प्रेमाचा चहा

Submitted by आरती शिवकुमार on 22 May, 2021 - 14:56

आईने बनवला प्रेमाचा चहा,
आणि म्हणाली लाडकी पिऊन तरी पहा.

यात मिसळली सौंसाराची गोडी,
गोड-कडू चव असेल कधी थोडी थोडी.

दुधात साखर विरघळल्या प्रमाणे,
तुला सौंसारात विरघळल्याचे,
आपल्या परिवारासोबत एकजूट राहायचे.

तुझ्या प्रेमाची गोडी त्यात येऊ दे आणि,
तुझ्या सौंसाराची गाडी दूरवर जाऊ दे .

तुझ्या प्रीतीचा सुगंध सर्वत्र पसरू दे,
तुझ्या आपुलकीचा रंग त्यात उतरू दे .

सतत वाहू दे तुझी माया,
त्यांच्यावर राहू दे तुझी छाया.

तू परिवारासाठी खूप वाहू दे,
तुझी छाप दुसऱ्यावर राहू दे.

तुला तिथे एकजीव व्हायचे,
परिवारा सोबत एकनिष्ठ राहायचं.

परिवारासाठी तू तडजोड करशील ,
आपला माणसासाठी तू धडपड करशील.

कामामध्ये तू राहशील व्यस्त,
रागामध्ये करू नको सर्व नष्ट.

तुझ्या लेकीला पण शिकव,
हा प्रेमाचा चहा आणि बोल,
लाडके पिऊन तरी पहा.

--आरती शिवकुमार

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users