प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १ - हास्य

Submitted by संयोजक on 9 September, 2021 - 22:52

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे

हास्य

मायबोली प्रशासन हे कायमच प्रताधिकार आणि त्याची अंमलबजावणी यांबाबत आग्रही राहिलं आहे. अनेक मायबोली किंवा मायबोलीबाह्य उपक्रम यांमध्ये वापरायला आपल्या सगळ्यांनाच प्रकाशचित्रं लागतात. यासाठी स्टॉक इमेजेस्‌ अर्थात प्रताधिकारमुक्त चित्रं उपलब्ध करून देणारी संकेतस्थळं खूपच उपयोगाची ठरतात. मायबोलीवर अनेक उत्तमोत्तम प्रकाशचित्रं कायम प्रदर्शित होत असतात. आपण विषयावर आधारित झब्बू दरवर्षी ठेवतो, पण मग पुढे या चित्रांचं काय होतं?
आपण जशी इतरांनी उपलब्ध करून दिलेली चित्रं वापरतो, त्याच सागरात आपल्याला काही थेंब टाकता आले, काही खारीचा वाटा उचलता आला तर, असा विचार करून पहिला झब्बू हा देवाला, अर्थात आंतरजाल वापरणाऱ्या समुदायाला अर्पण करायचं आम्ही ठरवलं आहे.
तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान फोटो किल्ली.
हे बघून मलाही माझा हसतानाचा फोटो टाकायची ईच्छा झाली
पण लग्नाआधीचे जुने फोटो सापडले नाहीत ..

माझं लेकरू पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी फोटो काढताना स्माईल देताना, डोळ्यात आश्चर्यमिश्रित भाव आहेत, अस मला वाटतं. आम्हा सर्वाचा हा फार लाडका फोटो आहे.

IMG_20210920_031320.jpg

धन्यवाद Happy
मस्त फोटो Happy
पणजी आणि पणती : खालचा फोटो
मैत्रिणीची मुलगी आहे IMG-20191002-WA0009.jpg

काय गोड आहे, पणजी पणती दोघीही. अन्जुताई, माऊमैया, मंजुताई गोड गोड बाळं. किल्ली..गोड फोटो.
सर्वच फोटो गोड आहेत.

सर्वच फोटो मस्त..
पणजी आणि पणतीकडे बघून पटते की गोड आणि निर्मळ हसण्यासाठी कोलगेट व्हाईट दात असणे, किंबहुना दातही असणे गरजेचे नाही Happy

मस्त फोटो आलेत इथे.पाहूनच चेहऱ्यावर हसू उमटतं.
पणजी आणि पणतीचा फोटो विशेष गोडू आहे.

हा फिरायला जाणार असल्याचा आनंद.(हे फिरणं म्हणजे सोसायटी गेट बाहेरच्या दुकानापर्यंत बरं का)
1632109233926.jpg

धन्यवाद
फोटो जुना आहे.आजीने काढलेला.या फोटोत घातलेल्या हेअरबँड सोडून बाकी सर्व वस्तू तिच्या कझीन च्या आहेत.

इथली सगळी लहान मुलं गोड आहेत.मुख्य म्हणजे खरेखुरे कँडीड फोटो आहेत.'अहो कँडीड पोझ द्या' म्हणून काढलेले नव्हे Happy

गोड गोड फोटोज

पणजी आणि पणतीकडे बघून पटते की गोड आणि निर्मळ हसण्यासाठी कोलगेट व्हाईट दात असणे, किंबहुना दातही असणे गरजेचे नाही Happy >>>>> हाहाहा. एकदम सत्यवचन

मुलगी

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUpovmK8t78QaIvlP2qrFCgTb1jRXyXoMF2lV5BbqUzynrUR8EO_xTEMuH09xLQFClK2Ytqzgaox9wvo1LTNg2asXzQNBbjtravNGXCTZX8ZzAZqLzCsRZIWvV0KLcK31c9JvYd33AJixhA6sgVZuBA8g=s640-no?authuser=0
------------------------
मी (कँडीड वगैरे काही नाही अर्थात सेल्फी आहे)

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLX10PN8-NLQK1M45pfXqTABhxC4tTN7bhoTFE0LqdKeUrg2d5mpE-Y4Yn6X-3mDgVYMFgXJ76Ep8pj1vW8c5xlEJjf4LmW_vHra-f_Fj-v3urPXK2oGrcD3eMCpqMNmJAJax9_ooFUWUIvZe_kn4JQYFw=w440-h619-no?authuser=0

Pages