काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....
“अग गधडे, दार उघडायला एवढा वेळ? अशी अवेळी झोपली होतीस की काय? दिवेलागणीची वेळ झाली की.”
असं बडबडत आईने पटापटा सगळे दिवे लावले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला. बाहेरील आणि मनातील अंधार निघून गेला.
पण पाण्याचा आवाज…?तो अजून येतोच आहे.
कधी टपटप…कधी धोधो..
हा त्याच्यासोबत धुंद करणारा धो धो पाऊस ..
का ?
पावसात आसर्याला जोडीने थांबल्यावर अंगावर पडणार्या पागोळ्या…
मनात परत हुरहूर दाटून आली..
तेवढ्यात पाठीवर एक धबका बसला…
“काय ग?पिंप भरायला लावले होते बारीक नळ सोडून , ते बंद करायला विसरलीस वाटतं”
“कठीण आहे बाई, हल्लीच्या मुलांना एक काम जमत नाही” असं पुटपुटत आई स्वयंपाकघरातील नळ बंद करायला गेली.
(No subject)
भारी जमलीय
भारी जमलीय
हाहाहा मस्त जमलीये.
हाहाहा मस्त जमलीये.
छान
छान
धन्यवाद धनवन्ती,मैत्रेयी
धन्यवाद धनवन्ती,मैत्रेयी,सामो,अमितव.
एक शब्द दोनदा आला होता. तो दुरूस्त केला.
छान
छान
छान
छान
छान
छान
छान.
छान.
धन्यवाद अस्मिता,मृणाली,मानव
धन्यवाद अस्मिता,मृणाली,मानव,देवकी
मस्त! बर्याच शशक मधे पाणी,
मस्त! बर्याच शशक मधे पाणी, नळ उल्लेख आलेत बघून मजा वाटली (इन्क्लुडींग मी)
मस्त कथा...
मस्त कथा...
धन्यवाद अंजली,रूपाली.
धन्यवाद अंजली,रूपाली.
हो, पाण्याचा आवाज ना
सर्वांच्याच शशक छान झाल्या आहेत.
छान आहे पण 122 शब्द होतायत
छान आहे पण 122 शब्द होतायत
खरंच? मग पुढे त्यांचे नाव.
खरंच? मग पुढे त्यांचे नाव. ते मिळुन मोहिनी१२३.
संयोजकांनी दिलेले शब्द वगळून १०० शब्द त्यांचे.
मस्त शशक... माझ्या बाबतीत असे
मस्त शशक... माझ्या बाबतीत असे व्हायचे तेव्हा..
धन्यवाद च्रप्स,मानव,साधना
धन्यवाद च्रप्स,मानव,साधना
च्रप्स-१००च शब्द आहेत हो. संयोजकांनी दिलेली सुरूवात सोडून.
साधना
<< छान आहे पण 122 शब्द होतायत
<< छान आहे पण 122 शब्द होतायत >>
काय अभ्यास, काय अभ्यास..