शशक पूर्ण करा- आतातरी तळा - धनुडी

Submitted by धनुडी on 16 September, 2021 - 14:15

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

एक हात आत आला...............
"ए उचल मला, अगं आतातरी उचल मला. थंडीने गारठून गेलोय. "
ऑं, अरेच्चा काढलं वाटतं बाहेर. आता तीन चार तास नॉर्मल टेंपरेचरला यायची वाट बघायची. दिवाळी आली वाटतं, मागच्या दिवाळीपासून आतच्चे ह्या मुक्तीदिनाची वाट बघत.
कमाल आहे ह्या बाईची, नाही करायचं तर आणायचंच कशाला मला? दुसऱ्या घरी सुखाने तळलो असतो.
आता केळं कुस्करून घालेल, मग थापट्या खायच्या आहेत आणि तेलात पण जायचय. पण चालतील मला ह्या यातना. कुडकुडत बसण्यापेक्षा कुरकुरीत होउन पोटात जाईन, कसे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सामो, (मी वर्षे भर फ्रिजमध्ये पिठ ठेवून शेवटी केलं कि फेकून दिलं हे ही मला आता आठवत नाहीये Sad , पण त्या पिठाचं आत्मवृत्त Lol )

छान Lol

Lol मस्त

भारीये हे! Biggrin

वर्षभरानंतर फ्रीज मधून बाहेर पडणारे म्हणजे अनारश्याचे पीठच. घ्या तळायला!

मोहोर!
(खरं तर मोहरा - तू चीज बडी है मस्त मस्त.)

सगळ्यांना धन्यवाद, अमितव,सामो, स्वाती, अवल, ममो, मैत्रेयी, मानव, वंदना, ऋ, सिंडरेला, ह आ, मामी, देवकी, कविन, जाई, मृ, मनमोहन, सस्मीत,केया, आर्या, सी, वावे, श्रवू, मॅगी Happy

Pages