गणेशवंदना

Submitted by कविन on 13 September, 2021 - 22:51

प्रथमेश्वर तू श्रीगणनायक
गुणाधिशा तुज नमो नम:

विद्यावारिधि वरदविनायक
बुद्धिनाथ तुज नमो नम:

योगाधिप तू सिद्धीविनायक
अखूरथा तुज नमो नम:

नादप्रतिष्ठित विघ्नविनाशक
अवनीशा तुज नमो नम:

भुवनपति तू देवेन्द्राशिक
अलंपता तुज नमो नम:

मृत्युंजय तू भवभय तारक
मुक्तिदायी तुज नमो नम:
_______________________

संदर्भासाठी:
हि गणपतीची नावे आहेत. त्यांचे अर्थही खाली लिहीत आहे.

प्रथमेश्वर - प्रथम देवता
श्रीगणनायक - गणांचा अधिपती
बुद्धिनाथ - बुद्धीची देवता
विद्यावारिधि - विद्येची देवता
वरदविनायक - समृद्धी देणारा
गुणाधिश - गुणांचा देव
योगाधिप - योग ध्यान यांचा अधिपती/स्वामी
सिद्धीविनायक - यश देणारा
नादप्रतिष्ठित - संगीत प्रेमी
विघ्नविनाशक - विघ्न हरण करणारा
अवनिश - सर्व विश्वाचा प्रभू
भुवनपति - देवांचा देव
देवेन्द्राशिक - सर्व देवतांचे रक्षण करणारा
अखूरथ - मुषक ज्याचा सारथी आहे असा
अलंपता - अनंत देव
मृत्युंजय - मृत्यूलाही हरवणारा
मुक्तिदायी - शाश्वत आनंद देणारा

Group content visibility: 
Use group defaults

छानच!

वाह

वाह!!! सुंदरच.
अलंपता हा शब्द माहीत नव्हता.

एकदम सहज काही कारागिरीचा मागमूस नसलेली अशी झाली आहे. आवडली.
शब्दार्थांबद्द्ल विशेष धन्यवाद.

धन्यवाद माबोकर्स Happy

एकदम सहज काही कारागिरीचा मागमूस नसलेली अशी झाली आहे. आवडली.>> फारच मोठे कौतुक झाले हे तर. आभारी आहे