मोजमाप कौशल्याचे

Submitted by केअशु on 19 May, 2021 - 03:48

चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार? चित्रकार अाहे तर कोट्यावधी रुपयांना विकले जाईल अशी चित्रे काढतो की जहांगीरमधे प्रदर्शन भरवण्याइतका दर्जेदार आहे की २-५ हजार रुपयाला म्हणेल ते पेंटींग बनवून देणारा छोटासा चित्रकार आहे? गायक आहे तर बॉलीवूडच्या सिनेमांसाठी गाईल इतका चांगला आहे की भजनी मंडळापुरताच मर्यादित आहे?
हे केवळ कलाक्षेत्रापुरतेच मर्यादित नाही तर तांत्रिक किंवा वाणिज्य अशा कोणत्याही क्षेत्रातही असे असू शकते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की तांत्रिक किंवा वाणिज्य क्षेत्रातील शिक्षणाच्या विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल मिळालेल्या प्रमाणपत्राचा आणि प्रत्यक्षात त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा संबंध असेलच असे नाही. तसा संबंध नसल्यानेच आपल्याला अनेकदा जिथे बीकॉम झालेला उमेदवार पुरेसा आहे तिथे कॉमर्सच्या थोड्याशा प्रशिक्षणाने प्रशिक्षित केलेला पदवीधर अभियंता काम करत असलेला दिसू शकतो. याचाच अर्थ त्या पदवीधर अभियंत्याला बीकॉम झालेल्या उमेदवाराइतके ज्ञान आहे. अशाचप्रकारे एखादी १२वी MCVC झालेली व्यक्ती निव्वळ जिज्ञासेतून त्याच्या शाखेतल्या तज्ञ डिप्लोमा किंवा पदवीधर अभियंत्याइतके ज्ञान असणारी असू शकते.
नोकरी शोधताना 'उमेदवाराला काय येतंय? किंवा त्याच्या ज्ञानाचा स्तर' हीच गोष्ट नोकरी देणार्‍यासाठी महत्वाची असते/असायला हवी. अशाप्रकारे शैक्षणिक प्रमाणपत्रावर उल्लेखित पात्रतेपेक्षा प्रत्यक्षातलं ज्ञान जास्त असेल किंवा कमी असेल तर ते मोजणार कसं?

सारांशाने आपल्याकडे कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वाधिक आहे किंवा आपला कल हा सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात आहे हे मल्टीटॅलेंटेड व्यक्ती स्वत: कसे तपासू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्याकडे कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वाधिक आहे?
प्रत्येक कलेचे/कामाचे ठराविक स्तर असतात.हे मैलाचे दगड(Milestone) वापरून कौशल्य जोखता येते.

आपला कल हा सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात आहे हे मल्टीटॅलेंटेड व्यक्ती स्वत: कसे तपासू शकते?
स्वतःचे मूल्यमापन करण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
त्यातील एक सर्वाधिक चर्चिला जाणारा पर्याय :-
जे काम(अर्थपूर्ण) करताना आपल्याला आनंद वाटतो, कितीही अडचणी आल्या तरी ते काम त्रासदायक वाटत नाही तिकडे आपला कल असतो.

लिंक्डईन या सोशल नेटवर्कने हा प्रश्न वेगळ्या रितीने सोडवला आहे.
तुमच्या नेटवर्कमधे असणारे इतर व्यावसायिक तुम्हाला किती ज्ञान आहे त्याप्रमाणे टॅग करतात. त्यात जर ते एखाद्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेले असले तर त्यांच्या टॅगला जास्त महत्व दिले जाते. अनेक जणांचे मत मोजून तुमचे प्राविण्य ठरते. आणि त्या त्या क्षेत्रात मग तुमचे मत इतरांसाठी महत्वाचे ठरते.

स्वप्निल अजय धन्स.
स्वप्निल हे स्तर मोजणारी काही टूल्स सुचवाल का?