अपेक्षा आणि वास्तव : अनुभव

Submitted by किल्ली on 29 September, 2021 - 13:39

:गटणे काका mode चालू :
जीवनाच्या समरात असे प्रसंग येतात की एखाद्या व्यक्तीकडून आपण गृहीत धरलेली साधी अपेक्षा पूर्ण होतं नाही आणि समोर भलतंच वास्तव आ वासून उभं राहतं.
असं झालं की घायाळ होणं आलंच. मनावरचे हे ओरखडे कालांतराने पुसट झाले तरी त्याची खूण राहतेच!
याउलट कधी कधी अजिबात अपेक्षा नसताना आनंदाच्या सुखद सरी कोसळू लागतात आणि आपण त्यात चिंब न्हाऊन निघतो.
:गटणे काका mode बंद :
तुमच्यासोबत कधी असं घडलंय का?
चला तर मग आपापले वास्तविक, काल्पनिक, मित्र मैत्रिणींचे, शेजार पाजाऱ्यांचे अनुभव येथे लिहूयात.
Expectation vs reality Happy
बघू कोणी कोणी अपेक्षा भंगाचा कडू रस पचवलाय आणि कुणाकुणाला मस्त surprizes मिळाली आहेत Happy
....
तळटीप :
धागा विरंगुळा ग्रुपात आहे, मजेदार प्रतिसाद येतील अशी अपेक्षा आहे बघूया वास्तव काय असेल!

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे एक होईल की

अपेक्षा - ब्रॅड पीट
वास्तव- पिठाचा ब्रेड

अस्मिता,
तो केक बघुन घाबल्लो नां मी :((

अपेक्षा - उद्यापासून सकाळी लवकर उठणार work out करणार junk food बंद, रूटीन सेट करणार आईला कामात मदत करणार रात्री लवकर झोपणार सहा महिन्यात दहा किलो कमी होणार
वास्तव - सकाळी नऊ वाजता office ची meeting आहे म्हणून जबरदस्ती पावणे नऊ ला उठून laptop समोर बसणे दिवसभर काहीबाही खाणे बेडवर एकाच ठिकाणी पडून राहून माबो वरील धाग्यांवर प्रतिसाद देत बसणे आईला मदत करणे तर सोडा आई आयत जेवायला बोलवेल तेव्हा हो पाच मिनिट हो पाच मिनिट करून तिला सुद्धा वैताग आणणे रात्री उशिरापर्यंत series बघत बसणे आणि सहा महिन्यात अजून वजन किलो किलो ने वाढवणे Sad

अपेक्षा - होणाऱ्या नवऱ्या सोबत प्रेमाने बोलणार अजिबात कंप्लेंट करणार नाही अजिबात भांडण करणार नाही त्याला समजून घेईल
वास्तव - तो बिचारा साधा शांत माणूस म्हणून आपण कायम त्याला बोल बोल बोलणार ऑफिस मधून थकून येऊन कॉल केला की आपण सदा न कदा कंप्लेंट करत बसणार Lol
चुकी जास्तीत जास्त वेळा आपलीच असते माहिती असून सुद्धा त्याला वैताग देणार Proud

सगळ्यांच्या posts Lol
मस्त आहेत
अस्मिता. ह्यांना मीम queen हा पुरस्कार जाहीर करते आहे Happy
अफाट

हेतू नव्हता, रूबाबदार होते वगैरे सारवासारवीला दुर्दैवाने अर्थ ऊरत नाही जेव्हा तुम्ही एखाद्या स्पेसिफिक ऊद्देशाने एखादे स्पेसिफिक मीम शेअर करता. तुम्हाला अजूनही अशा मीम्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही असे वाटत असल्यास हे जरूर वाचा https://www.bbc.com/news/uk-38340095

तुम्ही दोन गोर्‍या हँडसम विशीतल्या तरूंणांचे फोटो दाखवून, 'त्यांची शारिरिक तुलना ह्याच्याशी करा' असे सुचवत सावळ्या रूढार्थाने हँडसम नसलेल्या पंचेचाळीशीच्या आणि आता दिवंगत व्यक्तीला मॉक करत आहात, ज्याला बॉडी शेमिंग म्हणतात.

Every boy's weakness - Straight hair and Nerdy glasses म्हणत दोन गोर्‍या सुंदर स्त्रियांचे फोटो दिले आणि वास्तव म्हणून काळ्या लठ्ठ मुलीचा फोटो दिला ते तुम्हाला विनोदी वाटेल का?
नंतर म्हणाले 'माझा वाईट हेतू नव्हता मी गंमत म्हणून टाकली' किंवा 'मला ती मुलगी व्यक्तीशः सुंदर वाटते' तर मॉक करून सवरून माझी ही लंगडी सबब चालेल का?

तुमची 'कोणाचे आजोबा असे छपरी लूक ठेवत आमचे तर धोतर टोपी वगैरे वापरत' वगैरे मुक्ताफळे सुद्धा वाचली. केसांवरून आणि दिसण्यावरून जुन्या काळातल्या लोकांना छपरी वगैरे म्हणायची तुमची मानसिकता वाचून खेद वाटला. जॉर्ज हॅरिसन पासून ऋषी कपूर पर्यंत आणि प्रेम चोप्रा पासून राजेश खन्ना पर्यंत सगळ्यांनी तेव्हाच्या फॅशन नुसार हा लूक ठेवला आहे. जॉर्ज हॅरिसन किंवा राजेश खन्नाचे चित्र तुमच्या मीम मधे बसणार नाही कारण ते जात्याच देखणे होते तुम्हाला हशा मिळवण्यासाठी ओबड धोबड चेहर्‍याचाच माणूसच हवा नाही का?

SK.jpgDA.jpgPC.jpgDD.jpgRK.jpg

मला ऊत्तर दिले नाही तरी चालेल, तुम्हालाच पटतेय का बघा.

अपेक्षा - लग्नापूर्वीची गोडी गुलाबी लग्नानंतरही टिकून राहावी
वास्तव- लग्नानंतर गुलाबी ६ महिन्यात उडून जाते आणि गोडी २ वर्षात संपुष्टात येते.
प्रत्येक धाग्यावर गोडी गुलाबीच्या उदात्तीकरणला कंटाळलेला झम्पू.

अपेक्षा :
आज तुमचे ट्रेनिंग संपले आहे व तुम्ही अधिकृत रित्या इन्फोसिस चे एम्प्लोयी झाला आहात. तुमचा पहिलाच प्रोजेक्ट उद्यापासून आहे तो पायथॉन मशीन लर्निंग, ए आय वापरून मिस्साईल कन्ट्रोल सॉफ्टवेअर लिहिणे व पाकिस्तानी मिसाईल आपल्या देशात येण्यापूर्वीच आपले मिसाईल त्याला टक्कर देऊन रामयण सिरियल सारखे अडवेल.

वास्तवः
आज तुमचे ट्रेनिंग संपले आहे व तुम्ही अधिकृत रित्या इन्फोसिस चे एम्प्लोयी झाला आहात. अमेरिकेतल्या ए बी सी इन्शुरन्स मध्ये कोबोल मध्ये चाळीस वर्षापूर्वी लिहिलेले सॉफ्टवेअर मेन्टेन करायचे आहे. मॅनुअल टेस्टिंग करून एक्षेल शीट भरणे !

मी अश्विनी, एका चांगल्या विषयाबद्दल लिहीलंस म्हणून आधी अभिनंदन. सोशल मिडीयावर अनेक लोकं मुद्दा नीट न समजावता पोस्टी टाकतात नि अर्थात इतर त्यांना ट्रोल्स म्हणून दुर्लक्ष करतात (माझ्या हातूनही असे बरेचवेळा घडले आहे.). एक सुचवते बघ पटलं तर - वेगळा धागा काढ नि बॉडी शेमिंग बद्दल व्यवस्थित माहिती लिही.

अमरिष पुरी मीम बद्दल माझा गोंधळ आहे. कारण हा जरा ग्रे एरिया आहे. माणसाला ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्याबद्द्ल विनोद करू नये हा निकष मी सहसा ठेवते उदा: ओम पुरी यांच्या चेहर्‍यावरील देवीचे वण. त्यावर ओबड-धोबड चेहरा म्हणून कुणी विनोद केला तर ते बॉडी शेमिंग हे चटकन लक्षात येते.

पण इथे जरा गोंधळले आहे. इतर कुठला हिरो चालणार नाही हे बरोबर पण रणजित, प्रेम चोप्रा असे कुणी व्हिलन असते तर हसू आले असते. कारण गेट-अप बरोबरच 'व्हिलन इमेज' मुळेही हसू येते - हवा होता हिरो पण पदरी आला व्हिलन. पण "हसले असते" ह्या जर-तर ला अर्थ नसतो. कदाचित नसतेही हसले. अमरिष पुरी यांच्या एखाद्या चेहर्‍यातील न बदलता येणारे वैगुण्यही इथे उकरून काढलेले नाही. उदा: त्यांच्या नाकावर किंवा हनुवटीवर जोक नाही. सोनाक्षी सिन्हाच्या कपाळाबद्दल असे अनेक जोक्स वाचले आहेत. आवडले नाहीत कारण ते बॉडी शेमिंग मध्ये मोडते ते चटकन लक्षात येते. थोडक्यात, अधिक माहितीचा, व्यवस्थित अन्य माहितीच्या लिंक्स देणारा धागा काढला तर उत्तम.
(एकदा स्पष्ट इतकं सांगून कळत नाही का, तुम्हीच काढा मग इ इ वैतागू शकतेस माझ्यावर पण खरंच ह्या विषयाबद्दल जागरूकता हवी असे वाटत असेल तर धागा काढ, प्लीज).

खरं तर मला ते अमरीश पुरी आहेत हे पटकन ओळखू आलं नाही.इथे वाचल्यावर नीट पाहिलं.पण अश्विनी चा मूळ मुद्दा पटला.लूक वरून मिम्स खूप येतात.यात पाहिले व्हीक्तिम बनतात ते आफ्रिकन वंशाचे चेहरे.इथे मिम्स शेअर करताना कोणी मुद्दाम हा विचार केला नसेल, यापुढे करू.
नाना पाटेकर, ओम पुरी, पंकज कपूर यांच्या सारख्यानी स्वतःचा ब्रँड बनवला.लोक आज त्यांना ओळखतात, त्यांच्या लुक्स ना नाही.तास तर विकी कौशल, राजकुमार राव हेही रूढ अर्थाने देखणे नव्हेत.(तो कार्तिक आर्यन आणि त्याच्यावर क्रषित मुली हे तर मला अजिबात झेपत नाहीये,(पण क्रश शेमिंग नको म्हणून गप्प बसते))

अमरीश purinchi एरवीची भारदस्त प्रतिमा आणि वाढविलेले केस यात बरीच विसंगती असल्याने हसायला आले.बाकी काळा रंग आणि इतर या कडे लक्ष गेले नाही.

इतर कुठला हिरो चालणार नाही हे बरोबर पण रणजित, प्रेम चोप्रा असे कुणी व्हिलन असते तर हसू आले असते. .... सहमत.

सोनाक्षी सिन्हाच्या कपाळाबद्दल असे अनेक जोक्स वाचले आहेत. आवडले नाहीत कारण ते बॉडी शेमिंग मध्ये मोडते ते चटकन लक्षात येते.
>>>>

सोनाक्षी सिन्हाबद्दलचे जोक्स मी कधी पाहिले नाहीते. माझे वाचन कमी असेल. पण मायबोलीवरच मी स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांच्या दिसण्यावरून बरेच जोक्स, खरे तर त्यांना जोकही म्हणू नये असे टिकेचा सूर लावलेल्या पोस्ट पाहिल्या आहेत.
बॉडीशेमिंग हा शब्द आणि कन्सेप्ट छान आहे. पण खरेच किती जण याचा विचार करतात आणि काळजी घेतात याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करायला हवे.

मला तर अमरीश पुरीपेक्षा आधीच्या मिम्स मधील मधले दोन खटकले होते. त्यात एक उजवीकडचा निळा शर्टवाला माहितीतला नाही, खाली उजवीकडे मराठी नट आहे स्त्री वेषात. पण ही तसे दिसणाऱ्या व्यक्तींची त्यांची देहयष्टी/रूप यावरील थट्टा आहे असे वाटते. हे दोन मिम्स कुणाला खटकले नसतील तर तो माबुदो, अति खोलात विचार समजेन.

आणि अमरीश पुरी वाले मिम आता पाहिले आणि त्यावर मी अश्विनी यांच्या पोस्ट्स वाचल्या . त्यांचा मुद्दा पटला.
जर त्यात तिन्ही फोटो अमरीशपुरीचेच (किंवा कुठल्याही एका व्यक्तीचे) वेगवेगळ्या रुपात असते तर ती स्पेसिफिक लुक्स/फॅशनवरील थट्टा होईल. आता यात 'पण अमरिशपुरीचे चांगले फोटो नाहीत का, हा तशा लुक्स साठीच निवडलाय ना' असे म्हणता येईल, पण त्यात "हास्याचा" सुद्धा विशेष उल्लेख आहे आणि त्याने विशेष अभिनय करून ते हास्य केले आहे असे दिसत नाही. त्याचे हास्यच तसे आहे.

हे बॉडी शेमिंगच्या उद्देशाने केलेले नाही हे अर्थात माहीत आहे, पण अजाणतेपणी तसे होते आहे का हे पहावे.

अपेक्षा - अपेक्षा आणि वास्तव धाग्यावर मजेशीर प्रतिसाद

वास्तव - गंभीर विषयावर चर्चा

आणि - ह्यात चर्चा चुकीची आहे असे अजिबात सुचवायचे नाही आहे.

मी ट्विटर वर जास्त वेळ पडीक असल्याने मला मी अश्विनी ह्यांचा मुद्दा तेव्हाच समजलेला. पण गंमतीच्या धाग्याव र उगीच आपण पोस्ट केली तर एज शेमिन्ग व्हायचे म्हणून गबसले. मला तर नवे सभासद बिनधास्त पणे जिथे तिथे कॉपिराइटेड इमेजेस व टेक्स्ट टाकतात त्याचे सुद्धा टेन्शन येते. पूर्वी सजग माबोकर लगेच पॉइन्ट आउट करोन शिस्त लावत. पान नव्या सिस्टिमेत हे चालत असावे . चाललेल्या गंमतीत आप्ल्यामुळे खडा पडायला नको असे वाट्ते. मी अश्विनी धागा काढून लिहा . पूर्वी अलक्ष्मीच्या धाग्यावर मी हा मुद्दा लिहिला होता. की लक्ष्मी ती गोरी शेपली व सुंदर तर अलक्ष्मी काळी जाडी व दात पुढे आलेली खुर टे केस असे वर्णन होते व ती घरी दारिद्र्य घेउन येते असे बरेच पूर्वग्रह तिथे व्यक्त झाले होते. हे सुद्धा बॉडी शेमिन्ग आहे. कल्चरली सँक्षन्ड.

तुम्ही लिहिल्या नुसार ते सत्तर च्या दशकातले हिरो व्हिलन मी रेगुलरली बघितले आहेत. तो केसांचा कट तेव्हा पॉप्युलर होता व सलुनच्या समोर ते फोटो फिल्म मॅगझिन मधून कापून चिकटवलेले असत. हे आपले अवांत र.

किल्ली: सॉरी फॉर अवां तर पोस्ट. धागा मस्त आहे बाकी. गंमत वाचायला च आलेले.

वर एक मुद्दा आला की अमरीशपुरी विनोदी दिसावेत म्हणूनच तसा गेट अप होता.
यावरून एक मुद्दा असा मनात आला. जर चित्रपटात एखादा कलाकार जाडा, काळा, बुटका वगैरे दाखवून त्यातून विनोद घडवायचा प्रयत्न असेल तर ते बॉडी शेमिंग नाही का?
आणि असल्यास त्याचे पाप निव्वळ दाखवणाऱ्यावरच का? त्यांनी हसायला दाखवले आणि आपण हसलो तर यात आपण हसणारे त्या बॉडीशेमिंगमध्ये सामील नाही का?

मीम्स च्या नावाखाली 'ह्या खर्‍याखुर्‍या व्यक्तीचा फिजिकल अ‍ॅपिअरन्स अनडिझायरेबल आहे' हे सांगणे, सुचवणे सौजन्यशील आहे की कसे हा मेंटल चेक काहीही शेअर करण्यापूर्वी आपण करावा हे कळण्यासाठी लेख वाचायची गरज नसावी. आधी दिलेल्या लिंक मध्ये अशा निर्बुद्ध मीम्सचा विषय बनलेल्या व्यक्तीच्या भावना आलेल्या आहेत. तो लेख ह्या विनोदांमागची दुसरी दु:खी बाजू समजण्यासाठी पुरेसा असावा.

अमरिष पुरी यांच्या एखाद्या चेहर्‍यातील न बदलता येणारे वैगुण्यही इथे उकरून काढलेले नाही. >> सनग्लासेस, लांब केस आणि स्मित ह्या तिन्ही गोष्टी ठेऊन ह्रितिक रोशनचा फोटो दिल्यास विनोदनिर्मिती होते का? पण अमरिष पुरींच्या फोटोबाबतीत होते.
ईथे हेराफेरी मधल्या बाबूभाईंचा स्पेसिफिक फोटो असेल तर त्या सिनेमाच्या विनोदी कंटेक्स्टमध्ये ते विनोदी होऊ शकेल पण हा स्पेसिफिक सलाखे (१९७५) मधला फोटो आहे ज्याला विनोदाची पार्श्वभुमी नाही.
मग विनोद, पुरींच्या नैसर्गिक चेहर्‍यावर नाही असे कसे म्हणता येईल? ह्या प्रश्नांचे ऊत्तर मिळाले की हे विनोदी की कसे ह्याचा गोंधळ कमी होईल.

चला हवा येऊद्या वगैरे विनोदी कार्यक्रमात गेट अप घेऊन विनोद निर्मिती करण्याचा प्रकार थोडा विदुषक चेहरा रंगवून स्वतःला विनोदाचा विषय बनवतो ह्यावर आधारित आहे. तिथे त्या कंटेक्स्टमध्ये हसणे औचित्यपूर्ण असावे.

Happy अन्य व्हिलनच्या फोटोने विनोदनिर्मीती होत नाही काय या प्रश्नाच्या उत्तरासाठी लेख लिहा विनंती केली होती. पोस्टीत त्याचे उत्तर नाही. असो.

https://mobile.twitter.com/shatrudrapratap/status/1442477368577183753/ph... घ्या एक डिझायरेबल फोटो नि माझ्यापुरता हा विषय मिटला.

बॉडी शेमिंग ह्या विषयावर चांगली चर्चा झाली
त्या विषयी अधिक मुद्दे मांडण्यासाठी वेगळा, स्वतंत्र धागा हवाय.
इथून पुढे धागापूरक post टाकूया Happy

अपेक्षा : २ बाळं आहेत ना, एकात एक मोठी होतात. तुला कळणारही नाही. वेगळं फार काही करावं लागत नाही
वास्तव : उगवलेला प्रत्येक दिवस, रात्र आणि मी अपेक्षापु र्ती च्या प्रतीक्षेत
सध्या हेच सुचलंय


दोन बाळं, हे कधी झालं
अभिनंदन आता करू की नंतर? Happy
(की नवरा हे दुसरं बाळ असा भावार्थ आहे?)

माबो अभ्यास
अपेक्षा - अनु
वास्तव - ममो

काय रोपं आहेत का दोन लावली तरी दोघांना रोज एकाच वेळी पाणी घातलं की झालं? --- हे मला कसं आधी समजलं नाही Lol
Lol next time हेचं वाक्य वापरीन, आवडलंय Happy
थँक्यू अनु
हर्पेन Happy

Pages