शशक पूर्ण करा - बळी... ! मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील

Submitted by रूपाली विशे - पाटील on 11 September, 2021 - 07:16

बळी

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

तो आलायं... चांडाळ ..!! वैरी बनलायं माझा... त्याचा राक्षसी आवाज माझ्या कानावर येतोयं... धमकी देतोयं ...??

कुणाला देतोयं धमकी..?

' थाड्' ' थाड्'... !!

__मग तोंडात पदर खूपसून दिलेले दबके हुंदके... !!

त्या हुदक्यांनी शेवाळलेल्या, ओल्या भिंतीही शहारून उठल्यात..!

अरे, काय आहे तिच्या हातात ??

काठी...??

फट्....!

किंकाळीचा आवाज , रक्ताचा सडा...??

देवा..!

काय घडतयं ह्या अंधार खोलीत..??

" पाप्या, माझ्या तिसऱ्या लेकीचा बळी देतोस..? कशासाठी..?? घराण्याच्या वंशासाठी..?? हे कालिका माते... हा घे तुझा बळी..!! "

तो खाली निपचित पडलायं...

__आणि हातात आयुधं घेतलेली देवी तारवटलेल्या डोळ्यांनी हे सारं पाहतेयं...!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

धनवन्ती, देवकी, मानवजी, साधा माणूस, धनुडी, सीमंतिनी .... धन्यवाद..!

सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा..!!

बरेच दिवसात तुझे काही वाचले नव्हते... गणेशोत्सवाच्या निमित्ताने योग आला... >> हो सीमंतिनी.. फार दिवस झाले काही लिहिलं नाहीये मी.... गणेशोत्सवानंतर सुरुवात करेन लिहायला..!

>>>>>>आपल्या नेहमीच्या कथांसारखे काहीतरी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे
+१०००१

आपल्या कथा नेहमी खूप आवडतात.

एक मोडकातोडका प्रयत्न केला आहे.>>> वीरुजी, मोडकातोडका प्रयत्न नाहीये... जमलीये कथा...!
साधनाताई , सामो... धन्यवाद.... गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुमचे अनुभव, छान विचार तुमच्या लेखनातून वाचायला मिळत आहेत..

बिपिनजी... धन्यवाद..!!
तुमच्या कथेच्या प्रतिक्षेत... लिहा लवकर..!!

मस्तच!
सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणारी कथा आवडली .>>+1

छान

Sad reality .. Sad
सामाजिक प्रश्नाला स्पर्श करणारी कथा आवडली .>>+1111111

Pages