प्रेमाचा चहा

प्रेमाचा चहा

Submitted by आरती शिवकुमार on 22 May, 2021 - 14:56

आईने बनवला प्रेमाचा चहा,
आणि म्हणाली लाडकी पिऊन तरी पहा.

यात मिसळली सौंसाराची गोडी,
गोड-कडू चव असेल कधी थोडी थोडी.

दुधात साखर विरघळल्या प्रमाणे,
तुला सौंसारात विरघळल्याचे,
आपल्या परिवारासोबत एकजूट राहायचे.

तुझ्या प्रेमाची गोडी त्यात येऊ दे आणि,
तुझ्या सौंसाराची गाडी दूरवर जाऊ दे .

तुझ्या प्रीतीचा सुगंध सर्वत्र पसरू दे,
तुझ्या आपुलकीचा रंग त्यात उतरू दे .

सतत वाहू दे तुझी माया,
त्यांच्यावर राहू दे तुझी छाया.

तू परिवारासाठी खूप वाहू दे,
तुझी छाप दुसऱ्यावर राहू दे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - प्रेमाचा चहा