किशोरवयीन (प्रि-टीन्स, अर्ली टीन्स) मुलां/लीना आवडतील अशी इंग्रजी पुस्तके

Submitted by अमितव on 8 October, 2021 - 10:05

मॅजिक ट्री हाऊस झालं, सीरीज ऑफ अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स झालं, हॅरी पॉटरची अनेकोनेक पारायणं झाली, व्हिंपी किड बोर आहे... आता काय करू? आयेम बोर्ड! मग मायबोलीवर ग्रिशमच्या थिओडोर बून सिरीजचा धागा सापडला. ती सिरीज लायब्ररीतून आणून संपवली आता काय? हा प्रश्न ज्या पालकांना पडतो त्यांच्यासाठी हा धागा.

मायबोलीवर लहान मुलांना आणि मोठ्यांना वाचायला आवडतील अशा पुस्तकांचे अनेक धागे आहेत. पण किशोरवयीन म्हणजे साधरण ८ ते १५ वयोगटातील पोरांना वाचायला रेकमेंडेशन धागा सापडला नाही, आणि असला तरी पार खोलात बुडालेला असल्याने त्यावर अद्ययावत माहित उपलब्ध नसेल. या वयात मुलं अत्यंत भराभर वाचतात, त्यामुळे वाचनालयातून कितीही पुस्तकं आणली तरी त्यांचा कधी फडशा पडतो ते कळत नाही. परत आपण आपल्याला आवडतील अशी पुस्तकं आणावीत तर त्याकडे संपूर्ण काणाडोळा होतो. त्यांना घेउन लायब्ररीत गेलं की दोन-चार नॉन फिक्शन, जी काही मिनिटात वाचुन होतील अशी घरी येतात. पण तेच जर कुणाचा रेको असेल, तर ती पुस्तकं हमखास आवडली आहेत असा अनुभव आहे. ऑनलाईन ब्लॉग्स, लायब्ररीतुन शिफारशी मिळतातच, पण इथेही धागा असला आणि प्रत्यक्ष ओळखीत कुणी वाचुन रेको दिला तर लगेच शोध करायला आणखी बरं पडतं.

तुमच्या मुलांना कुठली पुस्तकं आवडली त्यांची नावं, थोडक्यात काही माहिती आणि मजकुरात काही धोक्याचे झेंडे (भाषा, कुणाला वावगे वाटतील असे विषय इ.) माहित असतील तर ते ही जरुर लिहा.
हा धागा इंग्रजी पुस्तकांसाठीच ठेवू. इतर भाषेसाठी हवे असतील तर वेगळे धागे काढता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खालील काही पुस्तकं/मासिकं मी माझ्या किशोरवयात वाचली

१. The Hunger Games, Twilight series
२. Highlights Magazine (not the one for children)
३. The H-Bomb Girl (and many more spy fiction novels!)
४. I'm Not Butter Chicken is written by Paro Anand
५. The Hitchhiker's Guide to the Galaxy series
६. The Princess Diaries series
७. some books by Mary-Kate Olsen & Ashley Olsen and Hannah Montana
८. अर्चिस, चंपक आणि ठकठक
९. The Adventures of Dennis by Viktor Yuzefovich Dragunsky
१०. My Family and Other Animals
११. The Yearling
१२. The Jim Corbett Omnibus

२०२१ - The Anthropocene Reviewed by John Green - his latest book, a refreshing read!

बरेच इंग्लिश क्लासिक जसे कि ब्लॅक ब्युटी, मर्चंट ऑफ व्हेनिस, Little Women & Good Wives ... अजून बरीच आहेत, जशी आठवतील तशी लिहेन.

मुलांना प्र्वासाची आव ड असेल तर जगाचा भूगोल असलेली पुस्तके अ‍ॅटलास. नकाशे वाचा यला शिकव णे फार उपयोगी पडते. एक एक देश पूर्ण शिकायचा आधी.( गूगल न करता पुस्तके वाचून) नकाशे पर्वत जमीन नद्या इति हा स ओरि जिनल लोकांचे कल्चर ह्याची माहिती करू न घेणे वर्ल्ड अ‍ॅटलास वाचणे हेच महत्वाचे. पुढे मुलांना ग्रॅजुएशन ट्रिप प्लॅन करायला फार मदत होते.

हळू हळू त्यांना त्यांचे इंट्रेस्ट कश्यात आहेत हे पण आपण मोल्ड न करता स्वतःच उमजत जाईल. म्ह ण जे शास्त्र आव् डते का इतिहास का भूगोल का संस्कृती का भाषा का लेखन का विनोद का चित्रकला का आर्ट्स का पर्फॉर्मिन्ग आर्ट्स का प्रोग्रामिन्ग का गेम डिझाइन?

कारण गेम डिझाइनिन्ग प्रोग्रामिग् फील्ड पुढे निवडले तरी त्याला ही रीसर्च लागतो. आपली असासिन्स क्रीडक्र/ क्रे टोस/ घोस्ट ऑफ त्सुशिमा गेम्स घ्या त्यात भर पूर चित्रकला संस्कृती, इतिहास भुगोल ह्याचा अभ्यास करून एक एक फ्रेम केलेली आहे. ह्यातून त्यांना त्यांचे फील्ड निवडणे सोपे जाईल.

बरोबरीने एक डीएस एल आर कॅमेरा व पोलोरॉइड कॅमेरा पण घ्या. मुले फिरायला जातील तिथे भरपूर फोटो काढू देत. व स्वतः चे अल्ब म जर्नलस बनवूदेत. देअर ओन बुक्स इट रिअली हेल्प्स.

हा धागा वाचल्यानंतर आमच्याकडे बरीच पुस्तकं विकत घेतली गेली.
मेधा, तुम्ही सांगितलेल्या लेखकाचे, Gerald Durrell चे my family and other animals घेतलं. माझ्या मुलाला खूप आवडलं ते. मुलाला हवे होते म्हणून James Rallison चे the odd 1s out घेतलं. हे पुस्तक त्याला गेले दोन वर्ष घ्यायचे होते.
इथल्या किंवा FB वरच्या कोणत्यातरी लिस्ट मध्ये वाचलेलं Sue Townsend चे The Secret Diary of Adrian Mole, Aged 13 3/4 घेतलं.
Goodreads वरून रिव्ह्यू वाचून The Girl who drank the moon घेतलं. ही सगळीच पुस्तकं त्याला आवडली. ही त्याला गेल्या birthday ला मिळालेली अमेझॉन कूपन वापरून त्यानेच घेतली. नावं मी सुचवली होती.

गेल्या शनिवारी इथे Bookaroo, children's literature festival ला गेलो होतो. बरेच भारतीय नवे लेखक / लेखिका आलेले होते. पुस्तक वाचन ( लेखक करतात), कथा कथन, illustrations, पुस्तक संबंधी क्राफ्ट असे ४ ते १४ वयोगटा साठी वेगवेगळे कार्यक्रम होते. आम्ही दोनच सेशन केली.

पण तिथे बरीच पुस्तकं घेतली. बहूतेक सगळी त्यानेच निवडली ( २-३ माझी निवड)..
१. India's Freedom Story - Ira Saxena , Nilima Sinha
२. Unearthed - an environmental history of independant India - Meghaa Gupta
३. Postbox Kashmir - Two Lives in Letters - Divya Arya
४.The happiness train - Nandini Nayar ( या पुस्तकाचे इथे प्रकाशन झालं बहूतेक. लेखिकेने थोडं वाचन केलं आणि सोबत illustration चे एक सेशन)
५. The secret diary of world's worst genius - Paro Aanand
६. Unmasked ( stories from the pandemic) - Paro Aanand
७. 5mistery stories - Nilima Sinha
८. The curse of Nader Shah - rise and fall of a tyrant - Supta Basu
९. The legend of Genghis Khan - Supta Basu
१०. Amar Chitra Katha collection - set of three books
आणि एक tinkle digest

यातली २-४ चाळून किंवा एकदा वाचून झालीत त्याची घाईघाईत. पण सवडीने वाचायची आहेत.

मध्यंतरी ट्रेन चा प्रवास झाला, त्यावेळी वाचायला अगाथा ख्रिस्ती ची पुस्तकं घेतली त्याने.

आता आम्हाला जाणवतं आहे की तो पद्य अजिबात वाचत नाही. मी स्वतः पण लहान पणी पुस्तकातल्या कवीतांव्यातिरिक्त कधी वाचलं नव्हतं. पुढे पण खूप कमी वाचलं आहे पद्य.
आज तोच म्हणाला मला पुढचं पुस्तक poetry चे हवं आहे. तर या वयोगटा साठी काही माहित असेल तर सुचवा.

Bookaroo मध्ये एरवी आम्ही हिंदी पुस्तकं पण घेतो पण यावर्षी अगदीच लहान मुलांची पुस्तकं होती हिंदीत.
वर लिहिलेल्या पैकी पारो आनंद चे Being Gandhi मागच्या एका book fair मध्ये घेतलं होते. ते आवडलं होते. बाकी सगळे लेखक आम्हाला नविन आहेत.

अल्पना, लहानांसाठी कवितांचं पुस्तक हवं असेल तर शेल सिल्व्हरस्टाइनची पुस्तके सुचवेन मी - फॉलिंग अप आणि व्हेअर द साइडवॉक एन्डस.

विमानप्रवासात ऐकून होईल म्हणून The Wild Robot नावाचे YA पुस्तक ऐकले.

वादळात सापडलेल्या मालवाहू जहाजाच्या कार्गोमधून रोबॉट असलेले काही खोके एका निर्मनुष्य बेटावर येऊन धडकतात. त्यातले चार खडकांवर आपटून फुटतात आणि आतले रोबॉट तुटून त्यांचे तुकडे इतस्तत: विखुरतात. एका खोक्यातला रोबॉट मात्र काही इजा न होता काठाला लागतो.
पाण्यात खेळणारे ऑटर तो खोका उघडतात आणि अचानक एका ऑटरकडून तो रॉबोट ऑन होतो. यू मे कॉल मी रॉझ म्हणत हा रोबॉट पहिल्यांदा डोळे उघडतो ते त्या बेटावर.
रॉझला त्या बेटावर वेगवेगळे प्राणी / पक्षी दिसतात. त्यांचे निरिक्षण करून ती त्यांच्याशी संवाद साधायला शिकते.
अनवधानाने एक गीझचे घरटे तिच्याकडून उध्वस्त होते तेंव्हा पोरक्या झालेल्या एका गॉझलिंगला ती कशी सांभाळते , त्यात तिला इतर प्राणी / पक्षी कशी मदत करतात, ती बार्क्या ब्राइटबिलला उडायला कशी शिकवते, हिवाळ्यात सगळे गीझ स्थलांतर करतात त्यांचा प्रवास, बेटावर राहिलेले इतर प्राणी आणि रॉझ हिवाळ्याचा सामना कसा करतात अशी सगळी गोष्ट आहे.

थोडं नेचर राइटिंग थोडं सायंस फिक्शन असं स्वरुप आहे. लेखक कॅल्डिकॉट ऑनर विनर आहे. चिल्लर पार्टीकरता प्रिंट कॉपी मिळाली तर चित्रं एकदम भारी असणार . चारेक तासांचं ऑडिओ बूक आहे त्यात जवळपास ऐंशी प्रकरणं आहेत. प्रिंट कॉपी मधे छोटे छोटे चॅप्टर्स असणार.

त्याचा दुसरा भाग पण आहे , आता तो ही वाचावा लागणार

The mysterious Benedict Society. तीन पुस्तकांची series आहे. माझा मुलगा सध्या दुसरं वाचतोय. Interesting आहे. पहिल्या पुस्तकावर disney ने एक season आणला आहे.

Box of Shocks वाचलं.
प्री-टीन्सना वाचायला चांगलं आहे.
६ वर्षाच्या मुलाला वाचुन दाखवलं आणि त्याला आवडलं.

एका पॅरेंटिंग ग्रुपवर सुचवलेली गेलेली काही पुस्तके इथे नोंदवून ठेवते आहे .
39 Clues
Trapped in a Video Game - series
City of Ember and sequels
Mr Terupt Series
Margaret Peterson Haddix series
Hatchet Series ( Gary Paulson books)
Stuart Gibbs books
I survived series of books
Soar by John Bauer and
Lone Star by Mike Lupica ( his books used to be on the Reading Olympics books lists )

Peter Lerangis 7 Wonders series
Maniac Magee by Jerry Spinelli
Holes
The Vanderbeekers of 141st - series
Pax ( Sarah Pennypacker)
Peak ( Roland Smith)
Nathan Hales Hazardous Tale
Among the Hidden series
Dan Gutman books
Track series
The Watsons go to Birmingham - My son had read this

Wings of Fire

अल्पना, लहानांसाठी कवितांचं पुस्तक हवं असेल तर शेल सिल्व्हरस्टाइनची पुस्तके सुचवेन मी - फॉलिंग अप आणि व्हेअर द साइडवॉक एन्डस.>>> Thanks. त्याला माहित आहे म्हणे ही पुस्तकं. पण वाचली नाहीत. आणून बघते.

The Whistling Schoolboy - Ruskin Bond
The travelling cat chronicles - Hiro Arikawa
The cat who saved books- Sosuke Natsukawa

प्री टिन्सना वाचायला योग्य अशी कोणती हेर कथांची पुस्तके सुचवू शकेल का कोणी? शक्यतो पूर्णपणे काल्पनिक हेर कथा नको. Real life stories आवडतील.
मी ६वी-७वीत असताना दुसर्‍या महायुद्धामधील काही हेरांच्या बद्दलचे एक पुस्तक मराठीतून वाचले होते. तसेच एक स्त्री हेरांच्या बद्दलचे पण वाचले होते. असे काही इंग्रजीमधे आणि १२-१३ वयोगटासाठी योग्य पुस्तक असेल तर सुचवा.

ब्लॅक हिस्ट्री मंथ निमित्त सध्या 'अंडरग्राऊंड टू कॅनडा' आणलेलं वाचतोय मुलगा.
अमेरिकेच्या दक्षिणेत गुलामी होती आणि कॅनडात गुलामी बेकायदा झालेली होती त्यामुळे अनेक गुलाम अंडरग्राऊड रेलरोडने महत्त्प्रयासाने कॅनडात आले. अशाच एका मुलीची गोष्ट आहे. अनेक मुलाखती आणि प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवरुन लिहिली आहे.
मला पण आवडलं पुस्तक.
नॉन फिक्शन म्हणायला हरकत नाही.

Pages