पण जनता नुसता टिम्ब वाला धागा पण प्रतिसाद देऊन पुढे नेतायत>>>> या टिंबामागे बरेच काही झालेले असते. मग नकोश्या प्रतिसादाला वैतागून ते टिंब अवतरलेले असते. मग आधी धागा न वाचलेले लोकही येऊन काय झाले ते बघतात.
खारुताई प्रचंड आवडते त्याला >>> आधीची पोस्ट पाहून खारुताई सुद्धा खायला आवडते असेच वाटले वाचताना. आणि कालवाकालव झाली मनात. ईतकी गोड आणि पोरांच्या आवडीची खारुताई खायच्या कल्पनेने.
आमच्याकडच्या मांजरीना training देण गरजेचं आहे
उंदीर आणि पाली खा म्हणून सांगायला हवे.
सारखं येऊन दुधाच्या पातेल्यात तोंड घालत असत. मग मांजरीचे येणे बंद केले.
पिलांना त्यांच्या आईचे दुध पचते आणि तेही एका विशिष्ट वयापर्यंत. त्यानंतर त्यांची आईदेखील त्यांना दूध पाजत नाही. त्यांचा जो काही शाकाहार, मांसाहार, सर्वाहार सुरु होतो तो शेवटपर्यंत. आणि सहसा मनुष्य सोडला तर अन्य प्राणी आपल्या प्रजाती सोडून अन्य प्राण्यांचे दुध पीत नाहीत. मोठे झाल्यावर तर नाहीच नाही.
तरी याला अपवाद आहेत. मांजरीने कुत्र्यांच्या पिल्लांना किंवा बकरीने अन्य प्राण्यांना दुध पाजल्याच्या घटना आहेत. पण ते अपवाद म्हणूनच.
आमच्या व्हेटच्या म्हणण्याप्रमाणे दुध (किंवा दुग्धजन्य पदार्थ) हे कुत्रा किंवा मांजरींसाठी विषारी किंवा हानीकारक नसतं. काही प्राण्यांना ते पचतं काहींना पचत नाही. जर तुमच्या कुत्रा किंवा मांजरीला दुध आणि दुधाचे पदार्थ पचत असतील तर द्यायला हरकत नाही. त्यामुळे मांजरींना दुध देणारे किंवा कुत्र्याला दुध देणारे अगदी प्रचंड मोठा गुन्हा वगैरे करत नसतात.
दुध हे त्यांचं नैसर्गिक अन्न नसेल कदाचित पण तसही कुत्रे मांजरांना कपडे घालणे, त्यांना त्यांचे नैसर्गिक अधिवास नसलेल्या वातावरणात वाढवणे (भारतात हस्की कुत्री पाळणार्यांना काय म्हणावं कळत नाही!) , न्युटरींग, स्पेईंग करणे, वाढदिवस करणे वगैर अनेक त्यांच्यासाठी अनैसर्गिक असलेल्या गोष्टी लोकं करतातच. त्यामुळे केवळ दुध दिलं म्हणून फारसं काही बिघडत नाही.
रच्याकने, ज्योईला ताक खूप आवडतं. सध्या उन्हाळ्यात, विशेषतः उन्हात बाहेर जाऊन आल्यावर तो पितो. त्याला कधीकधी ड्राय डॉगफुड खायचा कंटाळा येतो मग एखादा चमचा दही घातलं त्यावर की एकदम खुष.
आमच्या मजल्याचे मेन दार बंद होते त्यामुळे एक माउ अडकली होती. आत्ता गार्बेज ठेवायला दार उघडले तर रडत बसली होती. तिला दार उघडून दिले धूम पळून गेली बाई. तिला थोडे अन्न ठेवायचे होते पण पळूनच गेली शेपटी उंचावून.
भारतात हस्की बद्दल अनुमोदन. मुंबईत उकाड्यात फिरवत असतात बिचार्यांना.
Submitted by अश्विनीमामी on 6 August, 2021 - 22:23
पराग +१००
आमचा जिंजर पण दुग्धजन्य पदार्थ प्रेमी आहे. दूध, ताक, दही, पनीर, गुलाबजाम...प्रचंड आवडीने खातो. मी हे सगळे रोज देत नाही. पण रोज पोळीला तूप किंवा बटर नक्की लागतं अन्यथा वास घेऊन सोडून देतो जेवण. मी आठवड्यातून एकदा लोणी काढते सायीचे तर तो त्या ताकावर डोळा ठेवून असतो. किचन समोर बसून राहतो.
प्रतिसाद वरून अंदाज आला की तुम्ही पिल्ले रेस्क्यु करून घरी आणलात.
अस असेल तर तुमचं कौतुक.
मुंबई मध्ये BMC करून dogs ची नसबंदी होते पण ते मांजराच्या बाबतीत नाही.
कधी कधी BMC कडून देखील काही dogs पकडले जात नाही किंवा ते असे जाऊन लपतात की सापडत नाहीत नेमके.
मग यांच्या मार्फत भटक्या प्राण्याच्या आकडेवारीत वाढ होते.
एक मांजर एका वेळेला 5-8 पिल्ले जन्माला घालते. जर ती भटकी मांजर असेल तर त्या 8 पैकी 2-3 च पिल्ले जगतात असे पकडुन चाला.
पण हीच पिल्ले पुढे मोठी होतात आणि यांच्या थ्रू अजून पिल्ले.. हे चक्र चालत राहतं.
यात मग कधी तरी गाडी खाली येणे,वेळेवर ट्रीटमेंट न मिळाल्याने जीव जाणे तर बहूतेक वेळा जर काही जणांना जास्तच त्रास झाला तर मग त्यांना विष देऊन मारणे, मुद्दाम आई आणि पिल्ले (पिल्ले काही दिवसांची असतानाच) त्यांना वेगळे करून सोडणे हे सर्व प्रकार घडतात. ज्याने त्रास मुक्या प्राण्यांना होतो.
त्यामुळे वेळीच यांची नसबंदी करणे जास्त योग्य ठरते.
मी ज्या ग्रुप मध्ये आहे तिथे आम्ही जवळपास रोजच अशा केस बघतो.
काही जण तर हौस असेल तोपर्यंत प्राणी पाळतात मग ते सोडून देतात.
पण तोपर्यंत त्या प्राण्यांना एक सवय झालेली असते, बाहेर रस्त्यावर भटकून अन्न शोधून खाणे, इतर प्राण्यांच्या गँग सोबत लढणे त्यांना जमत नाही. यात मग त्यांचे हाल होतात.
तुमच्या पाळीव प्राण्याची नसबंदी करावी की नाही हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे.
पण जर बाहेर भटक्या प्राण्याच्या बाबतीत विचाराल तर माझं मत तरी आहे की नसबंदी होणे आवश्यक आहे.
बाकी धागाकर्त्याचे अभिनंदन आणि गुड लक.
दोन वर्षांपूर्वी आम्ही जे पाच पिल्ले वाचवली होती, त्यातील एकाचे Adoption झाले , एक आजारपणात गेले आणि बाकी 3 आरामात घरी आहेत. (जे अजून झोपले नसल्याने,त्यांच्या दंगा मस्तीत मला झोप न येत असल्याने, मायबोली वर लॉग इन केलं..)
Submitted by कविता९८ on 23 September, 2021 - 15:00
पण जनता नुसता टिम्ब वाला धागा
पण जनता नुसता टिम्ब वाला धागा पण प्रतिसाद देऊन पुढे नेतायत>>>> या टिंबामागे बरेच काही झालेले असते. मग नकोश्या प्रतिसादाला वैतागून ते टिंब अवतरलेले असते. मग आधी धागा न वाचलेले लोकही येऊन काय झाले ते बघतात.
विरु, पाल फिरते ना खाली पण
विरु, पाल फिरते ना खाली पण भिंतीवर 2,3 फुटांवर
पाली खातात का माहीत नाही, पण
पाली खातात का माहीत नाही, पण क्वचित प्रसंगी पाला खातात त्या.
गवत किंवा दुर्वा, पोटात गडबड
गवत किंवा दुर्वा, पोटात गडबड असेल तर किंवा असंही पचनासाठी म्हणून बहुतेक सॅलड सारखं
खारुताई प्रचंड आवडते त्याला >
खारुताई प्रचंड आवडते त्याला >>> आधीची पोस्ट पाहून खारुताई सुद्धा खायला आवडते असेच वाटले वाचताना. आणि कालवाकालव झाली मनात. ईतकी गोड आणि पोरांच्या आवडीची खारुताई खायच्या कल्पनेने.
आमच्याकडच्या मांजरीना
आमच्याकडच्या मांजरीना training देण गरजेचं आहे
उंदीर आणि पाली खा म्हणून सांगायला हवे.
सारखं येऊन दुधाच्या पातेल्यात तोंड घालत असत. मग मांजरीचे येणे बंद केले.
Cats are lactose-intolerant.
Cats are lactose-intolerant. Their digestive system cannot process dairy foods, and the result can be digestive upset with diarrhea.
छोटी पिल्ले त्यांच्या आईचे
छोटी पिल्ले त्यांच्या आईचे दूध पितात ते कसे पचते मग ?? का तेव्हा डायरिया होण्याचे प्रमाण खुप जास्त असते ??
पिलांना त्यांच्या आईचे दुध
पिलांना त्यांच्या आईचे दुध पचते आणि तेही एका विशिष्ट वयापर्यंत. त्यानंतर त्यांची आईदेखील त्यांना दूध पाजत नाही. त्यांचा जो काही शाकाहार, मांसाहार, सर्वाहार सुरु होतो तो शेवटपर्यंत. आणि सहसा मनुष्य सोडला तर अन्य प्राणी आपल्या प्रजाती सोडून अन्य प्राण्यांचे दुध पीत नाहीत. मोठे झाल्यावर तर नाहीच नाही.
तरी याला अपवाद आहेत. मांजरीने कुत्र्यांच्या पिल्लांना किंवा बकरीने अन्य प्राण्यांना दुध पाजल्याच्या घटना आहेत. पण ते अपवाद म्हणूनच.
आशु + 1
आशु + 1
मांजरे बाहेर जाऊन शी शु करतात त्यामुळे त्यांना दूध पिऊन काय त्रास होतो हे त्यांना पाळणार्यांना कळणे अवघड आहे.
आमच्या व्हेटच्या
आमच्या व्हेटच्या म्हणण्याप्रमाणे दुध (किंवा दुग्धजन्य पदार्थ) हे कुत्रा किंवा मांजरींसाठी विषारी किंवा हानीकारक नसतं. काही प्राण्यांना ते पचतं काहींना पचत नाही. जर तुमच्या कुत्रा किंवा मांजरीला दुध आणि दुधाचे पदार्थ पचत असतील तर द्यायला हरकत नाही. त्यामुळे मांजरींना दुध देणारे किंवा कुत्र्याला दुध देणारे अगदी प्रचंड मोठा गुन्हा वगैरे करत नसतात.
दुध हे त्यांचं नैसर्गिक अन्न नसेल कदाचित पण तसही कुत्रे मांजरांना कपडे घालणे, त्यांना त्यांचे नैसर्गिक अधिवास नसलेल्या वातावरणात वाढवणे (भारतात हस्की कुत्री पाळणार्यांना काय म्हणावं कळत नाही!) , न्युटरींग, स्पेईंग करणे, वाढदिवस करणे वगैर अनेक त्यांच्यासाठी अनैसर्गिक असलेल्या गोष्टी लोकं करतातच. त्यामुळे केवळ दुध दिलं म्हणून फारसं काही बिघडत नाही.
रच्याकने, ज्योईला ताक खूप आवडतं. सध्या उन्हाळ्यात, विशेषतः उन्हात बाहेर जाऊन आल्यावर तो पितो. त्याला कधीकधी ड्राय डॉगफुड खायचा कंटाळा येतो मग एखादा चमचा दही घातलं त्यावर की एकदम खुष.
अरेच्चा, इथे पण माऊंचे
अरेच्चा, इथे पण माऊंचे किस्से सुरू झाले की..
आमच्या मजल्याचे मेन दार बंद
आमच्या मजल्याचे मेन दार बंद होते त्यामुळे एक माउ अडकली होती. आत्ता गार्बेज ठेवायला दार उघडले तर रडत बसली होती. तिला दार उघडून दिले धूम पळून गेली बाई. तिला थोडे अन्न ठेवायचे होते पण पळूनच गेली शेपटी उंचावून.
भारतात हस्की बद्दल अनुमोदन. मुंबईत उकाड्यात फिरवत असतात बिचार्यांना.
पराग
पराग
ताक आणि दही उत्तमच आणि आवर्जून द्यावं
मी हे त्या भुभु च्या धाग्यावर पण लिहलं होत
पराग +१००
पराग +१००
आमचा जिंजर पण दुग्धजन्य पदार्थ प्रेमी आहे. दूध, ताक, दही, पनीर, गुलाबजाम...प्रचंड आवडीने खातो. मी हे सगळे रोज देत नाही. पण रोज पोळीला तूप किंवा बटर नक्की लागतं अन्यथा वास घेऊन सोडून देतो जेवण. मी आठवड्यातून एकदा लोणी काढते सायीचे तर तो त्या ताकावर डोळा ठेवून असतो. किचन समोर बसून राहतो.
Chraps, जिंजर पण असाच अचानक
Chraps, जिंजर पण असाच अचानक आला होता आमच्याकडे. आम्ही अजिबात तयारीत नव्हतो. सुरुवातीचे hiccups सोडले तर आता मस्त चाललंय आमचं.
प्रतिसाद वरून अंदाज आला की
प्रतिसाद वरून अंदाज आला की तुम्ही पिल्ले रेस्क्यु करून घरी आणलात.
अस असेल तर तुमचं कौतुक.
मुंबई मध्ये BMC करून dogs ची नसबंदी होते पण ते मांजराच्या बाबतीत नाही.
कधी कधी BMC कडून देखील काही dogs पकडले जात नाही किंवा ते असे जाऊन लपतात की सापडत नाहीत नेमके.
मग यांच्या मार्फत भटक्या प्राण्याच्या आकडेवारीत वाढ होते.
एक मांजर एका वेळेला 5-8 पिल्ले जन्माला घालते. जर ती भटकी मांजर असेल तर त्या 8 पैकी 2-3 च पिल्ले जगतात असे पकडुन चाला.
पण हीच पिल्ले पुढे मोठी होतात आणि यांच्या थ्रू अजून पिल्ले.. हे चक्र चालत राहतं.
यात मग कधी तरी गाडी खाली येणे,वेळेवर ट्रीटमेंट न मिळाल्याने जीव जाणे तर बहूतेक वेळा जर काही जणांना जास्तच त्रास झाला तर मग त्यांना विष देऊन मारणे, मुद्दाम आई आणि पिल्ले (पिल्ले काही दिवसांची असतानाच) त्यांना वेगळे करून सोडणे हे सर्व प्रकार घडतात. ज्याने त्रास मुक्या प्राण्यांना होतो.
त्यामुळे वेळीच यांची नसबंदी करणे जास्त योग्य ठरते.
मी ज्या ग्रुप मध्ये आहे तिथे आम्ही जवळपास रोजच अशा केस बघतो.
काही जण तर हौस असेल तोपर्यंत प्राणी पाळतात मग ते सोडून देतात.
पण तोपर्यंत त्या प्राण्यांना एक सवय झालेली असते, बाहेर रस्त्यावर भटकून अन्न शोधून खाणे, इतर प्राण्यांच्या गँग सोबत लढणे त्यांना जमत नाही. यात मग त्यांचे हाल होतात.
तुमच्या पाळीव प्राण्याची नसबंदी करावी की नाही हा तुमचा पर्सनल प्रश्न आहे.
पण जर बाहेर भटक्या प्राण्याच्या बाबतीत विचाराल तर माझं मत तरी आहे की नसबंदी होणे आवश्यक आहे.
बाकी धागाकर्त्याचे अभिनंदन आणि गुड लक.
दोन वर्षांपूर्वी आम्ही जे पाच पिल्ले वाचवली होती, त्यातील एकाचे Adoption झाले , एक आजारपणात गेले आणि बाकी 3 आरामात घरी आहेत. (जे अजून झोपले नसल्याने,त्यांच्या दंगा मस्तीत मला झोप न येत असल्याने, मायबोली वर लॉग इन केलं..)
धन्यवाद...
धन्यवाद...
Pages