ऑनलाईन शिक्षणासाठी घरगुती प्रिंटर कुठला घ्यावा?

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 July, 2021 - 06:44

ऑनलाईन शिक्षणासाठी घरीच वापरायला म्हणून प्रिंटर घ्यायचा आहे.
कुठल्या टाईपचा, फीचर्सचा, ब्रांडचा प्रिंटर घ्यावा हे प्लीज सुचवा.

मुलांना नोटस देतात ज्या सध्या टॅब वा लॅपटॉपवरच वाचाव्या लागतात. तो स्क्रीन टाईम वाचवायला प्रिंटर घ्यायचा आहे. तसेच एकदा प्रिंट केले की त्या नोटस पुन्हा पुन्हाही वाचता येणे शक्य आहे. नंतर ईतरांना शेअरही करता येतील. एकूणात बराच स्क्रीन टाईम कमी होईल.

सध्यातरी कलर प्रिंटर घ्यायचा आहे हे नक्की आहे. बाकी काय काय फीचर्स गरजेचे पडू शकतील भविष्यात याची सध्या कल्पना नाही मला. झेरॉक्स स्कॅनर वगैरे एकत्र असलेला घ्यावा का? की आणखी काही?

ईथे कोणी मुलांसाठी घेतला असेल तर प्लीज अनुभव शेअर करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Epson EcoTank L3110 घ्या सर. 11,200 रुपयाला अम्माजान कडून मागवू शकाल. इंक रिफिल करायची झंझट नाही.
झेरॉक्स, स्कॅनर पण आहे त्यात.

प्रिंटर+स्कॅनर+कॉपीयर हे कॉमन आहे छोट्या प्रिंटर्स मध्ये.
तेच घ्यावे.

इन्क कार्ट्रीज, इन्क टॅंक आणि लेजर असे तीन पर्याय आहेत.
पहिला सगळ्यात स्वस्त (~5 हजार) दुसरा जरा महाग (~12 हजार) आणि तिसरा अजून महाग (~ 20 हजार).

खूप पेपर्स प्रिंट करायचे असतील आणि कलर क्वालिटी एवढी महत्वाची नसेल तर लेजर.
रोजचे साधारण दहा पंधरा पेपर्स प्रिंट करायचे असतील तर इन्कजेट.
यात इन्क कार्ट्रीज हे वापरात नसले की इन्क टॅंकच्या तुलनेत लौकर वाळतात. जास्त दिवस वापर नाही केला (~3 -४ आठवडे ) तर इन्क टॅंक हेड पण वाळतात. उघडून हेड क्लिन करणे, मेडिकल शॉप मधुन इंजेक्शनचे सिरींज विकत आणुन घट्ट झालेली शाई ट्युब्स मधून शोषून घेणे वगैरे करावे लागते.
अन्यथा रिपेअरवाल्या कडे घेऊन जावे लागते.

कार्ट्रीज याही पेक्षा लौकर वाळतात, ८-१० दिवसात, आणि ओल्या मऊ फडक्याने पुसून कधी चालतात कधी बदलावे लागतात. यात जास्तीत जास्त कार्ट्रीज बदलावे लागेल, रिपेअर वाल्याकडे जायची गरज नाही. पण कार्ट्रीजची किंमत मोजावी लागते.

तेव्हा इन्क टॅंक काय किंवा कार्ट्रीज काय, गरज नसली तरी आठवड्यातून दोन कलर प्रिंट काढत रहावे.

इन्क टॅंक मध्ये इन्क बॉटलस् विकत घेऊन त्या टॅंक मध्ये भराव्या लागतात तर कार्ट्रीज मध्ये पूर्ण कार्ट्रीज बदलावे लागते जे तुलनेत महाग पडते. दीर्घ काळाने इन्क टॅंक प्रिंटरची जास्तीची किंमत वसूल होते.

इंटरफेस:
घरी लॅपटॉप आहे तिथेच प्रिंटर ठेवायला काही हरकत नसेल, सरळ मोबाईल फोन वरूनच प्रिंट करायचा हट्ट नसेल तर साधा USB इंटरफेस असलेला प्रिंटर पुरेसा आहे. यात USB केबल ने प्रिंटर लॅपटॉपला जोडावा लागेल.

लॅपटॉप एकीकडे आणि प्रिंटर लांब कुठे / दुसऱ्या खोलीत ठेवायचा असेल, मोबाईल वरून प्रिंट करायचे असेल तर WiFi प्रिंटर घ्यावा, ज्यात WiFi Direct print असेल. घरी ब्रॉडबँड राऊटर असेल तर WiFi network प्रिंटर म्हणुनही सेट अप करता येते, ऑफिस मधून / बाहेरून प्रिंट कमांड देणे वगैरे.

Epson EcoTank L3110 घ्या सर. >>
माझ्याकडे याचाच भाऊ L3150 Wifi आहे.
पहिल्या लॉकडाऊन मध्ये दोन महिने वापरला गेला नाही तेव्हा ते सिरींज आणुन ट्युब साफ सफाई वगैरे करावे लागले.
बाकी चांगला अनुभव आहे Epson EcoTank चा.

आमच्याकडे Epson ची सर्व्हीस सेंटर्स कमी आहेत, रिपेअरला वेळ लागतो, तुलनेत HP सर्व्हीस लौकर मिळते, पण Epson जास्त चांगला आहे असे सांगितले होते, मी घेताना माझ्या विश्वासु डीलरने. मलाही Epson प्रिंटर चांगला वाटला.

इन्क कार्ट्रीज प्रिंटर मध्ये इन्क कार्ट्रीज बदलण्याऐवजी रिफिल करून देणारे सुद्धा असतात, काही लोक स्वतः करतात म्हणे.
पण त्याने प्रिंट क्वालिटीवर फरक पडतो का वगैरे कल्पना नाही. नसेल फार फरक पडत तर तो स्वस्त पर्याय आहे.

देवाचं नाव घ्या आणि घेऊन टाका कुठला तरी. पुढे कार्ट्रिजेस महाग पडू लागल्या कि जवळपास कुठे प्रिंट्स काढून ठेवतात तिथून प्रिट्स काढून घ्याव्यात. हल्ली व्हॉटसअ‍ॅप वर आपल्याला हवे ते पाठवता येते. तिथे जाईपर्यंत प्रिंट्स काढून झालेल्या असतात. त्यानंतर आपला धूळ खात पडलेला प्रिंटर ओएलएक्स वर विकला जातोय का हे बघावे.

इन्क कार्ट्रीज प्रिंटर मध्ये इन्क कार्ट्रीज बदलण्याऐवजी रिफिल करून देणारे सुद्धा असतात, काही लोक स्वतः करतात म्हणे.
पण त्याने प्रिंट क्वालिटीवर फरक पडतो का वगैरे कल्पना नाही.>>> प्रिंटर नोझल खराब होते.

अगदीच गरज नसेल तर प्रिंटर विकत घेऊ नका.

मी घरगुती वापरासाठी 2011मध्ये hp चा all in one with wifi घेतला होता. पण लवकरच लक्षात आले की घरात इतक्या प्रिंटस ची गरज लागत नाही.
3/4 वर्षे चांगला चालला मग ते इंक रिफील करुन वैगेरे पण 1 वर्षभर चालला. फक्त स्कँन करण्यासाठी सध्या वापरत आहोत. बाकी घराजवळच्या दुकानात 2 रुपयात प्रिंट किंवा झेरॉक्स मिळते आणि आता हेच मत आहे की खूप वापर नसेल तर प्रिंटर विकत घेऊ नये.

रुन्म्या,

मला साद द्यायला फारसं जमत नाही. मी 'प्रति'सादक आहे.

तर, आताचं "ऑनलाईन" शिक्षण याबद्दल एक धागा काढ, जरा जास्त लिहिता येईल तिथे.

त्या मोबाईलच्या स्क्रीनवर ही पोरं डोळे फोडतात, त्यात तो मास्तर कॅमेरा लावून फळ्यावर लिहितो. कधी चुकून पॉवरपॉइंट वै असेल तर इतके बिनडोक फाँट साईझेस वापरतात की .. असोच. तुझ्या नव्या धाग्यावर लिहिन.

तर प्रिंटर.

हे मास्तर लोक अस्तात ना, यांच्या ज्या काय "नोट्स" येतात, ते सगळे आपल्याला सामान्यतः माहिती नसलेल्या पण साधारण सोप्या पुस्तकाचे फोटो यांच्या पीडीएफकन्वर्टर अ‍ॅप वरून तयार केलेले असतात. त्याचा प्रिंटाऊट काढण्यापेक्शा, सोप्या २ आयडिया आहेत.

१. मास्तरला पटवून त्या पुस्तकाचे नांव माहिती करून घ्या, अन डायरेक्ट पुस्तक विकत आणा.
२. गूगल वर त्यातली वाक्ये टाईप करून नक्की कुठल्या पुस्तकातली आहेत ते बघा.
अन,
३. शेजारपाजारच्या झेरॉक्सवाल्याकडून छापून घ्या. ४० पानं छापायचे फारतर ४० रुपये पडतील, पण इंकजेट कलर प्रिंटर नावाचा "जिलेट रेझर"** विकत घेऊ नका.

शाळेत तुम्ही शिक्षकांनी फळ्यावर लिहिलेलं वहीत उतरवून घेत होतात की नाही? मग इथे "नोट्स" चा प्रिंटाऊट कशाला ** ***ला हवाय? नोट्स काढ की भाऊ लेक्चर ऐकताना.
तिथे तरी पुन्हा लेक्चर ऐकता येत नसे. हे रेकॉर्ड् करून शम्भरदा ऐकता येतंय.

** जिलेट रेझर : गिव्ह देम द रेझर अँड सेल देम द ब्लेड्स, अशी या कंपनीची मार्केटींग स्ट्रेटेजी आहे. रेझर स्वस्त अस्तो. २-४ कार्ट्रिजेस फ्री असतात सोबत. एकदा तुम्हाला जिओच्या फुकट नेटसारखी याची सवय झाली की मग घी देखा मगर बडगा नही देखा वाली गम्मत होते.

फक्त टेक्स्ट नोट्स काढायच्या असतील तर सरळ विदाउत पोस्ट स्क्रिप्ट वाला ब्लॅक लेसर प्रिंटर घ्यावा. त्यातही स्कॅन कॉपी सोय असते. लेसर कार्ट्रिज जास्त दिवस चालते. प्रिंट क्रिस्प असतात. टोनर रिफिल करता येतो. तोही स्वस्तात रीफिल होतो. फार दिवस बंद राहिला तरी पावडर इंक असलेने वाळत नाही. बाहेर कुठे झेरॉक्स कॉपी मागितल्या तर प्रिंतरवर काढून देता येतात. अगदीच रंगीत चित्रे नाही पण आकृत्या आणि ब्लॅक व्हाईट फोटो येतात त्याच्यावर. रंग स्क्रीन वर बघायचे. हा का ना का.

घेऊ नये असं माझं मत आहे.अगदीच प्रिंटिंग चं दुकान 50 किलोमीटरवर असेल तर ठिके.
>>म्हणजे प्रिंट काढायला 50 km जाणार का ऋन्मेष??

मी पण विचार केला , घरी प्रिंटर ची गरज आहे का? पण मुले लहान वर्गातच आहेत . पहिली ते दहावी व पुढे बारावी परेन्त होमवर्क व प्रॉजेक्ट साठी लागेल. खूप प्रिंटिन्ग मटेरिअल लागते. किवा स्टेनसिल्स वगैरे प्रिन्ट करून रंग भरणे व्गैरे करता येते. फॅन्सि ड्रेस चे पॅटर्न वगैरे पन प्रिन्ट करून घेता येतात. मुले ग्रेजुएशन्स साठी बाहेर पडे परेन्त प्रिंटर लागेल. तेव्हा प्रिन्ट स्कॅन झेरॉक्स वाला घ्या. कधी कधी शाळा मिस झाल्यास नोट्स नुसत्या वह्या मागवून झेरॉक्स पण करता येतात.

घरा मध्ये एक आयटी कोपरा करून त्यात हे सर्व मुलांचे लॅपटॉप व प्रिंट र चे सामान असे नीट ठेवता येइल. म्हणजे पेपर व कार्ट्रिज वगैरे. एक एक्स्ट्रा कार्टिर्ज न उघडलेली घरात बॅक अप म्हणून नक्की ठेवा. कारण रविवारी रात्री नौ ला मुलांच्या प्रॉजेक्ट लक्षात येतो व प्रिंट र मधली इंक संपते. ए फोर साइज चे दोन तरी पुडे एक वापरातला व एक बॅक अप ठेवा. कारण परत तेच कारण त्यांची रडकी हवाल दील तोंडे बघवत नाहीत
इंक संपली पेपर नाही वगैरे त्यांना समजत नाही.

फोटो प्रिंट सुविधा वाला घेतल्यास प्रिंट घेउन फोटोंचे कोलाज वगैरे करता येइल मुलांच्याखोली साठी. हा पुढे फार ट्रेझर आयटम होतो. मुले कॉलेज ला गेली की.

माझ्या कडे दोन प्रिन्टर एक विकत घेतलेला व एक फुकट स्कीम मध्ये मिळालेला एकदाही वापरला गेला नाही व अक्षरशः घराबाहे र ठेवुन गार्बेज वाल्याला दिला. गरजच पडत नाही. अगदी लागल्यास ऑफिसातून किंवा पीडी वर डॉक्युमेंट घेउन स्टेशन पाशी जाउन प्रिन्ट आणतो.

तुमच्या ऑफिसात आयटी गाय असेल त्याला विचारा. आमच्याकडे पण साध्या साध्या प्रिंट कामांसाठी स्वस्त व सेकंड हेंड प्रिंतर लीज केलेले म्हणजे भाड्याने घेतलेले आहेत. तसा एखादा घेउन सहा महिने किती खरच गरज आहे ते तपासता येइल व मग घेता येइल. भाडे फार नसावे.
ह्यात कार्ट्रिज पण रिफील असतात. हे पण आयत्या वेळी मान टाकतात. धुरकट प्रिन्ट येते.

एक जुनी आठवण आरारा ंच्या पोस्टी नुसार. मी अगदीच सहावी सातवीत असताना आमचे काका व कुटुंब लोकमान्य नगर मधले कुठे तरी गेले होते म्हणून आम्ही आजीची काळजी घ्यायला बॅग भरून तिथे राहिलो होतो. तिथून मी डेक्कन ला शाळेत येत असे व बॉटनी पक्षी जीवशास्त्राची वही हरवली. मग घरी बोलणी खाल्लीच. पण नेक्स्ट डे मैत्रेणीची आणली. मग बाबा तिथे पलंगावर ठिय्या मारून बॅग वर नवी वही ठेवुन बसले व मैत्रीणीच्या वहीतून नोट्स जवळ ज्वळ अर्धी वही लिहून काढली. तेव्हा मला ती गंमतच वाटली होती आता वाट्ते ती वही ठेवायला हवी होती. ग्रेट पेरेटिन्ग लेसन लर्न्ट. अक्षर पण छान होते त्यांचे त्यामानाने माझे अगदी डेव्हलपिन ग टाइप.

वाचतोय. नोट करतोय.
प्रिंटर घ्यावा की न घ्यावा याचीही एकदा चर्चा करायला हवी घरी.
ईथे विचारायच्या आधी बायकोला महिन्याला किती प्रिंट लागतील असे विचारलेले तर ५०-१०० असे उत्तर मिळाले. चेक करतो एकदा सर्व पर्याय आणि मग तिला ठरवायला सांगतो खरेच घ्यावा की न घ्यावा.

@ आरारा, हो ऑनलाईन क्लासेसचा छोट्या मुलाबाबत मोठा प्रॉब्लेम झाल्याने त्याचा एक वेगळा धागा काढायचाच होता. तुम्ही म्हणता तसे मग सर्वसमावेशक काढतो. आणि प्रतिसादांत लिहितो.

गेल्या वर्षी लॉकडाऊन मध्ये घराबाहेर जाऊन 'हव्या त्या वेळी' प्रिंटा मिळवणे जमत नसे. म्हणून एच्. पी चा डेस्कजेट ३६३० घेतला होता. कलर आहे. वायफाय, झेरॉक्स, स्कॅन इ. आहे. फोनवरून, दुसर्‍या संगणकावरून वायरने न जोडताही थेट प्रिंट देता येते. शाळेच्या आणि घरगुती वापरासाठी बरा आहे. तसा शाईवारी महाग आहे. त्या प्रिंटरची एक खोड आहे - नवी शाई भरली की प्रत्येकवेळी एक नमुना पान तो स्वतःच छापून बघतो. तेवढी शाई आणखी वाया जाते. (काय गरज आहे या आगाऊपणाची? आम्हाला वाटले तर आम्ही घेऊ की नमुना छापून!) यावर्षी आम्ही सगळ्या पालकांनी शाळेच्या मागे धोशा लावून लावून सगळ्या आवश्यक शीट्सच्या हार्डकॉपीज् पोस्टाने पाठवणे शाळेला भाग पाडले. त्यामुळे यावर्षी प्रिंटर तसा झोपूनच आहे.

यावर्षी आम्ही सगळ्या पालकांनी शाळेच्या मागे धोशा लावून लावून सगळ्या आवश्यक शीट्सच्या हार्डकॉपीज् पोस्टाने पाठवणे शाळेला भाग पाडले. त्यामुळे यावर्षी प्रिंटर तसा झोपूनच आहे.
<<
तुमच्याकडून फी वसूल करताहेत ते लोक. इतना देना तो बनताहिच है. त्यांना बल्क प्रिंटिंग उच्च क्वालिटीत परवडेल.

आय लव्ह यू, फॉर द 'धोशा लावणे'

(काय गरज आहे या आगाऊपणाची? आम्हाला वाटले तर आम्ही घेऊ की नमुना छापून!)
<<

तुमचं नशीब की तुम्ही भरलेली शाई तो वापरू देतो. प्रिन्टरने शाई फेकून देणे अन तुमच्याकडून पैसे वसूल करणे = जिलेट रेझर.

बाकी कार्ट्रिज अलाइनमेंट, सीएमवायके चे प्रपोर्शन, इत्यादी चेक करण्यासाठी प्रिंटर हे करतो. ह्यूमन व्हिजुअल कन्फर्मेशन आवश्यक असते.

गजानन, एवढी शाई लागते त्या प्रिंटरला? की बरेच पेपर्स प्रिंट व्हायचे?

माझा प्रिंटर दाखवतोय की मी एकंदर 936 कृष्णधवल आणि 524 रंगीत प्रिंट्स घेतलेय एकुण 1464 पेजेस.
आता पर्यंत एकदा काळी शाई टॉप अप केली, तीही त्याची टॅंक १/४ वर आली होती म्हणुन, नसते टॉप अप केले तर अजून संपली नसती. आणि रंगीत शाया अजून अर्ध्याच्याही वर आहेत.

मानव, कार्ट्रिजवाला आहे. सुरुवातीला मला वाटते साधारण पन्नास ते साठ रंगीत पाने निघाली असतील (म्हणजे एवढ्या पानांसाठी रंगीत शाई पुरली.) त्यानंतर नवीन रंगीत शाई टाकली, सलग छपाई होत नसल्याने हिशेब ठेवता आला नाही, पण ती लगेच संपली असे वाटले.

पोरांच्या शाळेच्या प्रोजेक्टांमध्ये भरगच्च रंगीत पानं असतात, तेही आहे. पण तरी महाग वाटले. त्यामानाने कृष्णधवल शाई बरीच चालली आहे.

आरारा: ते नमुना पान छापले जाते ते आपण स्कॅनरच्या काचेवर ठेवून द्यावे म्हणजे प्रिंटर त्याप्रमाणे अ‍ॅड्जस्ट करतो असे त्याच्या मॅन्युअलमध्ये वाचले होते. पण तसे करूनही काही वेळा तीन-चार अशी पाने छापल्याशिवाय प्रिंटर पुढेच सरकत नाही. याचे कारण कळत नाही.
(आणि बहुतेक वेळा कामाच्या मिटिंगमध्ये असताना पूज्य शाळेला प्रिंटची तातडीची निकड आलेली असते.)

कॉन्स्पिरसी थिअरीज ना तोड नाही.

गजानन, ५०-६० पानात रंगीत कार्ट्रीज संपत असेल, तर इन्क टॅंक चांगलाच परवडतो म्हणायचे. किमान १५०० रंगीत पेजेस निघतील शाई संपायला, आणि १००० कृष्णधवल. चार शाईच्या बाटल्या १५०० ₹ला ओरिजिनल इप्सन.

त्यापेक्षा नोट्स पीडीएफऐवजी .Text .txt. File मध्ये करा. चित्रे एकदा पाहिली की नंतर हवीतच असे नाही. ( सायन्ससोडून). मग ती पेन ड्राईवमध्ये ठेवा. टीवीला जोडली की टीवी दाखवतो मोठ्या स्क्रीनवर टेक्सट फाईल.
तीच फाईल वाचून ऐकवणारी apps आहेतच. टेक्सट फाईल उघडता येणे हे ब्राउजरची अंगभूत वस्तू आहे हा एक फायदा.

ते प्रिंट टेस्ट पेज ऑफिस प्रिंटर वर व्हायचे.ऑन केल्यावर पहिलं बटन बहुतेक प्रिंट टेस्ट पेज चं होतं.ते आपोआप दाबलं जायचं.(अर्थात तुमची केस वेगळी असेल,)

कार्ट्रिज बदलली की प्रॉपर्टीज मध्ये जाउन प्रिंट टेस्ट पेज करावेच म्हणजे सर्व सेटिन्ग नीट आहे का ते कळते. आता हे फंक्षन आटो मेट करून टाकले असेल.

इंक वाचवायची अजून एक् ट्रिक आहे ती म्हणजे साधे रोजचे ब्लॅक व्हाइट प्रिट घेताना प्रॉपर्टीज मध्ये जाउन एक्नो मोड सिलेक्ट करायचा.
१२०० व ६०० डीपी आय अश्या दोन ऑप्शन असतात. भारी पेपर वर बॉसचे पत्र असल्यास १२०० सेटिन्ग ला करावे नाहीतर ६०० डीपी आय चालून जाते.

माझी प्रायवेट लिमिटेड कंपनी असतना मी लेटर हेड वर्ड मध्येच डिझाइन करून ठेवले होते. इशू आला की तडक रिझोलुशन चे पत्र पत्रे लगेच
ड्राफ्ट करून प्रिंट करायची. दुरंगी केले होते.

झाइरात एजन्सीत ले आउट कन्फर्म केल्यावर एक दोन टेस्ट प्रिंट घ्यायला लागत तेव्हा ती ऑपरेटर इक्नो मोड प्रिंट द्यायची. आम्ही काय काहीतरी करेक्षन करायचोच.

आता तर आमच्या इथे एच आर / फायनान्स मध्ये जे हेवी ड्युटी स्मार्ट प्रिंटर आहेत त्याला आम्हाला हात लावायलाच देत नाहीत. एम्लॉई कार्ड लावून मग ऑपरेटर काढून देतो. बाकी रिफील कार्ट्रेइज बदलणे पेपर स्टॉक करणे माझ्या सिस्टिमच्या प्रिंटर्चे मी आवडीने करते.

हार्ड कॉपी हे प्रकरणच नाम शेष होत चालले आहे. आता कंपन्यांचे अ‍ॅन्युअल रिपोर्ट पण लिंकच येते इ मेल मध्ये. पूर्वी ह्याचे ड्राफ्ट वारी ड्राफ्ट निघत.

आमच्या घरी HP Deskjet 4530 आहे. तीन चार वर्षे झाली असावीत.

सतराशे साठ वेळा ईकडून तिकडे नाचवून, घरातील ज्युनिअर सदस्यांनी त्यावर football, प्लॅस्टिकच्या बॅट आपटून, ऊगीचच नको ते स्विच दाबून, त्यावर ताकतीचे प्रयोग करुनही, अजून तरी व्यवस्थित चालू आहे.

आधीच्या प्रिंटरला शाई वाळण्याचा आजार होता. पण याला तो नाही. कदचित आमचा वापर वाढला असायची शक्यता आहे.

रेग्युलर कामे ( प्रिंट, फोटोकॉपी, स्कॅनिंग) सगळी करतो. आम्ही फोटो कधी प्रिंट केले नाही त्यामुळे त्याविषयी सांगता येणार नाही.

तुर्तास घरी पटवलेय की प्रिंटरची किती गरज आहे हे जरा थांबून चेक करूया.
जेव्हा गरज पडेल तेव्हा प्रिंट आणायचे काम तूच करायचे हे तिने माझ्यावर ढकलले आहे, ज्याला मी तयार झालोय.
कारण उगाचच घाईगडबडीत घेऊन त्याचा वॅक्युम क्लीनर नाही होऊ द्यायचाय जो फक्त फुगे फुगवायला वापरतो.
पण जर खरेच वरचेवर प्रिंट घ्यायचा त्रास मलाच होऊ लागला तर नक्की प्रिंटर घेऊ. तेव्हा ईथली बरीच माहिती उपयुक्त ठरेल. कारण याआधी मला प्रिंटरचे हे ईतके प्रकार त्याच्या फायद्यातोट्यांसह माहीत नव्हते.

घराजवळच्या झेरॉक्सवाल्याचा email address / WhatsApp number घेऊन ठेव. कधीही प्रिंट लागली की त्याला WhatsApp Web वापरून किंवा इमेलने file पाठवून कशा प्रकारच्या कागदावर (साधा / फोटो पेपर) किती आकाराच्या कागदावर (A4 / A3), कलर की BW आणि किती प्रिंट हव्यात ते सांगून ठेवायचे. म्हणजे प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर आपला वेळ जात नाही. शिवाय पेन ड्राईव्ह नेऊन तो तिथे विसरण्याची किंवा सोबत फुकटात virus ची भेट मिळण्याचीही शक्यता राहत नाही. (Confidential file असेल तर मात्र इमेल / WhatsApp न करता pen drive वापरावा, म्हणजे ती file कायमस्वरूपी त्यांच्या system वर राहत नाही.)

Pages