शशक पूर्ण करा - चालू पडा - अवल

Submitted by अवल on 16 September, 2021 - 15:39

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

डोळ्यांना कोणी दारांची उपमा दिली? आणि आपल्याच डोळ्यातून पडणाऱ्या पावसाचा कानोसा का बरं घ्यावा सतत? आपणच डोळे मिटायचे, म्हणायचं सगळीकडे अंधार नुसता. बुद्धीची कवाडं बंद करून घ्यायची अन म्हणायचं सुचतच नाही काही. मनाला हवं तसं भरकटू द्यायचं अन मग अनामिक हुरहुरीचं नाव द्यायचं. काय हा आचरटपणा? किती तो दांभिकपणा!
उठा झडझडून. डोळे उघडा. बघा तळपतं वास्तव! अंंधार दूर होईल. विचार केलात तर सुचेल. मनातलं वादळ थांबवलत तर पाणीही थांबेल. चला, बुद्धी जागती ठेवा अन उघडलेल्या दरवाजातून, चालू पडा!

Group content visibility: 
Use group defaults

प्राचीन गहन वगैरे नाही ग
दिलेल्या शब्दांना जरा फिरवलं। अन सध्या सगळ्याच पातळ्यांवरचं डोळे झाकून स्विकारणं बघून सटकलं जरा डोकं Wink

छानच.
चकवा सिनेमात संदीप खरेने लिहिलेलं गाणं आहे, ते आठवलं ..'अजून उजाडत नाही गं' त्यात एक ओळ आहे, 'त्यांच्या लेखी रात्र सदाची, ज्यांचे डोळे मिटले गं'