आपण आभासी दुनियेत जगत आहोत काय?
लहाणपासून आपण ठरवतो कि मला इंजिनीअर व्हायचंय,डॉक्टर व्हायचंय आणि याच्या मागेच आयुष्य घालवतोय.
95% लोकांचे ध्येय हेच असते चांगला जॉब,घर,कार,पैसा, चांगल्या मुलाशी/मुलीशी लग्न,दागिने, हनीमून प्लैनिंग.
हेच खरे आयुष्याचं ध्येय आहे?
Population and crony capitalism in our country, forcing us to have this kind of goals.
आपल्या इथं परिस्थिती अशी आहे कि शिक्षकांना व्यावस्थित पगार मिळत नाहीत. बर्याच ठिकाणी शिक्षक तणावाखाली असतात.ते विद्यार्थ्यांना जगण्याचा खरा अर्थ काय समजावणार.तुम्ही चांगले मार्क्स मिळवा तेव्हा चांगला जॉब मिळेल हेच शिकवले जाते शाळेत.
आजकालच्या कुठल्याही जाहिराती घ्या, बहुतेक फेक आहेत.कॉस्मेटिक पासून ते फूड जाहिराती पर्यंत, गोर्या बनवणार्या क्रिमा,उंची वाढवणारी ड्रिंक्स, एकतरी लॉजिकल असते काय? तरी उत्पादनं विकली जातात आणि लोकं विकत घेतात आणि मजेत वापरतात.
Being a logical is considered as a fool in today's world.
आजकालच्या न्युज तर न्युज नसून १००% prapoganda आहेत. फेक जगाची एक इकोसीस्टीम बनवली गेली आहे आणि कुणीही तुम्हाला यातून बाहेर पडू देणार नाहीत कारण त्यांचा बीझनेस त्यांना ठप्प करायचा नाहीये.
मीठ,चप्पलीपासून ते शिक्षणापासून सगळी एक इकोसीस्टीम आहे.एक ट्रैप आहे.
कुणाकडेही इतका वेळ नाहीये, काय चूक आहे काय बरोबर आहे?ह्याची खरंच गरज आहे का?असे प्रश्न कुणी करतच नाहीये.
समोर जे दिसतंय आणि सगळे ज्याच्या मागे धावताएत, आपण ही तेच करायचं हेच सुरू आहे सध्या.
Ultra rich
Rich
Upper middle class
Middle class
Poor
समाजातील या पाच कैटेगरीतील, upper middle class, middle class,poor ह्या तीन वर्गातील लोक 95% आहेत आणि हे कधीही इकोसीस्टीम च्या जाळ्यातून बाहेर पडू शकणार नाहीत.
या आभासी जगातील,मटेरिअल्स्टिक गोल्समुळे लोकांना खरंच समाधान,आनंद मिळतोय का कि या चक्रात अडकल्याने अपेक्षाचं अवास्तव ओझं,ताणतणाव, शारिरीक व्याधी यांना आमंत्रण दिले जात आहे?
आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही ध्येय जरूर असावीत.
जसे कि
• कुणाला शिक्षणासाठी सपोर्ट करणे.
• पर्यावरणाची निगा राखण्यात हातभार लावणे.
• कुणाच्या टैलंटला प्रोत्साहन देणे.
• घरात, समाजात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे.
माझ्या कडून मला इतके लिहिता आले.
प्रत्येकाने आपली अशी ध्येये लिहावीत आणि आचरणात आणायचा प्रयत्न करावा,आपल्या पुढच्या पीढीच्या चांगल्या भविष्यासाठी.
इथेही अशी ध्येये लिहून चर्चा केलेली आवडेल. जेणेकरून इतरांनाही रियल्स्टीक ध्येये बनवायला मदत होईल.
ऋन्मेष
ऋन्मेष
ती मुले एका ख्रिश्चन मिशनरी मध्ये ओरिसातील अनाथालयात आहेत. आर्थिक मदती व्यतिरिक्त आम्ही त्यांच्याशी दर महिन्यात २ ते तीन वेळा व्हिडियो कॉलवर बोलतो, त्यांच्या शाळेबद्दल, हॉस्टेलबद्दल बोलते. ख्रिसमसला त्यांच्या सणात सामिल होतो. घरच्या मिठाया पाठवतो. आमच्या अमेरिकेतील मुलींशी संवाद करवतो. कधी पूर्ण कुटुंब कॉन्फरन्स कॉल करतो... हे मात्र थोडे सांभाळून करावे लागते कारण त्या मुळे तिथल्या इतर बालकांना वाईट वाटू नये.
ओके, कल्पना आलेली, पण नेमके
ओके, कल्पना आलेली, पण नेमके काय आणि कसे हे जाणून घ्यायचे होते. आणि हे खरेच ग्रेट आहे _/\_
Pages