भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समीरची पोस्ट वाचून आठवलं, एका कॅट्स ग्रूपवर कुणीतरी एशियाटिक लिली मांजरांसाठी फेटल असू शकतात लिहिलं होतं.

खरं तर त्या भागात ही झाडं सर्रास दिसतात, व्हेटनं किंवा शेल्टरनं आधी माहिती द्यायला हवी.

क्यूट आहे

माऊई आणि सिलू एकाच जातीचे का ?

कसला स्टायलिश दिसतो सिलू! एकदम ब्रिटिश अ‍ॅक्सेन्ट मधे भुंकेल असे वाटते >>> Happy अगदी अगदी

अमृताक्षरः खूप क्यूट आहेत पाहुणे! Happy

सिलू एकदम स्टायलिश आहे.एखादा हॉलिवूड हिरो वाटतो.
अमृताक्षर सर्व नवे पाहुणे क्युट आहेत.त्यांची खाण्यापिण्याची काही व्यवस्था करतायत का आजूबाजूचे?

ओडीन महाशयांनी काल लावून घेतलं आहे काहीतरी
सकाळपासून खूपच लंगडत होता, पाय चेक केला तर पावलांच्या गादीचा एक टवका निघाला होता. ते सालट नेलकटर ने कापून स्प्रे मारला. तरीही बिचारा पाय टेकवू शकत नव्हता
परत पॉटी ला जायचा प्रॉब्लेम
तर चिरंजीवांना उचलून नेलं बाहेर शु करवली आणि परत उचलून आणलं
28-30 किलोचा आमचा गोळा, त्याला उचलून नेणे म्हणजे कसरत होती, बर त्यात तो स्वस्थपणे कडेवर बसत नाही, गाल चाट, कान चाट असल्या लाडात येतो

आणि कहर म्हणजे घरी येऊन बॉल दिसला तर खेळायला लागला छान
म्हणलं अरे ढेकळ्या हे तुला दोन मिनिटापूर्वी नव्हतं येत का करायला
तेव्हा अगदी तोंड गरीब करून बसलेला

कालचा दिवस तसा झोपूनच होता पण, आम्हीही भरपूर विश्रांती दिली, अधून मधून स्प्रे मारत राहिलो
मला त्याला टवका उडाला त्यापेक्षाही पाय लचकला असावा असे वाटत होते कारण उठता बसताना त्याची हालचाल विचित्र होत होती

ओडीन ला लागलं म्हणल्यावर किमान तीन चार जण चौकशी करून गेलेत, कसा आहे तो, बरा आहे का, व्हेट कडे नेलं का

म्हणलं आम्हाला कधी आलं नाही कोणी विचारायला Happy

आता छान आहे, मस्त चिकन हादडून झोपलाय
आजही त्याला फार हालचाल नाहीच करू देणारे

आणि कहर म्हणजे घरी येऊन बॉल दिसला तर खेळायला लागला छान
म्हणलं अरे ढेकळ्या हे तुला दोन मिनिटापूर्वी नव्हतं येत का करायला
तेव्हा अगदी तोंड गरीब करून बसलेला>>>>> Lol

एकटीच हसत बसलेय.

अर्रर्र बिचारा ओडीन ..
आशुचँप, तुमची लिहायची शैली मजेशीर आहे. ओडीनच्या करामती आणि उपद्व्यापांवर ' ओडीन डायरी ' प्रकारचे स्फुट किंवा स्वतंत्र लेख छान लिहाल! Happy

धन्यवाद चंद्रा आणि प्रज्ञा

ओडीन डायरी लिहायला हरकत नाहीये

मला असं वाटतंय की ओडीच्या नजरेतून आपण असे लिहावं
की त्याला काय वाटत असेल या सगळ्या घटनांबाबत

मला असं वाटतंय की ओडीच्या नजरेतून आपण असे लिहावं
की त्याला काय वाटत असेल या सगळ्या घटनांबाबत >> ही तर एकदम भारी कल्पना आहे!!

अरे वा बरा झाला का पाय. हे चार पायाचे कुत्रे एक पाय वर घेउन लंगडत चालतात तेव्हा मला पण फार वाइट वाट्ते. माझ्या इथे जे चार स्ट्रे आहेत दोन मुली दोन मुले त्यातली एक मुलगी राणी पॅक लिडर आहे व माझी जानी. सध्या रोज खाली गेले की जिथे असेल तिथे बसकण मारून तिचे लाड करावे लागतात १५ मिनिटे. मग तिला कावळा दिसला की पटकन उठून पळून जाते.

दुसरी लेकुर वाळी झाली आहे तिच्याशी ही भांडते उगीच. लेकुरवाळीला डॉग ट्रीट फार आवडतात. दिले की छान दूर जाउन खात बसते.

दोन मुलगे त्यातला एक हाडाचा किवा शेपटीचा गरीब आहे अगदी. एक एक कान कायम पडलेला असतो. आणी दुसरा जरा चौकस आहे व कायम इजा करून घेत असतो. त्याला असा हा पायाचा प्रश्न झाला होता एकदा. बघू पण देइना. परवा खूप दिवसांनी दिसला तर डोळ्याला जखम
अंग हाडकलेले. मी दिसल्यावर अगदी आईच्या पोटात डोके खुप सावे तसा जवळ आला. नाही तर एरवी टेचात असतो. पण ही जखम आठवड्या भरात भरून आली.

मेल कुत्र्यांच्या मारामार्‍या फारच भयानक असतात. व टोकदार नखाने डोळे फोडले. की तो कुत्रा जवळ जवळ बादच होतो. कारण अन्न कसे शोधणार व जगण्यातले धोके कसे दिसणार. मग ही कुत्री बसखाली कार खाली लपून अंधारात बसतात व हळू हळू उपासमारीने मरून जातात.
ह्याचे असे होते कि काय म्हणून मी हपिसात रडून घेतले.

पण आता सध्या नीट दिसतो आहे व डोळे पण सुरक्षित आहेत. कुत्र्याला जगायला सर्व ज्ञानेंद्रिये व हात पाय परफेक्ट व्यवस्थित असले कीच बेस्ट जमते. नाहीतर सर्वायवल अवघड आहे.

मला असं वाटतंय की ओडीच्या नजरेतून आपण असे लिहावं की त्याला काय वाटत असेल या सगळ्या घटनांबाबत >>>> ही मस्त आयडीया आहे! मला ओडीन बद्दलच्या एकूणच पोस्ट कथा किंवा फिक्शनच्या शैलीतल्या वाटतात (सायकलिंग सिरीजच्या शैलीपेक्षा खूपच वेगळ्या).. म्हणजे त्या वाचताना मुख्य प्रसंगापेक्षा त्या गोष्ट सांगण्याच्या पद्धतीने जास्त गंमत येते. प्रत्यक्षापेक्षा प्रतिम उत्कट की काय म्हणतात तसं... त्यामुळे ह्या डायरी फॉर्ममध्ये लिहिल्या की अजून भारी होतील.

आशुचँप, तुमची लिहायची शैली मजेशीर आहे. ओडीनच्या करामती आणि उपद्व्यापांवर ' ओडीन डायरी ' >>> भारी आयडिया आहे. मजा येईल वाचायला.

आयफोन वरून फोटो अपलोड कसे करायचे? पुर्वी एकदा केले होते पण आत्ता आठवत नाहीये आणि म्हणून जमत नाहीयेत! प्लिज सांगा.

@ समीर ... धन्यवाद ... माझ्याही बागेत हे झाड आहे .तुमचा अनुभव वाचून मी ती कुंडी ऑफिस मध्ये शिफ्ट केली
सीलू फारच गोड आहे .

ओडीन डायरी लिहायला हरकत नाहीये

मला असं वाटतंय की ओडीच्या नजरेतून आपण असे लिहावं
की त्याला काय वाटत असेल या सगळ्या घटनांबाबत

नवीन Submitted by आशुचँप on 31 July, 2021 - 21:10

नक्कीच लिहा आवडेल वाचायला

सुधा मुर्ती ह्यांचं गोपीच्या( Labrador) नजरेतुन लहान मुलांसाठी पूस्तक लिहिले आहे
20210802_150914.jpg

प्रयत्न करतोय

ओडीन डायरी
दि 1 ऑगस्ट

आज संध्याकाळी बाबा सोबत बाहेर फिरायला निघालो तर समोरून चेरी येताना दिसली. माझी फ्रेंड. मी आनंदाने उड्या मारत गेलो तर भुंकायला लागली. मला काही कळलंच नाही, मी आपला सांगतो, अगं मी ओडीन, तरी चिडली मग मी नाद सोडला आणि पुढे जायला लागलो
बाबा म्हणतो बायकांचा मूड कधी बिनसेल सांगता येत नाही, खरेच असेल कदाचित
पण म्हणून बाबाला सगळं कळतं असे नाही. उदा फिरायला जाताना त्याला वाटतं की मी सरळ रेषेत, मान वरती ठेऊन असं रुबाबात फिरावं. पण त्याला हे कळत नाही प्रत्येक खांबावर, कारच्या चाकावर, भिंतीवर आणि झाडावर बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या वाचून अर्थ लावायचा असतो मला. आणि शु करून माझी टेरीटरी मार्क करायची असते. नैतर बाहेरच्या भुभुना कळणार कसे की ओडीन इथे राहतो आणि इथून त्याची हद्द सुरू होते.
मी शु करायचं म्हणलं की म्हणतो सारखी किती रे शु करतो, एकाच वेळी सगळी का करत नाही, सगळीकडे शिंपडत जातो.
त्याला मी एकदा शांतपणे बसून हे समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही कळलंच नाही.
आज इतका का भुंकतोय, त्रास होतोय का असे म्हणून च्यु स्टिक दिली आणि शांत बस म्हणाला थोडा वेळ.
आता काय बोलणार या माणसाला

मी घरी त्याच्या मागे मागे हिंडतो तेही त्याला आवडत नाही. तो टॉयलेट ला गेला मी दारात जाऊन बसतो आणि मग मला म्हणतो मी काय आता खिडकीतून उडी मारून पळून जाणारे का?
अरे म्हणलं मी शु करतो, पॉटी करतो तेव्हा समोर उभा राहून बघतोस. पॉटी बदलली असेल तर पोट बिघडलं आहे आज ओडीन चे त्याला दही द्या, चिकन नको म्हणून सांगतो
मग मलाही त्याच्या तब्येतीवर लक्ष द्यायला नको का?

बाबाला ऐकूही तसे कमीच येते. बाहेरून गाडी गेली, शेजारचे गेट उघडून आले, पत्र्यावर मांजर उडी मारून आलं किंवा रस्त्यावरून भटके भुभु चालले आहेत यातलं त्याला काही म्हणजे काही ऐकू जात नाही. तो बिचारा आपल्या नादात असतो. मग मी माझं कर्तव्य म्हणून सगळं त्याला सांगायला जातो तर माझ्यावरच ओरडतो
ओड्या आवाजाने कान किटले माझे, प्रत्येक गोष्टीवर भुंकल पाहिजे का?
घ्या म्हणजे मदत करतोय ते कुठेच गेलं
अवघड आहे

ओडीन डायरी
पुढे चालू

मला माझ्या लहानपणीचे काही आठवत नाही पण मी आईचे दूध पिताना माझ्या भावना बहिणीशी मस्ती करायचो आणि नंतर एकमेकांना चावा चावी करत दमून एकमेकांच्या अंगावर झोपी जायचो. कसले मस्स्त दिवस होते.
माझ्या खऱ्या बाबांना मी कधी पाहिले नाही पण ते चॅम्पियन आहेत असे सगळे म्हणतात. मी त्यांच्यावर गेलोय म्हणे. म्हणजे मलाही चॅम्पियन व्हायला हवं.
आताचा बाबा मला बघायला आलेला तो दिवस पण आठवतोय. आई पण होती सोबत. आम्ही ते दारातून आत आल्यावर कोण आलंय म्हणून पळत आलो तर आई किंचाळून बाहेरच्या बाहेर पळून गेली. पण बाबा शूर होता तो काही पळाला नाही. तो उलट मांडी घालून खाली बसला. मग आम्ही सगळ्यांनी त्यावर हल्ला केला. याला पार आडवा करू असे म्हणत आम्ही सात आठ जण तुटून पडलो तर तो गुदगुल्या झाल्यासारखा हसायला लागला.
मग आईची कुमक आली पण झालं उलटंच. बाबाने तिला मानेला, गळ्याला खाजवायला सुरुवात केली आणि आई पघळली. मी तिला सांगत होतो की अटॅक कर तर उलट ती त्याला चाटायला लागली.
मी म्हणलं आता आपल्यालाच अटॅक करावं लागणार म्हणून जोरात त्याचा पायाचा अंगठा चावला तर त्याने मला उचलूनच घेतले.
मी अधांतरी असतानाच त्याने मला उलटा पालटा करून तपासले. माझे कान, पंजे, शेपूट, फर
मी फिस्करून सांगत होतो मला खाली ठेव नैतर तुझी खैर नही पण तो म्हणाला मला हे पिल्लू आवडलं. मी याला घेतो.
मग आईच्या बाबांनी माझ्या गळ्यात रिबीन बांधली आणि म्हणाले अजून दूध पितोय तो, थोडा मोठा झाला की घेऊन जा.
मला काही कळलं नाही पण कुठेतरी घेऊन जाणार हे कळलं आणि मी त्या रात्री आईला जास्तच बिलगून झोपलो

मस्त लिहिलंय आशु.
हे वाचताना मला ओडिन चे डोळे दिसतायत समोर, त्याचा फक्त फोटो पाहिला असला तरी.

Pages