रसमलई केक

Submitted by वर्णिता on 11 May, 2021 - 06:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

2 कप मैदा
1 कप मिल्क पावडर
1 कप पिठीसाखर
1 टीस्पून बेकिंग पावडर
अर्धा टीस्पून खायचा सोडा
4 टेबलस्पून तेल
3 टेबलस्पून बटर
1 कप दूध
इसेन्स

किंवा

सव्वा कप मैदा
2 अंडी
3/४ कप पिठीसाखर
१/२ कप तेल
१/४ कप दूध
१ टे स्पून बेकिंग पावडर
१/४ चमचा सोडा
इसेन्स

किंवा चांगल्या ब्रॅंडचे केक प्रीमिक्स.
1 कप प्रीमिक्स
अर्धा कप दूध
1 टेबलस्पून तेल

रसमलाई अर्धा किलो
जेल कलर (लेमन यलो)
व्हीप क्रीम

क्रमवार पाककृती: 

जर प्रीमिक्स न वापरता केक चा बेस करणार असाल तर ---
बटर आणि तेल एक प्लास्टिक कुंड्यात चांगले फेटून घ्यावी. पिठीसाखर आणि मिल्कपावडर मिसळून घ्यावी. दुसरीकडे एका कागदावर मैदा, सोडा, बेकिंग पावडर 3 वेळा चालून घेऊन ठेवावे. हे चाळलेले मिश्रण थोडे थोडे करत कुंड्यात घालून फेटावे. दूध, व इसेन्स घालावा. सतत फेट त रहावे. फुप्रो त छान फेटले जाते.

यापेक्षा अंड घातलेला केक किंवा प्रीमिक्स वापरून केलेला केक जास्त हलका होतो.

अंड घातलेल्या केकसाठी बॅटर करताना , मैदा, सोडा ,बे पावडर 2,3 वेळा चाळून घ्यावी. फु प्रोत हे चाळलेले मिश्रण घालून त्यात बाकीचे सगळे जिन्नस घालून फेटून घ्यावे.

हे करण्यापुर्वी एक पातेले/कुकर -- त्यात थोडी वाळू पसरून त्यावर स्टॅंड ठेवावा आणि बारीक गॅसवर झाकण घालून प्रिहिट करत ठेवावे.

आता फेटलेले बॅटर केक पॅन मध्ये तुपाचे बोट लावून त्यावर मैदा भुरभुरून ,तो सगळा झटकून घेऊन त्यात ओतावे. पॅन हलकासा आपटून घ्यावा. हवा राहू नये यासाठी. पातेल्यात / कुकरमध्ये ठेवून झाकण लावावे. हे पॅन बॅटर घातल्यावर साधारण अर्धे भरले पाहिजे. जास्त नको.
35 ते 40 मिनिटात बेक होते. गॅस बारीक हुन थोडा जास्त.
साधारण 35 मिनिटांनी झाकण काढून स्टिक केकमध्ये घालून बघावी. चिकटला नाही म्हणजे ओके.

जर प्रीमिक्स वापणार असाल तर
प्रीमिक्स, दूध, तेल घालून फेटावे , ह्याला फुप्रो ची गरज नाही. लगेच फेटले जाते.
पॅन मध्ये ठेवून (वरीलप्रमाणे) 15 मिनिटे बेक करावा.
हा लवकर होतो.

केक बेस तयार झाला की पॅन गार होत आला की पॅनच्या कडेने सूरी फिरवून ,केक बेस ताटलीत काढून घ्यावा. केक पूर्ण थंड होऊ दयावा. मग सुरीने अर्धा भाग हलकासा गोल फिरवत कापून घ्यावा. दोऱ्याने व्यवस्थित कापला जातो. हवे असले तर 3 भाग करावेत (आवडीनुसार).

20210511_155026.jpg

आता खालचा भाग आधी घेऊन त्यावर रसमालाईचे दूध चमच्याने पसरून घ्यावे. रसमालाईचे गोळे हाताने स्मॅश करून या लेअर वर पसरावे. क्रीमचा एक लेअर द्यावा.
केकचा कट केलेला दुसरा भाग त्यावर ठेवावा- - वरची प्रोसेस दूध आणि गोळे ठेवण्याची रिपीट करावी.

कुंड्यात क्रीम फेटून घ्यावे, कलर घालावा. व पूर्ण केकला कोटिंग करून घ्यावे. सुरवातीला क्रीम फासताना वेळ लागतो . क्रीम पातळ होऊ द्यायचे नाही. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे.
20210511_155111.jpg

नोजल वापरून हवे तसे डिझाइन करावे.

20210422_201719.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तितका
अधिक टिपा: 

बटर, दूध रूम टेंपरेचर ला असलेले घ्यावे.
बेकिंग पावडर, सोडा फार जुना वापरू नये.
गॅस वर पातेले प्रिहिट करताना गॅस मोठा ठेवून 5/7 मिनिटे करावे.
मावेत ही केक होतो, स्पॉंजी सुद्धा होतो पण कडेने खरपूस / ब्राउन होत नाही. ओव्हन/ ओटीजी मध्ये होईल. मी केलेला नाही. मावेत केलेल्यापेक्षा मला गॅसवरचा आवडला.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिणी
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच भारी दिसतोय केक! पण एकदम प्रो लोकांचं काम वाटतंय हे. आयता खायला मिळाला तर आवडेल टेस्ट करायला. भारतीय पदार्थांच्या चवीचे केक (रसमलाई, गुलाबजाम वगैरे) केक खाल्ल्याचं आठवत नाहीये कधी. त्यामुळे उत्सुकता पण आहे.

रश्मी, अनु,माऊमैय्या,सोनाली, अस्मिता, अमुपरी, सायो, स्वाती, केया,सिंड्रेला,नविना, रुपाली, अमितव, rmd,पिकू, भाग्यश्री, लंपन, पुणेकर,किल्ली, रानी सगळ्यांना धन्यवाद Happy

जाई, अश्विनी तुम्ही सुचवल्यामुळे रेसिपी लिहिली. ( माझा एकतरी धागा काढायचं स्वप्न पूर्ण झालं Proud )

मृणाली, देवकी, अंजू, अनिष्का नक्की या ,त्यानिमित्ताने भेटू , 3 लेअर केक करू. Happy

मैत्रेयी, माझा सुद्धा मी खालेल्यापैकी हाच फेवरीट आहे.

वावे, तुला रसमलाई केक खावासा वाटत नाही तसं मला गुजा केक नको वाटतो. नुसता गुजा खायला आवडतो पण केक फ्लेवर नको वाटतो. ह्याच रेसिपीत थोडे फेरफार केले आणि वर गुजा ठेवले की झाला गुजा केक. करून पहा.

भरत, हो गॅसवर छान ,खरपूस होतो. खरतर बेकिंग साठी मावे घेतला होता. आणि लाईतबील ही मावेचं जास्त येतं.

पराग, तुम्ही तर बेकिंग एक्सपर्ट आहात. ट्राय करून बघा देशी केक. रसमलाई केकवर रसमलाई गोळे हवेतच ,शास्त्र असतं ते. Happy
हा केक मी लोकडवून मध्ये केलाय. त्यामुळं जवळच्या 1,2 ठिकाणी च रसमलाई बघितली. नेहमीची छोटे गोळे वाली मिळाली नाही. ही फ्रेश होती पण चपटी ,बिस्कीट सारखी होती. मग तिचे टोपणाने भाग करून ठेवली.

मीरा, मामी, बेस केक अजिबात अवघड नाहीये. प्रमाणानुसार केला तर. नसेल तर पिल्सबेरी चं व्हॅनिला प्रीमिक्स आणून करून बघा. सगळं घरी केल्याचा फील येईल.

जिज्ञासा, मी अजिबात प्रो वगैरे नाहीये. मला जमतो म्हणल्यावर कुणालाही जमेल. फक्त मेजरमेन्ट कप कीट, spatula, knife अशा 2,3 वस्तू आणि 1,2 केक वर हात साफ झाला की झालं.

Pages