आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती

Submitted by हेमंतकुमार on 11 August, 2017 - 01:10

काल माबोवरील एका धाग्यात ‘पुण्यातील gastroenterologist सुचवा’ अशी विनंती होती. तेथील प्रतिसाद वाचल्यानंतर असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई, Dermatologist हा M D(dermatology) असतो तर Cosmetologist असे स्वतःला कोणीही म्हणवून घेते !

ओर्थोपेडिक डॉक्टर सर्दी, तापावर औषध देऊ शकत नाही का?

>>
का नाही? तो मिनिमम एम बी बी एस तर असतोच आणि जनरल मेडिसिनची प्रॅक्टीस करू शकतोच ना? विशेषतः जे बेसिक आजार आहेत त्यावर. तो जर हाडवैद्य झाला नसता तर त्याने ती प्रॅक्टीस केलीच असती ना? जीपी म्हणून? कदाचित मेडिसिन ची ट्र्रेटमेन्ट दिल्यास आपली स्पेशालिटी ऐवजी जनरल प्रॅक्टीसचे पेशन्ट येऊ लागतील या प्रतिष्ठेपायी कदाच्झित सामान्य आजाराला ते ट्रीटमेन्ट देत नसावेत...

एका स्त्री रोगतज्ज्ञांच्या मते येत्या काही वर्षांत त्यांच्या शाखेतील सर्व सर्जेरी laparoscopy ने होतील; फक्त एकच तशी होणार नाही. ती म्हणजे सिझेरियन सेक्शन !

समाजातील मधुमेहाचे झपाट्याने वाढणारे प्रमाण पाहता आता त्या आजारासाठी वैद्यकाची स्वतंत्र शाखा करण्यावर विचार चालू आहे. त्यासंबंधीची बातमी :
http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=5

तेव्हा येत्या काही वर्षांत "एम. डी. (मधुमेह)" अशी पदवी वास्तवात येउ शकेल.

मुंबईत नुकत्याच झालेल्या तुफान पावसाने जो हाहाकार उडवला त्यात ख्यातनाम पोटविकारतज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर, एम. डी. (मेडि). , डी. एम.( पोटविकार) यांचे निधन झाले.
ते या विषयातील भारतातील नामांकित तज्ञ होते. 'यकृतविकार' यात तर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तज्ञ होते.
या धाग्याच्या माध्यमातून त्यांना आदरांजली .

Sad ते हुशार डॉ. तर होतेच पण स्वभाव सुद्धा अतिशय म्रुदु होता. हाताखालील डाॅक्टरांवर कधीच ओरडायचे नाहीत.

श्रद्धांजली! अत्यंत निष्णात डॉक्टर. यांच्या औषध आणि आश्वासक शब्दांनी एक परिचीत अगदी खडखडीत बरे झाले. अशी विद्वान मंडळी हीच देशाची संपत्ती असते. _/\_

रुग्णांच्या दृष्टीने खरेच देवमाणूस असलेल्या या अवलियाला माझीही श्रद्धांजली.
निसर्गापुढे आपण हतबल आहोत खरे, पण प्रशासनाच्या गलथानपणामुळे आपण अशा माणसाला मुकतो याचा मात्र खूप राग येतो.
असो, मेरा भारत......

साधे प्रश्न
१) आधुनिक वैद्यक शास्त्र मधील कोणत्याही डिग्री च्या अभ्यासक्रमात प्रतेक वर्षाचे मूल्यांकन कसे होते .
आणि विहित मर्यादेत असलेल्या वेळेत तो कोर्स पूर्ण करणे हे बंधनकारक आहे की 5 वर्षाच्या कोर्स साठी 10 वर्ष काढली तरी चालतात.
2) डिग्री देताना संबंधित विद्यार्थी ला त्या कोर्स चे किती आकलन झाले आणि किती स्किल प्राप्त झाले ह्या वरून श्रेणी दिली जाते का?

आणि श्रेणी देत असतील तर ती श्रेणी सुद्धा dr ह्या उपाधी बरोबर लिहणे कम्पल्सरी केले पाहिजे.
3) आधुनिक वैधकिय पदवी ,पदविका अभ्यासक्रम किती वर्षांनी बदलतो.,?
नवीन माहीत पडलेल्या गोष्टी अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाते का?

१. प्रतेक वर्षाचे मूल्यांकन कसे होते .
>> विद्यापीठ परीक्षा- भरपूर दमछाक करणारी

२. आणि विहित मर्यादेत असलेल्या वेळेत तो कोर्स पूर्ण करणे हे बंधनकारक आहे की 5 वर्षाच्या कोर्स साठी 10 वर्ष काढली तरी चालतात.>>>
बऱ्याच विद्यापीठांनी तशी मुदत ठेवलेली नाही. पण विद्यापीठ प्रकारानुसार नियमभिन्नता असू शकते.

३. डिग्री देताना संबंधित विद्यार्थी ला त्या कोर्स चे किती आकलन झाले आणि किती स्किल प्राप्त झाले ह्या वरून श्रेणी दिली जाते का?
>> होय,गुण/ श्रेणी.

. आधुनिक वैधकिय पदवी अभ्यासक्रम किती वर्षांनी बदलतो.,?
>> मोठे बदल १० वर्षांनी; विषयानुसार छोटे बदल २ वर्षानी. सतत नवीन नियतकालिके वाचावी लागतात.

बदल २ वर्षानी. सतत नवीन नियतकालिके वाचावी लागतात.
हे ऐच्छिक झाले.
ज्या डॉक्टर ना आवड आहे तेच नियत कलिके वाचतील.
असो..

CME – Continuing Medical Education
मागे डॉ सातींनी कुठेतरी लिहिलं होतं. डॉक्टरांना आपलं ज्ञान आणि माहिती अद्यावत ठेवण्यासाठी कॉन्फरन्सेस, सेमिनार्स यांना हजर राहावं लागतं. वर्षागणिक किमान किती तास यात द्यायचे याचे काही नियम आहेत.

पहिले वर्ष 5 अटेम्पत मध्ये की 5 वर्षात पास व्हावे लागते , नैतर एडमिशन जाते

पुढच्या परीक्षांना अट नाही

( माझा एक मित्र MBBS first year झाले आणि त्याला शिझिफ्रेनिया झाला , तो काहीतरी भास झाल्याने पळत सुटला , तो लोकांना 90 किलोमीटर दूर सापडला , अस्ताव्यस्त कपडे , कुणाला ओळखत नव्हता. पोलिसांनी त्याला घरी पोचवले

उपचार होऊन पूर्ण बरे व्हायला 6 वर्षे निघून गेली , तोवर त्याची एडमिशन केन्सल झाली होती ,
मग सगळे डॉक्युमेंट घेऊन लोकल खासदार की कुणीतरी आरोग्यमंत्रीना लेटर लिहिले , त्यांनी केस स्टडी करून स्पेशल परमिशन देऊन युनिव्हर्सिटीला पत्र लिहिले , त्याची एडमिशन कँटीन्यू केली व पुढची वर्षे तो व्यवस्थित पास झाला, लग्नपण झाले.

एका 14 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही एकत्र होतो , इन्ट्रो मध्ये तो बोलला होता, i had some psych problem in past ,
तर हॉटेलात आम्ही दोघे रूम पार्टनर होतो , मला सगळे डॉकटर बोलत होते , तो काहीतरी करेल , रूम चेंज करून घे , मी म्हटले नाही, काय व्हायचे ते होईल
त्यात तो मला हे सगळे बोलला. )

भरत + ११
दर वर्षी ६ क्रेडीट्स मिळवावे लागतात. एका दिवशी पूर्ण ९ ते५ अशी छोट्या परिक्षेसह 'शाळा' केली की २ गुण मिळतात.

दर ५ वर्षांनी ३० गुणांचा पुरावा सादर केल्यावरच वैद्यकीय नोंदणीचे नूतनीकरण होते

वैद्यकीय अभ्याक्रमास प्रवेशासाठीचे किमान वय १७ हा नियम खूप जुना आहे. ( मूळ १८ वर्षे होता पण १०+२+३ आल्यापासून ते १७ वर आणले होते).
तरीसुद्धा विद्यार्थी असे कोर्टात का जातात हे समजत नाही :

https://medicaldialogues.in/news/education/neet-2021-mbbs-aspirant-plead...

अभियांत्रिकी ला १५ चालत असेल तरी वैद्यकीय नियमाची कारणे वेगळी आहेत.

त्याने तेराव्या वर्षी एसेसी आणि पंधराव्या वर्षी एचेसी उत्तीर्णं केलं. १७ वर्षांऐवजी एचेसी उत्तीर्ण असा नियम का ठेवत नाहीत?

अभियांत्रिकी त का चालतं आणि वैद्यकीत का चालत नाही?
तथागत अवतार तुलसीबद्दल वाचलं होतं. अन्य क्षीत्रांत चाइल्ड प्रॉडजी ऐकले आहेत. वैद्यकातले नाही.

पाठ्यपुस्तकात देशोदेशीचे ज्ञानेश्वर हा श्री. म. माटे यांचा लेख होता. त्यात ले बहुतेक चाइल्ड प्रॉडजी गणित आणि भौतिकशास्त्रातले होते.

वैद्यकीय अभ्याक्रमाच्या पहिल्याच वर्षी प्रेते हाताळावी लागतात. म्हणून विद्यार्थी सज्ञान हवा, ( , खरे तर १८ च) असे असावे.

प्रत्यक्ष असे कारण मी कुठे वाचलेले नाही; हा अंदाज.

अजून एक वर्षात अजून एक पीएचडी करायची
आणि मग जायचे मेडिकलला

उगाच कोर्टात जाऊन निकाल येईपर्यंत तेच वय येईल.
कोरडा पाषाण

Proud

माझे २ मित्र तेव्हा १७ पूर्ण नव्हते . पण गुणवत्ता यादीत होते. अशा वेळेस त्यांची जागा पुढील वर्षासाठी राखीव ठेवली होती. त्यांवर्षात ते घरी बसू शकतात किंवा निव्वळ वेळ जायला अन्य अभ्यासक्रम घेतात व नंतर सोडतात.
आता ' नीट मुळे परिक्षेअधीच रोखतात

अजून एक जनहित याचिका उच्च न्यायलयात !

"पदव्युत्तर 'neet' रद्द करावी . तसेच त्या जागा दुप्पट कराव्यात "
https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/a...

एमबीबीएस च्या प्रवेशासाठी एक मूलभूत अर्हता म्हणजे बारावीच्या परीक्षेत पीसीबी मिळून किमान 50 टक्के गुण मिळालेले असणे. हा नियम गेल्या कित्येक वर्षांपासून संपूर्ण भारतात लागू आहे.

नुकतेच आसाम सरकारने यामध्ये दोन महत्त्वाचे बदल केले आहेत.
१. पीसीबी मध्ये किमान 60 टक्के गुण हवेत आणि
२. बारावीची परीक्षा प्रथम प्रयत्नातच उत्तीर्ण हवी .

याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे. तिथल्या न्यायमूर्तींनी केंद्र सरकार व एन एम सी यांना स्पष्टीकरण देण्याची सूचना केलेली आहे.

यानिमित्ताने, एखादे राज्य सरकार स्वतःच्या अखत्यारीत असा मूलभूत नियम बदलू शकते का, यावर आता उहापोह होईल.

https://medicaldialogues-in.cdn.ampproject.org/v/s/medicaldialogues.in/a...

*UNEMPLOYMENT IN MEDICAL SECTOR- A sign of impending doom*
With more than 380 medical colleges (largest number in the world) we are producing more than 50,000 MBBS doctors per year. In a country where we continue to talk about about deficiency of health care professionals, majority of newly produced doctors are under employed or unemployed. By 2030 India will have one million additional MBBS doctors; currently being produced @50,000 per year who would remain dysfunctional and not have any work in a country of 1.30 billion population.

As a common sense, a lay person would like to believe that most of these doctors are greedy professionals who wish to live and work in urban areas for monetary benefits or worldly pleasures. But the the evidence is otherwise https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4408692/

+१११

एका मुलाला डॉक्टर करण्यासाठी जास्तीजास्त महिना 50000खर्च आला तरी वर्षाला 6 लाख झाले.
वार्षिक भारतात 5 लाख डॉक्टर तयार झाले पाहिजेत तेव्हा येथील आरोग्य व्यवस्था सुधारेल. .
वर्षाला दहा सात हजार कोटी खर्च येईल सरकार साठी ही रक्कम किरकोळ आहे.
जास्ती जास्त डॉक्टर कोणत्या ही मार्गे भारतात दर वर्षी निर्माण झाले पाहिजेत.
ठरवून अडचणी निर्माण करून कमी डॉक्टर निर्माण करण्याचे जागतिक षडयंत्र असावे असेच वाटते.
सर्वात जास्त हमखास फायदा करून देणारे क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र च आहे.
भारतात डॉक्टर चा अभ्यास क्रम पूर्ण करण्याची क्षमता असणारे करोड मुल दर वर्षी उपलब्ध आहेत.
फक्त साधन कमी पडतात.ती ठरवून च कमी ऊपलब्ध करून दिली जात आहेत.
भारतात असणाऱ्या डॉक्टर पैकी काही च डॉक्टर हे उच्च दर्जा चे आहेत .डिग्री नी नाही बौद्धिक क्षमतेने.
एमबीबीएस डॉक्टर md doctori पेक्षा अतिशय कुशल असू शकतो.
फक्त त्याची आर्थिक स्थिती नसल्या मुळे तो md चे शिक्षण घेवू शकतं नाही.
भारत सरकार खूप श्रीमंत आहे ,राज्य सरकार भारताचे प्लस राज्य सरकार चे वार्षिक उत्पादन खूप मोठे आहे.

Pages