आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती

Submitted by कुमार१ on 11 August, 2017 - 01:10

काल माबोवरील एका धाग्यात ‘पुण्यातील gastroenterologist सुचवा’ अशी विनंती होती. तेथील प्रतिसाद वाचल्यानंतर असे लक्षात आले की सामान्यजनांमध्ये ‘विशेष वैद्यकीय तज्ञ’ शोधण्याबाबत काही गैरसमज आहेत. तेव्हा असे वाटले, की आधुनिक वैद्यकातील पदव्युत्तर पदव्या आणि संबंधित तज्ञांची माहिती या लेखाद्वारे करून द्यावी. पदव्यांच्या चढत्या श्रेणीनुसार भारतातील माहिती पुढे देत आहे:

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.
२. पदव्युत्तर शिक्षणाच्या दोन प्रमुख शाखा : MD & MS
३. MD मध्ये जवळपास ५० उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे डॉ.( Consultant / Specialist) खालील शाखांचे असतात:

• मेडिसिन : हे डॉ. हृदय, फुफ्फुस, पोटातील अवयव, मेंदू , मधुमेह, रक्तदाब इ. चा एकत्रित अभ्यास केलेले असतात.
• फुफ्फुसरोग तज्ञ
• बालरोगतज्ञ
• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ
• त्वचा व गुप्तरोग तज्ञ
• मनोविकार तज्ञ
. Pathology ( laboratory medicine)
• Radiology ( X ray, sonography, CT scan, MRI इ.) तज्ञ
• भूलतज्ञ

४. MS मध्येही खूप उपशाखा आहेत. त्यापैकी नेहमी लागणारे तज्ञ असे :

• जनरल सर्जन
• हाड व सांधे विकारतज्ञ ( Orthopedics)
• डोळ्यांचे विकार तज्ञ
• कान, नाक व घसा तज्ञ
• Plastic surgeon

५. DM ही MD च्या पुढील Superspeciality आहे. यात सुमारे ३० उपशाखा आहेत. त्यातील नेहमीच्या अश्या :
• हृदयविकार तज्ञ
• मेंदूविकार तज्ञ
• कर्करोग तज्ञ
• पोट व यकृत विकार तज्ञ
• रक्तविकार तज्ञ
• हॉरमोन विकार तज्ञ
• मूत्रपिंड विकार तज्ञ
• सांधे विकार तज्ञ (Rheumatologist)
• संसर्गजन्य विकार तज्ञ
• अतिदक्षताविभाग तज्ञ ( Critical Care Medicine)
• Immunologist

६. MCh ही MS च्या पुढील Superspeciality आहे. त्यातील प्रमुख उपशाखा :

• हृदय शस्रक्रिया तज्ञ
• मेंदू शस्रक्रिया तज्ञ
• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञ
• बालक शस्रक्रिया तज्ञ
• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ
• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ
• हात शस्रक्रिया तज्ञ

MD & MS ना समकक्ष असणारा अजून एक अभ्यासक्रम म्हणजे Diplomate of National Board (DNB). ही पदवी राष्ट्रीय पातळीवर परिक्षा घेऊन दिली जाते. या अंतर्गतही वर उल्लेखिलेल्या अनेक उपशाखा असतात. सर्वसामान्य लोकांना DNB हे नेमके काय हे फारसे माहित नसते. तेव्हा अशी पदवी असणारा डॉ. हा स्पेशालिस्टच असतो हे ध्यानात घ्यावे.
तर थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. उपयोगी पडावा ही अपेक्षा. काही शंका असल्यास त्यांचे स्वागत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DNB बद्दल अजून माहिती सांगाल का...as a student vicharte ahe.....means किती वर्षांचा अभ्यासक्रम आहे.....eligibility criteria ky ahe.....only mbns नंतर च करता येते की bams or bhms नंतर पण असे काही अभ्यासक्रम असतात....

DNB हा एम्बीबीएस नंतरचाच अभ्यास आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यची प्रवेश परीक्षा होते. नंतर एखाद्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ३ वर्षे काम करावे लागते. मग लेखी परीक्षा. त्यात पास झाल्यास प्रात्यक्षिक प. ही अवघड असते.
एमडी नंतरही DNB कमी कालावधीत करता येते.
BAMS/BHMS या पूर्ण वेगळ्या शाखा आहेत. त्याबद्दल मला माहिती नाही.

इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काही काही शाखांच्या नंतर इंग्रजीत प्रतिशब्द दिले आहेत तसे सगळ्याच शाखांनंतर देणार का प्लीज. एखाद्या भाषांतरकाराला पटकन मराठी शब्द सुचला नाही तर त्याला उलट पहायला मदत होऊ शकेल.

1. Intensivist आणि Critical Care Medicine स्पेशालिस्ट एकच का?

2. ( Neo-Natal + specialty) .... या Super-Super-specialty का? त्यासाठी काय कोर्स असतो?

3. MD Cardio-Diabeto, हा पदवी प्रकार बरोबर आहे का फेक? की,

4. MD Medicine + DM Cardio = Cardio Super specialty
आणि
MD Medicine + DM Endocryno = Broader Endocryno Super specialty (ज्यात diabetes येईल)
अशा दोन विद्याशाखा होतील ??

( Neo-Natal + specialty) .... या Super-Super-specialty का? त्यासाठी काय कोर्स असतो? >> DM (neonatology) ही superspeciality आहे.

MD Medicine + DM Cardio = Cardio Super specialty
आणि
MD Medicine + DM Endocryno = Broader Endocryno Super specialty (ज्यात diabetes येईल)
अशा दोन विद्याशाखा होतील ??
>>> होय, बरोबर.

MD Cardio-Diabeto, हा पदवी प्रकार बरोबर आहे का फेक? >> MD (Medicine) ही अधिकृत पदवी आहे. तसे काही MD हे त्यांच्या पाटीवर 'मधुमेह व ह्रुदयविकार तज्ञ' असे लिहीतात. ते तत्वता चूक नाही. पण पदवी तशी नसते.

अजय, हे घ्या :
फुफ्फुसरोग तज्ञ Pulmonologist / chest physician
• बालरोगतज्ञ Pediatrician

• स्त्री रोग व प्रसूती तज्ञ Gynecologist & Obstetrician

• त्वचा व गुप्तरोग तज्ञ Dermatologist & Venereologist

• मनोविकार तज्ञ Psychiatrist
• भूलतज्ञ Anesthesiologist

हृदयविकार तज्ञ Cardiologist

• मेंदूविकार तज्ञ Neuro ....

• कर्करोग तज्ञ Onco.....

• पोट व यकृत विकार तज्ञ :Gastroentero......

• रक्तविकार तज्ञ Hemato.....

• हॉरमोन विकार तज्ञ Endocrino....

• मूत्रपिंड विकार तज्ञ Nephro.....

हृदय शस्रक्रिया तज्ञ Cardiothoracic surgeon

• मेंदू शस्रक्रिया तज्ञ Neuro....

• पोट, यकृत इ. चा शस्रक्रिया तज्ञGastroentero....

• बालक शस्रक्रिया तज्ञ Pediatric S....

• कर्करोग शस्रक्रिया तज्ञ Onco S....

• मूत्रमार्ग व प्रोस्टेट शस्रक्रिया तज्ञ Uro S...

• हात शस्रक्रिया तज्ञ Hand S...

कुमार१, धन्यवाद लिस्ट आणि धाग्याबद्दल. माझा थोडा हातभारः

अस्थितज्ञ - ऑर्थोपेडिक
पावलांचा - पोडायाट्रिस्ट
डोळ्यांचा - ऑप्थॅल्मोलॉजिस्ट

Intensivist आणि Critical Care Medicine स्पेशालिस्ट एकच का? >> होय, साधारण सारखे. पण, Critical Care हा अधिक व्यापक अभ्यास्क्रम आहे.

accupressure वगैरेचा कोर्स केलेले लोक ( इतर कोणत्याही मेडिकल शाखेचे शिक्षण न घेतलेले) डॅा नावाची पाटी लावतात त्यात किती तथ्य आहे? ते डेथ सर्टिफिकेट देऊ शकतात का/कोण देऊ शकते?

sports medicine नावाची एक शाखा आहे.त्याची वेगळी पदवी असते का??

इथे लिहिल्यावाचून राहवत नाहिये.

लेख आधुनिक वैद्यकशास्त्राच्या माहितीबद्दल असला, तरी भारतातल्या वैद्य व वैदूंनी या वैद्यकाच्या मूळ सोन्याला आपले बेगड चिकटवून अनेक गमती केलेल्या आहेत, तस्मात, मी इथे आधुनिक वैद्यकाची पदवी, प्लस, वैद्य व वैदू लोकांनी तसेच आधुनिक वैद्यकातल्या खोट्या/पॅरामेडिक्सनी स्वतःला डॉक्टर म्हणत मिरविलेल्या पदव्या, व कोणत्या तक्रारीसाठी कोणती डिग्रीवाला "डॉक्टर" (वैद्य, वैदू, वा पॅरामेडिक नव्हे) शोधावा याबद्दल इथे लिहिणार आहे.

दुर्दैवाने माबो प्रशासनाने प्रतिसाद संपादनासाठी ४ तासांचा अवधी दिलेला असल्याने, एकाच वेळी हे सगळे लिहिणे मला शक्य होणार नाहिये, तरीही, प्रशासनास माझे प्रतिसाद उपयुक्त वाटल्यास ते एकत्र संकलित करून प्रसिद्ध करण्याचा पर्याय उपलब्ध आहेच.

तर,

मूळ लेखापासून सुरुवात करणार आहे.

१. मूलभूत पदवी : MBBS. हे कुटुंबवैद्य असतात.

कुटुंबवैद्य = फॅमिली डॉक्टर. हे फार पूर्वीच्या काळी असत. आजकाल अत्यंत कमी टक्केवारीत प्लेन एमबीबीएस डिग्रीवाले लोक प्रॅक्टिस करतात. सापडलेच तर असे ९९+% डॉक्टर्स ६०+ वयोगटात सापडतील.

या "समकक्ष" बीएएमएस, बीएचएमएस / डिएचएमएस, युनानीउर्फ बीयूएमएस, सिद्ध, योगतज्ञ इ. लोकांना "डॉक्टर" म्हणवून घेण्याची मुभा आपल्या देशात आहे. हे सर्व लोक (सन्मानिय अपवाद वगळता. जे १%पेक्षा कमी आहेत) आधुनिक वैद्यकशास्त्रातील कोणत्याही फॉर्मल ट्रेनिंगशिवाय त्या शास्त्राची "प्रॅक्टिस" करीत असतात.

यांतल्या बहुतेकांचा वेळ थंडीतापाची बेसिक औषधे टोचणे, व खेड्यापाड्यातील लोकांना ट्रॅफिकपोलिसगिरी करीत योग्य त्या कन्सल्टंटकडे पोहोचवून योग्य ती "रेफरल फी" वसूल करण्यात जातो. अमुक आजारासाठी डॉक्टरकडे जायला हवे, हे आजही आपल्या देशातल्या ६०% जनतेला समजत नाही, ते सांगण्याचे काम हे लोक करतात, व त्यामुळे हे लोक कामाचे आहेत.
*
मुद्दा. तुम्ही ज्या डॉक्टरकडे गेलात/जायचे, त्याची अर्हता पाहताना,

१. त्याची अंडरग्रॅज्युएट डिग्री, अर्थात, एमबीबीएस, बीएएमएस, डीएचएमएस इ. पहा. नुसते एमडी, एमएस इ. छापलेले असेल तर तो अ‍ॅलॉपॅथ नाही. अ‍ॅलोपॅथ एमएस असेल, तर एम्बी, एमएस असे लिहिल. एमडि असेल, तर एमबीबीएस, एमडी(मेडिसिन, गायनॅक इ) लिहील.
२. रजिस्ट्रेशन नंबर पहा. त्यात IA किंवा तत्सम अक्षरे सापडलीत तर तो अ‍ॅलॉपॅथ नाही.
३. दंतवैद्यकात अजूनतरी इतर पॅथीजचा शिरकाव ऐकिवात नाही. त्यात डायरेक्ट डॉक्टर अन नंतर वैदू अशी गम्मत आहे.
*
आधुनिक वैद्यकातील पॅरामेडिकल लोकांपैकी "व्यायाम देणारे डॉक्टर" उर्फ फिजिओ थेरपिस्ट, आजकाल स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात, अगदी हापिशली. वरतून औषधेही लिहून देतात.
असेच इतर म्हणजे स्पीच थेरपिस्ट व ऑप्टोमेट्रीस्ट.

या सर्वांचे मूळ काम म्हणजे "डॉक्टर"ने सांगितलेले व्यायाम, बोलण्या/ऐकण्याचे ट्रेनिंग, दिसण्याबद्दल/चष्मा नंबर इ. देणे, त्यासाठीची यंत्रे पेशंटला विकणे उदा. ऑर्थोपेडिक शूज,हियरिंग एड्स, कॉन्टॅक्ट लेन्सेस, चष्मे इ.
हे सगळे ऑनरेबल व महत्वाचे प्रोफेशन्स असले तरी यांनी स्वतःला डॉक्टर म्हणवून घेत तुमचे आजार ट्रीट करण्याचा आव आणणे = नीम हकीम खतरे जान आहे. पण हे कोण कुणाला सांगणार?

*
आपण कोणत्या "पॅथी"चे उपचार घ्यावे हा आपला चॉईस आहे. पण या देशात असंख्य शॅमालिऑन अनेक गमती करीत तुम्हाला कापून पोटे भरतात. त्यात अ‍ॅलोपथी व इतरही येतात, त्यांच्याबद्दल पुढे, क्रमशः

आरारा बीएएमएस, बीएचएमएस, युनानी ही बहुतेक आपल्या देशाची खुबी आहे. माझ्या माहितीप्रमाणे इतर विकसित तसेच विकसनशील देशातून एकच एक वैद्यकशास्त्र पदवी असते. त्यातून शिकलेला डॉक्टर मग हवे तर आयुर्वेद, काही देशात अजूनही होमिओपॅथी व इतर आल्टरनेट मेडिसिन देऊ शकतो (अर्थात तेसुद्धा ज्याने हानी पोचत नाही असे व त्या त्या देशातल्या कायद्यात बसणारे).

इथे अमेरिकेत एक फिजिशियन्स असिस्टन्ट नावाचा शिक्षित लायसेन्स्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असतो. त्यांचा ४ वर्षाचा अभ्यासक्रम असतो + रेसिडेन्सी वगैरे. त्याचप्रमाणे प्रसुतिसाठी चार वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम + रेसिडेन्सी केलेले/ल्या मिडवाइफ असतात. असंख्य गर्भवती स्त्रीया या मिडवाइफ सर्विसेस घेतात. काही कॉम्प्लिकेशन (कुठल्याही स्टेजमध्ये १ला महिना ते डिलिवरी चालू असताना) जे मिडवाइफच्या 'हद्दी'बाहेर असेल त्या स्टेजला प्रसृतितज्ञ डॉक्टर ती केस हातात घेतो. मला वाटते भारतात असा सुइणीचा कोर्स आहे - मात्र त्यांचा कोर्स किती कॉम्प्रिहेन्सिव आहे ते माहिती नाही. बहुसंख्य स्त्रीया गायनॅक एमडीकडेच प्रसुतिसाठी जातात.
काही वर्षांपुर्वी असा एक प्रस्ताव वर्तमानपत्रे/काही फोरम्सवर मांडला गेला होता की एमबीबीएसपेक्षा एक लेवल खालची एक मेडिकल डिग्री व एज्युकेशन सुरू करावे. हे शिक्षण आधुनिक वैद्यकशास्त्रावर आधारीत असेल. यातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे फिजिशियन्स असिस्टन्ट प्रमाणे पीएचसी/खेड्यातून लहान गावातून बेसिक उपचार करू शकतील तसेच आता शहरातूनदेखील जीपीचे काम करतील. तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे हे पुढे स्पेशालिस्टकडे पाठवणे बर बरोबर करतील. बेसिकली बीएएमएस /बीएचएमएस वगैरे रिप्लेस करून हा कोर्स असावा.

या धर्तीवर काही भारतात पर्याय आहेत का? वा असे करावे याबाबत काही योजना होत आहेत का?

शरीरशास्त्र पुर्णवेळ चारवर्षे शिकलेल्या कुणालाही कोणत्याही पदविधारकास डॅा म्हणणे चूक नाही.
ज्याच्यात्याच्या शाखेप्रमाणे औषधउपाय वेगळे असले तरी रुग्णाची जबाबदारी घेत असल्याने तो डॅाक्टरच आहे.
सुईणीही प्रशिक्षित असतात.

#समजा डोके दुखत आहे तर त्याने अचानक कोणत्या एमडीकडे जायचे ते ठरवता येणार नाही. प्रथम एका डॅाक्टरचे औषध घेतल्यावरच तो सांगू शकतो.

सर्व प्रतीसादकांचे आभार आणि चर्चेत स्वागत.

१. नावाआधी ‘डॉ’ लावणे ही भारतीय परंपरा आहे. कदाचित ब्रिटीशांकडून घेतलेली. ‘डॉ’ लावलेच पाहिजे असा नियम आहे की नाही, याची मला कल्पना नाही.

२. अमेरिकेत तशी पद्धत नाही. एकूणच त्यांनी ब्रिटिशांपासून फारकत घेताना नावाआधीच्या सर्व बिरुदांना फाट्यावर मारले. तेव्हा एखादा भारतातून शिकलेला ‘डॉ’ जेव्हा अमेरिकेत जाऊन स्थायिक होतो, तेव्हा त्याची पाटी अशी असते:
संजय जोशी, एम.डी.
American Board Certified in Surgery

तिथे सर्व डॉक्टरांची पदवी एकच असते – एम.डी. तेव्हा जोशी जरी सर्जन असले तरी ते ‘एमडी’ च असतात. कुटुंबवैद्य सुद्धा एमडीच.
३. Paramedics नी ‘डॉ’ लावावे का नाही ? मुळात याचे लेखी नियम आहेत की नाही, हे माहित नाही. तसेच doctor चे अनेक अर्थ कोशात आहेत त्यापैकी एक आहे ‘an eminent scholar and teacher.’ तेव्हा जरी हा मुदा कायद्याच्या कक्षेत नेला तरी तिथे ते लोक हा युक्तिवाद करतील.

४. शेवटी माझे मत: भारतातील ज्या लोकांनी मूलभूत साडेपाच वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांनी ‘डॉ’ लावावे. या सर्वांना नियंत्रित करणाऱ्या National Councils आहेत म्हणून.

ज्या अभ्यास क्रमांना National Council असते त्यांनीच नावा आधी डॉ लावावे .
<<
लाजिक समजले नाही.
नर्सिंग काउन्सिल आहे. मग सगळ्या नर्सेस डॉ झाल्या का?
बार काउन्सिलही आहे Lol

National medical Council समजावे. आणि साडेपाच वर्षे अभ्यास क्रम मूळ पदवी साठी. एवढया काळात मानवी शरीराचा सर्व अंगाने पुरेसा अभ्यास होतो

कुमार१ सर,

आपण एमडी आहात से आपल्या प्रोफाइलात लिहिले आहे. आवर्जून एमडीच्या आधी एमबीबीएस लिहिले आहे. म्हणून खालील प्रश्न विचारायची हिम्मत करितो आहे.

मूळ पदवीसाठी कुणी "साडेपाच वर्षे" अभ्यास केला, हा क्रायटेरिया गंडलेला आहे असे वाटत नाही का? कसला अभ्यास केला त्याला काही अर्थ असेल की नाही?

उदा. (गायटनची) ह्यूमन फिजिऑलॉजी, व त्रिदोष, किंवा ४ ह्यूमर्सचा बॅलन्स, यांच्यातील फरक ५॥ वर्षे शिकूनही तसाच शिल्लक राहतो, हे कसे? फिजिऑलॉजी वेगळी, पण फार्मॅकॉलॉजी एकच, असे होऊ शकेल काय? मग मटेरिया मेडिका, अन रसशास्त्र, हा वेगळा प्रकार का आहे?

असो.

वरच्या (अमेरिकेत अमुक असते च्या) प्रतिसादांनुसार एक अजून अवांतर गम्मत.

आपल्याकडेही, एमडी गायनॅक असतात तेही सर्जन असतात Wink एम्सचे ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट्स एमडी ऑफ्ह्थॅल्म असतात, व सर्जन असतात.. या दोन्ही विषयांत एमएस आहेच..

हाच सगळा गोंधळ मला स्पष्ट करायचा आहे. असो. सध्या एका कॉन्फरन्समध्ये बिझि, उद्या अधिक लिहितो. या धाग्यावर नको असेल, तर वेगळा काढायचा यत्न करेन.

मधेच बोलल्याबद्दल क्षमस्व!

शरीरशास्त्र पुर्णवेळ चारवर्षे शिकलेल्या कुणालाही कोणत्याही पदविधारकास डॅा म्हणणे चूक नाही.
<<
महोदय,
शरीरशास्त्र, म्हणजे काय, याचीच संकल्पना वेगवेगळ्या "पॅथीत" वेगवेगळी असते याची कल्पना आपणास आहे का?
शरीर काम कसे करते, याबद्दलच मुळात घोळ आहे, अन हेच वेगळे असल्याने उपचार मुळातून वेगळे होतात, हे आपल्या ध्यानी आले आहे काय?

(दर्शन:)उदा. तुमच्या मोटरसायकलचे इंजिन कसे काम करते, याची "संकल्पना" जर मॉडर्न डॉक्टर "पेट्रोल जाळणारे इंटर्नल कंबशन इंजिन" म्हणून मांडतो आहे, पेट्रोल संपले तर पेट्रोल भरा सांगतोय, आयुर्वेदवाला इंजिनात कफ पित्त वात असे त्रिदोष आहेत, असे सांगतो आहे, व पेट्रोल संपले म्हणून सायेलेन्सरला बस्ति देतो आहे, अन होमिओपथीवाला ४ ह्यूमर्सचा बॅलन्स सांगून पेट्रोल संपण्याचा इलाज लाइक क्युअर्स लाईक म्हणत पेट्रोल संपले तर टाकी कोरडी करा, असे म्हणतो आहे!

मुळात शरीर काम कसे करते, याच्या संकल्पनेतच या सर्व शाखांत घोळ आहे. हे मूळ कुणी समजून घ्यायलाच तयार नाहिये इथे.

कमरेच्या खुब्यावर दिलेले इंजेक्शन मधील औषध मानेवरच्या गळूपर्यंत नेमके कसे पोहोचते, व पोहोचल्यावर काम कसे करते, याचे उत्तर आमच्याकडे "प्रॅक्टिसला" येणारे आजचे बीएएमएस, बीएचएमएस इ. "डॉक्टर" देऊ शकत नाहीत, हे माझे अन माझ्या देशाचे दुर्दैव आहे.
>>
ज्याच्यात्याच्या शाखेप्रमाणे औषधउपाय वेगळे असले तरी रुग्णाची जबाबदारी घेत असल्याने तो डॅाक्टरच आहे.
<<
अहो, मांत्रिकही त्याच्या रुग्णाची छातीठोक जबाबदारी घेत असतो. कैच्याकै लॉजिक लावले आहे आपण.

एस आर डी , तुमची पोस्ट फारच अशास्त्रीय आहे . याबद्दल खेद.
अर्थात अशा लोकांकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला आमची हरकत नाही. Happy

या वि षयात रस दाखवून चर्चेत सहभागी झालेल्या सर्वांचे आभार.
आरारा, तुम्ही तुमची मते हिरिरीने मांडत आहात त्याबद्दल आभार. अजून जरूर लिहा.

या धाग्याच्या निमित्ताने सर्वांना एक विनंती, की 'allopathy' हा कालबाह्य आणि अशास्त्रीय शब्द न वापरता त्याला ' Modern Medicine' च म्हणावे .

काही वर्षांपुर्वी असा एक प्रस्ताव वर्तमानपत्रे/काही फोरम्सवर मांडला गेला होता की एमबीबीएसपेक्षा एक लेवल खालची एक मेडिकल डिग्री व एज्युकेशन सुरू करावे. हे शिक्षण आधुनिक वैद्यकशास्त्रावर आधारीत असेल...

<<

टण्या,

पायरी उतरून खाली कशाला जायला हवे? खालच्या पायरीवरील लोकांना वर येऊ द्यात की!

आमचे म्हणणे असे आहे, की एक पायरी खालचा कोर्स काढू नका. याउलट, हे सध्या जे खेड्यापाड्यातून माजलेले बीएएमएस, डीएच व बीचएमएस, बीयूएमएस इ. चे तण आहे, ते नष्ट करून ही सर्व कॉलेजेस अपग्रेड करा. असेही ३-४ मार्क कमी मिळाले म्हणून बीएएमएस वा डीएचएमएसला जातहेत ना मुलं? मग त्यांना प्रॉपर आधुनिक वैद्यकाची पदवी व योग्य शिक्षण द्या.

आयुर्वेद होमिओ, युनानी कॉलेजांच्या नावाखाली हुशार मुलांचे रुपांतर कंपाउंडरही बनण्याची लायकी नसलेले पदविधर बनवण्याचा गोरखधंदा जो डोनेशन खाऊ पुढार्‍यांनी मांडलेला आहे, तो संपवा. यांना संपूर्ण व योग्य शिक्षण देऊन नंतर आधुनिक वैद्यकाची प्रॅक्टीस करू द्या. नुसते महिनाभर नाममात्र ट्रेनिंग देऊन नव्हे.

नॉनअ‍ॅलोपॅथ्स, मेडिकल स्टोरवाले इ.ना आधुनिक औषधोपचार करायला मान्यता देणे = आधीच कमअस्सल ट्रेनिंग देऊन मुलांना फसवले त्याची अधिक कमअस्सल भरपाई करून देशातील नागरिकांच्या जिवाशी अघोरी खेळ करणे होय. हेच सरकार करते आहे.

अमेरिका युरोपात पॅरामेडिक हा स्वतःला अभिमानाने पॅरामेडिकच म्हणवतो, त्यासाठीचे योग्य ट्रेनिंग घेतो, व योग्य वेळी योग्य त्या तज्ज्ञाकडे रुग्णास धाडतो.

आपल्याकडे अमुक डॉक्टरचा १५ वर्षे कंपाउंडर होता, या क्वालिफिकेशनवर लोक डॉक्टरकी करतात व त्यांना आपण "आरएमपी" म्हणून, "खेड्यापाड्यात सेवा कोण देणार?" असल्या भिकारचोट एक्सक्यूजखाली मान्यता देतो! जणू खेड्यात राहणारे लोक या देशाएच नागरीक नाहीत, किंबहुना ती माणसेच नाहीत...

Pages