'खेळरत्न पुरस्कार' नाम बदल..योग्य की अयोग्य?

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2021 - 15:10

भारता चे महान सुपुत्र दिवंगत प्रधानमंत्री राजीवजी गांधी यांच्या नावाने 'खेळरत्न' हा पुरस्कार् देण्यात येतो. सध्याच्या मोदी सरकारने राजीवजींच्या नावे देण्यात येणाऱ्या ह्या पुरस्काराचे नाव बदलून ध्यानचंद ह्या खेळाडूच्या नावाने हा पुरस्कार् देण्याचा निर्णय घेतला.

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. अशीच तात्परता बेरोजगारी, लसीकरण,पेट्रोल डिझेलचे वाढते भाव, अशक्त जिडीपी। ह्याबाबत त्यांनी दाखवल्यास जनता त्यांची। ऋणी राहील.

ध्यानचंद हे हॉकी ह्या क्रिडाप्रकारातले दिग्गज खेळाडू होते याबाबत
दुमत नाही. मात्र खेळ हा खेळाडू पेक्षा मोठा असतो असे माझे मत आहे. उद्या त्यांच्या पेक्षा दिग्गज खेळाडू ह्या भूमीत जन्म घेऊ शकतो. खेळ आहे तर खेळाडू तयार होणारच काही दिग्गज तर काही सुमार. त्यामुळे एखाद्या खेळाडूचे नाव पुरस्काराला देणे मला व्यक्तिशः पटत नाही.

ह्या पुरस्कारा चे नाव बदलल्यावर अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. काँग्रेस समर्थक नाराज झाले तर मोदी समर्थक् आनंदी झाले.
राजीवजींचे खेळाप्रती काय योगदान? असे बालिश प्रश्न फिरू लागले. अर्थात त्यांनाही ध्यानचंदांचे नाव दिल्यापेक्षा राजीवजींचे नाव हटवल्याचा आनंद झाला.त्यांना ध्यानचंदा ऐवजी दुसरे कुठले नांव दिले असते तरी आनंद तोच राहिला असता.
खेळाप्रती योगदान फक्त खेळ खेळूनच देता येते असा चुकीचा समज बळावलाय.
शासन व प्रशासन ह्यांची भूमिका ह्या बाबतीत महत्वाची आणी निर्णायक असते.

आता राजीवजीबद्दल, संजय गांधी ह्यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी १९८२ साली झालेल्या एशियाड चे आयोजक पद भारताला ३० वर्षांनी मिळाले होते. त्याची जबाबदारी ही इंदिराजींनी राजीवजी ह्यांच्यावर सोपावली. भारत ह्या स्पर्धेचे आयोजन करू शकेल का नाही ह्याबाबत जग साशंक होते। पण राजीवजींनी ही जबाबदारी ज्या प्रकारे पार पाडली आयोजनाचा भव्य दिव्य सोहळा ज्या प्रकारे आयोजित् केला त्याने सारे जग अचंबित झाले.

नंतर २ वर्षांनी इंदिराजी नंतर राजीवजी प्रधानमंत्री झाले. तेव्हा त्यांनी खेळाडूंना सुविधा मिळाव्या, सरकारकडून मदत मिळावी यासाठी योजना आखल्या.१९८६ साली ‌Special area games program 1986 आखण्यात आला.बी वी पी राव या आय ए एस अधिकाऱ्याच्या नेततृत्वाखाली शासनातिल् अधिकाऱ्यांना आदिवासी भागात पाठवण्यात आले.त्यांच्या बरोबर क्रीडा प्रशिक्षक ही पाठवण्यात आले.दुर्गम आदिवासी भागात 'टॅलेंट हंट कॅम्प' ह्या नावाने खेळांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आदिवासी समाजातील १२ ते १८ वयोगटातील काटक व चपळ मुलांचा शोध घेऊन त्यांना दिल्ली येथे नेवून प्रशिक्षण त्यांच्या राहण्या, खाण्याची सोय, सरावाला अनुकूल जागा देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली. 'लिंबाराम' हे तिरंदाजी मधील महान खेळाडू यामधूनच तयार झाले.

पुढे क्रिडाविश्वाच्या व देशाच्या दुर्दैवाने राजीवजींची सत्ता गेली. पुढील सरकारने ही योजना बासनात गुंडाळून टाकली.राजीवजींना अजून एक दोन टर्म जास्त मिळाल्या असत्या तर क्रिडाविश्वाचे व देशाचे चित्र हे अधिक उज्ज्वल झाले असते.

राजीवजींची हत्या झाली. सोनियाजी ह्या राजकारणात नव्हत्याच पण जो काही संबंध राजीवजीमुळे राजकारणाशी होता तोही त्यांनी तोडून टाकला.
नंतर नरसिह् राव सत्तेवर् आल्या नंतर राजीवजींचे जुने सहकारी असल्याने व राजीवजींचे खेळावर असलेले प्रेम, प्रयत्न ध्यानात घेऊन त्यांनी राजीवजींच्या नावाने हा पुरस्कार देण्यास सुरवात केली. तो काही सोनियाजींनी वा राहुलजींनी नाव दिलेला पुरस्कार नाही.

असो. सध्या राजकारणाचाच खेळ झाल्याने एका भारतरत्ना च्या नावाने सुरु केलेल्या पुरस्काराचे नाव बदलण्यात आले ही शोकांतिका आहे.

Group content visibility: 
Use group defaults

vaiytik आहेत भारता सरकार चा कोणताच सहभाग त्या मध्ये नाही.>> चुकिच आहे हे. निरज चोपडा वर प्रचंड खर्च केलाय. परदेशी प्रशिक्षक नेण्यापासून, महाग भाले खरेदी इ. साठी

मोदी ना BJP चे ढोंगी समर्थक च बुडवणार.
महाराष्ट्रात बेडूक पिता पुत्र,चंपा ,बोल बच्चन फडणवीस,वाहिनिसहेब,राज्यपाल महोदय च
महाराष्ट्र मधून bjp ल हद्ध पार करणार.
भक्त आहेत च कसर पूर्ण करायला.

मोदी ना BJP चे ढोंगी समर्थक च बुडवणार.
महाराष्ट्रात बेडूक पिता पुत्र,चंपा ,बोल बच्चन फडणवीस,वाहिनिसहेब,राज्यपाल महोदय च
महाराष्ट्र मधून bjp ल हद्ध पार करणार.
भक्त आहेत च कसर पूर्ण करायला. >>>>>>>>
गैरसमज आहे हा तुमचा !
अफगाण प्रश्न जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत भाजप सत्तेतून कशीच हटत नाही .
हा त्या तालिबान्यांनी आणि पाकड्यानी जर भारतात कोणत्याही कारवाया केल्या नाही तर भाजप चे बहुमत कमी होऊ शकते .
आता या विषयाशी संबंधित पुलवामा घडविण्यात भाजपचाच हात होता ही गण गवळण प्रत्येक धाग्यावर सादर करणारे कपाळी भंडारा लावून थोड्याच वेळात येतील Happy

आपल्याच विश्वात रममाण होणार्यांना समाज किंमत देत नाही हो ! त्या विश्वातून बाहेर ये चौकट राजा Happy

चुकिच आहे हे. निरज चोपडा वर प्रचंड खर्च केलाय. परदेशी प्रशिक्षक नेण्यापासून, महाग भाले खरेदी इ. साठी>> कितने तेजस्वी लोग हैं यहां, कहाँ से आते है। Wink

गंगाधर, जेऊरणी, मोतीलाल, स्वरूप राणी, जवाहर, कमला, फिरोज ,इंदिरा, राजीव, सोनीया ,राहुल ,रॉबर्ट , प्रियांका, मीराया , रेहन आणिक पुढील २००० वर्षंसाठी त्यांचे वंशज ह्यांच्या नावाने च सर्व पुरस्कार असावेत असे माझे  ठाम मत आहे. 

पगारेंनी कुणीही खेळाडू खेळापेक्षा मोठा नाही असे म्हटलेले आहे. त्यांनीच उत्तर द्यावे.
खेळासाठी भारतरत्न हा पुरस्कार नसल्याने राजीव गांधी यांच्या नावे खेलरत्न हा भारतरत्न ला समकक्ष पुरस्कार चालू केला होता. तो सचिन तेंडुलकरला दिला होता. तरीही त्याला भारतरत्न द्यायचे म्हणून तेव्हांच्या सरकारने भारतरत्नच्या नियम व अटींमधे बदल केला. हे खेलरत्नचे अवमूल्यन तेव्हां झाले असे म्हणायचे का ?

पीएम ह्यांनी लोकांची मागणी म्हणून हे नाव बदलल्याचे
सांगितले.अर्थात कोण लोक, कुठे मागणी झाली, कुठे मोर्चे निघाले याबद्दल अवाक्षरही नाही.अर्थात सत्ताधारी म्हणून त्यांनी त्यांचा अधिकार वापरला. >>> तेव्हांही नव्हते समजले.

थोडक्यात हे आले काय आणि ते आले काय.

Pages