.

Submitted by च्रप्स on 2 August, 2021 - 19:17

प्रश्नाचे उत्तर मिळाल्यामुळे संपादित...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमंतिनी - जबरी सेन्स ऑफ हुमर Happy

जास्त प्रतिसाद नव्हते म्हणुन ही ट्रिक केली त्यांनी.

>>>गलत जवाब!!!
मानव पृथ्वीकर उर्फ बोकलत Happy

एक लिटर बॉक्स म्हणजे अर्धा लिटर/एक लिटर असे वाचले मी आणि कितीवेळ विचार करत होते की एक लिटरचा बॉक्स म्हणजे नक्की काय आणि एक लिटरच का Proud

एक लिटरच का >> Lol आणि अर्थ लागल्यावर 'Oh sh*t! it's litter ' म्हणता पण येत नाही.... परत लिटर बॉक्सच पुढे करायचे Wink

मानव पृथ्वीकर उर्फ बोकलत Happy
>>>>>
कुत्ता पालो या बिल्ली पालो
पर गलहतफैमी मत पालो Wink
च्रप्स उर्फ ऋन्मेष उर्फ अ‍ॅडमिन Proud

अरर! माझ्या प्रतिसादाने ईरिटेट होऊन कंटेंट डीलीट केलात का च्र्प्स?
हे आपलं मनात विचार आले ते लिहिलं ओ.
दोन खोल्यांच्या घरात आणी दोन शिक्षण घेणारी लहान मुलं असताना, ज्यांच्या शिक्षणाचा आणि इतर खर्च बराच असतो, प्लस दोन सि सि आजी आजोबा, ज्यांच्याशी धड कुणाला बोलायला जमत नाहीये अशांनी हौसेखातर कुत्री पाळलेली बघुन नवल वाटलं मला ते लिहिलं.
तुम्ही लोड घेऊ नका. विचार न करता आणलेल्या दोन मांजरींना आता तुम्ही पाळणार आहात आणि त्यांच्या इन्शुरन्स आणी इतर गोष्टींवर खर्च करणार आहात हे वाचून आनंद झाला.
ऋ, आता हा प्रतिसाद कितीही इंटरेस्टींग वाटला तरी लिहू नको Lol

ऋन्म्याला इंटरेस्टिंग वाटलेले च्र्प्सना इरिटेटिंग वाटले म्हणजे
सुर्य पश्चिमेला उगवणार.
मुंगी पर्वत गिळणार.
जगच बुडणार आता. Wink

च्रप्स माझे ड्यूआडी असे ओळखता येत नाहीत कुणाला.
शोध सुरू ठेवा, शोधून काढल्यास पार्टी देण्यात येईल, हवं ते खाण्या-पिण्याची.

ऋन्म्याला इंटरेस्टिंग वाटलेले च्र्प्सना इरिटेटिंग वाटले म्हणजे ......
>>>>>

अहो, म्हणजे काय नाय, मला ज्या वाक्यात पोटेंशिअल वादाची चिंगारी दिसते ते ईंटरेस्टींग वाटते Happy

आमच्याईथे जुन्या बिल्डींगला शेजारी एक श्वानप्रेमी राहायचे. त्यांच्या घरात एक गेला की दुसरा मग तिसरा असे तीन श्वान माझ्या बालपणी माझ्यासोबत मोठे होताना पाहिले. ते काका स्वतःच्या हाताने कुत्र्यांना आंघोळ घालणे, सू-शी साफ करणे, त्यांना भातात टमाटर कुस्करून हाताने भरवणे वगैरे छान मुलांसारखी काळजी घ्यायचे. पण जेव्हा मुलांवर चिडायचे तेव्हा त्यांना चिडून "कुत्र्या" अशी "शिवी" द्यायचे. त्यामुळे त्यांचे नक्की खरे प्रेम कोणावर समजेनासेच व्हायचे Happy

नाही टमाटर
म्हणून तर ते प्रकरण फेमस होते Happy
अर्थात चिकनही द्यायचे अध्येमध्ये. पण त्या लेडी श्वानाचे टमाटर भात हे फेव्हरेट अन्न होते. आणि बरेपैकी धिप्पाड कुत्री होती.

पण जेव्हा मुलांवर चिडायचे तेव्हा त्यांना चिडून "कुत्र्या" अशी "शिवी" द्यायचे. त्यामुळे त्यांचे नक्की खरे प्रेम कोणावर समजेनासेच व्हायचे Happy >> Lol

माझ्या प्रतिसादाने ईरिटेट होऊन कंटेंट डीलीट केलात का च्र्प्स?
>>>अर्रर्रर्रर... अहो असे नाही...तो एक विनोद केला होता... प्रश्नाचे उत्तर मिळाले म्हणून धागा संपादित केला ...
इमॅच्युरिटी आणि घाईत धागा काढला होता, दुसऱ्या दिवशी वाटले, अरे इतना तो चलता है...
आणि काही लोकांनी प्रश्नाचे उत्तर पण दिलेच होते त्यामुळे फायदा झाला..
पण जनता नुसता टिम्ब वाला धागा पण प्रतिसाद देऊन पुढे नेतायत Happy

ऋन्मेष- भारतात पाळीव प्राण्यांना खूप त्रास आहे...
मांजरीला दूध दिले जाते जबरदस्ती, ते देखील पिते कारण पर्याय नसतो... काहीही खायला देतात..
मांजरीला दूध आणि डेअरी बिलकुल देऊ नये...

मांजरीला दूध दिले जाते जबरदस्ती, ते देखील पिते कारण पर्याय नसतो
>>>>
अच्छा, मांजर दूध पित नाही का आवडीने? माझ्यासाठी हि माहीती नवी आहे. म्हणजे मांजर डोळे मिटून दूध पिते असे ऐकून आहे. आवडत नाही म्हणून डोळे मिटून नाक दाबून पिते का Happy

बाकी एखादी कट्टर शाकाहारी व्यक्ती कुत्रा पाळत असेल तर ती कुत्र्याला शाकाहारीच बनवणार.
आपण शाकाहारी असलो तरी कुत्र्याला मांसाहार करू द्यावा यासाठी मांसाहाराचे संस्कार गरजेचे Happy

भुभुज ना पण
तरीही लोकं सर्रास दूध पोळी कुस्करून देतात

तेच ना..मांजर तर दूध पितेच. फक्त डोळे मिटून पिते. आमच्या गावठी मांजराला तर सकाळी सकाळी दुधाची च तल्लफ आलेली असते. लपालपा दूध पिऊन देवघरापाशी जाऊन बसतं. फार गोड दिसतं ते दृश्य.
आवडत नाही म्हणून डोळे मिटून नाक दाबून पिते का Happy>> Lol

आमची बरीच मांजरे दूध ,मासे खाऊन सणसणीत होती.

क्ष वर्षां पूर्वी कुत्र्यांची खाणी माहीत नव्हती. आमचा कुत्रा चिकन भात,दूधभात खायचा.
Processed अन्न आपण कमी घेतो.मग पे डिग्री किंवा तत्सम फूड, भुभू मंडळींना सहज देतो.मला खरेच पडलेला प्रश्न आहे.

मांजरीला दूध आणि डेअरी बिलकुल देऊ नये...>>नवीन माहिती मिळाली.
आमच्या मांजराला चहा पण आवडायचा. कपबशीचा आवाज केला तरी पठ्ठ्या किचनमध्ये हजर.

वर्षानुवर्षे माणसाळलेले कुत्रा मांजर काहीही खात असावेत.
आपल्याकडे कावळ्याला आपण आपले पूर्वज मानून रोजच आपले घरचे अन्न खाऊ घालतो. गाईलाही आपण देवाचा दर्जा देत नैवेद्य खाऊ घालतो.
याऊपर गाय चारा आणि कावळा मेलेला ऊंदीरही खातो.
जसे आदिमानवापासून आजवर आपली खाद्यसंस्कृती बदलत आली आहे तेच या जनावरांचेही झाले असावे.

हे वाचा. लेखात गाईचे दुधाबद्दल लिहिले आहे. पण म्हशीच्या दुधाला सुध्दा हे applicable असणार कारण म्हशीच्या दुधात तर जास्त fat content असतंय. आणि lactose intolerance चा पॉईंट

https://www.pdsa.org.uk/what-we-do/blog/vet-qa-can-cats-drink-milk

आमच्या बिल्डींगमध्ये एकाने पाळलेला पिंकूडा नावाचा फेमस बोका होता. त्याला रोज रात्री चायनीज चिकन मंचाऊ सूप प्यायला द्यायचे. हि तेव्हाची गोष्ट जेव्हा मुंबईत नुकतेच चायनीज गाड्यांचा सुळसुळाट झालेला. आम्ही आमच्या शाळेच्या पॉकेटमनीतील पैसे साठवून वन बाय टू सूप प्यायचो. तेव्हा हा बोका ते रोज प्यायचा म्हणून आमचा जळफळाट व्हायचा Happy

.

ओह
माऊंना दूध देऊ नये ऐकून एकदम कल्चरल धक्का बसला.मी आमच्या इथलया माऊंना सांगत असते पाली खा म्हणून.एक दोन वेळा हाताने दाखवली पण(खरं सांगतेय.).पण अजीबात बघत नाहीत.
उंदीर खाताना पण कधी दिसल्या नाहीत.कबुतरं मात्र खात असतात.

ऑ, पाली खात नाहीत मांजरे ? आमचा पहिला बोक्या आणि आत्ताचा ही फिशफिश कुडूम कुडूम पाली खातो. वर जे लिहिलंय ना ,ते देवघरासमोर म्हणूनच जाऊन बसतो ,फ्रेम मागुन किंवा छोट्या डब्याडुब्या मागूम कुठून पाल बाहेर येतेय का म्हणून. एकूण एक।पाली गायब आहेत आता. सध्या पावसाने छोटी बेडकं पण येतात अंगणात ती पण खातो.
पहिला बोक्या कोफी प्यायचा आवडीने . मी पीत बसले की शेजारी येऊन म्याव म्याव सुरू. आत्ताच्या ला नाही आवडत.
खारुताई प्रचंड आवडते त्याला. ती कठड्यावर सहकुटुंब येऊन खाऊ खात असते तेव्हा खिडकीतुन एकटक आवाज न करता बघत बसलेला असतो. मागे शेपटी प्रचंड खुशीत हलत असते.

Pages