आपण आभासी दुनियेत जगत आहोत काय?
लहाणपासून आपण ठरवतो कि मला इंजिनीअर व्हायचंय,डॉक्टर व्हायचंय आणि याच्या मागेच आयुष्य घालवतोय.
95% लोकांचे ध्येय हेच असते चांगला जॉब,घर,कार,पैसा, चांगल्या मुलाशी/मुलीशी लग्न,दागिने, हनीमून प्लैनिंग.
हेच खरे आयुष्याचं ध्येय आहे?
Population and crony capitalism in our country, forcing us to have this kind of goals.
आपल्या इथं परिस्थिती अशी आहे कि शिक्षकांना व्यावस्थित पगार मिळत नाहीत. बर्याच ठिकाणी शिक्षक तणावाखाली असतात.ते विद्यार्थ्यांना जगण्याचा खरा अर्थ काय समजावणार.तुम्ही चांगले मार्क्स मिळवा तेव्हा चांगला जॉब मिळेल हेच शिकवले जाते शाळेत.
आजकालच्या कुठल्याही जाहिराती घ्या, बहुतेक फेक आहेत.कॉस्मेटिक पासून ते फूड जाहिराती पर्यंत, गोर्या बनवणार्या क्रिमा,उंची वाढवणारी ड्रिंक्स, एकतरी लॉजिकल असते काय? तरी उत्पादनं विकली जातात आणि लोकं विकत घेतात आणि मजेत वापरतात.
Being a logical is considered as a fool in today's world.
आजकालच्या न्युज तर न्युज नसून १००% prapoganda आहेत. फेक जगाची एक इकोसीस्टीम बनवली गेली आहे आणि कुणीही तुम्हाला यातून बाहेर पडू देणार नाहीत कारण त्यांचा बीझनेस त्यांना ठप्प करायचा नाहीये.
मीठ,चप्पलीपासून ते शिक्षणापासून सगळी एक इकोसीस्टीम आहे.एक ट्रैप आहे.
कुणाकडेही इतका वेळ नाहीये, काय चूक आहे काय बरोबर आहे?ह्याची खरंच गरज आहे का?असे प्रश्न कुणी करतच नाहीये.
समोर जे दिसतंय आणि सगळे ज्याच्या मागे धावताएत, आपण ही तेच करायचं हेच सुरू आहे सध्या.
Ultra rich
Rich
Upper middle class
Middle class
Poor
समाजातील या पाच कैटेगरीतील, upper middle class, middle class,poor ह्या तीन वर्गातील लोक 95% आहेत आणि हे कधीही इकोसीस्टीम च्या जाळ्यातून बाहेर पडू शकणार नाहीत.
या आभासी जगातील,मटेरिअल्स्टिक गोल्समुळे लोकांना खरंच समाधान,आनंद मिळतोय का कि या चक्रात अडकल्याने अपेक्षाचं अवास्तव ओझं,ताणतणाव, शारिरीक व्याधी यांना आमंत्रण दिले जात आहे?
आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही ध्येय जरूर असावीत.
जसे कि
• कुणाला शिक्षणासाठी सपोर्ट करणे.
• पर्यावरणाची निगा राखण्यात हातभार लावणे.
• कुणाच्या टैलंटला प्रोत्साहन देणे.
• घरात, समाजात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे.
माझ्या कडून मला इतके लिहिता आले.
प्रत्येकाने आपली अशी ध्येये लिहावीत आणि आचरणात आणायचा प्रयत्न करावा,आपल्या पुढच्या पीढीच्या चांगल्या भविष्यासाठी.
इथेही अशी ध्येये लिहून चर्चा केलेली आवडेल. जेणेकरून इतरांनाही रियल्स्टीक ध्येये बनवायला मदत होईल.
मूल दत्तक घ्यायचे होते परंतु
मूल दत्तक घ्यायचे होते परंतु फारच वर्षांनी आता थोडीफार स्टॅबिलिटी दिसते आहे. आता पन्नाशीला मूल दत्तक घेणे योग्य तर नाहीच पण दोघांच्या वयाची बेरीज १०० पेक्षा कमी असावी असा काहीतरी नियमही आहे.
हां अशा संस्था आहेत ज्यांना डोनेशन देउन एखादे मूल व त्याचा खर्च सांभाळता येइल. पण अजुन काही केलेले नाही. बहुधा करणारही नाही.
(हे या लेखाशी संबंधित नाही
(हे या लेखाशी संबंधित आहे पण प्रत्यक्ष मृणालीला उद्देशून नाही.असेच वाटले म्हणून.)
कोव्हीड वेव्ह पहिली च्या काळात ऑनलाईन शॉपिंग जास्त भरात आले होते कारण बाकी सर्व बंद असायचे.तर एका बाईंनी 'मला चांगला इमिटेशन ज्वेलरी चोकर नेकलेस कसा मिळेल' अशी पोस्ट टाकली.यावर दुसऱ्या बाईंनी दुसऱ्या एका ग्रुपवर ती पोस्ट शेअर करून 'बघा काय मूर्ख लोक आहेत, जगात काय चाललंय आणि यांचं काय चाललंय' वगैरे लिहिलं.मग त्यावर बरीच उलट सुलट मतं आणि भांडणं झाली.छोट्या उद्योजकांचं म्हणणं होतं की कोणीतरी इमिटेशन ज्वेलरी खरेदी करून छोट्या ज्वेलरी उद्योजकांचे पोट चालवत असेल तर हरकत काय आहे?
मुळात समाजाला मदत करणारा, गरिबांना मदतीचा हात देणारा एखादा माणूस स्वतः कमावलेल्या व्हाईट मनी मधून स्वतःसाठी चांगल्या ब्रँडेड वस्तू आवडणारा, घेणारा असू शकणार नाही का?मिनिमलीझम काय आणि आवश्यकता काय ही बॉर्डर लाईन कोण ठरवणार?माझा याबद्दल थोडा गोंधळ आहे.
मला वाटतं की ध्येय हा शब्द
मला वाटतं की ध्येय हा शब्द खूपच मोठा आहे. आयुष्यातील ध्येयं खालीलपैकी असू शकतातः
- भरपूर आनंद मिळवणे
- इतरांना आनंद मिळवून देणे
बाकी गोष्टी ह्या ती ध्येयं मिळवण्यासाठी केलेल्या पूरक गोष्टी आहेत, जसे पैसे मिळवणे, चांगले घर घेणे, चांगल्या कला जोपासणे - हे सर्व पहिले ध्येय मिळवण्यासाठीचे प्रयत्न होत. दानधर्म करणे, दत्तक घेणे, शिकवणे, पर्यावणाची निगा राखणे - हे सर्व दुसरे ध्येय मिळवण्यासाठीचे प्रयत्न होत. तुम्हाला त्यातली एखादी गोष्ट नाही करता आली म्हणजे काही तुम्ही ध्येयापासून ढळलात असे होत नाही. ध्येय मिळवण्यासाठीचे अनेक मार्ग आहेत, त्यातले आपल्याला शक्य होतील ते, पटतील ते, योग्य वाटतील ते, आणि श्रेयस्कर वाटतील ते आपण करतो.
आता हे ही आहे, की ह्या गोष्टी केल्या म्हणजे ध्येय साध्य होईल का? तशी काही शाश्वती देता येत नाही. ह्या सर्व गोष्टी फारच कॉम्प्लेक्स असतात आणि त्याचा अमुक केले म्हणजे तमुक ध्येय मिळेल - असा सरधोपट मार्ग नसतो.
छान लेख, छान विचार. अधूनमधून
छान लेख, छान विचार. अधूनमधून असले विचार करत राहावेत. मनात येतच राहतात.
माझे ध्येय माझ्या स्वभावाला अनुसरून फार आत्मकेंद्रीत आहे. ते म्हणजे आनंदी राहायचे.
पण त्याचवेळी हे सुद्धा समजले आहे की आपल्या आजूबाजूचे जग आनंदी असेल तरच आपण आनंदी राहू शकतो.
>>>>
व्यवस्थित सगळं व्हायला पैसा हवाच.
पण किती पैसा आला म्हणजे आपण अजून पैशाच्या मागे धावणे थांबवू याचे प्रत्येकाचे वेगवेगळे का असेना पण एक गणित असावे.
>>>>
सगळं व्यवस्थित व्हायला पैसा हवा असा विचार एकदा केला की मग तो पैसा किती याचे गणित आयुष्यभर सुटणे अवघड आहे असे मला वाटते.
जगायला पैसा लागतोच. पण तो काय किती याचा विचार करू नये. आयुष्य जगण्याच्या प्रोसेसमध्ये तो कमीजास्त कमावला जाणारच.
मला आठवतही नाही की मी माझी पे स्लिप, सीटीसी, बँक बॅलन्स, वगैरे शेवटचे कधी पाहिले आहे.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. हा सल्ला मी कोणाला देणार नाही. प्रत्येकाचे ध्येय आणि महत्वाकांक्षा त्याच्या स्वभावाला अनुसरून भिन्न असणार. त्याच्याशी प्रामाणिक राहावे.
अनुची पोस्ट आवडली.
अनुची पोस्ट आवडली.
पर्स्युट ऑफ हॅपिनेस!
पर्स्युट ऑफ हॅपिनेस!

शेवटी इतरांना आनंद का? कारण त्याने स्वतःला आनंद होतो म्हणून. आनंद होणार नसेल तर सगळं व्यर्थ आहे. आणि होणार असेल तर सगळं (नाही, पण बरंचस) माफ आहे. हा आनंद गिल्ट फ्री करायचा. आपण काहीही केल्याने अगदी श्वास घेतला तरी कोणाला तरी त्रास होणारच आहे. त्यामुळे प्रत्येक कृतीची चिरफाड करत बसलो तर डोक्याची मंडई होणार. ते टाळायचं.
आपण जे वागतो ते त्या क्षणाला विचार करुन वागावे, आणि आनंद उपभोगावा. पश्च्यात आपल्याला काही वावगं आढळलं, आणि ते सुधारावं असं वाटलं तर जरुर बदलावे. पण पूर्वी केलेल्या गोष्टीचा गिल्ट मनात नि:संदेह आणू नये. त्यावेळी जो विचार करणं शक्य होतं तो मी केलेला आणि त्या प्रकारे कृती केलेली. आता नव्या प्रकाशात बदल करावासा वाटतोय तर तो परत विचार करुन करावा.
शाश्वत चुक आणि बरोबर असं काहीच नसतं. परिस्थितीप्रमाणे आणि आपल्या अक्कलेप्रमाणे ते बदलतं. निर्णय मात्र आपला आपण घ्यावा, आणि त्याला फक्त आपल्यालाच जबाबदार धरावे. चुकला तरी, बरोबर आला तरी.
भूतकाळातील आपल्या चुकीच्या निर्णयावर हसायला मिळावं अशी परिस्थिती म्हणजेच आनंदी मनाची स्थिती कायम आणायचा प्रयत्न करावा. स्वत:च्या चू*गिरीवर हसायला मजा येते.
(स्वगतः हा माझा उंच स्टुलावर बसुन दिलेला प्रतिसाद वाचुन दोन वर्षांनंतरचा मी मला जाम हसणारे)
हपा आणि अमितव यांचे प्रतिसाद
हपा आणि अमितव यांचे प्रतिसाद आवडले.
शाश्वत चुक आणि बरोबर असं
शाश्वत चुक आणि बरोबर असं काहीच नसतं. परिस्थितीप्रमाणे आणि आपल्या अक्कलेप्रमाणे ते बदलतं. निर्णय मात्र आपला आपण घ्यावा, आणि त्याला फक्त आपल्यालाच जबाबदार धरावे. चुकला तरी, बरोबर आला तरी.>>>>+११११ हा पॅरा खुपच आवडला.
मी स्वतः फार मोठी ध्येय वगैरे ठेऊन नव्हते. फक्त एक मात्र वाटायचं कि आई पासून लपवावं लागेल असं काहीच कधी करणार नाही. अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही जे घरी सांगायला लाज वाटेल.
चूकीच्या मार्गाने पैसे मिळवणार नाही., मग भले कमी मिळाले तरी चालतील. .
अमितव,हपा छान प्रतिसाद !
अमितव,हपा छान प्रतिसाद !
धनुडी छान लिहिलेस !
आई पासून लपवावं लागेल असं
आई पासून लपवावं लागेल असं काहीच कधी करणार नाही. अशा चुकीच्या गोष्टी करणार नाही जे घरी सांगायला लाज वाटेल.
>>>
अगदी अगदी. हे तत्व मी सुद्धा पाळतो. अगदी याच शब्दात. आई आणि आता पोरं, यांनाही सांगायला कधी लाज वाटली नाही पाहिजे.
याचा अर्थ कधी भरकटलो नाही असे नाही. पण दरवेळी चुकीचा मार्ग पकडल्यावरही वेळीच सावरलो. वेळीच थांबलो, मागे फिरलो. त्यामुळेच आजवर कुठल्या व्यसनातही अडकलो नाही.
मिनिमलीझम काय आणि आवश्यकता
मिनिमलीझम काय आणि आवश्यकता काय ही बॉर्डर लाईन कोण ठरवणार?माझा याबद्दल थोडा गोंधळ आहे. >>>> गोड आवडतं का ? समजा पेढा / काजूकतली किंवा बर्फी पाहील्यावर राहवत नसेल तर... हे पदार्थ चवीसाठी असतात. त्याचा पहिला बाईट हा चवीसाठी पुरेसा असतो. त्या वेळी जीभ सुद्धा चव सांगते. पण चटक लागली म्हणून पाव किलो फस्त केली तर नंतर प्रत्येक बाईटला चव सुद्धा कळत नाही. पुढचे बाईट्स अनावश्यक असतात. पहिला बाईट हा गोडाची चव अनुभवण्यासाठी पुरेसा असतो. हे पुरेसे असणे हे ज्याने त्याने स्वतःपुरतं ठरवायचं असतं. दुस-यावर थोपवायचं नसतं. एखाद्याला पाव किलो पुरेसे वाटत नसेल तर त्याची मर्जी.
चूकीच्या मार्गाने पैसे
छान प्रतिसाद, धनुडी.
मला वाटतं की ध्येय हा शब्द
मला वाटतं की ध्येय हा शब्द खूपच मोठा आहे..... हरचंद पालव.
------
ध्येय हा जड शब्द मोठ्यांचा आहे. आपण मुलांचा विचार केला तर त्यांच्या वयाप्रमाणे 'आयुष्य' हासुद्धा एक जड शब्द आहे.
त्यांच्या वयाप्रमाणे -
१) आज संध्याकाळी काय करणार आहेस?
२) उद्या रविवारी सुटीला काय ?
३) दिवाळी सुटीत काय?
४) मे महिन्याच्या सुटीत काय?
५) मोठा झाल्यावर काय?
असे साधे प्रश्न आणि छोट्या सोप्या आनंदाच्या गोष्टी ठरवलेल्या असतात.
'तुमच्या मुलांनी सुटीत काय करायचे ठरवले आहे?' हा धागाही दसऱ्यानंतर मायबोलीवर काढता येईल.
मृणाली, छान विषय आणि लेख हि
मृणाली, छान विषय आणि लेख हि छान लिहिलायं..
सगळे प्रतिसाद हि उत्तमच..
आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही ध्येय जरूर असावीत.
>>> सहमत...
माझ्या मते , ध्येय म्हणजे ठराविक काळात आपल्याला काय मिळवायचे आहे आणि जे हवे आहे ते मिळवण्यासाठी त्या कालावधीत त्यासाठी कष्ट उपसणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.
आयुष्यात ध्येय निश्चितच असायला हवीत.. ती
असामान्यच असायला पाहिजेत असं काही नाही. ज्यातून आनंद आणि समाधान मिळेल अशी ध्येय असायला हवीत. ध्येयामुळे आयुष्याला दिशा मिळते , जगण्याचा उत्साह वाढतो. आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध लागतो. आपल्यातल्या कमतरता हि कळून चुकतात. आपल्या जगण्याला शिस्त हि लावण्याचा प्रयत्न करता येतो. प्रत्येकवेळी ध्येय यशस्वी होतीलच असं नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे..? हे अर्थात माझं मत आहे.
सामान्यपणे प्रत्येक व्यक्ती मनात काही ना काही ध्येय बाळगत असतोच. तसं पाहायला गेलं तर ध्येय ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे.
आता मी पण दैनंदिन आयुष्यात मनात काही लहानसहान ध्येय बाळगून असते जसं की, अधूनमधून होणारी चिडचिड अमंळ कमी करावी. वाचन आणि लेखनासाठी वेळ देणे, रोज अर्धातास तरी व्यायाम करणे, घरखर्चाचे व्यवस्थित व्यवस्थापन करून बचत कशी करता येईल.. त्या अनुषंगाने खर्च कमी करणे, मुलांना अभ्यास आणि वाचनाची गोडी कशी लागेल.. ह्यासाठी प्रयत्न करणे.
हि जरी सामान्य ध्येयं असली तरी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यात थोडे फार यश मिळाल्यावर त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान मला महत्वाचे वाटते.
२५ पैशात जे सुख होतं ते आज
२५ पैशात जे सुख होतं ते आज हजार डॉलर्सचा आयफोन देऊ शकत नाही कारण वापराचा अतिरेक.>>>>
नाही हो... उलट आज करोना काळात आई वडिलांचा चेहरा बघू शकतो, आ़जी आजोबा नातवंडांचे कौतुक लीला बघू शकत आहेत हे विडीओ कॉल च्या कृपेनेच
टेक्नॉलॉजी कायम च घातक नसते काही..
कायद्याच्या चौकटीत राहून पैसे
कायद्याच्या चौकटीत राहून पैसे कमावणे व खर्च करणे, मटेरियालिझम आणि त्याचबरोबर सामाजिक जाणीव ठेवून केलेलं सत्पात्री दान.स्वतःकडून चांगल्या इमानदार लोकांना बिझनेस मिळेल असं काही करत राहणे.खाण्याची नासधूस न करणे.
वस्तूंवरचे टॅक्स नीट भरून(विदाऊट टॅक्स ब्लॅक न घेऊन) वस्तू घेणे.
इतकं आता सुचतंय.
मटेरियालिझम मार्केट ला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हातभार लावत असतो.उदा. एखाद्याने काही उद्देशाने 3 गाड्या घेतल्या तर या गाड्या बनवणारा वर्कर, डीलर कडे वाढलेली मॅनपॉवर, सर्व्हिस सेंटर आणि त्यावरचा स्टाफ असा हातभार अप्रत्यक्ष रित्या लागणार आहे.
तसं म्हटलं तर उधळपट्टी मानला जाणारा इंटरनॅशनल टुरिझम बंद झाल्यावर, एव्हीएशन इंडस्ट्री चे काम कमी झाल्यावर किती बाजूचे उद्योग अफेक्ट झाले?
ड्रग, टेररीझम याला हातभार लागणार नाही, कायदा भंग होणार नाही, कोणाचेही आपल्याकडून नुकसान होणार नाही अश्या प्रकारे ज्याने जसे पाहिजे तसे जगावे असे वाटते.
आर्थिक स्थैर्य आले आता काही
आर्थिक स्थैर्य आले आता काही ध्येयं
१)योग्य वाटली तिथे, तशी गुंतवणुक करणे
२)नवर्याला काय वाटेल, सासरच्याना काय वाटेल हे विसरून सेल्फ पॅम्पर करणे, सणावारा प्रमाणे स्वतःला आवडणारी वस्तू गिफ्ट करणे वगैरे..
३)मैत्रिणिंची, जवळच्या आणि खरंच केअरिंग अशा नातेवाईकांची नियमित चौकशी करणे
४)आई वडिल, सासू सासरे यांना कायम संपर्कात राहून उपयुक्त भेट वस्तू देणे
५)वृद्धाश्रम येथे प्रत्यक्ष जाऊन अॅडल्ट डायपर, तेले, तांदुळ, औषधी ई. ऑफ पेपर देणे
६)मुलांसोबत रोज निदान १ तास खेळणे...काहीही बोलणे, गप्पा वगैरे.
सध्या तरी इतकेच सुचतेय..
'तुमच्या मुलांनी सुटीत काय
'तुमच्या मुलांनी सुटीत काय करायचे ठरवले आहे?' हा धागाही दसऱ्यानंतर मायबोलीवर काढता येईल.
>>>>>
चालेल, मला दसर्यानंतरचे ध्येय मिळाले. असा धागा काढून तो शतकी होईल हे पाहायचे.
आर्थिक स्थैर्य आले आता काही
आर्थिक स्थैर्य आले आता काही ध्येयं
३)मैत्रिणिंची, जवळच्या आणि खरंच केअरिंग अशा नातेवाईकांची नियमित चौकशी करणे
४)आई वडिल, सासू सासरे यांना कायम संपर्कात राहून ...
६)मुलांसोबत रोज निदान १ तास खेळणे...काहीही बोलणे, गप्पा वगैरे.
>>>>>
कोणाच्या ध्येयाबाबत टिप्पणी करणे खरे तर ऊचित नाही. फक्त एक बाब जाणवली ती नमूद केल्यावाचून राहात नाही. वर जे ध्येय उल्लेखले आहेत त्यासाठी आर्थिक स्थैर्य येण्याची वाट बघायची गरज नव्हती. अर्थात तुम्ही लिस्ट आउट करताना सगळे एकत्र केले असावेत. पण त्यातून अर्थ असा निघत होता. जर दोन वेळचे जेवायला मिळतेय आणि डोक्यावर छप्पर आहे तर जवळच्यांना वेळ न देता आणखी कुठल्या आर्थिक स्थैर्यामागे आपण धावत असतो असे वाटले.
वर जे ध्येय उल्लेखले आहेत
वर जे ध्येय उल्लेखले आहेत त्यासाठी आर्थिक स्थैर्य येण्याची वाट बघायची गरज नव्हती.>>>
हो खरंय ते, पण ती जाणीव आता होतेय असो बेटर लेट दॅन नेव्हर.
आता स्थैर्य आहे तर इतर गोष्टी सुचत आहेत, त्या पुर्वी काम आणि काम हेच सुरू होते..
बेटर लेट दॅन नेव्हर +७८६
बेटर लेट दॅन नेव्हर +७८६ आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर हे लागू
मी व माझ्या पत्नीने
मी व माझ्या पत्नीने उत्तरायुष्यात काही मंथन केल्यानंतर ही ध्येये निश्चित केली.
-- गरजू व अनाथ - विद्यार्थ्यांना आर्थिक व भावनिक पाठिंबा
-जगप्रवास.... ७० वर्षापर्यत
- लेखन ( माझी पत्नी व मी अनुक्रमे मुलांसाठी पुस्तके व अनुवादाचे काम करतो).
-आम्ही ३ मुले पदरात घेतली आहेत व त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो. त्यांना भावनिक आधार (शक्य तेवढा) देतो.
वा, फारच स्तुत्य.
वा, फारच स्तुत्य.
फारच स्तुत्य +७८६
फारच स्तुत्य +७८६
आम्ही ३ मुले पदरात घेतली आहेत व त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो. त्यांना भावनिक आधार (शक्य तेवढा) देतो.
>>>>
आर्थिक मदतीबद्दल ऐकून आहे. पण हे काही वेगळे वाटतेय. थोडे सविस्तर सांगता येईल का?
सध्या तरी सन्ध्याकाळी यु
सध्या तरी सन्ध्याकाळी यु-ट्युब वरुन बघुन बघुन पियानो (किबोर्ड) वाजवणे / बडवणे शिकतोय, जाम मजा येतेय. लहानपणी शिकयला मिळालं नव्हत, पण आता ते सगळं करायचं ठरवलं आहे.
रेव्युसर, फारच छान!
रेव्युसर, फारच छान!
हो आशू२९ टेक्नॉलॉजीचे फायदे
रेव्यु सर, कौतुकास्पद !
रेव्यु सर, कौतुकास्पद !
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
वापराचा अ ति रेक आणि दमछाक या
वापराचा अ ति रेक आणि दमछाक या मुद्द्याबदल दुमत असू नये.>>. अगदी बरोबर.. ते सतत चे न संपणारे कंपॅरीझन प्रवास ट्रीपा असो, गाडी घेणे, घर घेणे वगैरे मुळे फेबू वरून संन्यास घेणारी बरीच मंडळी आहेत..
आर्थिक मदतीबद्दल ऐकून आहे. पण हे काही वेगळे वाटतेय.>>> माझी १ मैत्रिण आहे, ती ऑनलाईन शिबिरातून मानसिक आधार देण्याचे काम करते, हे फ्री असते, ज्याना निराश वाटत आहे, किंवा अपराधी अशांना सगळ्यांनाच मानसोपचारा कडे जाण्याची कुवत किंवा तयारी नसते, अशांना ह्या शिबिरातून खूप भक्कम आधार मिळतो.
अशा कामासाठी आधी केयरटेकर लोकांना ट्रेन करतात. हे सुरत मधे झाले आहे.. महाराष्ट्राबद्दल माहित नाही.
जो तो त्याच्या त्याच्या रिअल
जो तो त्याच्या त्याच्या रिअल दुनियेतच जगतो
जिथून त्याला अन्न वस्त्र निवारा मिळतो तीच त्याची दुनिया असते
खेड्यामध्ये शेतकऱयांनी 4 , 10 मुले काढली त्यातलीच तिथे पोट न भरू शकणारे शहरात आले , शहरातील दुनिया ही त्यांची real world च आहे , उगाच जुन्या आठवणी काढून हे इथे होते , ते तिथे असायला हवे होते , असे म्हणत बसले तर उमराव जानसारखे होऊन जाईल
ये क्या जगह है दोस्तो !!
Pages