मित्रांना पिकनिकला टांग कशी द्यावी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 29 July, 2021 - 10:38

गूगल केले, पण काही सापडले नाही.
म्हणून म्हटले मायबोलीवर आपणच एक धागा काढूया. जेणेकरून पुढे हा प्रश्न कोणाला उद्भवल्यास त्याने गूगल केल्यास तो निराश होऊ नये.

तर झालेय असे,
शालेय वर्गमित्रांचा व्हॉटसपग्रूप आहे. साठ पोरे आहेत. तीस तुफान सक्रिय असतात. दिवसाला जवळपास हजार मेसेज पडतात. ज्यात पाच पन्नास पोस्ट माझ्याही असतात. ज्यांना ते निबंध म्हणतात Happy

तर आता जे मित्र अजूनही एकमेकांच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आहेत त्यांच्या महिन्या दर महिन्याला मैहफिली रंगतच असतात. पण सर्व वर्गातल्या पोरांची मिळून वर्षाला साधारण एखादी किमान वन नाईट स्टे करायची पिकनिक निघते. गेले सहा सात वर्षे हे चालत आलेय. दर पिकनिकला साधारण तीस चाळीस जण असतात.
मी माझ्या क्लोज ग्रूपच्याच शालेय मित्रांनाच साधारणपणे वर्षातून एकदा भेटतो. पण पुर्ण क्लासची जी पिकनिक निघते त्यात आजवर एकदाही गेलो नाही.

सुरुवातीला एक दोन वर्षे कोणी काही म्हटले नाही. पण तिसर्‍या वर्षापासून मित्रांच्या लक्षात येऊ लागले की बाकी सारे एकदा ना एकदा तरी पिकनिकला आले आहेत. पण हा रुनम्याच अजून एकदाही आला नाही.

ग्रूपमधील निम्मी मुले परदेशात आहेत. तर काही महाराष्ट्राबाहेर. तरी ते सुद्धा एक दोन वर्षा आड का होईना त्या काळात भारतात/ मुबईत येऊन पिकनिकला उपस्थिती नोंदवून गेली आहेत. मग यालाच का जमत नाही असे त्यांना वाटत असल्याने मला दरवर्षी न जाण्याचे काहीतरी दणदणीत कारण द्यावे लागते.

यावर्षी तर ठरवून त्यांनी चार महिने माझ्या मागे लागून लागून माझ्याकडे कुठला पर्यायच राहणार नाही हे पाहिले. तारीख वेळ स्थळ काळ सारे काही माझ्या मतानुसार सोयीनुसारच ठरवून घेतले. सुरुवातही माझ्याकडूनच काँट्रीब्यूशन घेऊन केली. आणि बघता बघता पिकनिक तोंडावर आली तसे आता खरेच जावे लागणार या विचाराने मला टेंशन आलेय.

भरलेले पैसे गेले तरी चालतील. अर्थात ते नंतर मला परत करतीलच. माझ्याच शाळेचे संस्कार आहेत, कोणाचा फुकटचा एक पैसा खाणार नाहीत.

पण आता आयत्या वेळी काय कारण देऊ जे त्यांना निरुत्तर करेल. वा झाल्यास तेच मला म्हणतील बघ मग नसेल जमत तर नको येऊस...

तुम्ही मित्रांना पिकनिकला टांग द्यायला काय कारणे देता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठाय ??? कुठाय ???? कुठाय ????

यात पाऊस, घाट, बशी, कार, टेंपो, मित्र, त्यांनी आणलेले पदार्थ, घाटावरचा भणाण पावसाळी उत्तेजक वारा, धबधबे, कणसे, चहा सग्ळ सग्ळ सामिल करायचे आहे. मध्ये मध्ये दरडी, डोंगर पण घालायचे चवीला.

मानेवर कामाचा डोंगर असताना मित्रांबरोबर डोंगर चढायला गेलेलो.
आता परत आल्यावर मान वर करायला ऊसंत नाहीये.
अजून ग्रूपवर शेअर झालेले पिकनिकचे सारे फोटो आणि विडिओ सुद्धा पाहिले नाहीयेत, फेसबूक आणि व्हॉटसप स्टेटसवर शेअर करणे दूरची गोष्ट.. तरीही त्या आधी ईथे वृत्तांत लिहीणार हे नक्की...
कारण हि माझ्यासाठी नेहमीसारखी नुकतीच एक मजा करायची पिकनिक नव्हती. आयुष्याकडे बघायचा आणि जगायचा दृष्टीकोण बदलणारे होते हे दोन दिवस.. बरेच काही साचलेय मनात. ते वेळीच कागदावर उतरवावे, त्याची एक वेगळीच मजा असते.

काय हे तुम्ही लोक दोन दिवस ऋन्मेश च्या प्रतिसादाची चातकासारखी वाट बघताय. येऊन जाऊन कुठे आहे ऋन्मेश, पिकनिक ला गेला काय, चौकश्या करताय आणि त्यालाच अटेंशन सिकर म्हणताय. आता तो सविस्तर वृतातं देतो म्हणतो तर पळताय कशाला. कोणी किती बोललं तरी त्याने वृत्तान्त टाकला की प्रतिसादाच्या उड्या पडणारच आहेत. ऋ तू दे रे सविस्तर वृत्तान्त आम्ही वाचतोय.

कोविडच्या काळात कारणे काय शोधतात? एक दोन शिंका मारत , नक्की येइन असे सांगा. थोडा ताप आहे पण काही केल्या चुकवणार नाही मग
कोविड असेल तरी बेहत्तर असे कळवा. तेच तुमच्या मागे घरी राहण्याची विनंती करतील.

आयुष्याकडे बघायचा आणि जगायचा दृष्टीकोण बदलणारे होते हे दोन दिवस..
परवाच गॉर्डन राम्से, मी आणी हरपाल सोख्खी बरोबरच्या कॉलमधे म्हणाला की टीव्ही प्रोग्रम्समधे शेफांची पिसं काढुन कंटाळा आलाय, मी पण भारतात येवुन "आयुष्याकडे बघायचा आणि जगायचा दृष्टीकोण बदलणारे होते हे दोन दिवस" जगायचा विचार करतोय.

जाऊनच यायचं होतं तर मग धाग्याचा मेन उद्देशच गेला ना उडत? कशाला फुकाचे सल्ले मागितले? I only have the answer- कारण तो ऋ आहे ..

प्रसंग, टाईमलॅप्स, खाणे, फिरणे कितीजण्/जणी, जागा, कर्म आणी यात कुठे गॅप राहु नये याची जुळवाजुळव चालली आहे.
थोडा धीर धरा.
Submitted by जेम्स बॉन्ड on 2 August, 2021 - 17:55

यात पाऊस, घाट, बशी, कार, टेंपो, मित्र, त्यांनी आणलेले पदार्थ, घाटावरचा भणाण पावसाळी उत्तेजक वारा, धबधबे, कणसे, चहा सग्ळ सग्ळ सामिल करायचे आहे. मध्ये मध्ये दरडी, डोंगर पण घालायचे चवीला.
Submitted by रश्मी. on 2 August, 2021 - 18:52

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

माझी आजवरची ईमेज पाहता मी पिकनिकला जातोय हिच थाप मारली असेल असे तुम्हाला वाटत असेल तर त्यात काही गैर नाहीये. ईटस ऑके.
पण मी खरेच पिकनिकला गेलेलो. वृत्तांत खालील लिंकवर टाकला आहे.
https://www.maayboli.com/node/79682
जरूर वाचा. वाचून पटल्यास आणि संशय दूर झाल्यास प्रामाणिकपणे क्लीन चीट दिल्यास आवडेल Happy

अरे बाबा निवांत वाचते. Proud उलट गेला आहेस हेच बरे केले. प्रत्येक दिवशी नवा खुराक घेऊन डोक्याची मंडई करण्यापेक्षा आपल्या लोकांबरोबर पावसाळी निसर्ग अनुभवने हाच खरा आनंद आहे. Happy

पुण्यात हडशी ला जाऊन आम्ही तो अनुभवलाय.

https://www.whatshot.in/pune/head-to-hadashi-a-cutesy-hill-station-just-...

आपल्या लोकांबरोबर पावसाळी निसर्ग अनुभवने हाच खरा आनंद आहे.
>>>>>>
हे मात्र अगदी खरे. फक्त माझ्यासाठी आपल्या लोकांमध्ये कुटुंबच येत होते ईतकेच. आता शालेय मित्रही जोडले गेले.
आजही मी सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत मुलीबरोबर आमच्या वाशीच्या मिनी सी शोअरला पावसाळी चक्कर टाकून आलो. बारीक बुंदाबांदीत भिजून आलो. या वातावरणाचे प्रचंड वेड आहे.. फक्त मला आवडीचीच लोकं सोबत द्या किंवा एकांत द्या.

ते हडशी सुद्धा छान दिसतेय, फक्त आता आमची पुढची ट्रिप मुंबईपासून कमी ट्रॅवलिंगचीच काढायची असे ठरलेय.

Pages