मित्रांना पिकनिकला टांग कशी द्यावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2021 - 10:38

गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.

तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात Happy

तर आता जे मित्र अजूनही एकमेकांच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आहेत त्यांच्या महिन्या दर महिन्याला मैहफिली रंगतच असतात. पण सर्व वर्गातल्या पोरांची मिळून वर्षाला साधारण एखादी किमान वन नाईट स्टे करायची पिकनिक निघते. गेले सहा सात वर्षे हे चालत आलेय. दर पिकनिकला साधारण तीस चाळीस जण असतात.
मी माझ्या क्लोज ग्रूपच्याच शालेय मित्रांनाच साधारणपणे वर्षातून एकदा भेटतो. पण पुर्ण क्लासची जी पिकनिक निघते त्यात आजवर एकदाही गेलो नाही.

सुरुवातीला एक दोन वर्षे कोणी काही म्हटले नाही. पण तिसर्‍या वर्षापासून मित्रांच्या लक्षात येऊ लागले की बाकी सारे एकदा ना एकदा तरी पिकनिकला आले आहेत. पण हा रुनम्याच अजून एकदाही आला नाही.

ग्रूपमधील निम्मी मुले परदेशात आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर. तरी ते सुद्धा एक दोन वर्षा आड का होईना त्या काळात भारतात/ मुबईत येऊन पिकनिकला उपस्थिती नोंदवून गेली आहेत. मग यालाच का जमत नाही असे त्यांना वाटत असल्याने मला दरवर्षी न जाण्याचे काहीतरी दणदणीत कारण द्यावे लागते.

यावर्षी तर ठरवून त्यांनी चार महिने माझ्या मागे लागून लागून माझ्याकडे कुठला पर्यायच राहणार नाही हे पाहिले. तारीख वेळ स्थळ काळ सारे काही माझ्या मतानुसार सोयीनुसारच ठरवून घेतले. सुरुवातही माझ्याकडूनच काँट्रीब्यूशन घेऊन केली. आणि बघता बघता पिकनिक तोंडावर आली तसे आता खरेच जावे लागणार या विचाराने मला टेंशन आलेय.

भरलेले पैसे गेले तरी चालतील. अर्थात ते नंतर मला परत करतीलच. माझ्याच शाळेचे संस्कार आहेत, कोणाचा फुकटचा एक पैसा खाणार नाहीत.

पण आता आयत्या वेळी काय कारण देऊ जे त्यांना निरुत्तर करेल. वा झाल्यास तेच मला म्हणतील बघ मग नसेल जमत तर नको येऊस...

तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड.
मुलांना वॅक्सिन दिले नाहीये हा धोका.

तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता? >> मित्रांना टांग द्यायला लागावी हा विचार येतोय हेच सांगून टाक. तुझी पण सुटका नि त्यांची पण Wink

ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात. -------- यातून च तू किती अत्याचार करतो आहेस हे दिसून येते.. बिचारे फ्रेंड्स

Medical certificate देऊ का ?

फोन करून तू अगदी उत्साहाने सांग , तू येणार म्हणून आणि चार वेळा जोरात शिंक नैतर खोक

मग ते स्वतःच नको म्हणतील तुला

सॉरी हि तळटीपच द्यायला हवी होती - कोरोनाचे कारण त्यांनी आधीच बाद ठरवले आहे. तुझी टेस्ट करू म्हटले. पण तुला यंदा नेणारच म्हणताहेत Sad

ज्यांना ते निबंध म्हणतात. -------- यातून च तू किती अत्याचार करतो आहेस हे दिसून येते.. बिचारे फ्रेंड्स
>>>>
अत्याचार Happy हो, शाब्द्दिक अत्याचार, ते मी करतोच, मला ते ग्रूपचा ओशो म्हणतात कारण मी तत्वज्ञानाचे फंडे देत असतो ग्रूपवर.
(ती गोष्ट वेगळी की ओशो कोण आहेत आणि काय करतात हे मला माहीत नाही. फक्त नाव ऐकलेय)

..

मित्रांना टांग द्यायला लागावी हा विचार येतोय हेच सांगून टाक.
>>>>>
हे त्यांनाही माहीत आहे मी टांग देतो. म्हणूनच अडकवलेय मला. त्यातूनही कारणाशिवाय दिली तर ग्रूपवर माझ्याशी पुन्हा कोणी कधी धड बोलणार नाही Sad

तुला भरपूर थापा मारता येतात की. तूच सांगितले आहेस हे ठिकठिकाणी. त्यातळया मार 4-5

नाही तर सांग घरचे पाठवत नाहीयेत. तुला हसले तर स्त्री पुरुष समानता, मुलांना सन्मानाने वागवावे , आई वडिलांचं मन राखणं हाच खरा पुरुषार्थ वगैरे टाईप्स 15 -20 ओळींच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगायची सोय होईल तुझी.

नाही आवडत. मी माणूसघाणा आहे असेही म्हणू शकता. वा तसे असेलही.

तुम्ही खरंच माणुसघाणे असाल तर त्यांना सांगून टाका की त्यांच्याबरोबर जायला आवडत नाही म्हणून.
सोशल मीडियावर चर्चा (?) करणं प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा जास्त आवडतं म्हणून सांगून टाका. हाकानाका

मला तुमच्या बरोबर येण्यात इंटरेस्ट नाही. तुमच्याशी बोलायला आवडतं, त्यामुळे वाळीत टाकू नका. प्रत्यक्ष भेटण्यात आणि तुमच्या बरोबर इतका वेळ दवडण्यात इंटरेस्ट नाही/ त्याहुन जास्त प्रायॉरिटीची कामं आहेत.

एक मार्ग आहे. व्यत्यय म्हणतात तसे वाढवून एक छान निबंध टाकून ग्रुप मधून लेफ्ट व्हायचे. तसेही जाऊ वाटत नाही यासाठी इथे तिथे विचारणे म्हणजे इतर लोकांना बिन कामाचे धंद्याला लावणे आणि मग मजा घेणे आहे. तर त्या निबंधात ही आजारी वृत्तीची मजा समाविष्ट करून खरे ते बोलून टाक. सोबत याच आजारीपणामुळे निबंध टाकणे आणि तुमची मजा घेणे या केवळ एकमेव कारणासाठी या ग्रुप मध्ये होतो, मैत्री बित्री झुट असे चेरी ऑन केक सांगून टाक. मग मित्र नक्कीच त्रास देणार नाहीत. Happy

जुलाब ऐनवेळवर होऊ शकतात निघण्याच्या दोन तास आधी पासूनही.
>>>>
जवळपास दोनचार मित्र आहेत जे घरावरून गाडी काढू शकतात. हे कारण दिले तरी ते वास काढत येणारच. त्यांना माझा सोक्षमोक्ष लावायचा आहेच. उगाच मग अति नाटक नाटक खेळावे लागेल. त्यातही त्यांनी म्हटले, चल तरीही. मध्ये लागली तर गाडी थांबवतो आम्ही आणि तिथे हॉटेलवर सारी सोय आहे तर लटकलो Sad

तुला भरपूर थापा मारता येतात की. तूच सांगितले आहेस हे ठिकठिकाणी. त्यातल्या मार 4-5
>>>>>
छे, एखादी मारता येते, जशी की हिच वरची. ती सुद्धा बरेचदा पकडली जाते.

नाही तर सांग घरचे पाठवत नाहीयेत. तुला हसले तर ....... >>>>>>>> आजवर हेच सांगत आलोय. आणि त्यांचे हसूनही झालेय. आधी बायकोच्या दावणीला बांधलेला बैल म्हणून चिडवून झाले, मग सहानुभुती व्यक्त करून झाली, मग चिडून आता आम्हीच तुझ्या बायकोशी बोलायला येतो की का आमच्या मित्राला सोडत नाही अशी धमकीही देऊन झाली..
त्यामुळे आता हे कारण आणखी खेचले तर मग ते बायकोला खरेच फोन करतील की मग फसलो.
कारण बायकोच बोलतेय जा जा जा... मग खरेच माझे कबूतर होईल Sad

तुम्ही खरंच माणुसघाणे असाल तर त्यांना सांगून टाका की त्यांच्याबरोबर जायला आवडत नाही म्हणून.
>>>>>>
प्रॉब्लेम तोच आहे. लोक माणूसघाण्या लोकांना समजून घेत नाहीत Sad
माणूसघाण्या वा एकांतप्रेमी माणूस म्हणजे ज्याला मित्रांची गरज नाही, मैत्रीची कदर नाही, हा नीच अप्पलपोट्या स्वार्थी माणूस आहे असे समजू लागतात...
बाकी सारे खरे खोटे आरोप मी सहन करेन, जसे की रुनम्या खोटे बोलतो, जुगार खेळतो, धागे काढतो, भारंभार प्रतिसाद देतो.. पण रुनम्या नीच नाहीये रे Sad

खोटा आरोप म्हणून पण तू ॠन्मेSSष दारू पितो हे सहन करणार नाहीस का?? Wink Happy

असो, काहीतरी चांगली थाप/सबब सापडू दे यासाठी शुभेच्छा!!

मी काय म्हणते, एकदा जाऊनच ये. आवडेल नक्की. मग मित्र सबबी शोधायला इथे धागा काढतील की ‘ऋन्मेषला पिकनिकला नाही कसं म्हणु? सारखा सारखा पिकनिका काढतोय‘. Proud Proud Proud

जुलाब ऐनवेळवर होऊ शकतात निघण्याच्या दोन तास आधी पासूनही.>>>>हे कारण दिले तरी ते वास काढत येणारच. >>अवघड आहे.

सुनिधी, +१
एकदा कधीतरी ही भिंत तोडा. हे सगळे मित्र फक्त सोशल मीडियावरचेच नाहीत ना? प्रत्यक्षातही त्यांची भेट अनेकदा झाली असणार ना? मग काय समस्या आहे? शांतपणे कोपऱ्यात बसूनही आनंद घेता येतो. दारू सिगारेटला नकार देता येतो. तुम्हांला ते आवडत नाही हे त्यांना माहीतच असणार. खरं तर माध्यमांमध्ये इतक्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या म्हणून मांडल्या आहेत की आता लपवण्यासारखं आणि खरी बाजू उघड होईल म्हणून दूर राहाण्यासारखं काही उरलेलंच नसावं. आणि एकदा तुम्हांला
पिकनिकला नेऊन आणलं की ' जिंकलो ' म्हणून नंतर मित्र मागे लागणार नाहीत.

टांग देण्यासाठी तुम्हाला एक टांग आधी उपलब्ध करून द्यावी लागेल. एखादी जयपूर स्टाईलची लाकडी मिळते का बघा. आता बाजारात अनेक अत्याधुनिक टांगा आल्या आहेत. त्यातल्या त्यात स्वस्त निवडून घेऊन मग त्यांना पिकनिकला जाताना देऊन टाका. हाय काय नाय काय!

या धाग्याची लिंक त्यांना पाठवा. तुमची न जाण्याची खटपट आणि माबोकरांचा (प्रतिसादरूपी) पाठिंबा बघून ते ऐकतील तर तुमचे काम होऊन जाईल. तरीही मागे लागले तर इथे दिलेले कोणतेही कारण देता येणार नाही.
योग्य उपाय म्हणजे प्रमाणिकपणे आणि स्पष्टपणे नकार देणे.

कोविडचा धोका संपलेला नसताना वेगवेगळ्या घरातल्या, रोज एकमेकांना न भेटणाऱ्या तीसचाळीस जणांनी एकत्र येऊन पिकनिक काढणं चुकीचं आहे. हे योग्य कारण आहे न जाण्याचं.

वावे अगदीच सहमत.
असे धंदे करायचे मग मोठी लाट आली की सरकारला दोष द्यायचा.

मित्रांना टाळण्याचा एवढा आटोकाट प्रयत्न चाललाय तर कसला Inferiority Complex (न्यूनगंड) आहे का ते हवं तर एकदा तपासून बघा.

Pages