'खेळरत्न पुरस्कार' नाम बदल..योग्य की अयोग्य?

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2021 - 15:10

भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.

ध्यानचंद हे हॉकी ह्या क्रिडाप्रकारातले दिग्गज खेळाडू होते याबाबत
दुमत नाही. मात्र खेळ हा खेळाडू पेक्षा मोठा असतो असे माझे मत आहे. उद्या त्यांच्या पेक्षा दिग्गज खेळाडू ह्या भूमीत जन्म घेऊ शकतो. खेळ आहे तर खेळाडू तयार होणारच काही दिग्गज तर काही सुमार. त्यामुळे एखाद्या खेळाडूचे नाव पुरस्काराला देणे मला व्यक्तिशः पटत नाही.

ह्या पुरस्कारा चे नाव बदलल्यावर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. काँग्रेस समर्थक नाराज झाले तर मोदी समर्थक् आनंदी झाले.
राजीवजींचे खेळाप्रती काय योगदान? असे बालिश प्रश्न फिरू लागले. अर्थात त्यांनाही ध्यानचंदांचे नाव दिल्यापेक्षा राजीवजींचे नाव हटवल्याचा आनंद झाला.त्यांना ध्यानचंदा ऐवजी दुसरे कुठले नांव दिले असते तरी आनंद तोच राहिला असता.
खेळाप्रती योगदान फक्त खेळ खेळूनच देता येते असा चुकीचा समज बळावलाय.
शासन व प्रशासन ह्यांची भूमिका ह्या बाबतीत महत्वाची आणी निर्णायक असते.

आता राजीवजीबद्दल, संजय गांधी ह्यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी १९८२ साली झालेल्या एशियाड चे आयोजक पद भारताला ३० वर्षांनी मिळाले होते. त्याची जबाबदारी ही इंदिराजींनी राजीवजी ह्यांच्यावर सोपावली. भारत ह्या स्पर्धेचे आयोजन करू शकेल का नाही ह्याबाबत जग साशंक होते। पण राजीवजींनी ही जबाबदारी ज्या प्रकारे पार पाडली आयोजनाचा भव्य दिव्य सोहळा ज्या प्रकारे आयोजित् केला त्याने सारे जग अचंबित झाले.

नंतर २ वर्षांनी इंदिराजी नंतर राजीवजी प्रधानमंत्री झाले. तेव्हा त्यांनी खेळाडूंना सुविधा मिळाव्या, सरकारकडून मदत मिळावी यासाठी योजना आखल्या.१९८६ साली ‌Special area games program 1986 आखण्यात आला.बी वी पी राव या आय ए एस अधिकाऱ्याच्या नेततृत्वाखाली शासनातिल् अधिकाऱ्यांना आदिवासी भागात पाठवण्यात आले.त्यांच्या बरोबर क्रीडा प्रशिक्षक ही पाठवण्यात आले.दुर्गम आदिवासी भागात 'टॅलेंट हंट कॅम्प' ह्या नावाने खेळांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आदिवासी समाजातील १२ ते १८ वयोगटातील काटक व चपळ मुलांचा शोध घेऊन त्यांना दिल्ली येथे नेवून प्रशिक्षण त्यांच्या राहण्या, खाण्याची सोय, सरावाला अनुकूल जागा देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली. 'लिंबाराम' हे तिरंदाजी मधील महान खेळाडू यामधूनच तयार झाले.

पुढे क्रिडाविश्वाच्या व देशाच्या दुर्दैवाने राजीवजींची सत्ता गेली. पुढील सरकारने ही योजना बासनात गुंडाळून टाकली.राजीवजींना अजून एक दोन टर्म जास्त मिळाल्या असत्या तर क्रिडाविश्वाचे व देशाचे चित्र हे अधिक उज्ज्वल झाले असते.

राजीवजींची हत्या झाली. सोनियाजी ह्या राजकारणात नव्हत्याच पण जो काही संबंध राजीवजीमुळे राजकारणाशी होता तोही त्यांनी तोडून टाकला.
नंतर नरसिह् राव सत्तेवर् आल्या नंतर राजीवजींचे जुने सहकारी असल्याने व राजीवजींचे खेळावर असलेले प्रेम, प्रयत्न ध्यानात घेऊन त्यांनी राजीवजींच्या नावाने हा पुरस्कार देण्यास सुरवात केली. तो काही सोनियाजींनी वा राहुलजींनी नाव दिलेला पुरस्कार नाही.

असो. सध्या राजकारणाचाच खेळ झाल्याने एका भारतरत्ना च्या नावाने सुरु केलेल्या पुरस्काराचे नाव बदलण्यात आले ही शोकांतिका आहे.

Group content visibility: 
Use group defaults

मनालीला गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देणारी एक उत्तम संस्था आहे. तिचे नाव आहे "अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिअरिंग". ही संस्था राज्य सरकार चालवते. https://abvimas.org/ वाजपेयींचा गिर्यारोहणाशी दुरान्वयाने पण संबंध नाही पण संस्थेला नाव त्यांचे दिले आहे. तसेच मोदी आणि क्रिकेटचा बादरायण पण संबंध नाही पण तरीही स्टेडियमला नाव त्यांचे. त्यामुळे राजीव गांधींचे योगदान विचारणार्यांनी जरा स्वतःच्या गिरेबान मध्ये झाकावे. भाजपचा इतिहास कोंग्रेस सारखा असला असता तर वाजपेयी प्रमाणेच इतर नेत्यांची नावे पण रस्ते, संस्था, उपक्रमांना आत्ता पर्यंत दिली गेली असती. भाजप मध्ये "महान" नेत्यांची यादी वाजपेयीनी सुरू होऊन वाजपेयी वर संपते. सध्या मोदीना त्या यादीत बसवायचे प्रयत्न चालू आहेत पण यश येईलासे वाटत नाही.
विद्यार्थ्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात फेरफार तर सुरू केलेच होते (
https://www.news18.com/news/india/gujarat-textbook-calls-jesus-christ-demon-minister-says-will-correct-error-1426817.html) आता गांधींचे नाव सर्व ठिकाणा वरून हटवले की - सावरकर आणि गोडसेमुळे देश स्वातंत्र्य झाला असे म्हणायला मोकळे.

राजकारणात पडायचे नाही.
पण हे नामबदल मलाही फार रुचले नाही. कारण यात नक्कीच राजकारण आहे.
नुकतेच मोदींनी अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या स्टेडीयमला आपले नाव दिले. त्यात कोरोना डोक्यावर असताना गर्दी करून तिथे सामने भरवले आणि नेहमीची मार्केटींग केली. आणि त्या पार्श्वभूमीवर ईथे मात्र पुरस्काराला राजकीय नेत्याचे नाव न देता खेळाडूचे नाव लावायचे हा न्याय अजीब आहे.
आणि खेळाडूचे नाव द्यायचेच होते तर मग भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे हवे होते असेही एक वाटले.

असो,
उद्या पुन्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा ते पुन्हा नामबदल करून नाव पुर्ववत करतील का हे बघणे आता रोचक आहे.

स्वत: चे असे काही निर्माण करता येत नाही मग नुसतेच नावे बदलणार याच्या शिवाय अशिक्षित आणि असंस्कृत मोदी / भाजपे काय करु शकतात ?

आंबेडकरांचे महत्व कमी करण्यासाठी कुठे ठेंगड्यांना त्यांच्या त्यांचे स्विय सहायक बनवतात. तर कधी फुले यांचे महत्व कमी करण्यासाठी.... त्यांच्या पहिल्या शाळेचे वर्ष पुढे नेतात.

थोडे विषयांतर होत असेल तर क्षमस्व पण हे वेगळ्या प्रकारचे हाय जॅकींग आहे. साबरमती आश्रमाचा पुनर्विकास करण्यासाठी १२०० कोटी रुपये.
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/sabarmati-ashram-rede...

एव्हढे गांधी यांच्याबद्दल प्रेम / आदर आहे? का गांधी यांना हायजॅक करण्याच्या कुटिल उद्योगाचा एक भाग?
१९४८ साली जिवाने मारले पण गांधी मेले नाही मग आता त्यांच्या आश्रमांना हायजॅक करायचे....

गांधी यांच्या बद्दल थोडाफार आदर असेल तर इतर धर्मांबद्दल/ जातीबद्दल आदर ठेवा. सत्य आणि अहिंसा या दोन महान तत्वांना अमलांत आणायचा प्रयत्न करा.

मुळात खेलरत्न ला राजीव गांधींचे नाव द्यायची गरज नव्हती. आधीच पन्नास ठिकाणी नावे दिलेली आहेत. त्यापेक्षा ध्यानचंद वगैरेंचे नाव तेव्हाच द्यायला हवे होते.

पण इतकी वर्षे प्रचलित आहे तर आवर्जून नाव बदलण्याचीही गरज नव्हती. त्यात कोतेपणा दिसतो.

आंबेडकरांचे महत्व कमी करण्यासाठी कुठे ठेंगड्यांना त्यांच्या त्यांचे स्विय सहायक बनवतात. तर कधी फुले यांचे महत्व कमी करण्यासाठी.... त्यांच्या पहिल्या शाळेचे वर्ष पुढे नेतात.>> अगदी अगदी... इतिहास पुसण्याचा हा यशस्वी प्रयत्न फेकू सरकारने चालवला आहे. आपल्याला इतिहास निर्माण करता येत नाही तर इतरांनी केलेला इसिहास पुसा हा अनाजी पंतुकड्याने दिलेला कानमंत्र त्याच्या विखारी विचारधारेने चालणार्‍या संस्था, संघ, पक्ष, व्यक्ती नेहमीच करत आलेत आणि इथुनही पुढे करत रहातील. सर्वसामान्य जनतेला जो पर्यंत अनाजेपंतांची कारस्थाने ओळखता येत नाहीत तोपर्यंत हे असेच चालेल. ज्या-ज्या वेळे जनता अनाजी पंतुकड्यांची कारस्थाने ओळखू लागते नेमकं त्याचवेळी हे अनाजीचे पणतु जनतेच्या मेंदूवर शेणाचा लेप देऊन त्यांना धर्म, गाय, शेण, गोमुत्र, श्रावण, व्रतवैकल्ये, सणवार यांचा भडीमार करून कारस्थानांवरून जनतेचे लक्ष यशस्वीपणे दुसरीकडे वळवतात.

सर्वप्रथम, वर केलेल्या १७व्या धर्मातील कुपमंडूकांच्या प्रतिसादांना "जाहीर फ़ाट्यावर" मारून, अत्यंत संयत लेखाबद्दल आभार!
व्यक्तिशः मलाहि हा निर्णय पटला नाही.

बाकी "पंख" लागलेल्या धाग्यावर आधिच चर्वण झाले असल्याने पुनरावृती टाळतो.

शुभम् भवतु!

अवांतरः https://www.esakal.com/pune/organizing-civic-felicitation-on-the-occasio...

पुरस्कारच नाव बदलून मोदींनी योग्य तेच केल. मुळात राजीव गांधी हे केवळ सहानुभूतिच्या लाटेमुळेच पंतप्रधान झालेले होते. त्यांची 5 वर्षाची कारकीर्द ही साधरणच होती. म्हणूनच 1989 ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 405 वरून 200 च्या खाली आली. एक दोन खेळाच्या योजना आणल्या मुळे सर्वोच्च पुरस्काराला एखाद्याचे नाव देने योग्य नाही. त्यांचा आणि खेळाचा काहीही संबंध नव्हता.
गुजरात मध्ये क्रिकेट स्टेडियम ला मोदींचे नाव देणे हे पण चुकीचेच आहे. काँग्रेस ने सत्ता आल्यावर खुशाल त्याचे परत नामकरण करावे, कारण भाजपा काही अत्ता नाव बदलणार नाही.

नाव बदलून काही फरक पडणार नाही
अगदी बाल वयापासून मुलांमध्ये खेळाची आवड बघून त्यांना मदत करण्याची भारतात कोणत्याच सरकार ची निती नव्हती आणि आता पण नाही
टोकियो मध्ये ज्यांनी देशाचे नाव उंच केले आहे त्याच्या शी भारत देशाचा काहीच संबंध नाही ते त्यांचे वैयातिक यश आहे.
मोदी नी नाव बदल करण्या पेक्षा खूप मोठी आर्थिक तरतूद खेळाडू साठी केली पाहिजे होती
सर्व खेळत प्रवीण असणाऱ्या मुलांना खूप सारी आर्थिक मदत सरकारी स्तरावर झाली असती तर भारत आज टॉप ला असता.
राजीव जी चे काही तरी योगदान तरी आहे मोदी फक्त आयत्या पिठावर रेगोटया मारत आहे.
मोदी नी खेळाचा प्रसार होण्यासाठी काहीच केलेले नाही .
फेकू आहे फक्तं

खेलो इंडिया कोणाची संकल्पना आहे माहिती नाही पण ती मोदींच्या कारकीर्द मध्ये आलेली आहे

बाकी स्टेडियम ला स्वतःचे नाव देणे चुकीचेच
स्टेडियम ला नावे खेळाडूंचीच द्यायला हवी
देशात आज डझनानी नेहरू गांधी आणि राजीव स्टेडियम आहेत
ती पण बदलायला हवीत
आणि एक कायदा करून राजकीय नेत्यांची नावे ठेवायला मनाई करायला हवी

अगदी बाल वयापासून मुलांमध्ये खेळाची आवड बघून त्यांना मदत करण्याची भारतात कोणत्याच सरकार ची निती नव्हती आणि आता पण नाही >>>>>
पूर्णपणे सहमत !
म्हणूनच स्टेडियम किंवा खेळातील पुरस्कार साठी कोणत्याही राजकारण्यांची नावे नसावीत .
प्रतिकूल परिस्थितीत आकाशाला गवसणी घालणारे खेळाडूंच्या नावानेच पुरस्कार दिले गेले पाहिजेत .

म्हणजे इथे सगळे मायबोलीकर पुरस्कारांना खेळाडूंची नावे पाहिजेत या एकमताने एकत्र आलेत. खूप छान वाटलं हे पाहून. मला आतून कुठेतरी वाटत होतं राजकारणी धाग्यावर सगळे मायबोलीकर कधीतरी एकत्र येतील. आता सगळ्यांनी इमली का बूता बेरी का पेड हे मैत्रीचं गाणं ऐका.
https://youtu.be/ydbgHcJi-rA

सचिन पगारे यांनी त्यांच्या धाग्यातून सगळ्या मायबोलीकरांना एकत्र आणले त्याबद्दल त्यांचं करावं तेव्हडं कौतुक कमी आहे. नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांच नाव विचारात घेतलं जावं अशी मागणी मी करत आहे.

सुरुंगाचा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलपेक्षा अलेक्साण्डर ग्रॅहम बेलचे नाव देऊन 'बेल पुरस्कार' अशी सकारात्मकता त्यात आणावी. नो बेल हे नकारात्मक नाव आहे.

त्यापेक्षा ध्यानचंद वगैरेंचे नाव तेव्हाच द्यायला हवे होते.

>>
ध्यानचंद यांच्या नावाने अगोदरच एक कुठलासा पुरस्कार दिला जातो. नक्की कोणता आठवत नाही आता.

हे नामांतर म्हणजे निव्वळ कोतेपणाचे राजकारण.

नाव बदललं काही वाटत नाही पण उगाच कधीही काहीही टायमिंग नसताना..
असे फालतू राजकारण करून मोदी स्वतःचेच फॅन्स कमी करत आहे...
कसेही करून लाईमलाईट मध्ये कसे राहावे हे त्यांच्याकडून शिकावे..

मुळात पुरस्काराला व्यक्तीचे नाव कशाला हवे.. खेलरत्न पुरस्कार हे नाव बास आहे की...

नोबेल पुरस्काराचे नाव बदलावे अशी मागणी>>> नोबेल यानी आपल्या इस्टेट मधुन या पारितोशकान्ची तजवीज केली म्हणून त्यान्चे नाव दिलेले आहे व ते तसेच राहिल.

स्टेडियम, इमारतीच्या खर्चासाठी, लाल फितीच्या कारभारातून फाइल सोडवून, परवानग्या मिळवण्यासाठी, संस्थेच्या स्थापनेसाठी कुणा नेत्याची, शास्त्रज्ञाची, कलाकाराची, व्यक्तीची भरीव मदत खाली असल्यास इमारतीला, कार्यालयाला, संस्थेला त्या नेत्याचे वा व्यक्तीचे नाव देणे ठीकच आहे. उदा. वानखेडे स्टेडियम, सतीश धवन स्पेस सेंटर, भाभा atomic रिसर्च सेंटर ईत्यादी.
खेलरत्न पुरस्कार वैयक्तिक अचिव्हमेंट साठी सर्वोच्च सन्मान म्हणुनच दिला जातो ना.. जसे दादासाहेब फाळके पुरस्कार, तेनझिंग नोर्गे साहस पुरस्कार, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार, शांती स्वरुप भटनागर पुरस्कार, जो तुम्ही कोणाचा वारसा पुढे नेत आहात, तुमची कामगिरी ही अचिव्हमेंट पाहिल्याने मिळवणार्‍या pioneer व्यक्तीच्या तोडीची आहे आणि तुमचे कार्य त्या प्रथम व्यक्तीच्या कार्या एवढे प्रेरणादायी आहे असा काहीसा अर्थ अभिप्रेत असेल तर ह्या पुरस्कारासाठी ध्यानचंद ह्यांचे नाव देणे योग्य वाटले. पण ध्यानचंद नावाने अजून एक पुरस्कार असल्याने ह्या निर्णयाने गोंधळ वाढला हे खरे.

खेळासाठी प्रचंड आर्थिक तरतूद करा.आता जी पदक खेळाडू नी आणली आहेत ती त्यांची vaiytik आहेत भारता सरकार चा कोणताच सहभाग त्या मध्ये नाही.
पुरस्कार नाव कोणाचे द्यायचे हा प्रश्न असेल तर जी खेळाडू ना आर्थिक मदत प्रचंड प्रमाणात पुरवेल त्याचे द्यावे मग तो भारतीय च असला पाहिजे असे काही नाही .
नोकरी करून फक्त लाभ म्हणून दर वर्षी उत्कृष्ट कामगार म्हणून पुरस्कार दिला आणि पगार च दिला नाही तर चालेल का.
मेहनतीचे फळ हे आर्थिक स्वरूपात च मिळावे असे जगातील सर्व मानवांना वाटत.
नावाला काय chatayche आहे का

खेळांकडे भारतात पुरेसे लक्ष दिले जात नाही हे लक्षात आल्यावर ज्या माणसाने जाहिरातबाजीवर, फोटोग्राफीवर किंवा पदकं जिंकलेल्या खेळाडुंच्या सन्मानार्थ करोडोंची उधळपट्टी न करता भविष्यात आपल्या देशात खेळासाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणुन बजेट मधे खेळासाठी भरीव आर्थिक तरतुद केली, खेळांसाठी मैदाने आणि इतर सोयी-सुविधा करून ठेवल्या तसेच कसलीही पार्श्वभुमी नसताना खेळाप्रति केवळ विधायक दृष्टीकोन ठेऊन एशियाडचे यशस्वी नियोजन, आयोजन आणि सांगता करून दाखवली त्या माणसाचे नाव खेळातील एखाद्या पुरस्काराला दिले म्हणुन कुणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांच्या विखारी विचारधारेची कल्पना येऊ शकते.

खेळांकडे भारतात पुरेसे लक्ष दिले जात नाही हे लक्षात आल्यावर ज्या माणसाने जाहिरातबाजीवर, फोटोग्राफीवर किंवा पदकं जिंकलेल्या खेळाडुंच्या सन्मानार्थ करोडोंची उधळपट्टी न करता भविष्यात आपल्या देशात खेळासाठी पोषक वातावरण तयार व्हावे म्हणुन बजेट मधे खेळासाठी भरीव आर्थिक तरतुद केली, खेळांसाठी मैदाने आणि इतर सोयी-सुविधा करून ठेवल्या>> राज्य पातळीवर असे काम नवीन पटनायक करताना दिसत आहेत. हॉकितला चमत्कार अचानक घडलेला नाही. पण पुन्हा चमकोगिरी करणाऱ्यांची जेवढी चर्चा होत आहे तितकी ना नवीन पटनाईक यांची होत ना हॉकी या खेळाची. उद्या पटनाईक यांच्या नावाने एखादा पुरस्कार चालू केला जरी तरी परवा संघोटे आयत्या पिठावर रेघोट्या मारून पटनाईक यांना बिनकामाचे ठरवून अजून कुणा खेळाडूच्या नावामागे आपले भिखमांग धंदे करेलच यात तिळमात्र शंका नाही. Wink

उद्या पटनाईक यांच्या नावाने एखादा पुरस्कार चालू केला जरी तरी परवा संघोटे आयत्या पिठावर रेघोट्या मारून पटनाईक यांना बिनकामाचे ठरवून अजून कुणा खेळाडूच्या नावामागे आपले भिखमांग धंदे करेलच यात तिळमात्र शंका नाही.>> Biggrin

खेळाला प्रोत्साहन द्यायचे नाही.जे स्व हिमतीवर जगात नाव कमवतात त्यांच्या यशात मात्र स्वतःचा पूर्ण वाटा आहे अशी जाहिरात गुलाम मीडिया चा वापर करून करायची.
हे लोक ओळखतात.
जी कोणी मुल,मुली खेळात विशेष प्राविण्य दाखवत आहेत त्यांचा सर्व खर्च सरकार नी करावा.कोणी दुसरा करणार असेल तरी स्वागत .
आणि ह्याच लोकांच्या नावांनी पुरस्कार दिला जावा.
फालतू नावाचे राजकारण करणारी वांझोटी विचार श्रेणी सोडून द्यावी.

Pages