला आवडतेय.

७ ते १३ वर्षांसाठी विनोदी पुस्तके
Sideways Stories from Wayside School (हे पहिले वाचा)
Wayside School Is Falling Down
Wayside School Gets a Little Stranger
Wayside School Beneath the Cloud of Doom
by Louis Sachar

१४-३० वर्षे आवडणार नाही

३०- च्या पुढे
एक वेगळ्या प्रकारचा विनोद असल्यामुळे वाचायला धमाल येईल. मी स्वतः ३५+ नंतर वाचले आणि खूप दिवसांनी मोठ्ठ्याने हसलो होतो ते आठवते आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Wayside_School

हॅरी पॉटर नंतर पहिलं काही आवडलं असेल तर- पर्सी जॅक्सन ची पुस्तके
एरीक ब्रुटन, रोआल्ड दाल (८ च्या आसपास च्या वयोगटा साठी).
पण ही पुस्तकं लायब्ररीत मिळणे अवघड आहे, किंडल वर मिळतील.

जेरोनिमो स्टिल्टन ची पुस्तके- जरा लहान ७-८ वर्ष यांना खूप आवडतात, पण भाषा मिस लिडींग आहे, अयोग्य शब्द जसे फँटॅबुलस वगैरे वापर आहे तर ते नको.

हंगर गेम्स
ज्युल्स व्हर्न ची पुस्तके
Laura Ingalls Wilder ची लिटिल हाऊस सिरीज
डॅडी लाँगलेग्ज

छान आहे हि लिस्ट. यात बऱ्यापैकी नवी नावं सापडली आहेत.

कुणाला नॉन फिक्शन मध्ये पण काही पुस्तक सुचवतात आली तर नक्की सुचवा.
लायब्ररी मध्ये पूर्वी जायचो त्यावेळी काही पुस्तकं नॉन फिक्शन घेणं मुलाला कम्पल्सरी होते. त्यामूळे वाचली जायची. विकत घेताना मात्र जास्तीत जास्त फिक्शन घेतलं जाते.
Even poetry पण सुचवा. अजून तरी सगळया प्रकारची पुस्तकं वाचायला चालतात तर मग वेगवेगळे प्रकार वाचले जातील आणून दिले तर.
काही वर्षांनी आवडी निवडी जास्त define झाल्या की मग दुसरं काही वाचले जायची शक्यता कमी आहे.

छान लिस्ट.

तोतोचान आणि 'जूनी बी जोन्स' सिरीज माझ्या लेकीला आवडली होती.
कॅप्टन अन्डरपॅन्ट्सही.
सध्या 'हरस्टोरी' वाचते आहे (जगाच्या इतिहासावर ठसा उमटवणार्‍या पन्नास स्त्रियांची थोडक्यात आणि एज-अ‍ॅप्रोप्रिएट शब्दांत माहिती).
नॉन फिक्शनमध्ये 'हू इज/व्हॉट इज' सिरीजही चांगली आहे.

https://www.amazon.com/that-went-walk-Short-Stories/dp/8193926005

The Dot that went for a walk... (51 Short Stories) A children's book with 51 illustrated stories that celebrate extraordinary women from India including artists and scientists, healers and entrepreneurs, politicians and rocket women of India, women in sports and a commando trainer, The Dot That Went for a Walk is a stunning juxtaposition of circumstance and grit creating a thrilling sense of possibility. The book is illustrated with original art by female artists from all over the nation. Each woman's story is written in the style of a fairy tale except these women have been their knights in shining armor.

माझ्या ओळखीतल्या एकीचा यात सहभाग होता . संग्राह्य पुस्तक आहे

ऍडमीन,
Submitted by अस्मिता. on 12 October, 2021 - 20:18 हा प्रतिसाद माझ्या परवानगी खेरीज टाकण्यात आला आहे. कृपया तात्काळ डिलीट करा.

Sorry Amy. मला या यादीचा खूप उपयोग झाला आहे म्हणून मी दिली, यादीसाठी परवानगी घ्यायची मला लक्षात आले नाही. मी प्रतिसाद काढून टाकला असता पण वेळ उलटून गेली आहे. Sad
Admin/ वेमा प्लीज माझा प्रतिसाद व यादी तात्काळ काढून टाकावी ही विनंती.

The Perks of Being Wallflower .................. काही शाळांत बॅन केलेले दिसते आहे. त्यात बॅड अ‍ॅसिड ट्रिप व ड्रंकन रेप चे वर्णन निदान उल्लेख आलेला आहे. असे वाचले. तेव्हा अमित आधी रिव्ह्यु वाचा आणि मग द्या.

पण हे सुद्धा लिहीलेले आहे की एक दोन टीन एजर्स ना या पुस्तकाने आत्महत्येपासून परावृत्त केले.

https://web.archive.org/web/20050113162049/http://wordriot.org/template....

हो. पण ते १६-१९ ला ठीक असेल कदाचित.
गेल्याच आठवड्यात मी मला वाचायला आणलेलें पुस्तक मुलाने घेतलं. स्वयंचलित गाड्या आणि ए.आय. प्लॉटवरची कादंबरी होती. माझ्या हातात आलं तेव्हा काही ओझरते सेक्शुअल अंडरकरंट असलेले उल्लेख दिसले. त्याला विचारलं, तुला काही प्रश्न पडले का? तर ए.आय. इ. लॉजिकल प्रश्न वगैरे बोलला. पण याबाबत काही बोलला नाही, खोदुन विचारावं अशा वयाचा नाही, सो मी ही दुर्लक्षित केलय सध्या.
रेप इ. मुळेच मॉकिंगबर्ड सध्या तरी देणार नाही.

शुअर्ली यु आर जोकिन्ग मिस्टर फाइन मन. बाय रिचर्ड फाइन मन हे छान पुस्तक आहे. एकदम जीवनाची दिशा बदलून टाकते.

सापडायला जरा कठीण आहे, पण दामू धोत्रेंचं इंग्रजी पुस्तक आहे वाइल्ड अ‍ॅनिमल मॅन . माझ्या ओळखीतल्या टीनेजर्सना आवडलं होतं

शुअर्ली यु आर जोकिन्ग मिस्टर फाइन मन. बाय रिचर्ड फाइन मन हे छान पुस्तक आहे. एकदम जीवनाची दिशा बदलून टाकते.

>>>

कोणाच्या जीवनाची? आई-वडिलांच्या?

Fiction च पाहिजेत अस आहे का? तस नसेल तर अर्ली टीन्स ना accessible दोन सिरीज आहेत -
"A graphic guide" series by Introducing Books
https://www.introducingbooks.com/graphic-guides/

"Very short introductions" by OUP
https://www.veryshortintroductions.com/

पुस्तक समजून घ्यायला कधी कधी पालकांची मदत लागू शकते. किंवा पुस्तक वाचायला मोटिव्हेट करायला पालक मदत करू शकतील. पालक आणि मुले एकत्र वाचू शकतात आणि डिनर टेबल किंवा इतर वेळी चर्चेला उत्तम खाद्य पुरवतात.

Pages