आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती

Submitted by हेमंतकुमार on 11 August, 2017 - 01:10

काल माबोवरील एका धाग्यात ‘पुण्यातील gastroenterologist सुचवा’ अशी विनंती होती. तेथील प्रतिसाद वाचल्यानंतर असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एम बी बी एस चा अभ्यासक्रम हिंदी भाषेतून शिकवण्यासाठी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश मध्ये तयारी सुरू.
काही विद्यापीठांनी त्यासंदर्भात पाऊल उचलले आहे

https://medicaldialogues.in/news/education/soon-mbbs-in-hindi-in-indian-...
.....
आणि लगेच ही विरोधी बातमी !

एम बी बी एस चा अभ्यासक्रम हिंदी भाषेतून शिकवण्यासाठी एनएमसी परवानगी देणार नाही .

https://medicaldialogues.in/news/education/mbbs-in-hindi-not-to-be-recog...

एका पूर्ण अंध डॉक्टरने पदव्युत्तर नीट ही परीक्षा पार केली असून त्याने एमडी मानसोपचार या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मागितला होता परंतु तज्ञ समितीने त्याचा अर्ज फेटाळला आहे.
https://science.thewire.in/health/can-a-blind-doctor-become-a-psychiatrist/
त्याविरुद्ध संबंधित डॉक्टर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. जगभरात या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अंधांना प्रवेश दिला गेल्याची उदाहरणे आहेत.

आता आपले न्यायालय काय निर्णय देते हा उत्सुकतेचा विषय राहील.

भारतातील 6 'एम्स' मध्ये कुटुंबवैद्यक या विषयातील एमडी पदवीचा अभ्यासक्रम सुरू होत आहे.

चांगला निर्णय. अभिनंदन !

https://medicaldialogues.in/amp/news/education/aiims-to-offer-md-family-...

महाराष्ट्र सरकारने 'सरकारी-खाजगी भागीदारी' या तत्त्वावर शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/the-government-of-ma...

D.M. (Interventional radiology)
हा M.D. (radiology) नंतरचा उच्च अभ्यासक्रम आहे.

या प्रकारचे विशेष डॉ सीटी, एमआरआय स्कॅन, इत्यादी प्रतिमातंत्रांचा वापर करून शरीरातील लहान प्रमाणातील शस्त्रक्रिया अथवा बायोप्सी तंत्र यासंबंधी काम करतात.

सेक्सॉलॉजिस्ट होण्यासाठी काही स्पेशल डीग्री असते का? स्वत:ल सेक्सॉलॉजिस्ट असे कोण म्हणवून घेउ शकतो?

भारतात MBBS नंतर
Fellowship Courses & PG Diploma in Sexology
असे अभ्यासक्रम मुंबई, भुवनेश्वर अशा काही मोजक्या ठिकाणी आहेत.
एमडी अभ्यासक्रम असल्याची अधिकृत नोंद सापडली नाही.

मेडिकल चा अभ्यासक्रम आणि पदव्या जगभरात एकसारख्याच आहेत का?
भारतात एमबीबीएस साठी जो अभ्यासक्रम असतो ती जगभर तसाच असतो का?
प्रवेश प्रक्रिया एकसारखीच असते का?

१.भारतातील एमबीबीएस ही पदवी ब्रिटिश पद्धतीतून आलेली आहे.

२. अमेरिकेतील मूलभूत वैद्यकीय पदवी एमडी आहे. त्यासंबंधी विवेचन पान १ वरील चर्चेत आहे.

३. प्रवेशपात्रतेचे निकष देशानुसार भिन्न असू शकतात. आपल्याकडे बारावीनंतर हा अभ्यासक्रम आहे. परंतु काही देशांमध्ये एक मूलभूत पदवी मिळाल्यानंतर वैद्यकीय शाखेला निवड केली जाते.

४. बारावीत पीसीबी पन्नास टक्के (खुलागट) व 'नीट ' ला बसणे हे मूलभूत निकष भारतातील आहेत; अन्यत्र कल्पना नाही.

प्रत्यक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विषय सर्वत्र सारखे असतात. त्यांची वर्षांनुसार विभागणी देशानुसार भिन्न राहते

महाराष्ट्र मध्ये फक्त मराठी मध्येच मेडिकल शिक्षण मिळेल असा बदल केला तर .
महाराष्ट्र मध्ये डॉक्टर जास्त मिळतील.

पण कशासाठी मराठी आणि हिंदीतून डॉक्टरकी शिकायची आहे? प्रतिगामी निर्णय वाटतो आहे.
मेडिकल ईंग्रजी शब्दांना मराठीतले प्रतिशब्द देणार आहेत की ईंग्रजी शब्द फक्त देवनागरीत छापले आहेत?
हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या डॉक्टरांना नोकर्‍या कुठे मिळणार? कुठले हॉस्पिटल नोकरी देणार? की सरकार नवीन हॉस्पिटल काढून ह्या डॉक्टरांची भरती करणार आहे? की ह्यांनी फक्त खेडोपाडीच काम करावे अशी अपेक्षा आहे?
डॉक्टरांनी वापरावयाची ऊपकरणे, औषधे हे पण मराठीतून करणार का?

ज्या व्यक्तीकडे ईंग्रजीसारखी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आत्मसात करण्याचा जनरल अ‍ॅक्युमेन नाही तिच्याकडून ह्युमन अ‍ॅनटोमी आणि फिजिओलॉजी सारखे गहन विषय शिकून जिवंत माणसांवर ऊपचार करण्याचे ज्ञान असू शकेल ह्यावर कुठली सेन व्यक्ती विश्वास ठेवेल?

शेक्सपिअर मराठीतून अभ्यासण्यासाठी अभ्यासक्रम ऊपलब्ध करण्याचा महाराष्ट्र (भाजप) सरकारचा निर्णय अशीही बातमी लवकरच येऊ शकते.

गॉडफादर सिनेमामध्ये हायमन रॉथ म्हणतो ना..
I don't trust a doctor who can hardly speak English!

सध्याच्या दोन विशेष घडामोडी :
१.नागालँडमधले पहिले मेडिकल कॉलेज यंदा सुरू होत आहे :
https://indiaeducationdiary.in/nagaland-institute-of-medical-sciences-re...
...

२. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ( MD/MS) गुणवत्ता यादीत आलेले पहिले शंभर विद्यार्थी शस्त्रक्रिया, बालरोग आणि स्त्रीरोग या महत्त्वाच्या शाखा नाकारत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे.
यासंबंधी विश्लेषण करणारा लेख छापील महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार 20 ऑगस्टच्या संवाद पुरवणीत आहे.

Dy पाटील कॉलेज ची एमबीबीएस ची फी १.४४ करोड आहे.
इतके पैसे खर्च करून जो डॉक्टर होईल तो काय आरोग्य व्यवस्थेत महत्वाचे positive काम करेल.
खासगी कॉलेज च्य भयंकर वाढलेला fees दर्जेदार डॉक्टर निर्माण करू शकणार नाहीत.

Dy पाटील कॉलेज ची एमबीबीएस ची फी १.४४ करोड आहे >>> ती पाच वर्षांची मिळून आहे. एका वर्षाची नव्हे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील फी जास्त आहे हे जरी मान्य असले तरी आता केंद्र व राज्य शासनांकडून विविध योजनेअंतर्गत ट्युशन फी चा परतावा मिळतो मात्र त्याला वेळ लागू शकतो (सध्या सगळ्या खासगी वैद्यकीय अभिमत विद्यापीठांत (उदा. DY Patil) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने राजर्षी शाहू महाराज योजना लागू केली आहे). सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही प्रति विद्यार्थी प्रति वर्षी जवळपास एवढाच खर्च येत असतो, तथापि केंद्र व राज्य सरकार सुरुवातीपासूनच हा खर्च उचलत असतो, त्यामुळे त्यांची फी कमी असते.

खासगी कॉलेज च्य भयंकर वाढलेला fees दर्जेदार डॉक्टर निर्माण करू शकणार नाहीत >>> विशेषतः जे NEET - UG मध्ये अत्यंत कमी मार्क मिळवलेले असूनही एनआरआई कोट्यातून प्रवेश घेतात त्यांच्याकडून हे काही अंशी खरे आहे.

सरकारी कॉलेज मध्ये एक ते दीड लाख प्रती वर्ष फी आहे .
चार वर्ष साठी चार ते पाच लाख समजा.
डॉक्टर हा घटक देशासाठी अत्यंत गरजेचा आहे जसे शेतकरी आहेत..अत्यंत कमी फिस मध्ये अत्यंत हुशार मुल डॉक्टर बनली तर ही गोष्ट देशासाठी खूप फायद्याची आहे
केंद्र,राज्य सरकार नी खर्च उचलला च पाहिजे.
पण खासगी कॉलेज साठी नाही.
सरकारी कॉलेजेस ची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे..
इतक्या की सर्व हुशार मुलाना सहज एडमिशन मिळेल मेडिकल साठी

आरारा यांनी दिलेल्या (डॉक्टर कुणाला म्हटले जाते) यादीत, आता डाएटिशियन यांना पण सामील करावे लागेल कारण ते पण आता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात.

यासंदर्भात एक प्रश्न मनात आला. BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BNYS
नॅचरोपॅथी, BUMS युनानी, BSMS सिद्ध मेडिसीन असे लोक death certificate देऊ शकतात का?

मृत्यूचा दाखला >>
या संदर्भात भारत सरकारची अधिकृत अधिसूचना बघायला मिळणे आवश्यक आहे.
ती काही जालावर सापडली नाही.

BMC ची मृत्यू नोंद पुस्तिका डॉक्टर कडे असते त्या मध्ये डॉक्टर मृत्यू झाल्याची खात्री आणि कारण,
वेळ ,तारीख लिहतात आणि त्याची एक कॉपी आपल्या कडे देतात एक त्यांच्या कडून BMC ल जाते.
Bmc मृत्यूचा दाखला देते.
आणि एमबीबीएस doctor नाच हा अधिकार आहे परत ज्यांच्या कडे सरकारी नोंद पुस्तिका आहे तेच डॉक्टर हे काम करू शकतात.
तशी मोठी प्रक्रिया आहे डॉक्टर ना लिखाण काम खूप करावे लागते

<< एमबीबीएस doctor नाच हा अधिकार आहे परत ज्यांच्या कडे सरकारी नोंद पुस्तिका आहे तेच डॉक्टर हे काम करू शकतात. >>

हे जर खरे असेल तर MBBS डॉक्टर हेच खरे डॉक्टर, असे खुद्द सरकार पण मानते असेच म्हणावे लागेल.

माझ्या मते तरी Alternative medicine म्हणजे छद्मविज्ञान आहे. BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BNYS
नॅचरोपॅथी, BUMS युनानी, BSMS सिद्ध मेडिसीन हे सगळे खरेखुरे डॉक्टर नाहीतच.

पण भारतात काहीही शक्य आहे. उद्या ५.५ वर्षांचा ज्योतिष्याचा कोर्स काढून त्यांना पण डॉक्टरची पदवी देतील. Lol

@ हेमंत३३३
आणि एमबीबीएस doctor नाच हा अधिकार आहे
>>>
नाही, हा गैरसमज आहे.

या संदर्भात मी आमच्या वैद्यकीय संघटनेतील न्यायवैद्यक प्रकरणांचा अभ्यास करणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरांना विचारले. त्यांनी सांगितल्यानुसार भारतात कुठलाही Registered Med. Practitioner ( म्हणजे ज्याला शासकीय नोंदणीकृत क्रमांक मिळालेला आहे असा ) मृत्यूचा दाखला देऊ शकतो.

या संदर्भात हा कायदा अस्तित्वात आहे :
The Registration of Births and Deaths Act

https://indiankanoon.org/doc/1636244/#:~:text=(3)%20Where%20the%20State%20Government,of%20that%20person%2C%20forthwith%2C%20issue

Registered Medical Practitioner In India म्हणजे कोण, असे शोधताना ही लिंक मिळाली. खरेखोटे माहीत नाही, पण त्यानुसार

Who can become a registered medical practitioner?
Those persons who have completed the M.B.B.S., D.M.S., D.H.M.S., B.H.M.S., B.A.M.S., B.A.S.M., B.E.M.S., B.I.A.M.S., B.N.Y.T., B.A.T.S., B.U.M.S., N.D., N.O., M.D(A.M) etc. * Practitioners/Research Workers who are practicing for the last 10 years. Minimum basic qualification is exempted.

हे सगळं खरं असेल तर डॉ. केतकी death certificate देऊ शकतील.

आधुनिक वैद्यकातील कुटुंबवैद्य ही संकल्पना गेल्या काही वर्षात झपाट्याने कमी होत गेलेली आहे. आता महानगरांमध्ये तर असे डॉक्टर ‘औषधालाच’ सापडतील. खरं तर गणितातील पिरॅमिड सूत्रानुसार त्यांची संख्या सर्वाधिक तर अतिअतिविशिष्ट तज्ञांची संख्या कमी, असे चित्र असणे समाजाच्या हिताचे असते.

कुटुंबवैद्य या संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतात काही प्रयत्न होत आहेत. अलीकडे काही विद्यापीठांमधून कुटुंबवैद्यकी ही एमबीबीएस नंतरची वेगळी स्पेशालिटी मानून तसे पदव्युत्तर अभ्यासक्रम आखलेत. त्याचा लाभ थोडे डॉक्टर घेताना दिसतात.

असाच पुनरुज्जीवनाचा विचार पाश्चात्य जगतातही उमटलेला दिसतो. एकेकाळी ४० वर्षे कुटुंबवैद्यकी केलेल्या एका अमेरिकी डॉक्टरांचा हा लेख वाचनीय आहे (https://www.thejoltnews.com/stories/primary-care-internal-medicine-is-de...?).

तिकडच्या काही राज्यांमध्ये पण कुटुंब वैद्यकीय विशेष प्रशिक्षणाच्या दृष्टीने काही पावले उचलली आहेत.

एखाद्या समाजाची सरासरी आयुर्मर्यादा आणि त्याच समाजातील डॉक्टरांची आयुर्मर्यादा यांचा तुलनात्मक अभ्यास अलीकडे झालेला आहे. पुण्यातील आय एम ए या डॉक्टरांच्या संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार इथल्या सामान्य माणसाची आयुर्मर्यादा 69 ते 72 वर्षे इतकी असून इथल्या डॉक्टरांची मात्र 55 ते 59 वर्षे आहे.

डॉक्टरांचे मृत्यू तुलनेने लवकर होण्यामागे खालील कारणे आहेत :
* कामाचा व्याप आणि ताणतणाव
* अपुरी झोप
* पुरेशा व्यायामाचा अभाव आणि
* स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष

https://medwinpublishers.com/OAJO/sudden-&-premature-death-among-doctors...

मला वाटतं डॉ. नीतू मांडके यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ही धोक्याची घंटा ठरली पाहिजे होती. पण एकंदरीत कामाचे स्वरुप पाहता रेग्युलर दिनचर्या मेंटेन करणे कठीण ठरावे

डॉक्टर लोक गंभीर infections वगैरेना पण जास्त expose होतात ना? १४-१६ तास ड्यूटीवर असतांना खाण्यापिण्याचे हाल असतात. अगदी पदवी शिक्षणापासूनच. तणाव, झोपेचे खोबरेच काय बदाम होत असतील. हे सर्व मुद्दे दीर्घकालिक आरोग्यासाठी घातक असावेत.

मांडके केस मध्ये हॉस्पिटल काढल्याने मोठं कर्ज, आर्थिक विवंचना, वेळेवर कोणाची मदत न मिळणे असे बरेच मुद्दे होते बहुतेक.

Pages