बरसू दे मज मेघसा

Submitted by निखिल मोडक on 24 September, 2021 - 17:01

बरसू दे मज मेघसा
भार हो आठवांचा वसा
क्षणैक ये गे चमकुनी
सौदामिनीशी मदालसा

© निखिल मोडक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मेघसा हा हिंदी शब्द आहे का? मराठीत असं कधी वापरत नाहीत. मेघसम म्हणतात, पण ते यमकाशी जुळणार नाही.

पण प्रयत्न चांगला आहे. छान उपमा वापरल्या आहेत. चार ओळी खूप पटकन संपल्या. अजून विस्तार करा नक्की.

हे मुक्तक आहे! त्यात चार ओळी व पहिल्या दुसऱ्या व चौथ्या ओळीत यमक असते. मेघसा हा शब्द मराठीत वापरता येतो. मेघा प्रमाणे असा त्याचा अर्थ होतो. जसे गीत रामायणात दशरथाचे वर्णन करताना 'गृही चन्द्रसा नगरी इन्द्रसा' वगैरे म्हटले आहे तसेच इथे आहे. आठवांचा वसा म्हणजे आठवणींची ठेव. मुक्तकाचा अर्थ आहे, हे सखे प्रिये मला ही आठवणींची ठेव (पाण्याने भरलेल्या मेघा प्रमाणे) आता भारभुत झाली आहे, (म्हणून) मला आता मेघासमान बरसू दे! अन तू ही क्षणासाठी का होईना मदालसे, विजे सारखी चमकून जा.

अच्छा! रोचक.
गृही चन्द्रसा नगरी इन्द्रसा >> हे कुठल्या गीतात आहे, कृपया सांगाल का? मला हे माहीत नव्हते.

@हरचंद पालव, 'सरयु तीरावरी अयोध्या' ह्या गीतात आहे.

इक्ष्वाकू कुल कीर्ती भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचे करितो रक्षण
गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी

असे ते पूर्ण कडवे आहे