ऑनलाईन शिक्षणासाठी घरगुती प्रिंटर कुठला घ्यावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2021 - 06:44

ऑनलाईन शिक्षणासाठी घरीच वापरायला म्हणून प्रिंटर घ्यायचा आहे.
कुठल्या टाईपचा, फीचर्सचा, ब्रांडचा प्रिंटर घ्यावा हे प्लीज सुचवा.

मुलांना नोटस देतात ज्या सध्या टॅब वा लॅपटॉपवरच वाचाव्या लागतात. तो स्क्रीन टाईम वाचवायला प्रिंटर घ्यायचा आहे. तसेच एकदा प्रिंट केले की त्या नोटस पुन्हा पुन्हाही वाचता येणे शक्य आहे. नंतर ईतरांना शेअरही करता येतील. एकूणात बराच स्क्रीन टाईम कमी होईल.

सध्यातरी कलर प्रिंटर घ्यायचा आहे हे नक्की आहे. बाकी काय काय फीचर्स गरजेचे पडू शकतील भविष्यात याची सध्या कल्पना नाही मला. झेरॉक्स स्कॅनर वगैरे एकत्र असलेला घ्यावा का? की आणखी काही?

ईथे कोणी मुलांसाठी घेतला असेल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडची चर्चा वाचून आमचा ही विचार तूर्तास लांबणीवर टाकलाय.
सध्या सगळे व्यवहार online होत असल्याने गरज वाटत नाहीये

घरात प्रिंटर नसताना आपण महिन्यातून बाहेरून किती प्रिंट्स काढून आणल्या, गेल्या वर्षभरात याचा हिशेब करा.
महिना सरासरी किमान ५० प्रिंट्स असतील तर प्रिंटर घ्या.

अर्थात काही कारणांस्तव वेगळी निकड असू शकते ती गोष्ट वेगळी.

पेपर जाम झालाय ते पोरा सोरांवर सोडू नका पेपर खेचून काढायला, किंवा स्वतःही पोरा सोरां सारखे तो खसाखस खेचून काढु नका. आत एक तुकडा अडकला की प्रिंटर पेपर जामची एरर देत रहातो.
प्रिंटरचे कप्पे उघडून नीट ग्रीप घेऊन पेपर काढणे, कुठले रोलर फिरवून काढणे वगैरे प्रिंटर घेताना शिकून घ्या. याउपरही योग्य प्रकारच्याच आणि साईझच्याच स्क्रूड्राइव्हर्सने (एका पेक्षा अधिक लागू शकतात) प्रिंटर नाजूकपणे उघडून अडकलेला तुकडा काढुन तो परत नीट बंद करता आला पाहिजे. (बहुतेक लोक चुकीच्या प्रकारचे/साईझचे टूल्स वापरून स्क्रूज हेड, नट्सचे कंगोरे खराब करून टाकतात, मग ते योग्य प्रकार/साईझच्या टूल्स ने ही काढता येत नाहीत.)
किंवा अशी सर्व्हिस देणारा हाकेच्या अंतरावर तरी असावा.

प्रिंटर हेड/नॉझल क्लिन करण्याची utility असते, प्रिंटर वरील बटणे दाबून किंवा संगणकावरील प्रिंटरच्या सॉफ्टवेअर मधुन. याव्यतिरीक्त कधी ते प्रिंटर उघडून फिजिकली क्लिन करावे लागू शकते, प्रिंटर दीर्घकाळ वापरला नसल्यास.(लेजर जेट मध्ये हा प्रॉब्लेम येत नाही). युट्युबवर व्हिडिओ असतात याचे, पण परत ते काम योग्य टूल्स आणि कसबेने करता आले पाहिजे, अन्यथा सर्व्हिस सेंटरमध्ये प्रिंटर नेणे उत्तम.

काल मी कार्ट्रिज बदलत होते तर खोके उघडल्यावर तिला दोन बाजुनी दोन लाल प्लास्टिक चे तुकडे होते. ते कसे काढावे समजेना पण हळूच काढले पेशन्सने व फिट केले एकदम मस्त प्रिंटा आल्या. डिपार्ट मेंट ने दया येउन एक बॅक अप पण दिली. त्यामुळे सध्या आधीची एक फिकट वाली व ही एक अश्या दोन बॅक अप झाल्या व एक नव्या नवेली प्रिंटर मध्ये आहे. ऑल सेट.

वॅक्युम क्लीनर नाही होऊ द्यायचाय जो फक्त फुगे फुगवायला वापरतो>>>> रिअली?
>>>
नाही असे काही नाही. सध्या स्विमिंगची क्रेझ आहे फार घरात. तर स्विमिंग रिंग फुगवायलाही वापरतो.

वॅक्युम क्लीनरसाठी हा धागा वापरू शकता
https://www.maayboli.com/node/76732

महिना सरासरी किमान ५० प्रिंट्स असतील तर प्रिंटर घ्या >>> एखादा महिना होतीलही. पण वर्षाला सहाशे वा गेला बाजार चारपाचशे ईतक्या प्रिंट निघतील का खरेच हे चेक करायला हवे. सोय, गैरसोय, आर्थिक बाबी सर्वांचा विचार करायला हवा.

एक थोडे अवांतर पण प्रिंटर गरजेशीच संबंधित -
मुलीची शाळा बदलून सीबीएससी बोर्डचे आईसीएसई केले.
असे ऐकून आहे या बोर्डाला प्रोजेक्ट खूप असतात. त्यात प्रिंट्सची गरज जास्त लागू शकते का?
अर्थात सध्याच्या ऑनलाईन शिक्षणाची डिमांड वेगळी असेल, पण रेग्युलर स्कूल सुरू झाल्यावर ईनजरल ईथल्या पालकांचे काय अनुभव आहेत?

महिना सरासरी किमान ५० प्रिंट्स असतील तर प्रिंटर घ्या.>> थोडक्यात हे प्रिंटर प्रकरण कारसारखे आहे. खुप वापर असेल तरच घ्या. नाहीतर ओला जिंदाबाद.

पण रेग्युलर स्कूल सुरू झाल्यावर ईनजरल ईथल्या पालकांचे काय अनुभव आहेत?>> मुलगी आहे आयसीएसई बोर्डाच्या शाळेत. पण आतापर्यंत प्रोजेक्टसाठी भरपुर प्रिंट काढण्याची वेळ कधीच आली नाही. अर्थात हे शाळेवरही अवलंबुन असु शकते.

प्रिंटर विकत घेण्यापेक्षा आजूबाजूच्याचा व्हाट्स अप नंबर घेऊन पीडीएफ पाठवून प्रिंट्स घेणे स्वस्त पडते. फक्त जाऊन आणावे लागते.

बिल्डींगमध्येच. कोरोनाच्या नियमानुसार बंदचालू होत राहतो. चालू असताना रिंग फुगवायची. बंद असताना हवा काढून कपाटात ठेवायची. वॅक्युम क्लीनर झिंदाबाद.

ऊप्स हा धागा प्रिंटरचा आहे. प्लीज वॅक्युम क्लीनर धाग्यावर विचारा हे

आज पासून तीन दिवस अमॅझॉन प्राइम डे सेल आहे. त्यात सबकुछ प्रिंटर रु. ३२९९ पासून आहेत. एकदा बघून घ्या. मुलांची हौस पूर्ण होईल.
प्रिंट स्कॅन कॉपी सर्व होते म्हणे. मी टाइम्स मध्ये जाहिरातीत बघितला.

अमा धन्यवाद, चेक करून बघतो.
हौस सध्या मुलांना नसून त्यांच्या आईला त्यांच्यासाठी प्रिंटरची गरज वाटत आहे.
पण घरात असे उपकरण आले की मुलं हौस भागवणार हे नक्की

माझे मत पण लेझर प्रिंटरला, जर घ्यायचाच झाला तर. शाईवाले जरा प्रिंट काढायला उशीर झाला तर मेले वाळतात व शाया महाग.

सद्ध्या सर्व मुलांच्या महागड्या शाळा बंद करण्याची योग्य वेळ आहे. होम स्कूलींग किंवा चक्क मराठी स्वस्त शाळेत मुलांना घालायचं. मग कितीही प्रिंटर्स घ्यायला परवडतील.

Pages