शशक पूर्ण करा- आतातरी तळा - धनुडी

Submitted by धनुडी on 16 September, 2021 - 14:15

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.....

एक हात आत आला...............
"ए उचल मला, अगं आतातरी उचल मला. थंडीने गारठून गेलोय. "
ऑं, अरेच्चा काढलं वाटतं बाहेर. आता तीन चार तास नॉर्मल टेंपरेचरला यायची वाट बघायची. दिवाळी आली वाटतं, मागच्या दिवाळीपासून आतच्चे ह्या मुक्तीदिनाची वाट बघत.
कमाल आहे ह्या बाईची, नाही करायचं तर आणायचंच कशाला मला? दुसऱ्या घरी सुखाने तळलो असतो.
आता केळं कुस्करून घालेल, मग थापट्या खायच्या आहेत आणि तेलात पण जायचय. पण चालतील मला ह्या यातना. कुडकुडत बसण्यापेक्षा कुरकुरीत होउन पोटात जाईन, कसे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थंडीमुळे अनारसे-पीठ शीतनिद्रेत गेले होते अस कळलं.
तुम्ही थापट्या मारुन उठवलं म्हणुन नाहीतर गुरगुटुन झोपुनच राहिलं असतं :))
नई सोच नया विचार नया शशक आणी नया चिमित्कार...भारीच

भारी !
श्रवु, हेच समीकरण बर्याच जणांच्या मनात आहे.
निरु, हसले म्हणजे फसले Happy

हेहेहेहे, हसले नाही हो अनारसे हसले तर आमच्या वर रडायची पाळी येते Lol मी शिर्षक ठरवताना हाच विचार करत होते, हसण्याफसण्यावर काही शिर्षक सुचतय का.
मंजूताईला नमस्कार करून मगच अनारशाला हात घातला.
धन्यवाद सगळ्यांना.

<<निरु, हसले म्हणजे फसले Happy>>
Oh..!! So Sorry.. मग तसं म्हणायचं नव्हतं मला..

(थोडक्यात इथेही हँसे वो फँसे हेच लक्षात ठेवायचं तर)

बिपीनसांगळे, सीमा, अन्जू, झेलम, अनामिका, ब्लॅककॅट धन्यवाद. Happy
आणि सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार _/\_ . ( नावं लिहायची राहून गेली)

Pages