स्वातंत्र्याचे अनुभव

Submitted by muktapravasi on 31 August, 2021 - 12:48

गेले खूप दिवस मी मायबोलीवर भरपूर माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे लेख वाचत आहे. घरापासून दूर माझ्या घराची आणि संस्कृतीची आठवण करून देणारी ही मायबोलीवरची माणसे अगदी कुटुंबसारखी वाटू लागली आहेत. इतके दिवस विचार करत आहे की मे पण काहीतरी लिहावे, ही इच्छा मनात आहे. पण कुठल्या विषयावर लिहावे हा प्रश्नच होता. मला माझ्या कामासाठी खूप लिहावे लागते.. पण ते सगळे इंग्रजीमध्ये आणि ते देखील वैद्न्यानिक भाषेत. त्यामुळे विषय निवडने तसे अवघडच होते! काल माझ्या मैत्रीणिंबरोबर गप्पा मारताना आमच्या लक्षात आले की आमच्यासारख्या मुलींच्या गोष्टी सांगणारी पुस्तके, लेख, सिनेमे तसे कमीच आहेत. आमच्यासारख्या म्हणजे? म्हणजे - स्त्री, शास्त्रद्न्य, अविवाहित, घरापासून दूर, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुखी! थोडक्यात काय, तर "स्वतंत्र"!

माझी आणि माझ्या सारख्या अनेकांची स्वात्यांत्र कथा ऐकायला आवडेल तुम्हाला?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माबोवर स्वागत आहे. नक्की लिहा. मला आवडेल नवीन विषयाबद्दल वाचायला.
सुरवातीला 'गेले काही दिवस' लिहले आहे म्हणजे आयडी नवीन असला तरी तुम्ही इथे वाचनमात्र आहात. त्यामुळे इथल्या वातावरणाबद्दल माहिती असेलच. लोकांना तुम्ही लिहलेले आवडले तर चांगले प्रतिसाद येतीलच पण काही गोष्टी नाही पटल्या तर त्यावर निगेटिव्ह कमेंट पण येणार हे गृहीत धरूनच लिहायला सुरवात करा.
तुम्हाला डीमोटीवटे करायचा हेतू नाही माझा पण काय आहे ना इथे लोक येऊन लिहतात मग माझ्यासारख्या बऱ्याच जणांना त्यांचे लेखन आवडू लागते, मग त्यांच्या लेखाची प्रतीक्षा केली जाते. परंतू काही दोन चार निगेटिव्ह कमेंट मुळे लेखक रागावून, भांडून आपले लिखाण अर्धवट ठेवून माबो ला अलविदा करून निघून जातात त्यामुळे वाचकांचा हिरमोड होतो.
All the best

बीन देअर डन दॅट तुमचा प्रवास लिहा. वैचारिक आर्थिक शारीरिक भावनिक स्वा तंत्रय कसे अचीव्ह केले ते लिहा.

कॅट वॉक वाली बेबी है तेरी चाल
बॅकलेस सुट विच लगदी कमाल
ओ ख्त्थे चली जांदी ए
दिल पुछना एको ही सवाल
ऐणे वि नखरे तू करना सोनि ये
आज फिर कित्थे चल दिये मोरनी बनके मोरनी बनके.

नक्की लिहा.

वाचकांच्या पॉझिटिव्ह-निगेटिव्ह प्रतिक्रिया येणार हे ध्यानात ठेवून लिहा.
मुळात तुमच्या स्वत:च्या आनंदासाठी आणि अनुभव शेअर करण्यासाठी लिहा... प्रतिक्रियांचा विचार न करता.

शुभेच्छा.