२०२१ यु.एस.ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्स, सी.एच.आय.सेंटर, ओमाहा: एक अविस्मरणिय अनुभव!

Submitted by मुकुंद on 22 June, 2021 - 02:31

तुम्हा सगळ्यांना आनंदाची बातमी द्यायची म्हणजे या आठ्वड्यात आमच्यापासुन ३ तासाच्या ड्राइव्हिंग अंतरावर ओमाहा, नेब्रास्का इथे यु एस ऑलिंपिक्स स्विम टिमची निवड चालु आहे ऑलिंपिक्स ट्रायल्स मधे. तुम्हा सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की या शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकीटे मिळवण्यात मी यशस्वी झालो आहे. त्या दिवशी संध्याकाळच्या सेशनमधे केलब ड्रेसल( ज्याच्याकडुन अमेरिका टोकियो ऑलिंपिक्स मधे ७ सुवर्णपदके मिळवायची आशा ठेवुन आहे!) ५० मिटर्स सेमि फायनल व १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल पोहणार आहे! माझा मुलगा आदित्य जो गेली ७ वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करतो त्याचा केलब ड्रेसल हा आयडल आहे. त्याला माहीत नाही की मी त्याला ओमाहाला केलब ड्रेसलची रेस बघायला नेणार आहे! इट्स अ बिग सरप्राइज फॉर हिम! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला शनिवारच्या दोन्ही सेशनची तिकिटे जरी मिळाली असली तरी सगळी होटेल्स आधीपासुनच बुक झाली असल्यामुळे होटेल मात्र मिळाले नाही राहायला. म्हणुन मग सकाळच्या १० च्या सेशनला, ३ तासाचा ड्राइव्ह करुन जायला, सकाळी ६ लाच घरुन निघावे लागणार आहे. त्यामुळे त्याला आधीच सांगुन ठेवायला लागले आहे की तुला शनिवारी एक मोट्ठे सरप्राइझ आहे पण त्यासाठी तुला पहाटे ५ वाजताच उठुन तयार व्हायचे आहे व आपल्याला लवकर कुठेतरी जायचे आहे.
पण मग तेव्हापासुनच क्ल्यु साठी त्याचे १००० प्रश्न विचारुन झाले आहेत पण मीही ताकाला सुर लावुन दिला नाही आहे, सो ही इज स्टिल कंप्लिटली क्ल्युलेस! Happy

आणी एक, मीही त्या दिवशी ओमाहाच्या सी. एच. आय. सेंटरच्या स्विमिंग पुलवर कुठे मायकेल फेल्प्स दिसतो का ( प्रेक्षक म्हणुन!) याच्यावर एक डोळा ठेवणार आहे आणी असला तर त्याची स्वाक्षरी मिळवायचा प्रयत्न करणार आहे. झालच तर एन. बी. सी चा एक्स्पर्ट कलर समालोचक , १९८४ ऑलिंपिक्स मधला १०० मिटर्स फ्रिस्टाइल गोल्ड मेडल विनर व तेव्हाचा फास्टेस्ट स्विमर राउडी गेन्स याचीही स्वाक्षरी मिळवता येते का हेही बघणार आहे असल्या बाबतीत मग मी लहानाहुनही लहान होतो. Happy

तुमच्यापैकी अनेक जणांनी आदित्य पुढच्या ऑलिंपिक्स ट्रायल्स साठी सिलेक्ट व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यासाठी धन्यवाद!.

पण ते इतके सोपे नाही. मागे मी माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्स आठ्वणींच्या पोस्टमधे पण सांगीतले होते. स्विमींगमधे C, B, BB, A, AA, AAA and AAAA अश्या चढत्या मापाच्या टायमिंगच्या श्रेणी असतात. आदित्यचे 50 meters freestyle, 100 meters freestyle , 100 meters butterfly and 200 meters individual medley चे टायमिंग त्याच्या एज ग्रुप मधे या वर्षी AA श्रेणीचे आहे. ऑलिंपिक्स ट्रायल्स साठी तुमचे टायमिंग AAAA श्रेणीमधे असावे लागते. मायकेल फेल्प्सचे टायमिंग १६ व्या वर्षी AAAA लेव्हलचे होते. आदित्य सप्टेंबरमधे १५चा होइल. आम्ही पालक म्हणुन स्टिल प्राउड ऑफ हिम Happy

अहो काय सांगु तुम्हाला कालच्या ओमाहातल्या यु. एस. स्विम ट्रायल्सच्या आमच्या अनुभवाबद्दल? सिंपली सुपर्ब, अनबिलिव्हेबल अँड अनफर्गेटेबल एक्स्पिरिअंस!

आदित्यला कालचे सरप्राइज तर मस्तच होते, त्यात वादच नाही पण त्यावरही मात करणारी पुढची गोष्ट ओमाहाच्या सी एच आय सेंटरमधे काल घडली!

आम्ही घरी येइसपर्यंत काल रात्री एक वाजुन गेला होता म्हणुन इथे लिहीता आले नाही.

आठवत तुम्हाला मी आधीच सांगीतले होते की माझा एक डोळा मायकेल फेल्प्स कुठे दिसतो का यावर असणार होता व त्याची व राउडी गेन्सची स्वाक्षरी मिळवायचा मी प्रयत्न करणार आहे?
वेल, मिडिया कक्षात सुरक्षा अती कडक असल्यामुळे माझ्या त्या मनसुब्यावर पाणी फिरले.

पण तरीही सी एच आय सेंटरमधे आम्ही सकाळच्या १० च्या सेशनला ९ वाजताच पोहोचलो होतो. मला त्या सी एच आय सेंटरवरच्या फेस्टिव्ह वातावरणात पूर्ण भिजवुन घ्यायचे होते, फोटो काढायचे होते.
तसच संध्याकाळच्या सेशनलाही आम्ही ८ ऐवजी ७ लाच आत गेलो होतो.

त्या १ तासात संध्याकाळी सी एच आय सेंटरच्या एका भिंतिवर गेल्या इथल्या अनेक ऑलिंपिक्स ट्रायल्समधे विक्रम केलेल्या व विजेत्या खेळाडुंच्या नावाची यादी असलेल्या प्लॅकचा आम्ही फोटो काढत होतो. तिथे आम्हाला “टिम केलब ड्रेसल“ असे टी शर्ट घातलेले एक जोडपे त्या प्लॅकवर असलेल्या केलब ड्रेसलच्या नावाकडे पॉइंट करत फोटो काढत असताना दिसले.

त्यांना मग मी विचारले तुम्ही हा टी शर्ट कुठुन घेतला? तर तो माणुस म्हणाला की माझे नाव स्टिव्ह आहे व मी केलब ड्रेसलचा अंकल आहे!
मी व आदित्य चाट पडुन अवाकच झालो! तेवढ्यात त्याची बायको आमच्याजवळ आली व तिने मला विचारले की आम्ही भारतिय आहोत का? ती स्वतः सुद्धा भारतियांसारखी दिसत होती पण मी म्हटले कदाचित मेक्सिकन बाइ पण असु शकेल. मी म्हटले की मी अमेरिकेत गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासुन राहात आहे पण हो मी मुळचा भारतियच आहे. तर ती म्हणाली तिचे वडिल गोव्याचे व आई मुंबईची आहे! मला तिने विचारले की मुंबईत मी कुठला? मी म्हटले दादरचा. ती म्हणाली तिची आई कुलाब्यात राहायची.

हे असे आमचे संभाषण होत असताना मी त्या दोघांना सांगीतले की आज माझ्या मुलाला इथे केलब ड्रेसलची रेस बघायला आणुन मी त्याला फादर्स डे चे ( एक दिवस आधीच!) कसे अरली सरप्राइज दिले व आदित्य कसा गेली कित्येक वर्षे कंपॅटिटीव्ह स्विमिंग करत आहे व केलब ड्रेसल त्याचा कसा आयडल आहे.

ते ऐकुन गुड लक यंग मॅन! असे म्हणत त्या दोघांनी आदित्याचा हँड शेक केला.

मी त्या दोघांना म्हटले की आदित्यचा केलब ड्रेसल बरोबर फोटो काढुन घेणे त्याची लोकप्रियता व इथली सिक्युरीटी बघुन तर अगदी अशक्य गोष्ट वाटते तर निदान तुमच्या बरोबर तरी त्याचा एक फोटो मी काढु शकतो का?

तर ते मला म्हणाले की त्यांच्या स्वतःच्या वाट्याला सुद्धा या आठवड्यात केलब आलेला नाही व त्यांनी ग्रेशिअसली फोटो काढायला परवानगी दिली. इतकेच नव्हे तर त्या दोघांनी “ टिम केलब ड्रेसल“ च्या बाकीच्या त्याच्या सगळ्या नातेवाइक इन्क्ल्युडिंग केलब ड्रेसलच्या आई- वडिलांना भेटायला व त्यांच्याबरोबर फोटो काढुन घ्यायला त्यांच्या व्ही आय पी सेक्शन मधे यायचे आमंत्रण आम्हाला दिले!

ते ऐकुन आदित्यचे डोळे एकदम विस्फारले व आदित्यचा( आणी माझाही!) आनंद गगनात मावेनासा झाला.
पण लवकरच ८ वाजता केलबची आजची पहीली फायनल सुरु होणार होती म्हणुन मग मी म्हटले ती रेस झाल्यावर आम्ही त्या सेक्शनमधे आले तर चालेल का?

ते म्हणाले जरुर! जस्ट त्या सेक्शनमधे येउन त्यांना वेव्ह करा. ते सगळे त्या सेक्शनमधे शेवटच्या रो मधे बसलेले असतील.

केलब ड्रेसलने त्याची १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल सहज जिंकली व त्यानंतर सुरु होणार्‍या २०० मिटर्स वुमन्स बॅकस्ट्रोक फायनलच्या आधी आम्ही लगेच टिम केलब ड्रेसलची फॅमीली जिथे बसली होती तिकडे जायला पोबारा केला.

तिथे पोहोचल्यावर केलबचा अंकल स्टिव्ह याने आम्हाला लगेचच पाहीले व वेव्ह करुन आम्हाला जवळ बोलावले. त्याने केलब ड्रेसलच्या आईवडिलांना आम्ही कोण हे व आम्ही तिथे त्यांच्याबरोबर आदित्यचा फोटो काढायला येणार असल्याची आधीच कल्पना दिली होती.
पण तेवढ्यात वुमेन्स २०० मिटर्स बॅकस्ट्रोक स्पर्धा चालु होणार होती व शर्यत सुरु होण्याच्या आधीचा पिनड्रॉप सायलंस सुरु झाला.
तेव्हा केलबच्या आइने आदित्यला हग करुन जवळ घेतले व तिच्या बाजुला असलेल्या केलबच्या वडिलांच्या सिटवर ती रेस बघायला आदित्यला तिच्या जवळ बसवुन घेतले. मग म्हणुन केलबच्या वडिलांनी व मी मागेच असलेल्या भिंतीला टेकुन ती वुमेन्स २०० बॅकस्ट्रोकची रेस बघीतली! कॅन यु बिलिव्ह इट?

मग ती रेस संपल्यावर केलबच्या आईने आदित्यला म्हटले की केलब तर आता तुझ्याबरोबर फोटो काढायला इथे येउ शकणार नाही पण हे केलबच्या चेहर्‍याचे कार्डबोड कट आउट् तु हातात धर असे म्हणुन तिने केलबच्या चेहर्‍याचे कार्डबोर्ड कटआउट आदित्यच्या हातात दिले व मग मी आदित्यचा त्यांच्याबरोबर फोटो काढला व त्याच्या सगळ्या फॅमीली व फ्रेंडसमोरही (ते सगळे त्या व्हि आय पी सेक्शमधल्या वरच्या दोन रो मधे बसुन ) आदित्यचा फोटो कढायाला केलबच्या आइने मला सांगीतले व मी तसाही एक फोटो काढला! : )

असा हा कालचा दिवस आदित्यसाठी( व माझ्यासाठीही) एक मेमोरेबल अरली फादर्स डे ठरला!

लवकरच ते फोटो इथे अपलोड करीन.

बाकी ओमाहामधले सी एच आय सेंटरमधले यु एस ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्सचे जबरदस्त फेस्टिव्ह अ‍ॅटमॉसफिअर याबद्दल व कालच्या सगळ्या रेसचा मेमोरेबल अनुभव मी ऑलिंपिक्स बीबीवर लवकर टाकीनच.

आदित्यची गेल्या वर्षीची अंडर १४ डिस्ट्रिक्ट क्वालिफिकेशनची सेमिफायनलची ही एक क्लिप इथे टाकत आहे. माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्सच्या बीबी वर काहींनी ही क्लिप गेल्या वर्षी बघीतली आहे. पण इथे ती या बीबीच्या विषयासंबधीत आहे म्हणुन परत एकदा इथे टाकत आहे.

आदित्य लेन २ ( वरुन दुसरी लेन ) , निळ्या स्विम कॅप मधे आहे.

https://drive.google.com/file/d/1yCv1Kmr5Fqm2N7sApUr7ptonz7QyilT9/view?u...

सगळ्यांचे आभार!

च्रप्स, तुला फेडररची स्वाक्षरी मिळाली, नशिबवान आहेस तु!

(मी फेडरर- अ‍ॅगॅसीच्या २००४ यु एस ओपन क्वार्टरफायनल मधे फेडररला प्रत्यक्ष खेळताना पाहीले आहे. पण पावसामुळे फक्त पहिले तिनच सेट बघायला मिळाले. फेडरर २ सेट्स टु १ लिड करत होता व पावसामुळे मॅच थांबवली गेली. मला पण त्याची स्वाक्षरी मिळवायची होती पण नंतर ते दोघे लॉकर रुममधुन बाहेरच आले नाहीत .रात्रीचे ऑल्मोस्ट १० वाजले होते. त्यामुळे ते बहुतेक परस्पर होटेल मधे गेले असावेत.)

बाकी ओमाहाच्या स्विम ट्रायल्समधल्या जबरदस्त वातावरणाबद्दल व ज्या रेसेस मी प्रत्यक्ष बघीतल्या त्याबद्दल सुद्धा लिहायचा मी प्रयत्न करणार आहे.

शनिवारी संध्याकाळच्या फायनल्स मधे आम्हाला केलब ड्रेसलच्या १०० मिटर्स बटरफ्लाय फायनल व ५० मिटर्स फ्रिस्टाइल सेमिफायनलच्या रेसेस बघायला तर मिळाल्याच पण केलब इतकीच सेन्सेशनल अमेरिकन स्विमर केटी लडेकीची ८०० मिटर्स फायनलसुद्धा आम्हाला बघायला मिळाली. केटी लडेकी ४ इव्हेंट्स मधे पहिल्या नंबरवर क्वालिफाय झाली आहे. २०० मिटर्स फ्रिस्टाइल, ४०० मिटर्स फ्रिस्टाइल, ८०० मिटर्स फ्रिस्टाइल व १५०० मिटर्स फ्रिस्टाइल! अमेझिंग! हॅट्स ऑफ!

८०० मिटर्स फायनलमधे दुसर्‍या स्थानासाठी( दुसर्‍या नंबरवर येणारे सुध्हा ऑलिंपिक्ससाठी क्वालिफाय होतात) खुपच मस्त चुरशीचा व अटितटिचा लढा झाला. त्यात केवळ १५च वर्षाच्या चिमुरड्या केटी ग्राइम्सने बाजी मारली! तिच्या पुढे नक्कीच उज्वल भवितव्य आहे!

टोकियोमधे ऑलिंपिक्सच्या इतिहासात प्रथमच महिलांची १५०० मिटर्स फ्रिस्टाइल रेस होणार आहे.