आयुष्याचं नक्की ध्येय काय?

Submitted by mrunali.samad on 2 October, 2021 - 08:23

आपण आभासी दुनियेत जगत आहोत काय?
लहाणपासून आपण ठरवतो कि मला इंजिनीअर व्हायचंय,डॉक्टर व्हायचंय आणि याच्या मागेच आयुष्य घालवतोय.
95% लोकांचे ध्येय हेच असते चांगला जॉब,घर,कार,पैसा, चांगल्या मुलाशी/मुलीशी लग्न,दागिने, हनीमून प्लैनिंग.
हेच खरे आयुष्याचं ध्येय आहे?

Population and crony capitalism in our country, forcing us to have this kind of goals.

आपल्या इथं परिस्थिती अशी आहे कि शिक्षकांना व्यावस्थित पगार मिळत नाहीत. बर्याच ठिकाणी शिक्षक तणावाखाली असतात.ते विद्यार्थ्यांना जगण्याचा खरा अर्थ काय समजावणार.तुम्ही चांगले मार्क्स मिळवा तेव्हा चांगला जॉब मिळेल हेच शिकवले जाते शाळेत.

आजकालच्या कुठल्याही जाहिराती घ्या, बहुतेक फेक आहेत.कॉस्मेटिक पासून ते फूड जाहिराती पर्यंत, गोर्या बनवणार्या क्रिमा,उंची वाढवणारी ड्रिंक्स, एकतरी लॉजिकल असते काय? तरी उत्पादनं विकली जातात आणि लोकं विकत घेतात आणि मजेत वापरतात.
Being a logical is considered as a fool in today's world.

आजकालच्या न्युज तर न्युज नसून १००% prapoganda आहेत. फेक जगाची एक इकोसीस्टीम बनवली गेली आहे आणि कुणीही तुम्हाला यातून बाहेर पडू देणार नाहीत कारण त्यांचा बीझनेस त्यांना ठप्प करायचा नाहीये.
मीठ,चप्पलीपासून ते शिक्षणापासून सगळी एक इकोसीस्टीम आहे.एक ट्रैप आहे.
कुणाकडेही इतका वेळ नाहीये, काय चूक आहे काय बरोबर आहे?ह्याची खरंच गरज आहे का?असे प्रश्न कुणी करतच नाहीये.
समोर जे दिसतंय आणि सगळे ज्याच्या मागे धावताएत, आपण ही तेच करायचं हेच सुरू आहे सध्या.
Ultra rich
Rich
Upper middle class
Middle class
Poor
समाजातील या पाच कैटेगरीतील, upper middle class, middle class,poor ह्या तीन वर्गातील लोक 95% आहेत आणि हे कधीही इकोसीस्टीम च्या जाळ्यातून बाहेर पडू शकणार नाहीत.

या आभासी जगातील,मटेरिअल्स्टिक गोल्समुळे लोकांना खरंच समाधान,आनंद मिळतोय का कि या चक्रात अडकल्याने अपेक्षाचं अवास्तव ओझं,ताणतणाव, शारिरीक व्याधी यांना आमंत्रण दिले जात आहे?

आयुष्यात प्रत्येकाला काहीना काही ध्येय जरूर असावीत.
जसे कि
• कुणाला शिक्षणासाठी सपोर्ट करणे.
• ​पर्यावरणाची निगा राखण्यात हातभार लावणे.
​• कुणाच्या टैलंटला प्रोत्साहन देणे.
​• घरात, समाजात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे.
माझ्या कडून मला इतके लिहिता आले.
प्रत्येकाने आपली अशी ध्येये लिहावीत आणि आचरणात आणायचा प्रयत्न करावा,आपल्या पुढच्या पीढीच्या चांगल्या भविष्यासाठी.
इथेही अशी ध्येये लिहून चर्चा केलेली आवडेल. जेणेकरून इतरांनाही रियल्स्टीक ध्येये बनवायला मदत होईल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण आभासी दुनियेत जगत आहोत काय?>>>> पहिलीच ओळ वाचली आणि कमेंट द्यायला आलो. ही ओळ वाचून एकच बोलतो ...जोरदार टाळ्या. दिल जित लिया आपने. हो आपण आभासी दुनियेत आहोत. स्वतः एलोन मस्क बोललाय आपण आभासी दुनियेत आहोत. तो बोलायच्या कितीतरी वर्षे आधीपासून मी बोलतोय आपण आभासी दुनियेत आहोत.

कधी काय होणार हे आधीच ठरलेलं आहे. प्रत्येक पार्टीकलची प्रॉपर्टी असते. ठरलेल्या परिस्थितीत ठरलेली घटनाच होणार. आता मला सांगा दगड जर पाण्यात टाकला तर दगडाने कितीही ठरवलं त्याला पोहायचं आहे तरी तो बुडणारच.

अतिशय अंतर्मुख करणारे लिहिले आणि मायबोलीवर नेहमीच्या असणार्या अर्थपूर्ण (शून्य) प्रतिक्रिया अपेक्षित होत्या...लौकिक व्यस्तता असूनही काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे

जगण्याची ध्येय बदलत असतात किंबहुना आपल्या शरीर-मनाची जशी वाढ होते तशी तशी ती ध्येय बदलतात असे काही असावे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ साध्य करावे असे अनेकांना वाटते. पण धाग्यात लिहील्याप्रमाणे "अर्थ" म्हणजे पैशामागे धावण्यात अनेकांची दमछाक होते. इकोसिस्टीम मधून बाहेर पडणे सोपे नसले तरी जमू शकते. उदा: सोशल मिडीयावर वेळ व मेंटल बँडविडत्थ जाणे. १२ वर्षापूर्वी सोशल मिडीयावर खाती होती. पण २०१२ सुमारास व्हॉट्सॅप आले नि जाणवले हे "अति" होत आहे. मायबोली वगळता सर्व सोशल मिडीया इकोसिस्टीम मधून बाहेर पडले. खूप लोकांनी शिव्या घातल्या. ऐकल्या. पण इतरांच्या जीवनातील सहभाग, तुलना, किंवा अनावश्यक संवादांमुळे येणारी "दमछाक" पूर्णपणे टळली. ज्यांना माझ्याबद्दल माया होती ते इमेल/टेक्स्ट इ मार्फत संपर्कात राहिलेच. ज्यांना व्यक्तीपेक्षा सोशल मिडीयातील "संवाद" अधिक महत्त्वाचा अशी माणसे आपसूक गळून पडली.
आपल्या आजी-आजोबा नि आई-वडिलांची पिढी आपल्यापेक्षा अधिक सुखी होती ह्याला कारण ते पोस्टकार्ड वापरायचे!! २५ पैशात जे सुख होतं ते आज हजार डॉलर्सचा आयफोन देऊ शकत नाही कारण वापराचा अतिरेक.

मृ माझी पोस्ट जरा विस्कळीत आहे. पण तुझ्या भावना पोहोचल्या आहेत, माझ्याही तुझ्यापर्यंत येतील अशी आशा आहे.

लेखाचे सार कळले.
हे विचार नेहमी येत असतात अधून मधून.
व्यवस्थित सगळं व्हायला पैसा हवाच.
पण किती पैसा आला म्हणजे आपण अजून पैशाच्या मागे धावणे थांबवू याचे प्रत्येकाचे वेगवेगळे का असेना पण एक गणित असावे. त्यात मुलांचे व्यवस्थित शिक्षण आणि पुढे त्यांना त्यांच्या पायावर उभे करायला मदत, आणि आपल्याला शेवट पर्यंत लागेल एवढी पुंजी असावी. (माझे वैयक्तिक मत तसे, मुलांचे उच्च शिक्षण कर्ज काढून, भले मग ते आई/वडिलांकडुन का असेना, व्हावे असे आहे. आपल्या लग्नाचा खर्चही त्यांनी आपल्या कमाईतून करावा.)
मुलांनाही वेगळे घर आणि आयुष्यभर पुरेल एवढे आपण कमवत बसण्यात सगळे जीवन घालवायचे का? याचा विचार करावा. (ज्यांना मिळतोय तेवढा पैसा चाळीशी पन्नाशी पर्यन्त त्यांची गोष्ट वेगळी). असे काही ठरवून या चक्रातून बाहेर यावे.

पर्यावरण जपणे यात हातभार लावावाच लागेल, अशी अजून काही ध्येये कॉमन असतील जी करावीच. इतर ध्येये वैयक्तिक वेगवेगळी असतील. ती सुद्धा इथे कुणी लिहिली तर इतरांना उपयोगी होऊ शकतील.

रेव्यु सर धन्यवाद.

सी, सविस्तर पोस्ट लिहिल्याबद्दल धन्यवाद, काय म्हणायचंय ते पोहोचले आहे.

मानव धन्यवाद, हेच अपेक्षित आहे कि, इतरांचीही वेगवेगळी ध्येये असू शकतील जी इतरांनाही मार्गदर्शक ठरू शकतील.

अस्मिता आभार.
बोकलत Happy तुमचे विषयाला धरून प्रतिसाद पण वाचायला आवडतील.

मृणाली, छान विषय! माझ्या ही डोक्यात वेगळ्या संदर्भात या प्रश्नाविषयी लिहायचं आहे. आत्ता इथे वाचनमात्र राहते.
सी आणि मानव यांच्या पोस्ट पटल्या. सोमि सोडून तीन वर्षे झाली. One of the best decisions I've ever made. मिळालेला वेळ मला माझ्या आवडीच्या विषयावर अधिक ज्ञान मिळवण्यासाठी आणि चिंतनासाठी वापरता येतो. आपुलाचि वाद आपणासी या करता दिलेला वेळ, काहीही न करणे यासाठीचा वेळ (doing nothing) should be considered as time well spent. आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवण्यासाठी हे आवश्यक आहे. आपण स्वतःसाठी वेळ दिला की आपल्याला स्वतःचा रस्ता सापडत जातो असा माझा अनुभव आहे.

ध्येय असं काहीच नाही. पण वाचन करण्याची सवय आहे. त्यातून सतत विचार येत असतात.
यातल्या काहींना ध्येय म्हणावं तर जगापासून उफराटं वागावं लागेल. ध्येय म्हणून बाळगावं तर जग एका दिशेने धावत सुटलेय, त्यासोबत रगडले जावे लागणार आहे. पण जगाचे असे धावणे कुठपर्यंत ? ते कोण थांबवणार ? की प्रत्येकाच्चीच ही अवस्था आहे ? समजून उमजून प्रत्येकजण जीवघेण्या शर्यतीत धावतो हे कळत नाही.
माफक गरजा, त्यामुळे निसर्गाचे ओरबाडणे कमी ... पर्यावरणपूर्वक आणि शांत जीवनशैली, वैज्ञानिक दृष्टीकोण मात्र विज्ञानाचे प्रत्येक शोध जीवनशैलीत आणणे गरजेचे आहे का याचा सारासार विचार .... पुढच्या पिढीला पृथ्वी अधिक सकस देण्याकरता सशक्त विचार जगणारी मानवजात याकडे वाटचाल व्हावी असे वाटते. हे एकट्यादुकट्याचे काम नाहीच.

अध्यात्मिक विचार कधीच केला नाही. पण आता वेळ काढून आत्मशुद्धीसाठी प्रयत्न करण्याचे मनात आहे.

95% लोकांचे ध्येय हेच असते चांगला जॉब,घर,कार,पैसा, चांगल्या मुलाशी/मुलीशी लग्न,दागिने, हनीमून प्लैनिंग.>>>
वयाच्या तिशीपस्तीशीपर्यंत हे ध्येयं साध्य होतात. त्यानंतर पुढे तुम्ही जी poor to ultra rich चढणी दिलेली आहे ती साध्य करण्यासाठी माणूस स्वत:ला जुंपून घेतो आणि त्यातच व्यस्त राहतो. पण हे करत असतानाही तो
>>>• कुणाला शिक्षणासाठी सपोर्ट करणे.
• ​पर्यावरणाची निगा राखण्यात हातभार लावणे.
​• कुणाच्या टैलंटला प्रोत्साहन देणे.
​• घरात, समाजात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे.>>>
हे साध्य करु शकतो. (बहुतेकजण हेच करत नाहीत.)
शेवटी एका निर्णायक वळणावर मृत्यू सामोरा येतो आणि सगळं संपतं.
पण त्यानंतर ? त्यानंतर काही असेलच तर त्याचेही निरनिराळे टप्पे असतील. ते सर्व टप्पे सहज पार करता येण्यासाठी तुम्ही जिवंतपणी चांगली कर्मे करायला हवीत. तुम्ही समाजाच्या कोणत्याही कॅटेगरीत असलात तरी तुमची चांगली कर्मे ही मृत्यूपश्चात वाटचालीचा प्रवास (जर तो असेल तर*) सोपा करणार आहेत म्हणून चांगली कर्मे करणं हेच ध्येयं बनवा आणि चालत रहा.
-वैतरणीच्या काठावरुन हाडळीचा आशिक Proud

मी माझ्यापुरतं एक ध्येयं मनोमन निवडलंच आहे ते नाही लिहीत पण त्याचाच महत्त्वाचा भाग असलेलं काही लिहीतो, मृत्यूच्या क्षणभर आधी मला समाधानानं हसायचं आहे.

नक्की वाक्य आत्ता सापडत नाहीये पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशा अर्थाचे म्हणतात - माणसापुढे २ पर्याय असतात. अधिकाधिक पशूत्वाच्या पातळीवरती जाणे किंवा मग अधिकाधिक सुयोग्य, उत्तम माणुस बनणे. माझ्या मते उर्ध्वगामी प्रवास हा श्रेयस्कर आहे. अधिकाधिक चांगले माणुस बना. प्रयत्न तरी करा. कारण कोणतीतरी एक दिशा धरणे गरजेचे आहे.

"• कुणाला शिक्षणासाठी सपोर्ट करणे.
• ​पर्यावरणाची निगा राखण्यात हातभार लावणे.
​• कुणाच्या टैलंटला प्रोत्साहन देणे.
​• घरात, समाजात सगळ्यांशी मैत्रीपूर्ण वागणे."

हे नक्कीच आधी यावे.पण उरल्या सुरल्या वेळात स्वतःला,आजूबाजूच्याना कम्फर्ट देईल असा मटेरियालिझम करायलाही मला आवडेल.बरीच इकॉनॉमी त्यावर चालते.

१) जोपर्यंत हातपाय धड आहेत तोपर्यंत सोलो भटकंती, ट्रेकिंग करणे.
२) जोपर्यंत वाचता येतंय तोपर्यंत वाचन करणे.
३) पोटोबा त्रास देत नाही तोपर्यंत चमचमीत खाणे.
४) भाषा शिकणे. (तीन चार भारतीय, एक दोन परदेशी.)
५) जमेल तेवढ्या जुन्या वस्तू आणि उपकरणं चालू स्थितीत ठेवणे. दहा रुपये किलोने विकण्यापासून वाचवणे.

Srd, तुमची ध्येये आवडली. सहज सुटसुटीत आणि स्वच्छ समजतील आणि फॉलो करता येतील अशी आहेत.
वरचा लेखातला ट्रॅप वाटत नाही आणि मेटरियलिस्ट जगणे आवडते आणि सोडणार नाही. पण त्याबरोबर गरजा ( त्यातल्या त्यात) कमी ठेवून राहायचा प्रयत्न करतो.
राहतो त्या आणि भावनिक जवळच्या कम्युनिटीत व्होलेंटियर करायला आवडेल. सध्या नवीन काहीतरी शिकणे आणि मुलांना शिकवणे यात वेळ घालवतोय.

इतक्या मोठ्या अंतरा ळात इन द नोन युनिवर्स असे गूगल करून बघा. त्यात किती एक लक्ष करोडो आकाश गंगा त्यात आपली एक. कित्येक ग्रहमाला त्यात आप्ला एक बारकुसा सूर्य त्यात एक आपला ग्रह. त्यात चिरकुट आपण. आपले कसले ध्येय. मनाला येइल तसे जगायचे व मरून जायचे ह्यापलिकडे काय करतात मानव लोक्स.

आम्ही न्युज लाँड्री ला सबस्राइब करतो. मेरे दम पे आझाद है खबरें

मी सेवा करणार ( म्हणजे कुणीतरी हातपाय मोडून पडावे)

मी इतरांना प्रकाश दाखवणार ( म्हणजे कुणीतरी अंधारात फाफलावे)

मी इतरांचा उद्धार करणार ( म्हणजे कुणीतरी खड्ड्यात पडावे)

स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून लोक असल्या इच्छा का बाळगतात ?

चांगला धागा मृ, प्रतिसाद ही आवडले. मी लिहीन नंतर.
स्वतःला मोठेपणा मिळावा म्हणून लोक असल्या भिकारड्या इच्छा का बाळगतात ?>>>>> कोणी अशा इच्छा बाळगल्या आहेत?

दुसर्‍याला मदत करण्याने आपल्या डोक्याभोवती एक सॉफ्ट ग्लो असलेला हेलो तयार होतो हे मान्य. पण कोणी तशी इच्छा करते आहे - हा फार फेच्ड निष्कर्ष झाला.

ब्लॅककॅट तो शब्द उडवल्याबद्दल धन्यवाद.

ज्यांना सेवेची , प्रकाशाची, उद्धाराची गरज आहे असे असंख्य लोक आधीपासूनच असतात. त्यांच्या आयुष्यात किंचित का होईना, चांगला फरक आपल्या कामामुळे पडावा अशी इच्छा बाळगण्यात काही चुकीचे नाही.

@ जिज्ञासा, वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेले पण.

@शांत माणूस, पहिला प्रतिसाद चांगला आहे.

@srd, ध्येये छान आहेत,शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

@धनुडी, सामो,हा.आ.,भरत थँक्स !

@ अनु, अमितव आभार!

मटेरीयलीस्ट असणे, एका मर्यादेपर्यंत ठिक आहे.
पण मार्केटिंग मुळे झाले असे आहे कि एक कुटुंब, एक घर, एक गाडी असं गरजेपुरतं न राहता, दोन-तीन घरे पाहिजेत. घरात माणसं असतात तीन आणि दारात गाड्या चार.
तिथे गरीबांच्या मुलभूत गरजा (अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण) यात आपल्याला हातभार लावता आला तरी इकॉनॉमीला चालना मिळणार ना?
माझ्या लेखाचा उद्दिष्ट हेच आहे कि,
समजा रिटायरमेंट नंतर जेव्हा आपण मागे वळून बघू कि काय मिळवले आयुष्यात, तेव्हा फक्त मटेरीयलीस्ट ध्येये साध्य झालेली असतील कि काही अशा काही गोष्टी हि आपण केलेल्या असतील कि ज्याने आपल्याला समाधान आणि आनंद वाटेल.

Pages