शशक पूर्ण करा-हल्लीची मुलं-मोहिनी१२३

Submitted by मोहिनी१२३ on 10 September, 2021 - 05:15

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो....

“अग गधडे, दार उघडायला एवढा वेळ? अशी अवेळी झोपली होतीस की काय? दिवेलागणीची वेळ झाली की.”

असं बडबडत आईने पटापटा सगळे दिवे लावले. सगळीकडे लख्ख प्रकाश पडला. बाहेरील आणि मनातील अंधार निघून गेला.

पण पाण्याचा आवाज…?तो अजून येतोच आहे.
कधी टपटप…कधी धोधो..
हा त्याच्यासोबत धुंद करणारा धो धो पाऊस ..

का ?

पावसात आसर्याला जोडीने थांबल्यावर अंगावर पडणार्या पागोळ्या…
मनात परत हुरहूर दाटून आली..

तेवढ्यात पाठीवर एक धबका बसला…

“काय ग?पिंप भरायला लावले होते बारीक नळ सोडून , ते बंद करायला विसरलीस वाटतं”

“कठीण आहे बाई, हल्लीच्या मुलांना एक काम जमत नाही” असं पुटपुटत आई स्वयंपाकघरातील नळ बंद करायला गेली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol छान

छान Happy

छान Happy

धन्यवाद अंजली,रूपाली.
हो, पाण्याचा आवाज ना Lol
सर्वांच्याच शशक छान झाल्या आहेत.

खरंच? मग पुढे त्यांचे नाव. ते मिळुन मोहिनी१२३.
Proud
संयोजकांनी दिलेले शब्द वगळून १०० शब्द त्यांचे.

धन्यवाद च्रप्स,मानव,साधना
च्रप्स-१००च शब्द आहेत हो. संयोजकांनी दिलेली सुरूवात सोडून.
साधना Lol